Saturday 7 January 2012

Windows चे व्हर्जन कोणते हे कसे ओळखावे?

Start - Run याप्रमाणे क्लीक करून Run च्या बॉक्समध्ये खालील दाखविल्याप्रमाणे winver शब्द टाईप करा आणि Enter दाबा (किंवा चित्रात दाखवल्याप्रमाणे OKवर क्लीक करा.).



OK वर क्लीक करताच तुमच्यासमोर Windows चे नेमके व्हर्जन कोणते आहे हे दाखविणारी विंडो (खाली दाखवल्याप्रमाणे) अवतरेल.

ब्लुटुथ तंत्रज्ञान





आज ब्लुटुथ तंत्रज्ञान वेळोवेळी आपण वापरतो. मोबाईलच्या तसेच संगणकाच्या सहयोगी वस्तुंमधे तर या तंत्रज्ञानाने क्रांती घडवुन आणली आहे.
ब्लुटुथ तंत्रज्ञान हे संगब्लुटुथ हे नाव विसाव्या     शतकातील राजा हेराल्ड ब्लाटांड याच्या आडनावाच्या इंग्रजी भाषेतल्या सुसुत्रीकरणातुन आले आहे. त्याने युरोपातल्या अनेक टोळ्यांचे एकत्रीकरण करुन एकच साम्राज्य उभे केले होते. ब्लुटुथ तंत्रज्ञाने अगदी हेच केले आहे, वेगवेगळ्या कम्युनिकेशन मानकांना एकत्र करुन एक जागतिक दर्जाचे मानक बनवले आहे.
ब्लुटुथ तंत्रज्ञान फ्रिक्वेन्सी हॉपिंग स्प्रेड स्पेक्ट्रम नावाचे रेडिओ तंत्रज्ञान/मानक वापरते. हे तंत्रज्ञान वापरुन होणार्‍या माहिती प्रसारणाचा वेग कमाल १ मेगाबाईट प्रतिसेकंदापर्यंत असु शकतो. माहिती प्रसारणाचे अंतर किमान १ मीटर पासुन ते कमाल १०० मीटर पर्यंत असु शकते. हे तंत्रज्ञान प्रसारणार रेडिओ लहरींचा वापर करत असल्याने याचे वापरकर्ते एका रेषेतच असणे गरजेचे नाही.
ब्लुटुथच्या मायक्रोवेव्ह रेडिओ लहरींची मर्यादा 2.4 GHz ते 2.4835 GHz इतकी आहे. ही सर्वसाधारण मोबाईलफोन पेक्षा कमी आहे. त्यामुळे शरीराला होणार्‍या अपायांच्या तुलनेत ब्लुटुथ हे मोबाईल पेक्षा जास्त सुरक्षित आहे.

मोबाईलवर ब्लुटुथ वापरतांना सुरक्षेसाठी खालील गोष्टींचे पालन व्हावे.
१. ब्लुटुथ जेव्हा लागेल तेव्हाच चालु करा. वापर झाल्यावर ते आठवणीने बंद करा.
२. ब्लुटुथ नेहमी नॉनडिस्कव्हरेबल म्हणजे हिडन मोड मधे ठेवा.
३. ब्लुटुथ उपकरणांची कायमची जोडणी (पेअरिंग) करतांना वापरण्यात येणारा पिन हा पुरेसा लांब आणी अल्फान्युमरीक असावा.
४. अनोळखी जोडणीच्या विनंत्या अ‍ॅक्सेप्ट करु नका.
५.जोडणीची यादी वारंवार तपासुन पहा, एखादी अनोळखी जोडणी सापडल्यात ती काढुन टाका.
६. संगणकाशी जोडणी करतांना एन्क्रिप्शनचा ऑप्शन चालु ठेवाणकाधारीत उपकरणांमधले माहितीवहनाचे अत्याधुनिक आणी वैश्विक असे मानक आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने संगणकाधारीत वस्तुंच्या सहयोगी वस्तुंमधील केबलच्या जंजाळापासुन मुक्तता झाली आहे. दिवसेंदिवस या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे ते सर्वसामान्यांच्या आवक्यापर्यंत येण्याइतके स्वस्तही होत आहे. याचा वीज वापरही अत्यल्प असतो, त्यामुळे मोबाईलसारख्या वस्तुंमधेही हे अत्यंत उपयोगी ठरले आहे. दोन मोबाईलमधे तात्पुरते नेटवर्क तयार करुन माहीती पाठवणे, अथवा ब्लुटुथ हेडफोनने संगीत ऐकणे ह्या अगदी रोजच्या वापरातील गोष्टी झाल्या आहेत. तुमच्या संगणकाशीही ब्लुटुथद्वारे तुमचा मोबाईल सिंक्रोनाईझ होउ शकतो, जेणेकरुन तुमच्या मोबाईलवरील सर्व गोष्टींचा बॅकअप सारखा घेतला जात जाईल आणी तुमचा वैयक्तीक डेटा सुरक्षीत राहील.
 

