Monday 26 March 2012

हॅकर्सचा हल्लाबोल


हॅकर्सचा हल्लाबोल 'इंटरनेट' संपर्कासाठी वापरण्यात येणार्‍या माध्यमांपैकी एक प्रमुख माध्यम. इंटरनेटने जग जवळ आले. केवळ एका क्लिकवर घरबसल्या जगाच्या कानाकोपर्‍यातील कशाचीही माहिती मिळवता येते. जगात कुठेही आपल्या संदेश ई-मेलद्वारे क्षणार्धात पाठविता येतो. कोणतीही खासगी संस्था, सरकारी आस्थापना, कॉर्पोरेट कंपन्या यांची माहिती हवी तेव्हा त्यांच्या वेबसाईटवरून घेता येते. जग जोडणार्‍या या माध्यमाचे फायदे अनेक आहेत, पण त्यापेक्षा या माध्यमाचा गैरवापर करणार्‍यांची संख्या अधिक आहे.

 ज्याप्रमाणे एका क्लिकवर जगाची माहिती मिळवता येते त्याचप्रमाणे 'हॅकर्स' एका क्लिकवर तुमचा ई-मेल आयडी किंवा वेबसाईट हॅक करतात. 'हॅकर्स' हे संगणक क्षेत्रात उच्चशिक्षित असतात. केंद्र सरकारची े.ुदन्.ग्ह ही वेबसाईट नुकतीच हॅक करण्यात आली. यावर पाकिस्तानी चिथावणीखोर संदेश टाकण्यात आले. ही वेबसाईट कुणी आणि कशी हॅक केली याचा शोध सुरू आहे.
 काही दिवसांपूर्वी सीबीआयची वेबसाईटदेखील हॅक करण्यात आली होती. जवळपास महिनाभरानंतर ती पुन्हा सुरू झाली. वेबसाईट हॅक करण्याच्या घटना काही नवीन नाहीत. गेल्या पाच वर्षांत देशभरात

तब्बल ३६७ वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आयटी सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बंगळुरूमध्ये दरवर्षी हॅकिंगचे सर्वाधिक गुन्हे नोंद होतात. हॅकर्स एखादे सॉफ्टवेअर अथवा व्हायरसचा वापर करून वेबसाईट हॅक करतात. वेबसाईटवर संबंधित संस्था किंवा तिच्या पदाधिकार्‍यांची वैयक्तिक माहिती असते. या माहितीचा गैरवापर हॅकर्सद्वारे केला जाऊ शकतो. संस्थेच्या सर्व डेटा नष्ट करून तिचे नुकसान व्हावे या उद्देशानेदेखील वेबसाईट हॅक केल्या जातात. त्यामुळे वेबसाईटवर स्वत:ची किंवा संस्थेची इत्थंभूत माहिती देताना काळजी घेण्याची गरज आहे. वेबसाईटबरोबरच ई-मेल आयडीदेखील हॅक करण्यात हे हॅकर्स माहीर असतात.

अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचा ई-मेल आयडी हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. अंबानी यांच्या संपर्कातील व्यक्ती, त्यांनी ई-मेलवरून पाठविलेली माहिती हे सर्व चोरी करण्याच्या उद्देशानेच करण्यात आले. याआधीदेखील अनेक कंपन्या आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांचे ई-मेल हॅक करण्यात आल्याची उदाहरणे आहेत. एखादा नातेवाईक, मित्र किंवा कंपनीतील सहकारी अशा ओळखीच्या व्यक्तींच्या नावावर हॅकर्स ई-मेल आयडी उघडतात आणि त्याद्वारे ई-मेल पाठविला जातो. ओळखीचे नाव दिसल्याने आपणही कोणताही विचार न करता मेल उघडतो.

 या मेलमध्ये माहितीऐवजी एखाद्या हॅक करणारा सॉफ्टवेअर किंवा व्हायरस असतो. संगणक अचानक हँग झाल्यानंतर आपल्या लक्षात येते. हॅकर्सची आणखी एक मोडस् ऑपरेंडी आहे. 'तत्काळ मदतीची गरज' तुमजा मित्र परदेशात अडचणीत आहे. त्याचे पाकीट व इतर सामान चोरीला गेले असून घरी परतण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. त्याला मदत करण्यासाठी काही रक्कम दिलेल्या बँक खात्यात जमा करा' असा ई-मेल वाचून आपण संभ्रमात पडतो. नेमका त्याच वेळी मित्राशी संपर्क न झाल्यास आपणही त्यावर सहज विश्‍वास ठेवतो आणि मित्रासाठी काही रक्कम मेलमध्ये उल्लेख केलेल्या बँक खात्यात जमा करतो, पण प्रत्यक्षात मित्र हा परदेशात गेलेलाच नसतो त्यावेळी फसवणूक झाल्याचे आपल्या निदर्शनास येते.

 ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा ई-मेल देखील अशाचप्रकारे हॅक करण्यात आला होता. त्यामुळे -मेल हाताळताना जरा जपून. खासगी माहिती ई-मेलवर अथवा वेबसाईटवर ठेवू नका. तुमची एक चूक भविष्यात धोकादायक ठरू शकते. हॅकर्समुळे गेल्या दोन वर्षांत हिंदुस्थानला सुमारे एक हजार कोटींचा फटका बसला आहे.

आर्थिक नुकसानीची ही रक्कम आपण काळजी न घेतल्यास वाढू शकते. इतकेच नाही तर देशातील सरकारी संस्थांची माहिती मिळवून समाजकंटक या माहितीचा गैरवापर करू शकतात. -मेल उघडण्यापूर्वी हे तपासून पहा - -मेल ओळखीच्याच व्यक्तीने पाठविला आहे का? - याआधी त्या व्यक्तीने ई-मेल पाठविला होता का? - -मेल पाठविणारा सोबत 'अटॅचमेंट' पाठविणार होता का? - -मेलचा विषय आणि अटॅचमेंटचा विषय सारखाच आहे का? - व्हायरसचा धोका आहे का? (अपडेटेड ऍण्टी व्हायरसची गरज असते.) - व्हायरस ऍलर्टचा ई-मेल फॉरवर्ड करू नका. वेबसाईट व ई-मेल हॅक होऊ नये म्हणून.... - -मेल आयडीचा पासवर्ड वारंवार बदलावा. - नाव, टोपणनाव, मोबाईल क्रमांक ही सर्वसाधारण माहिती पासवर्डसाठी टाळा. - ऑनलाईन किंवा फोनवर पासवर्डची देवाणघेवाण करू नका. - ज्या माहितीमुळे नुकसान होईल अशी माहिती वेबसाईटवर टाकू नका. - ऍण्टी व्हायरस नियमित अपडेट करा. - मूळ सर्व्हरसाठी सॉफ्टवेअरची लायसन्स कॉपी वापरा