Monday 28 May 2012

संपूर्ण सीडी (७०० एम. बी.डेटा) पाठवायचीय ऑनलाईन?

याहू असो की जीमेलआणि हॉटमेल असो की आणखी कुठली वेबमेल असोतुम्ही तुमच्या ईमेलला जास्तीत जास्त किती एम.बी. ची फाईलAttach करणार याला मर्यादा असते. ही मर्यादा सर्वत्र १० एम.बी. पर्यंतचीच असते. ज्यावेळी ह्या मर्यादेपेक्षा मोठी फाईल पाठवण्याची वेळ येते तेव्हा मार्ग खुंटलेला असतो. आजकाल लग्ना-मुंजीला व्हिडीओ शुटींग करण्याची पद्धत रूढ आहे. अगदी साधे फोटो घेतले तरी त्यांनी एक आख्खी सीडी भरलेली असते. अशी एखादी संपूर्ण सीडी समजा ईमेलला अटॅच करून पाठवायची आहेतर काय करायचंते शक्य आहे काशक्य असेल तर त्याला काही खर्च येईल काखर्च येणार असेल तर तो कितीअसे वेगवेगळे प्रश्न ही चर्चा उपस्थित झाल्याने तुमच्या मनात डोकावले असणार.

तुमच्या प्रश्नांची ही घ्या उत्तरं.

१) संपूर्ण सीडीचा म्हणजे अदमासे ६५० ते ७०० एम.बी. चे व्हिडीओ शुटींग वा फोटोग्राफ्स वा कोणताही डेटा तुम्ही ऑनलाईन म्हणजे इंटरनेटचा वापर करून पाठवू शकता. होयते सहज शक्य आहे. मी स्वतः अनेकदा असा डेटा पाठवला आहे. अजुनीही पाठवत असतो

.
२) असा १००० एम.बी. (होय, 1000 MB) पर्यंतचा डेटा पाठवायला शुन्य खर्च येतो. म्हणजेचही सुविधा इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहे. तुम्हीही त्याचा लाभ घेऊ शकता. तुमची आख्खी सीडी कोणत्याही ईमेल पत्त्यावर अटॅच करून पाठवू शकता.
आता तुमचा पुढला प्रश्न आहे- हे कसं करायचं?त्याचं उत्तरही सोपं आहे. हे काम पांडोकडून करून घ्यायचं.



तुमचा परत प्रश्न येणार की हा पांडो कोण?पांडो हे नाव आपल्या पांडू हवालदारसारखं भारतीय वाटत असलं तरी हा पांडो भारतीय नाही. तो अमेरिकन आहे. तुम्हाला जास्त कोड्यात न टाकता सांगून टाकतो की पांडो हा अमेरिकन माणूस नसून ते एक सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर किंवा हा प्रोग्राम सर्वांसाठी मोफत आहे. तो उपलब्ध आहे http://www.pando.com/ ह्या साईटवर.
 
पांडो ची सध्याची आवृत्ती (
Version) आहे २.३ ह्या २.३ आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल की पांडो हा काही फार जुना प्रोग्राम नाही. तुमचा अंदाज बरोबर आहे. पांडो नेटवर्कस ही न्युयॉर्क येथील कंपनी मूळातच २००४ साली स्थापन झाली आहे.

