Wednesday 11 April 2012

टीव्हीवर संगणक


संगणकावर टीव्ही बघण्यासाठी आजकाल आपणासमोर बरेच पर्याय आहेत. संगणकावर इंटरनेटचा वापर करून आपण अनेक ऑनलाईन टीव्ही चॅनल्स बघू शकतो किंवा संगणकाचा मॉनिटर किंवा एलसीडीला बाहेरून लावण्यासाठी असणारे टीव्ही ट्यूनर कार्डचा वापर करूनदेखील आपण संगणकावर टीव्ही बघू शकतो. पण जर घरच्या टीव्हीवरच आपण जर संगणकात करू शकतो ती सर्व कामे करू शकलो तर? होय आता हे शक्य आहे. एलजी व सॅमसंगने त्यांचे नवीन ‘स्मार्ट टीव्ही’ हे क्रांतिकारी वैशिष्ट्य असणारे एलसीडी टीव्ही सादर केले आहे. ज्याचा वापर करून आपण टीव्हीवरच संगणक वापरू शकतो. ‘स्मार्ट टीव्ही’ हे भविष्यातील टीव्ही आहेत व त्यात संगणक, इंटरनेट व टीव्हीचे भन्नाट कॉम्बिनेशन आहे.
स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये


* संगणक प्रणाली :
 स्मार्ट टीव्हीमध्ये संगणकात असते तशीच संगणक प्रणाली असते व संगणकाच्या संगणक प्रणालीमध्ये असणारे जवळपास सर्व वैशिष्ट्ये ‘स्मार्ट टीव्ही’मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.




* सोशल नेटवर्किंग ‘स्मार्ट टीव्ही’चे हे एक अनोखे वैशिष्ट्य आहे त्यात सोशल नेटवर्किंग विभागात आपण आपल्या टीव्हीवर कुठलाही कार्यक्रम बघता बघताच आपल्या सोशल नेटवर्किंग संकेत स्थळावरील मित्रमंडळींच्या थेट संपर्कात राहू शकतो. सोशल नेटवर्किंगवर आपण ‘लाईव्ह’ असल्यामुळे आपण एखादा आवडीचा कार्यक्रम आपल्या मित्रांना थेट शेयर करू शकतो किंवा एखादा व्हिडीओ किंवा फोटोजदेखील शेयर करू शकतो.




* स्मार्ट ऍप्लिकेशनस्मार्ट टीव्हीवर संगणक किंवा मोबाईलप्रमाणेच आपणास विविध ऍप्लिकेशन देण्यात आलेले आहेत. या ऍप्लिकेशनचा वापर करून आपण वेगवेगळ्या गोष्टींचा टीव्हीवर वापर करू शकतो.




* वेब ब्राऊजर : संगणकाप्रमाणेच स्मार्ट टीव्हीवर आपण वेब ब्राऊजरचा वापर करून इंटरनेटचा वापर करू शकतो. आपण आपल्या टीव्हीवर इंटरनेटवरील विविध संकेतस्थळे वापरू शकतो किंवा आपला ई-मेल पाहू शकतो अगदी इंटरनेटवरून कोणतीही फाईलदेखील डाऊनलोड करू शकतो.




* म्युझिक प्लेयर स्मार्ट टीव्हीवर आपण इंटरनेटवरून कोणतेही गाणे डाऊनलोड करू शकतो. डाऊनलोड केलेले कोणतेही गाणे आपण स्मार्ट टीव्हीमधील म्युझिक प्लेयरचा वापर करून टीव्हीवरच ऐकू शकतो.




* विजिटस् : यू ट्यूब, पिकासा, स्कायपी, फेसबुक इ. इंटरनेटवरील लोकप्रिय सेवांचे थेट टीव्हीवरच विजिटस् देण्यात आले आहेत व त्याचा वापर करून आपण थेट या सेवा टीव्हीवरच वापरू शकतो.




* प्रोग्राम रेकॉर्डर डीटीएच टीव्ही सेवेतले हे लोकप्रिय वैशिष्ट्य आता स्मार्ट टीव्हीवरदेखील आपणास बघावयास मिळेल. प्रोग्राम रेकॉर्डरचा वापर करून आपण टीव्हीवर सुरू असलेला कोणताही कार्यक्रम ऑनलाइन किंवा टीव्ही बंद असतानादेखील रेकॉर्ड करू शकतो. रेकॉर्ड झालेला कार्यक्रम नंतर आपण आपल्या सवडीनुसार कधीही बघू शकतो.




* ३डी/एचडी टीव्ही : स्मार्ट टीव्हीमध्ये आपणास ३डी तसेच हायडेफिनेशन असे दोन्हीही पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण आपल्या बजेटप्रमाणे कोणत्याही आवडत्या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो.




* स्मार्ट कनेक्टिव्हिटी स्मार्ट टीव्हीमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीटीसाठी आपणास विविध पर्याय देण्यात आले आहेत. वायफाय व वायरलेस राऊटरसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या टीव्हीवर इंटरनेटची जोडणी करू शकतो. स्मार्ट कनेक्टिव्हिटीमधले सर्वात क्रांतिकारी वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा, आयपॅड, आयफोन अशी कोणतीही डीव्हाईस तुमच्या टीव्हीला कनेक्ट करू शकता व त्यातील हवी ती गोष्ट किंवा सेवा शेयर करू शकता.




* स्मार्ट टीव्हीचे पर्याय : सध्या बाजारात एलजी व सॅमसंग या दोन कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत व त्याच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्यावी. 
www.samsang.comlin/smarttv. www.LG.com.