Saturday 21 January 2012

Google Wave चं मंच.


Google तसे काही ना काही नविन करण्याच्या मागे लागले असते.त्यातीलच हा प्रकार. Google Wave , google चा नविन मंच. तसा हा काय प्रकार आहे हा प्रश्न आपल्याला पडलाच असेल. साहाजिकच आहे. तर या नव्या मंचाबद्दल अधिक माहीती पाहुया.
Google Wave  हे नविन संगनकिय Internet संपर्क साधन आहे. तसं हे email च काम करत पण पुर्ण संदेश पाठवायच्या एवजी येथे सर्व संदेश एकाच ठीकाणी साठवले जातात.व आपण एकाच वेळी अनेकांसोबत संवाद साधू शकतो. आपल्याला सहजच प्रश्न पडेल की email, facebook इ असल्यावर या नव्या बिरादाची काय गरज. त्याचे उत्तर मी खालिल मुद्दाने देतो.
१. उपयुक्तता.
Google Wave हे real time application आहे.म्हणजे जेव्हा आपण email  वा chat करतो, तेव्हा आपण लिहिलेला संदेश काही वेळाने दुसरयाला पोहोचतो. कारण हा संदेश पहीले आपल्या संगणकातून बाहेर निघुन केबल/तारे द्वारे दुसर्याच्या संगणकापर्यत पोहचतो. कितिही वेग असला तरी काही सेंकंदाचा वेळ तो लागतोच. कारण दोन्ही व्यक्ती दोन वेगवेगळ्या Server वर काम करत आहे.

Google Wave मध्ये या उलट आपण Google च्या server  वर काम करु त्यामुळे दुसर्याने लिहिलेल्या शब्द सुध्दा त्याच क्षणी आपल्याला दिसतो. अगदी मी लिहित असलेला शब्द न शब्द तेव्हाच दिसेल. इतकच नाही तर माझी चुक झाल्यास समोरचा व्यक्ती तबोड्तोब बरोबर करु शकेल.
२. पर्याय.
Google Wave यात अनेक पर्याय आहेत.जसे की आपण rewind करुन पाहु शकतो कि आपलं संभाषण कसं सुरु झाल व कस वाढत गेलं.त्याच प्रमाणे जर आपल्याला कोनासोबत खाजगी बोलायचं असेल तर यात त्याचा पण पर्याय आहे.
३. नाही फ़क्त email.
Google Wave हे फ़क्त email साठिच नाही आहे याचा आपण social networking sites सारखाही उपयोग करु शकतो. येथे आपण टाइमपासही करु शकतो, विविध खेळ खेळून. येथे आपण जगाचे नकाशेही पाहू शकतो.यात अजुन बरेच काही आहे.
४.गंभीर कामे.
Google Wave हे जरी आता मजा करायचा साधन वाटत आसल तरि तस नाही आहे.Google Wave चा वापर करुन विविध कंपन्या आपापल्या लोकांसाठी एक मंच बाधत आहेत.जेथे कंपनीचे email पासुन सर्व कामे होतिल.
५.ओपन सोर्स.
Google Wave हे software  Java या संगणकिय भाषेत लिहिले गेले आहे.Google ,Google Wave चे सर्व code लोकांना देनार आहे.जेणे करून लोक यात बदल करुन त्याना हवं तस sotfware तयार करु शकेल.
६.भाषा.
यात आपोआप शब्द व व्याकरण चुका दुरुस्ती होते. यात ४० विविध भाषेच भाषांतर पण होते.
७. अधिक माहिती.
आपल्यला Google Wave बद्दल अजुन जानुन घ्यायचे असल्यास भेट द्या.
१.  http://en.wikipedia.org/wiki/Google_Wave
२.  http://googlewave.blogspot.com/
या कामाचे श्रेय हे ऒस्ट्रेलियाच्या google चमूला जातं. Google Wave हे officially  release व्हायचं आहे,पण त्याचे १,००,००० लोकांना वापरायला व बदल सुचवायला दिले आहे.
Google Wave हे software appilication आपण बाकी software सारख नाही वापरु शकत. आपल्याला पहिले कोनी निमंत्रंण द्याव लागत ,अजुनतरी. जर आपल्याला Wave चा अनुभव घ्यायचा असेल ,तर मला कळवावे . मी आपल्याला आपल्या  e-mail   वर निमंत्रण पाठविल. तर मग तयार आहात उद्याच्या वेगवान जगात पाउल ठेवायला.
आणि हो जरुर कळवा आपला wave अनुभव , मला व Google ला ही.