 त्यामुळे हा प्रोग्राम जेमतेम ५ वर्षे वयाचाच आहे. पण त्या पहिल्या दोन वर्षांत त्याने चांगलं बाळसं धरलेलं आहे. pando.com वर जाऊन तुम्ही हा प्रोग्राम डाऊनलोड करून घ्या. तो केवळ ३ एम.बी. चा असल्याने काही मिनिटांत डाऊनलोड होतो आणि तेवढ्याच झपाट्याने आणि सहजपणे तो इंन्स्टॉलही होतो. हे इंन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुमच्या कॉंप्युटरच्या तळाशी उजव्या बाजूला जेथे वेळ (time)दाखवलेला असतो तेथे लागून असलेल्या आयकॉन्समध्ये पांडोचा आयकॉनही आल्याचं तुम्हाला दिसेल. ह्या आयकॉनवर डबल क्लीक करा. पांडो उघडेल. तुम्हाला मेल पाठवायची असेल तर Share New वर क्लीक करा. पुढे तुमची फाईल अटॅच करामेल मध्ये जो संदेश लिहायचा तो लिहाज्याला ईमेल पाठवायची त्याचा ईमेल अड्रेस लिहा आणि Send वर क्लीक करा. पांडो अवजड फाईल्सही अतिशय झपाट्याने पाठवतो.


ज्याला तुम्ही फाईल पाठवलीत त्याला .pando ह्या प्रत्ययाची (extension) फाईल त्याच्या ईमेल पत्त्यावर मिळते. त्यानेही आपला पांडो उघडावा आणि फाईल डाऊनलोड करून घ्यावी. त्याच्याकडे पांडो नसला तर त्यानेही वर सांगितल्याप्रमाणे तो डाऊनलोड करून घ्यावा. पांडो कसा वापरायचा याचे उत्तम मार्गदर्शन पांडोच्या साईटवर आहे. वाटल्यास त्याची मदत घ्या. पण माझा अनुभव असा आहे की अगदी शाळकरी मुलं सुद्धा पांडोचा उपयोग पटकन समजून घेतात.
पांडो का खरच जबाब नही..

व्हिडिओंनी बनलेला ज्ञानकोश





वाचायला बुवा कंटाळा येतो. त्यात आणखी काँप्युटरच्या स्क्रीनवर वाचायचं म्हणजे तर बघायलाच नको. डोळ्याला त्रास वगैरे होतो. घरात पीसी किंवा लॅपटॉप वगैरे आलेला असतो. हौसेने इंटरनेटची व्यवस्थाही झालेली असते. ब्रॉडबँडच्या प्रसारामुळे इंटरनेटचा स्पीडही चांगला मिळत असतो. म्हणजे थोडक्यात सगळं असतं. पण वाचायला कंटाळा येत असतो. म्हणजे ज्ञान नको असतं असं नाही. ज्ञान, मीन्स नॉलेज, तर हवंच. त्याचं महत्व चांगलच कळत असतं. ज्ञानपिपासू वृत्तीही असते.वाचनातून ज्ञान मिळतं याबद्दल दुमत वगैरे नसतच. वाचन हवं हे कळत असतं पण वळत नसतं. जी मंडळी ह्या अशा काहीशा पेचातून चालली असतील (आणि एवढं असूनही सौजन्यपूर्वक हा लेख वाचायची तसदी घेत असतील) अशांसाठी इंटरनेटवरची एक वंडरफूल सोय सांगतो. इंटरनेटवरची सोय म्हणजे अर्थातच कुठली तरी साईट असणार हे तुम्ही एव्हाना ओळखलेलं आहे. तुमचा अंदाज बरोबर आहे. मी एका वेब साईटबद्दलच सांगतो आहे. त्या साईटचं नाव आहे - 'वंडर हाऊ टू डॉट कॉम'.

लक्षात घ्या की साईटच्या नावातच 'हाऊ टू' आहे. म्हणजे एखादी गोष्ट कशी करावी याचं ज्ञान देणारी ही वेब साईट आहे. पण साईटच्या नावात नुसतं 'हाऊ टू' नाही,तर त्या बरोबर 'वंडर' पण आहे. म्हणजे आश्चर्यकारकपणे शिकवणारी ही वेब साईट आहे. आता तुम्ही विचाराल की हा काय फंडा आहे? तर, त्याचं साधं सोपं उत्तर म्हणजे तुम्हाला काहीही वाचायला न लावता प्रत्यक्ष 'आंखो देखा हाल' पद्धतीने शिकवण्याची व्यवस्था ह्या साईटवर आहे. आता एवढी प्रस्तावना झाल्यानंतरही लक्षात न येण्याइतका तुमचा आयक्यू साधासुधा नाही हे सरळ आहे. तुमच्या लक्षात आलेली गोष्ट बरोबर आहे. ह्या साईटने 'हाऊ टू' हा प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला देऊ केला आहे. मुख्य म्हणजे तो मोफत आहे.