खराब झालेल्या CD मधुन माहीती कशी घेणार


परवा साफसफाई करताना अडगळीत एक CD सापडली ती अलीबाबाच्या काळातली वाटली मला. कारण त्याच्यावर बर्‍यापैकी ओरखडे (Scratches) पडले होते. ती CD माझीच होती हे नक्की. पण  त्यात काय होते हे नव्हते माहीत मला . त्या CD ची हालत बघुन वाटत होते आता यातली माहीती Copy कशी करायची, कारण ओरखडे असलेल्या CD/ DVD वरील माहिती कॉपी होणे महाकठीण काम असते. त्यात जर Audio किंवा Video या प्रकारची १ च फाईल असेल तर ती ह्या जन्मी तरी कॉपी होणार नाही याची खात्री असते. मनात विचार आला की आपल्याला असे एखादे सोफ्टवेअर मिळाले तर की ज्याद्वारे शक्य तितकी माहीती तरी घेणे शक्य होईल, मग काय लागलो कामाला आणि भ्रमंती सुरु झाली माझी Internet वर. थोड्याच वेळात एक मस्त, चकटफू आणि व्हायरस नसलेले असे सोफ्टवेअर माझ्या हाती लागले त्याचे नाव आहे Bad CD DVD Reader. हे सोफ्टवेअर हातळण्यास अगदि सोपे आहे तसेच या सोफ्टवेअरची Installation Process देखील सहज सोपी अशी आहे. खालील लिंकवर क्लिक करून या सोफ्टवेअरची setup फाईल डाऊनलोड करुन घ्या.
तुम्ही डाऊनलोड केलेल्या setup फाईलवर डबल क्लिक करा.


मुळ Installation ची प्रक्रिया सुरु होईल ती खालील प्रमाणे असेल.
१.

२.

३.

४.

५.


६.

७.

८.

९.

 Finish या बटणावर क्लिक केल्यावर. हे सोफ्टवेअर तुमच्या काँप्युटरवर Install होईल आणि आपोआपच सुरु होईल.
मला सापडलेली ती CD मी माझ्या CD Drive मध्ये आधीच टाकून ठेवली होती.त्यामुळेच Bad CD/ DVD Reader सुरु झाल्यावर मला माझ्या CD मधील सर्व फोल्डर्स दिसले आणि ती CD गाण्यांची असल्याचे माझ्या निदर्शनास आले.

.माझ्या CD मधील जास्तीत जास्त माहिती (गाणी) मला हवी होती. त्यामुळे मी कुठलेही फोल्डर न निवडता G Drive निवडला जो माझा Default (मुळ) Drive आहे (तुमचा कुठलाही असू शकतो अगदी E किंवा H सुद्धा). तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या उपयोगाचे आणि अगदी महत्त्वाचे फोल्डर किंवा फाईल निवडू शकता.
तुम्हाला या CD किंवा DVD वरील फाइल्स साठवण्यासाठी सर्वात वर असलेल्या मेन्यु बार माधून Copy a folder हा पर्याय निवडावा लागेल.

हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला तुमचे निवडलेले फोल्डर साठवण्यासाठीचे ठिकाण (Location) निवडण्याकरिता एक छोटी विंडो दिसेल त्यातून तुम्हाला हव्या त्या फोल्डर मध्ये तुम्ही फाईल्स कॉपी करून ठेवू शकता. मी आधीपासूनच E Drive मध्ये datarecovered नावाचे फोल्डर बनवून ठेवले आहे आणि मी तेच Destination Foldaer म्हणून निवडले आहे. तुम्हाला हवे असल्यास एखादे नविन फोल्डर देखील तुम्ही Create new folder या बटणावर क्लिक करून बनवू शकता.
एकदा तुम्ही Destination Folder निवडले की तुम्हाला Copy या बटणावर क्लिक करयचे आहे.

Copy या बटणावर क्लिक केल्यावर काँप्युटर सर्व शक्तीनिशी जितकी माहिती वाचतायेण्याजोगी (Readable) आहे आणि करप्ट नाही अशी माहिती तुम्ही निवडलेल्या फोल्डर मध्ये कॉपी होईल.(Stop बटणावर क्लिक करू नका त्यने तुमची Data Copying ची प्रक्रिया थांबेल, हा जर तुम्हाला स्वतःला ही प्रक्रिया जर थांबवायची असेल तर मात्र नक्की stop बटणावर क्लिक करा )

