Saturday 19 January 2013

ऑपरेटिंग सिस्टम पेन ड्राईव्हने इन्स्टॉल करण्यासाठी पेन ड्राईव्ह कसा बूटेबल करावा?


पेन ड्राईव्ह का,कधी ,कसा बूटेबल करावा हा प्रश्न आपणस नक्की पडला असेल.त्याचीच महिती देणारा हा लेख आपणस नक्की उपयोगी पडेल.


नवीन कॉम्पुटर खरेदी केला आहे ,सिस्टीम बंद पडते,कॉम्पुटरमध्ये व्हाईरस आला आहे अशा अनेक  वेळी आपणास बऱ्याचदा नवीन ऑपरेटिंग सिस्टिम इंस्टॉल करावी लागतच असते. त्यावेळी नेमकी आपणस सी डी ची आठवण येते आणि बूटेबल सी.डी. शोधून सापडत नाही.सध्या यु.एस.बी. पेन ड्राईव्ह रीराईटेबल आल्यामुळे सर्वांकडे उपलब्द असतो त्याचाच वापर करून ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करण्याच्या सोप्या स्टेप्स आपलास फार उपयुक्त पडतील.


ऑपरेटिंग सिस्टमचा सेटअप करण्यासाठी आपल्याकडे संगणकात ऑपरेटिंग सिस्टमचा सेटअप व कमीत कमी १ जी.बी.चा पेन ड्राईव्ह असणे जरुरू आहे.

या पद्धतीने आपण विंडोज एक्स पी,विंडोज व्हिस्टा ,विंडोज ७,विंडोज ८ या सर्व ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करता येतात.


पेन ड्राईव्ह वा सी.डी बूटेबल करणे म्हणजे ती NTFS फॉर्मट मध्ये कन्वर्ट करावी लागते….तरच त्यातून नवीन ऑपरेटिंग सिस्टीम इंस्टॉल करता येते.


ऑपरेटिंग सिस्टम पेन ड्राईव्हने इन्स्टॉल करण्यासाठी पेन ड्राईव्ह बूटेबल करण्याच्या स्टेप्स:

१]पेन ड्राईव्ह बूटेबल करण्यासाठी पहिला तो सिस्टिमला कनेक्ट करा.

२]स्टार्ट मध्ये जाऊन ‘रन’ ओपन करा.[शॉर्टकट: विंडोज बटन +R बटन]

३]त्या Run बॉक्स मध्ये ‘cmd’ टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

4]त्यामुळे कमांन्ड विंडो ओपन होते.

५]त्या विंडोत “diskpart” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[याद्वारे आपण डिस्क संबधित सेटिंग करू शकतो]

6]नंतर “list disk” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[यामुळे आपणस आपल्या कॉम्पुटर मधील हार्ड डिस्क व पेन ड्राईव्ह लिस्ट होईल.

७]त्या लिस्ट मध्ये जर पेन ड्राईव्हचा नंबर एक असेल तर ‘Select Disk 1’ ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[ही कमांन्ड आपणस उपलब्द डिक्स मधून आपण ज्या डिस्क वर प्रोसेसिंग करायचे आहे ती डिस्क सिलेक्ट करू शकतो,शक्यतो हार्ड डिस्क नंबर ० ला असते आणि कनेक्टेड पेन ड्राईव्ह नंबर १ ला असतो.]

८] नंतर “Clean” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

 [ही कमांन्ड  पेन ड्राईव्ह मधील आधीचा डाटा डिलीट करून स्वच्छ करतो.]

९] नंतर “Create Partition Primary” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[ही कमांन्ड पेन ड्राईव्ह मध्ये प्रमुख विभाग तयार करते जो पुढे वापरला जातो.]

१०] नंतर “Select Partition 1” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[नवीन केलेला विभाग सिलेक्ट केला]

११] नंतर “Active” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[या कमांन्डमुळे पुढील प्रक्रियेसाठी फोकस तयार केला]

१२] नंतर “Format FS=NTFS” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[ही सर्वात महत्वाची स्टेप या मुळे पेन ड्राईव्ह NTFS फोर्मेतमध्ये कन्वर्ट होतो.]

१३]या प्रोसेसला जवळपास ५ मिनिट लागतात १००% प्रोसेसिंग पूर्ण झाल्यवर पुढील कमांन्ड टाईप करणे.

१४] नंतर “Assign” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[यामुळे पेन ड्राईव्ह ला नाव दिले जाते जसे सी ड्राईव्ह,डी ड्राईव्ह]

१५] नंतर “Exit” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[यामुळे डिस्क पार्ट टूलमधून बाहेर पडतो.]

अधिक माहितीसाठी पुढील छायाचित्र पहावे


.Bootable pen drive

१६]आता ऑपरेटिंग सिस्टमच्या सर्व फाईल्स पेन ड्राईव्ह मध्ये पेस्ट करणे.


[bootmgr फाईल सेटअप मध्ये आहे का ते चेक करणे,जर सेटअप झीप फाईल मध्ये असेल तर तो एक्स्टेन्शन करून मग पेस्ट करणे]

१७]पेन ड्राईव्ह कॉम्पुटर मधून रिमूव्ह करणे.हा झाला बूटेबल पेन ड्राईव्ह याचा वापर करून आपण कोणत्याही मशीन मध्ये ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करू शकतो.

१८]हा पेन ड्राईव्ह नवीन ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करायची आहे त्या मशीनला कनेक्ट करावा.