उदाहरणार्थ पहा - गणितातले अपूर्णांक तुम्हाला शिकता येतील ते ह्या साईटवरचा व्हिडीओ पाहून. किंवा आणखी इंटरेस्टींग सांगायचं तर डोकेदुखी घालवण्यासाठी मालीश कसं करायचं हे प्रत्यक्ष व्हिडीओ क्लीपमध्ये दिसलं तर वाचण्यापेक्षा सोपं आणि पक्क यात शंका नाही. ह्या खेरीज कॉंप्युटरशी संबंधित म्हणाल तर तुमच्या किबोर्डवरची विंडोज की कशी वापरायची किंवा विंडोज एक्सपी मध्ये एका कॉंप्युटरवर दोन मॉनिटर्स कसे लावायचे वगैरे. अशा प्रकारच्या विविध विषयावरच्या ९०,००० (नव्वद हजार फक्त) व्हिडिओ क्लीप्स http://www.wonderhowto.com/ वर आहेत.

महिलांसाठीचे विषय

इंटरनेटवरचं मल्टीमिडीयाचं तंत्र हा ह्या साईटचा आत्मा आहे. आपल्याला शिकायची ती गोष्ट किंवा ते तंत्र चित्रपट माध्यमातून प्रत्यक्ष दिसणं ही बाब वाचनातून शिकण्यापेक्षा अधिक प्रभावी आहे. उदाहरणार्थ ह्या साईटवरचे खास महिलांसाठीचे हे काही मुख्य विषय पहाः १) सौंदर्य कला २) घर आणि बगीचा ३) अन्नपदार्थ अर्थात स्वयंपाकघरातील टीप्स ४) कौटुंबिक आणि व्यक्तीगत बाबी वगैरे.

तुम्ही ब्युटी किंवा सौंदर्य कलेच्या विषयात शिरलात तर तेथे अनेक म्हणजे एकूण ८४८ उपयुक्त व्हिडीओज तुम्हाला दिसतील. त्यातले उदाहरणादाखल हे काही पहाः कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी, कुरळ्या केसांची हाताळणी कशी करावी, कोरड्या ओठांसाठी काय करावे, परफेक्ट पोनी टेल कशी बांधावी, स्वतःचा स्वतःच फेस मसाज कसा करावा, लिपस्टीक जास्त टिकण्यासाठी काय करावे असे एक ना अनेक विषय त्यात आहेत. प्रत्यक्ष दिसत असल्याने ते समजण्यात वा शिकण्यात काहीही अडचण येत नाही.

आता दुसरा विषय घर आणि बगीचा हा घ्या. यात एकूण ३२८५ व्हिडीओ क्लीप्स आहेत. हा विषय इतर अनेक उपविषयांमध्ये विभागला आहे. त्यातले काही उपविषय पहा - स्वच्छता टापटीप, इंटिरियर डेकोरेशन, बागकाम, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक साधने वगैरे. यात इनडोअर गार्डन कसे करावे, तुमच्या एलसीडी स्क्रीनवर किंवा सीडीवर किंवा प्लास्टीकवर कुठेही चरे आले असतील तर ते काढण्यासाठी साधे अंडे कसे वापरता येते, टॉवेल्सची घडी उत्तम प्रकारे कशी घालावी, उत्तम फर्निचर कसं ओळखावं वगैरे अक्षरशः शेकड्यांनी टीप्स आणि ट्रीक्स शिकवणारी तंत्रे आपल्याला प्रत्यक्ष पहायला मिळतात.