या प्रक्रियेला लागणारा एकूण कालावधी हा CD/ DVD वरील वाचता येण्याजोगी माहीती, CD/ DVD कितपत चांगल्या परिस्थीत आहे, तुम्हाला हव्या असलेल्या माहितीची एकूण Size म्हणजे एम बी आहे की जी बी  यांसारख्या तांत्रिक बाबींवर अवलंबुन असेल. आणि हो कधीकधी जास्त scratches असतील तर काँप्यूटरचा वेग पण कमी होऊ शकतो. त्यामुळे जर जास्त Scratches तर मग हा पर्याय काय इतर कुठलाही पर्याय न वापरलेलाच बरा.उगीच विशाची परीक्षा कशाला घ्या म्हणतो मी..
पण तुर्तास हे सोफ्टवेअर वापरुन निदान काहीतरी माहिती आपल्याला मिळवता येत असेल तर हे सोफ्टवेअर नक्की वापरून बघा. आणि सांगा तुम्हाला किती वेळ लागला खराब CD/ DVD मधून Data कॉपी करायला!!! माझी CD कॉपी व्हायला १५ मिनिटे लागली आणि जवळ जवळ सगळीच गाणी कॉपी झाली.

गूगलतर्फे क्रोम ऑपरेटिंग सिस्टिम (OS) चा आरंभ


1)  गूगल ने आपल्या गूगल क्रोम ह्या नवीन ऑपरेटिंग सिस्टिमची चाचणी आवृत्ती वापरात आणली आहे. ही इंटरनेटवर आधारित OS असल्याने भारतात संगणकाच्या किंमती 25% ने कमी होऊ शकतील. क्रोम OS हे फुकट मिळणारे सॉफ्टवेअर आहे असे गूगलमधील उत्पादन-व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष श्री. सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले. संगणकाच्या एकूण किंमतीपैकी सुमारे चौथा किंवा पाचवा हिस्सा OS चा असतो. गूगलची ही OS मुळातच फुकट असल्याने 2011 सालात संगणकांच्या किंमती त्या प्रमाणात घसरतील असे दिसते. उदाहरणार्थ 22,000 रु. किंमतीच्या संगणकातील OS ची किंमत सुमारे 4,000 रु. असते. त्याचप्रमाणे ग्राहकास Microsoft Windows 7 Home Basic version ची किंमत सुमारे 5,690 रू. तर Windows 7 Ultimate ची किंमत सुमारे 11,190 रु. पडते.


2) गूगल क्रोम मुळे संगणकांच्या किंमती खूपच कमी होतील – अर्थात त्यासाठी ही OS ओपन सोर्स उर्फ मुक्तस्रोत प्रकारची असली पाहिजे म्हणजे तिच्यावर कोणत्याही परवाना शुल्काचा बोजा असून उपयोगी नाही असे प्रोटिव्हिटी कौन्सेलिंगचे श्री. पंकज अरोरा म्हणाले.
किंमतींचा मुद्दा सोडला तरी गूगल क्रोम OS वापरणार्यांरना इतरही काही फायदे मिळू शकतात – उदा. हे सॉफ्टवेअर स्थापित (इंस्टॉल) करण्याची गरज नाही. त्याऐवजी संगणकाद्वारे इंटरनेटवरून मिळणार्याे ऍप्लिकेशन्सचा वापर केला जातो व ह्यामुळे वापरकर्त्याला कोणत्याही संगणकावरून आपल्या फाइल्स व ऍप्लिकेशन्सपर्यंत पोहोचता येते. क्रोम असलेले संगणक कमी वेळात सुरू होऊन वापरकर्त्याला 10 सेकंदांत एखाद्या इंटरनेट ब्राउझरपर्यंत पोहोचवतात. ज्या वापरकर्त्यांना माहिती सतत नोंदावी किंवा वापरावी लागते परंतु त्यांना एका जागी बसणे शक्य नसते अशांसाठी क्रोम आदर्श आहे असे तांत्रिक सल्लासेवा देणार्याए ओव्हम ह्या कंपनीचे म्हणणे आहे. मूलतः क्रोम नोटबुक प्रकारच्या संगणकांसाठी बनवलेले असले तरी डेस्कटॉप व लॅपटॉपनाही ते उपयोगी आहे कारण ते X86 (Intel Pentium, Atom समूह) आणि ARM चिप अशा दोन्ही प्रकारच्या सिस्टिम्सवर चालते. ह्याखेरीज गूगलने आणखीही काही बाबी ह्यात देऊ केल्या आहेत - स्प्रेडशीट्ससाठी Docs तर वर्ड प्रोसेसर आणि PDF साठी रीडर. ब्राउझरच्या साहाय्याने वापरकर्ते इतर सामाईक सुविधांचा उपयोग करू शकतील – उदा. कॅलक्युलेटर, Face book व YouTube साठीचे टॅब्ज, सुरक्षा-प्रणाली इ