3G




काहीच महिन्याआधी पार पडलेले 3G Auction आणि आता सरकारचा चाललेला हो-नाहीचा सावळा गोंधळ. त्यामुळे आपल्या मनात 3G  हे नक्की काय भानगड आहे, असा प्रश्न उद्भवलाच असेल. आज, आपण याबद्दलच काही माहिती घेऊ.
(मायाजाळावरुन साभार)
तोंडओळख :
जेव्हा आपण 3 G म्हणत आहोत, तेव्हा नक्कीच त्याआधीचे आकडे पण असणार. हे अगदी बरोबर आहे. 3G च्या आधी 1G, 2G व काही तंत्रज्ञान्यान 0G या प्रवर्गात ही मोडते. येथे 3G म्हणजे 3rd Generation/३ री पीढी. 3G ला International Mobile Telecommunications-2000 (IMT–2000)म्हणतात. यांचे मापक International Telecommunication Union ही आंतराष्ट्रीय समिती ठरवते. ही सेवा या शतकाच्या सुरुवातीला उदयास आली.

इतिहास :
3G  च्या आधी 1G व 2G  हे तंत्रज्ञान होते. 1 G चे पहिले व्यावसायिक उत्पादन जापानच्या NTT  या कंपनीने १९७९ ला केले. 1G  हे तंत्रज्ञान फ़ार महत्वाचं होत. कारण या आधीच्या दुरध्वनी हा रेडीओ वा तारांनी जोडलेला होता. 1G मुळेच दुरध्वनी यंत्रणा खर्या अर्थाने तार मुक्त झाली. त्यानंतर त्यात प्रगती होऊन 2G चा जन्म झाला. १९९० साली हे तंत्रज्ञान आले. यात व आधीच्या तंत्रज्ञान मोठा फ़रक म्हणजे आधिचे यंत्रणा Analog transmission होती, ती आता digital transmission झाली होती. त्या़च प्रमाणे यंत्राणा फ़ार प्रगत व GSM चा वापर करत होती. यानंतर मे, २००१ ला जापानच्या NTT  DoCoMo या कंपनीने 3G सेवा सुरु केली.
भारतात 3g चे आगमण २००८ ला BSNL  तर्फ़े पट्ना, बिहार येथे झाले.

गरज :
2G सेवा चांगली  असली तरी तिचे काही तोटे होते. जसे की, कमी वेग.त्यांचा transmission वेग 64 to 200 Kbps होता. त्याच प्रमाणे ही यंत्रणा तयार करण्याच उद्दिष्ठ होत की, दुरध्वनीवर माहितीची देवाण-घेवाण जास्त वेगाने व त्याच वेळी कॉल/बोलणे ही सुरु राहिले पाहिजे. हे उद्दिष्ठ 3G
पुर्ण करते.

तंत्रज्ञान :
3G यंत्रणात जास्त वेगाने ( 200 Kbps च्या वर) व कुठुनही, कोणीही, कधीही वापरु शकतो. यासाठी याचे ठिकाण एकाच जागेवर राहते. त्याच प्रमाणे मायाजाळाशी जोडणारी व व्यवसायसाठी असो वा शिक्षणासाठी नवीन दारे उघणारी आहे. याचा वापर आपण दोन ठिकाणची माहिती जास्त सोप्या पध्दतीने व वेगाने करु शकतो. त्याच प्रमाणे या यंत्रणेची सुरक्षा पातळी जास्त आहे.

वैशिष्टे :
- दुरध्वनी कॉल/ फ़ॅक्स.
- ग्लोबल रोमिंग.
- मोठ्या आकारचे विपत्राची देवाण-घेवाण.
- वेगवान मायाजाळ.
- ऑनलाइन नकाशे.
- चित्रफ़ित संवाद.
- दुरदर्शन दुरध्वनीवर.

तोटे :
ही सेवा कितिही चांगली असली तरी ,ती आपल्या वाढत्या ,मागणी समोर कमीच पडणार आहे. यातील सर्वात मोठा तोटा म्हणजे याची किंमत जास्त आहे. त्या़च प्रमाणे याचा तेवढा प्रसार न झाल्याने देवाण-घेवाण करण्यात त्रास होतो.

भविष्य :
3G च्या पुढची पीढी/generation ही 3gpp वा 4G आहे. काही भागात pre-4g ही सेवा सुरु झाली आहे.