Friday 13 April 2012

फेसबुक वर त्रास देणार्‍या व्यक्तीचा पत्ता(फेक प्रोफाईलवाले) कसा शोधाल?


मंडळी सोशल नेटवर्किंग म्हटले की खोटी प्रोफाईल बनवणारे पण त्या अनुषंगाने आलेच आणि तुम्ही जर मुलगी असाल तर तो त्रास कोणत्या टोकाला जावू शकतो याची तुम्ही कल्पना करू शकता अथवा काहीना असे अनुभव आले असतीलच...बर्‍याच फेक प्रोफाईल वाल्यांचा अथवा उलटी कामे करणा‍र्‍यांचा असा समज असतो की त्यांना शोधणे कठिण आहे..त्यांना कोणी पकडू शकत नाही...पण या जगात कठिण काहीच नाही आहे.

मंडळी सुरुवातीचा काही काळ फेसबुक कडून तुम्हाला येणा‍या नोटिफिकेशन मेल मध्ये त्या व्यक्तीचा आयपी ऍडरेस कोडिंगच्या स्वरुपात लपवलेला असायचा,त्यामुळे कोणता युजर कोणत्या ठिकाणा वरून असे प्रकार करतो ते शोधणे संगणकाची मध्यम स्वरुपाची माहिती असलेल्या कोणालाही शक्य होते,पण त्यामुळे युजरची खाजगी माहिती उघड होते असे मानून फेसबुकने तो बग मानून दुरुस्त केला आणि अश्या  फेक प्रोफाईलवाल्या लोकाना शोधणे कठिण झाले..पण अशक्य नाही.

आज आपण अश्या त्रासदायक व्यक्तींचे ठिकाण कसे शोधायचे याची माहिती करून घेणार आहोत..हे करण्यासाठी तुम्हाला संगणकाची माहिती असणे गरजचे आहे नसेल तर माहिती असलेल्या व्यक्तींची मदत तुम्ही घेवू शकता.

सोप्पी पद्धत:
१) या पद्धतीचा वापर करण्यासाठी,जी अनोळखी व्यक्ती तुम्हाला त्रास देते आहे उदा. आपण त्याला फेसबुक आजोबा,फेसबुक राजा, असे काहीही समजु या. :-D
अश्या फेक प्रोफाईल वाल्या अनोळखी मवाल्याच्या वॉलवर एक 
लिंक पाठवायची आहे..आणि ती त्याला उघडायला भाग पाडायची आहे.

२)यासाठी आधी खाली दिलेल्या दुव्यावर जा.
how-about-you

३)जे पान उघडेल त्यावर तुम्हाला खाली चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे पर्यांय दिसतील.


Link for person:
पर्यांया समोर असलेली संपुर्ण लिंक तुम्हाला कॉपी करून या फेक प्रोफाईल वाल्याच्या वॉल वर पोस्ट करायची आहे अथवा मॅसेज मधून पाठवायची आहे.(जर तुम्हाला इतकी मोठी लिंक पाठवायची नसेल तर खाली चित्रामध्ये दाकविल्याप्रमाणे Click here to create tinyurl link पर्यांयाचा वापर करून जी लिंक मिळेल ती कॉपी करून त्या मवाल्याला पाठवा.)


४)Redirect URL: http:// समोर www.facebook.com   टाईप करा.असे केलेत तर तुम्ही त्या व्यक्तींला पाठवलेल्या दुव्यावर त्याने टिचकी दिली की  आपोआप www.facebook.com उघडले जाईल.

५)Link for you: समोर जी लिंक आहे ती तुम्ही तुमच्या कडे ठेवायची सेव्ह करून ठेवायची आहे आणि वेळोवेळी ब्राउजर मध्ये उघडून त्यात त्या मवाल्याचा आयपी ऍडरेस आला आहे का ते पाहायचे आहे.

उदा.
फेसबुक राजा तुम्हाला काहीतरी अश्लील टिप्पणी करतो..आणि तुमच्या कडे तुमचा फोटो नंबर मागतो.
मग तुम्ही वर दिलेल्या साईट वर जाता सर्व पायर्‍या नीट वापरून tinyurl link  बनवता आणि त्याला सांगता की मी तुला माझा फोटो या दुव्यावर पाठवला आहे तो बघ :
मग हा फेसबुकचा राजा लाडात त्या लिंकवर टिचकी देतो आणि त्याचा आयपी ऍडरेस आपोआप नोंदवला जातो.

आता तुम्ही Link for you: पर्यांया समोरील जी लिंक तुम्हाला शोध घेता यावा यासाठी सेव्ह करून ठेवली आहे ती वेब ब्राउजर मध्ये उघडता. आणि मग त्या व्यक्तीचा आयपी ऍडरेस तुम्हाला उघडलेल्या पानावर चित्रा मध्ये दाखवलेल्या टेबला मध्ये IP या पर्यांया खाली मिळतो.


६)आता तुम्ही तो आयपी नंबर घेता आणि खाली दिलेल्या दुव्यावर जाता.

ip-tracer
तिथे चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे रिकाम्या जागेत तो नंबर टाईप करता आणि > वर टिचकी देता


आणि असे केल्याने तुम्हाला त्या व्यक्तीचा देश,ठिकाण,इंटरनेट सर्विस प्रोव्हायडरची माहिती मिळते.


७)या माहितीच्या आधारे तुम्ही अश्या फेसबुक राजाना गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यामध्ये सजा मिळवून देवू शकता.