पुढला विषय अन्नपदार्थ आणि स्वयंपाकघराचा. यात एकूण ५०७० व्हिडीओ आहेत. यामध्ये एकूण २३ उपविषय आहेत. त्यात भाजणं (बेकींग) पासून ते अंड्यापर्यंत आणि चिकन पासून ते मांसापर्यंत विभागणी आहे. अंडी ह्या एका उपविषयावर १३० तर भाज्यांवर ५७६ व्हिडीओ आपण पाहू शकतो. एग करी असो की एग भुर्जी असो, उकडलेलं अंडं असो की आम्लेट असो ते कुणी ना कुणी प्रत्यक्ष केलं आहे, ते करतानाचं छान शुटींग केलं आहे, आणि ती व्हिडीओ क्लीप आपल्याला इंटरनेटवर मोफत दिली आहे. भाज्या आणि अंडी वगळता वेगवेगळ्या प्रकारची सॉसेस, मसाले, पिझा, पास्ता, फळं, ज्युसेस, फिश, सुप्स वगैरे रेलचेल ह्या प्रकारात दिसून येते.

कौटुंबिक विषयातही ही साईट मागे नाही. एकूण ७१७ व्हिडीओज तिथे आहेत. त्यात नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या काळजीपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या शुश्रुषेपर्यंत अनेक गोष्टी आहेत. बाळंतपणापासून ते पालकत्वापर्यंतचे अनेक मुद्दे स्वतंत्र चित्रफितींतून आले आहेत.

वर मी फक्त महिलांशी संबंधित विषयांची झलक दिली आहे. पण महिलांबरोबरच पुरूषांसाठीही ते सारखेच महत्वाचे आहेत. स्वयंपाकघर आणि सौंदर्य हे आणि तत्सम विषय आता दोघांसाठीही सारखेच महत्वाचे आहेत.

इतर अनेक विषय

ह्या साईटवर सॉफ्टवेअर विषयक २६३२ व्हिडीओ आहेत. एमएस ऑफिस पासून ते फोटोशॉपपर्यंत आणि फ्लॅशपासून ते फाईलमेकर पर्यंत अनेकांची हाताळणी त्यात झालेली आहे. केवळ हार्डवेअर व तत्सम विषयक ८७० व्हिडीओंचा संग्रह इथे पहायला मिळतो. त्याखेरीज इलेक्ट्रॉनिक विषयाला वाहिलेल्या वेगळ्या ७३१ क्लीप्सही त्यात आहेत. यातील अनेक व्हिडीओ क्लीप्स विद्यार्थ्यांसाठीही खूप उपयुक्त आहेत.

डाएट आणि आरोग्य ह्या विषयावरील ११७०, नृत्यविषयक ४५१, विविध कलाविषयक ११०३, एक हजारांहून अधिक जादूचे प्रयोग, पाळीव प्राणी विषयक ६४२ वगैरे विषयांची यादी खरच न संपणारी आहे. ही साईट सापडल्यानंतर पुढले कितीतरी आठवडे यातले अनेक दर्जेदार व्हिडीओ पाहण्यात मी घालवले. इथे ९०००० व्हिडीओ आहेत असा ह्या साईटचा दावा आहे. तो खरा असेलही किंवा नसेलही. पण एक मात्र नक्की की विविध विषयांवरच्या उपयुक्त अशा व्हिडीओ क्लीप्सचा खजिना तिथे आहे. तुम्हाला यांतून एखादा विशिष्ट विषय शोधायचा असेल तर 'सर्च' ची सोय त्यात आहे. पण त्याही पलिकडे एकूण ५०० व्हिडीओ ह्या साईटने टॉप म्हणून निवडूनही दिले आहेत. त्यावर नजर टाकली तरी आपले डोळे दिपून जातात.

