Wednesday 28 September 2011

Troubleshooting - पीसी सारखा रिस्टार्ट होत असेल तर ?

१) पॉवर कनेक्शन चेक करावे .

२) लो वोल्टेज मुळे पीसी रिस्टार्ट होत असेल .

३) पीसी मध्ये काही फाइल डिलीट झाल्या असतील .

४) Ram काढून परत स्वच्छ करून CPU मध्ये लावावी.

५) वाइरस मुळे ही पीसी सारखा सारखा रिस्टार्ट होत असेल .

६) SMPS चा ही प्रोब्लेम्स असू शकतो .

७) सॉफ्टवेर चा लोड पीसी घेत नसेल .

सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .

Troubleshooting - कीबोर्ड चालताच नसेल तर ?

१) सर्व प्रथम त्याचा कनेक्टर , केबल चेक करावी .

२) पीसी रिस्टार्ट करावा जेन्हे करून जर तात्पुरता प्रॉब्लम असले तर कीबोर्ड परत नीट चालतो .

३) कीबोर्ड चे लाक् (LOCK)चेक करावे .

४) किबोर्ड बटन साफ़ कराव्यात .

सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .

Troubleshooting - माउस नीट चालत नसेल तर ?

१) माउस साफ़ करावा . माउस च्या खालील बाजुस असलेला फ्लाप (cover) काढून आतील रबरी Ball काढून स्वच्छ करावा . माउस मधील रोलर वर चिकटलेली धुळ काढावी .

२) रोलर फिरत नसले तर माउस बदलावा.

३) माउस चा पोर्ट चेक करावा . तो CPU मध्ये नीट कनेक्ट झाला आहे की नाही ते पाहावे .

४) केबल मध्येच ब्रोकेन झाली असली तरी माउस चालत नाही .

५) पीसी रिस्टार्ट करावा जेन्हे करून जर तात्पुरता प्रॉब्लम असले तर माउस परत नीट चालतो .

सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .

निराळ्या तर काही उपयोगी वेबसाइट

१. www.statusdetect.com - या वेबसाइटवर आपण याहू मॅसेंजरवरील आपल्या 'इनव्हिजिबल' म्हणजेच 'अदृश्य' असलेल्या मित्रमैत्रीणींना पकडू शकता. २. www.yahoo.com - या याहूच्या वेबसाइटवर गेल्यावर याहूचे जे मुख्य पान उघडते त्यातील याहू या नावापूढे असलेल्या ' ! ' वर क्लिक केल्यास 'याहूहूहूहूहूहू.....' असा आवाज ऐकू येईल. लक्षात असू द्य की बर्‍याच वेळेस याहूची ही वेबसाइट सुरु केल्यास याहू इंडीया ही वेबसाइट उघडते, ज्यावर yahoo.com अशी लिंक दिलेली असते ज्यावर क्लिक करुन ती वरील वेबसाइट सुरु करा. ३. www.easycalculation.com - या वेबसाइटवर आपण वयाचे गणित पाहू शकता. ४. www.transferbigfiles.com - या वेबसाइटद्वारे आपण इतरांना मोठ्या साईझच्या फाईल्स पाठवू शकता. ५. www.downforeveryoneorjustme.com - या वेबसाइटवर आपण एखादी वेबसाइट चालू आहे का नाही ते पाहू शकता. ६. www.dontclick.it - इटलीच्या या वेबसाइटवर कुठेही क्लिक करायची गरज पडत नाही. म्हणजेच 'न' क्लिक करता ही वेबसाइट पाहाता येईल अशीच ती बनविली आहे. ७. www.pimpmysearch.com - या वेबसाइटवर आपण आपले नाव दिल्यास गुगल पुढील वेळेस इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केल्यास गुगल सदृश वेबसाइट सुरु होईल पण त्यावर गुगल एवजी आपले नाव असेल. ८. www.cooltoad.com - जवळजवळ सर्व भाषांतील गाणी डाऊनलोड करण्यासाठी हि एक चांगली वेबसाईट आहे. मुळात हि एक अशी वेबसाईट आहे जेथे कुणीही त्याला हवी असलेली गाण्याची फाईल [ mp3 ] इतकेच नव्हे तर कोणतीही आवाजाची फाईल ह्या वेबसाईटवर टाकू शकतो. ९. www.meebo.com - याहू, हॉटमेल, जीमेल इ. मॅसेंजरद्वारे चॅटिंग करण्यासाठी ते सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटर टाकणे (इंस्टॉल करणे)आवश्यक असते. याला पर्याय म्हणून www.meebo.com या वेबसाईटवर या सर्व प्रकारातील चॅटिंग कोणतेही सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये न टाकता करता येते. १०. www.howstuffworks.com - सर्व प्रकारच्या गोष्टी कशा काम करतात म्हणजेच त्यामागचे शास्त्रिय कारण व ते मानवाने त्यात वापरलेले कौशल्य याद्वारे ती वस्तु कशी बनली व ती कशी काम करते ही सर्व माहिती या वेबसाईट दिली आहे. ११. www.ehow.com - एखादी गोष्ट कशी हाताळायची अथवा कशी करायची अशा अनेक प्रनेक प्रश्नांची उत्तरे या वेबसाईट दिली आहे. १२. www.bugmenot.com - बर्‍याच वेळेस एखाद्या वेबसाइटवर गेल्यावर आपणास ती वेबसाइट पाहण्यासाठी त्या वेबसाइटचे मोफत सभासद व्हावे लागते आणि त्यानंतरच त्या वेबसाइट वरील आपल्या मोफत लॉगीन आयडी आणि पासवर्डने लॉगीन करता येते. हा सभासद होण्याचा वेळ वाचविण्यासाठी ही वेबसाइट उपयोगी पडते. १३. www.computerpranks.com - कॉम्प्युटरवर खोड्या करुन इतरांना फसविण्याचा आणि नंतर हसविण्याचा विचार करीत असाल तर या वेबसाईटवर तुम्हाला बरेच प्रोग्रॅम्स मिळतील, पण लक्षात असूद्या कुठलाही प्रोग्रॅम वापरण्याआधी त्याची संपूर्ण माहिती वाचा आणि मगच वापरा.

