Tuesday 3 January 2012

लिहने आता मराठीत सोपे

1)    बराह हे काय आहे ते पाहुया

                                                  १९९८ मध्ये "बरह' हे सॉफ्टवेअर मुळात निर्माण झाले कन्नड भाषेकरता. पण हळूहळू मराठी आणि इतरही भारतीय भाषांकरता ते उपलब्ध झालेले आहे. बरह "लोड' केल्यानंतर इंग्रजीसाठी असणाऱ्या Qwerty या प्रकारच्या की-बोर्डचा वापर करूनच आपल्याला मराठीमध्ये टाईप करता येते. त्यासाठी वेगळे काहीही शिकण्याची गरज नाही. तांत्रिकदृष्ट्या बरह हे सॉफ्टवेअर "फोनेटिक आयएमई' आहे. फोनेटिक म्हणजे उच्चाराप्रमाणे आणि आयएमई म्हणजे "इनपुट मेथड'. आपण उच्चाराप्रमाणे इंग्रजी स्पेलिंगप्रमाणे टाईप करत गेलो, की मराठी मजकूर उमटत जातो. या प्रक्रियेला "ट्रान्सलिटरेशन' असे म्हणतात.

2)    लिहावे कसे?  

                         "
बराह' असे नाव असणारा प्रोग्रॅम हा "एडिटर' आहे. म्हणजेच "वर्ड'सारखेच पण मराठीमधून त्यात टाईप करता येते. त्यात फाईल्स तयार करता येतात. अनेकपानी मजकूर लिहायचा असेल, तर हे सॉफ्टवेअर उपयुक्त ठरेल. पण झटपट फेसबुकवर किंवा इ-मेलमध्ये लिहायचे असेल तर मात्र बरह डायरेक्‍ट सुरू करावे लागते. केवळ एफ-११ ही की दाबली की आपल्याला मराठीत अक्षरे लिहिता येतात. इंटरनेटवर लिहिताना आपल्याला "युनिकोड' हा प्रकार "सेट' करावा लागतो. त्याशिवाय मराठी अक्षरे उमटणार नाहीत.

3)   उदा. 

               १) "ती इमारत उंच आहे' असे टाईप करण्यासाठी, की बोर्डवर tI imarat uncha ahe अशा प्रकारे कीज दाबाव्या लागतील.

               २) "मला बंगाली मिठाई आवडते' असे टाईप करण्यासाठी की बोर्डवर mala bangali mithai Avadate अशा प्रकारे

4)             १) बरह हे सॉफ्टवेअर फुकट आहे.

                २) डाउनलोड www.baraha.com येथे उपलब्ध राहील.

                ३) साईटवर उगाच इकडेतिकडे क्‍लिक करू नये.

                ४) वेबसाईट दुपारी १ ते ४ या वेळातही सुरू राहील