ही साईट अमेरिकन ढंगाची आहे. तेथील संस्कृतीचे प्रतिबिंब त्यात पुरेपूर पडलेले दिसते यात शंकाच नाही. म्हणूनच डिशवॉशर कसे वापरावेत, कसे मेंटेन करावेत वगैरे आपल्याला कदाचित अपरिचित वाटणारे व्हिडीओ त्यात दिसतात. मात्र आपल्याला उपयुक्त अशा शेकडो क्लीप्स त्यात असल्यानेच ह्या साईटला 'एंटर' मध्ये स्थान दिले.

कुठून येतात हे व्हिडीओ?

हा प्रश्न आपल्यापुढे येणं हे स्वाभाविक आहे. हे सारं प्रचंड काम कुणा एका माणसाचं खचितच नाही. खरं तर हे सारं हजारो माणसांचं मिळून झालेलं श्रमदान आहे.तुम्हीही त्यात सामील होऊ शकता. इंटरनेटवर मुशाफिरी करताना उद्या तुम्हाला एखादा हाऊ टू प्रकारातला व्हिडीओ दिसला (आणि तो मोफत असला) तर तुम्हीही तो ह्या साईटवर सबमिट करू शकता. मात्र तुम्ही कोणताही व्हिडीओ सबमिट करून चालणार नाही. तो हाऊ टू ह्या प्रकारातला असणं आवश्यक आहे.

जसजसे आपण ह्या वेबसाईटच्या अंतरंगात घुसत जातो तसतशी ही वेबसाईट एखाद्या ज्ञानकोशासारखी भासू लागते. हा ज्ञानकोश अनेक चित्रफित निर्मात्यांनी मिळून तयार केलेला आहे. अशा प्रकारचे काम हे इंटरनेटच्या माध्यमातूनच होऊ शकते. हे माध्यम अशा साईटस तयार करून वापरण्यासाठीचा प्रचंड आवाका इंग्रजीप्रमाणे आता मराठीसाठीही खुला आहे. आपण त्याचा लाभ कसा घेतो यावरच मराठीचे इंटरनेटवरील भवितव्य काय असेल हे ठरेल.

Saturday 19 May 2012

एक मजबूत पासवर्ड तयार करा


पासवर्डसमुळे आपल्या व्यक्तिगत माहिती1चे ऑनलाईन रक्षण होते. मजबूत पासवर्ड म्हणजे असा पासवर्ड की जो दुसर्या व्यक्तीला समजण्यास कठीण असेल पण आपल्याला आठवेल

मजबूत पासवर्ड कसा तयार करावा याची माहिती:

             कॅपिटल (अप्पर केस) लोअर केसमधील अक्षरे, चिन्हे अंक यांचा एकत्रित वापर करा. बहुतांश पासवर्डस केस-सेन्सिटिव्ह2 असले पाहिजेत, म्हणजेच आपण आपला पासवर्ड टाईप करीत असताना अप्पर केस आणि लोअर केसमधील अक्षरांना महत्व असते.

             आपले पासवर्डस किमान आठ वर्णांचे असल्याची खात्री करा. ते जितके मोठे असतील, तितका त्यांचा अंदाज करणे कठीण असते.

             एक पूर्ण शब्द निवडण्याऐवजी अंक आणि अक्षरांचा एक संच निवडण्याची खात्री करा. मात्र तो आपल्याला आठवू शकेल याचीही खात्री करा.

आपला पासवर्ड सेट केल्यानंतर तो सुरक्षित राहील याची खात्री करा:

हे करा:
             आपले पासवर्डस वारंवार बदला. दर महिन्यातून एकदा बदलण्याची सवय चांगली.
             वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगवेगळे पासवर्डस वापरा
हे करु नका:

             तो विशिष्ट संगणक फक्त आपणच वापरत असलात तरच, आपल्याला आपला पासवर्ड संगणकावर जतन करायचा आहे का, असे विचारल्यावरहोयम्हणा.