इंटरनेट (Internet)

१९६९ मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इंटरनेशनल संगणक नेटवर्क विकसित केले . जगातील छोट्या नेटवर्क ला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय . १९९२ मध्ये स्वित्झलंड येथे सेंटर फॉर उरोपिन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (www) आपल्या पर्यंत पोहचले . ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स , एनीमेशन , ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेल माध्यम होते . वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेट वर पहाणे शक्य झाले . आणि इंटरनेट २१ व्या शतकातील एक मेकांच्या सपर्काचे प्रभावी साधन बनले. इंटरनेट वायर, केबल, सॅटॅलाइट यांच्याशी जोडून बनले आहे . तर वेब इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या डाटा सही जोडून देतो ते वेब .इंटरनेट चा वापर खलील गोष्टी साठी सामान्यत केला जातो. सपर्क :- इंटरनेट द्वारे केलि जाणारी ही एक लोकप्रिय बाब आहे . तुम्ही ईमेल च्या द्वारे तुम्ही कुठल्या ही जगातील व्यक्तिशी संपर्क साधू शकता . आवडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी भाग घेवू शकता इतकेच नाही तर तुम्ही स्वतच वेब पेज म्हणजेच वेब साईट ही बनवू शकता . शोपिंग :- इंटरनेट च्या माध्यमातून तुम्ही शोपिंग करू शकता किवा एखादी वस्तु विकू ही शकता . बाजारात आलेल्या नविन वस्तुंची माहिती नेट मुळे आपणास बघायला मीळते. एलेक्ट्रोनिस्क कार्ड किवा डेबिट कार्ड वापरून तुम्ही ही खरेदी करू शकता . सर्चिंग :- एखाद्या विषयावर माहिती शोधणे इंटरनेट मुळे सोपे झाले आहे . जगातील कुठल्या ही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती हवी असल्यास ती आपणास इंटरनेट मुळे मीळु शकते . शिवाय इ-बुक मुळे कुठल्या ही ग्रंथालायाची बुक्स, पुस्तके आपणास नेट वर फ्री मध्ये वाचायला भेटतात . शिवाय ऑनलाइन न्यूज़ ही वाचायला किवा व्हीडीओ द्वारे बघायला मीळते. उदा . http://www.starmajha.com/ मग लगेच स्टार माझा न्यूज़ चेनल वेब पेज तुमच्या स्क्रीन वर ओपन होइल . त्यात न्यूज़ बातम्या संदर्भामधील माहिती आपण पाहू शकतो . मनोरंजन :- या विषयावर सांगाव तेवढ कमी आहे कारण या विषयावर इंटरनेट वर भरपूर माहितींचा खजाना आहे . संगीत , चित्रपट , मासिक तसेच आता ऑनलाइन चित्रपट ही आपण नेटवर पाहू शकतो . सध्या ऑनलाइन गेम्स ही नेट वर उपलब्ध आहेत . इंटरनेट आणि दूरध्वनी या दोन्ही यंत्रणा सारख्याच आहेत जश्या प्रकारे टेलेफोन ला टेलेफोन ची केबल जोडली जाते तशाच प्रकारे संगणकालाही इंटरनेट जोडले जाते . इंटरनेट ज्या वेळेस तुमच्या संगणका सोबत जोडले जाते तेव्हा तुमचा संगणक हा जगातील भल्या मोठ्या संगणकाचा भाग बनतो कारण त्या वेळेस आपण जगातील कुठल्याही ठिकाणी नेट माध्यमातून जावू शकतो .गूगल अर्थ एक अस इंटरनेट वरील साईट आहे की कुठल्या ही देशा मधून फोटो आपण पाहू शकतो . इंटरनेट बरोबर जोड़नी करण्यासाठी इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स (ISP) हे आपल्याला इंटरनेट जोड़नी साठी एक्सेस देते . हा एक्सेस लोकल नेटवर्क माध्यमातून किवा टेलेफोन माध्यमातुन असतो . बिनतारी म्हणजेच वायरलेस कनेक्शन इंटरनेट चे मोडेम मुळे मीळते. इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी संगणक ब्राउजर्स असणे गरजेच असत . यात माइक्रोसॉफ्ट इंटरनेट हे खुप लोकप्रिय ब्राउजर्स आहेत . संगणकाच्या डेस्कटॉप आणि प्रोग्राम्स मध्ये हे ब्राउजर्स आहेत . वेबसाइट चे नाव किवा URL ( यूनीफोर्म रिसोर्स लोकेटर्स ) माहिती असणे गरजेच आहे . सगणका मधील डाटा ची देवाण घेवाण करण्यासाठी वापरत येणार्या नियमाना प्रोटोकॉल असे म्हणतात. http:// हा सर्वसाधारण वापरात येणारा प्रोटोकॉल आहे . तर .com (.