             आपले पासवर्डस डेस्कटॉपवर ठेवू नका.

             आपले पासवर्डस आपल्या संगणकावर लिहून ठेवू नका किंवा आपल्या संगणकावर चिकटवून ठेवू नका.
             आपला पासवर्ड इतर कोणालाही देऊ नका.

Wednesday 16 May 2012

 
Tablet PC  हा HDMI Portसह म्हणजेच जबरदस्त मजा !

HDMI + Tablet PC बद्दल माहिती :


आज काल प्रदर्शित झालेल्या बहुतांशी सर्वच Tablets ला HDMI portची सुविधा देण्यात आली आहे.
हे HDMI port म्हणजे नक्की कायआणि आपल्याला त्याचा उपयोग काय हा प्रश्न आपल्यालापडला असेलच.

त्याची उकल शोधण्यासाठी हा खास लेख..
पहिली गोष्ट HDMI चा लोंग फॉर्म आहे->(High-Definition Multimedia Interface).
HDMI हे ऑडिओ व व्हिडिओ digital रुपात पाठवण्यासाठी छोट्या स्वरूपात केलेला interface connector आहे.

हा एक digital format मध्ये Digital audio/video data send करण्याचा standard interface आहे.
HDMI port चा उपयोग:- set-top boxes, DVD players, HD DVD players, Blu-ray Disc players,  camcorders, personal computers(PCs), video game consoles आणि Tablets मध्ये केला जातो.

HDMI चा वापर करून आपण अतिशय उच्च दर्जाचे ( 720p60 and 1080i60) व्हिडिओ पाहू शकतो.
तांत्रिकदृष्ट्या:

  • ऑडिओ सिग्नल:- LPCM, Dolby Digital, DTS, DVD-Audio, Super Audio CD, Dolby Digital Plus, DTS-HD High Resolution Audio, DTS-HD Master Audio. इत्यादी..
  • व्हिडिओ सिग्नल:- 480i, 480p, 576i, 576p, 720p, 1080i, 1080p,1440p, 1600p, 2160p,  इत्यादी..
  • Bandwidth : 10.2 Gbit/s (340 MHz)
  • Protocol: TMDS
  • Pins:19
  • प्रमुख उत्पादक: Hitachi, Panasonic, Philips, Sony, Toshiba, Thomson आणि Silicone Image.
  •  
फायदे HDMIचे:
  1. सेटउप करण्यास एकदम सोपे.
  2. m ते २० m पर्यंत wire connection करू शकतो.
  3. Blu-Ray बघण्यासाठी उत्तम.
  4. Piracyस प्रतिबंध करण्यास मदत करतो.
  5. 19 wires एकाच cable मध्ये.
  6. LCD किंवा plasma screen असेल तर व्हीडीओ बघण्याचा अत्यानंद
  7. Connector चा लहान size हा याचा फायदा.
  8. 24-bit ते 48-bit color depth
  9. DVI पेक्ष्या कितीतरी पटीने जलद.
  10. सर्वात नवीन Digital data transfer technology यात वापरली आहे.
Tabletमध्ये HDMI का?
  • Tabletमध्ये HDMI port चा वापर करून आपणास आपली Tablet आपल्या TV किंवा Monitor  ला connect करू शकतो.
  • याद्वारे आपण Tablet मधील HD व्हिडीओ TV च्या मोठ्या Display वर पाहू शकतो.
  • TV वर youtube चे व्हिडीओ पाहू शकतो.
  • TV वर High Levelचे गेम खेळू शकतो.
  • Tabletमधील सर्व गाणी ,फोटो मोठ्या screen वर ऐकू व पाहू शकतो.
  • आणि अप्रतिम HD video आणि Audio चा आनंद घेवू शकतो.
मग नवी Tablet घेताना HDMI port वालीच Tablet जरूर घ्या आणि HD video बघाण्याची मजा घ्या घरच्या TV वर