मशीन री-स्टार्ट करावी आणि बूट ऑप्शन मधून बूट फ्रॉम “USB Drive” सिलेक्ट करावे.

१९]मग ऑपरेटिंग सिस्टम इंस्टॉलेशन चालू होईल.

हीच प्रोसेस आपण ऑटोमॅटिक करू शकता.

यासाठी आपणस बँच फाईल बनवावी लागेल.

बँच फाईल मध्ये खालील महिती टाकावी.

@echo off 
DISKPART /s
 X:\USBBoot.txt 
xcopy H:\*.* /s/e/f M:\
pause
exit

टेक्स्ट फाईल मध्ये खालील महिती टाकावी.

SELECT DISK 1 
CLEAN
CREATE PARTITION PRIMARY
SELECT PARTITION 1
ACTIVE
FORMAT QUICK
ASSIGN LETTER=M
EXIT

या दोन्ही फाईल एकाच फोल्डरमध्ये ठेवावे आणि बेच फाईल वर डबल क्लिक करावे.

त्याद्वारे तुमचा  पेन ड्राईव्ह आपोआप बूटेबल होईल.

यादोन्ही फाईल मी दिलेल्या आहेत त्यात फक्त .doc एक्सटेंशन काढून त्या फाईल आहे डेक्सटॉप वर फोल्डरमध्ये पेस्ट करून आहे तश्या वापरू शकता.

काही शंका असल्यावर नक्की कळवा…MJ आहेच तुमच्या मदतीला… :)


 

Android OS म्हणजे काय ?

Android OS म्हणजे काय ?

Android OS म्हणजे काय ?

Android म्हणजे नक्कीच फोन नाही वा कॉम्पुटर नाही…

Android हा एक Moblie साठी बनलेला एक सॉफ्टवेअर चा platform आहे.

आपला mobile हा कोणत्या ना कोणत्या तरी OS वर चालत असतो.जसे Nokia N97 हा Symbian os वर चालतो,Samsung Omnia हा विन्डोव्स mobile osवर चालतो,तर iPhone-हा i os वर चालतो.

या पुढील बरेच Mobile ,Tablet Android नावाची नवीन OS वापरतील…एव्हाना बरेचे mobile बाजारातही आले असतील..

Androidचे उपयोग :
  • या मध्ये mobile साठी लागणारी Applications सोफ्टवेअर मधेच आहेत.
  • Android हि  ओपन सोर्स आहे.
  • Android हि open आहे.(कोणीिहे या platform मध्ये Development करू शकतो.)
  • हि os “Open Handset Alliance” नावाची संस्था चालवते.
  • यामध्ये प्रामुख्याने गुगलचा पुढकार आहे.
  • यात T-Mobile,Vadafone यासारख्या Mobile कंपनी आहेत,e-buy,Esmetec,Sasken सारख्या सोफ्टवेअर कंपनी आहेत.
  • Intel,Nvidia,ARM सारख्याprocessor च्या कंपनी आहेत.
  • LG,Motorola,Samsung,Asus,Acer,sony सारख्या Mobileच्या कंपनी आहेत.
  • मग गुणवत्तेची आणि सुविधाची हमखास हमी..
  • लक्षात ठेवा…..Android हि जगतील सर्वात जलद वेगाने वाढणारी OSआहे.

तांत्रिकदृष्ट्या:

*हा  JAVA बेस फोन आहे.
[Android uses the Dalvik virtual machine with just-in-time compilation to run Dalvik dex-code (Dalvik Executable), which is usually translated from Java bytecode.]



*याचा बेस Linux os आहे.
*यामध्ये Integrated browser आहे.
*Hardware acceleration व 2D,3D साठी graphics optimization.
*GSM Technology support सुद्धा आहे.
*SQLite चा वापर data storage साठी केला जातो.
*मीडिया,वेब,३D साठी खास libraries.
*XML चा वापर करून UI हा os शी संवाद साधतो.
*म्हणूनच हि OS सहजपणे हाताल्ण्याजोगी व भरपूरच सुविधांनीयुक्त आहे.

नक्की काय आहे Android मध्ये..

 

Email ची सुविधा ,SMS,calendar,नकाशे,browser,contact या सारख्या अनेक सुविधा या OS सोबतच मिळतील.
१०००० हून जास्त Application-Android Store मध्ये उपलब्ध..
यास Multi Touch चा support आहे.Bluetoot,wiFi,Adobe Flash सोबतीला..इत्यादी Applicationला व इतर सर्वांना कमी battery मध्ये एकदम सुरल रीतीने चलावतो.

Android OS चे प्रकार:

 


  1. Android 1.5 (Cupcake)- हे Android चे सुरवातीचे version आहे.
  2. Android 1.6 (Donut)- यात Voice Search,कॅमेराची सुविधा Add करण्यात आली.
  3. Android 2.0/2.1 (Eclair)- यात HTML5,Digital Zoom add केले आहे.
  4. Android 2.2 (Froyo)- यात Adobe Flash 10.1 wifi ला support देण्यात आला.
  5. Android 2.3 (Gingerbread)- यात power management,व gyroscopes सारख्या sensor ला support देण्यात आला.
  6. Android 3.0 (Honeycomb)- हे Tablet साठी बनविलेले खास version आहे.यात Google Maps 5 व 3D तंत्रज्ञानाचा वापरासाठी योग्य बदल केले आहेत.
  7. Android 4.0 (Ice Cream Sandwich)- यात एकच अप्लिकेशन व ऑपरेटिंग सिस्टम मोबाईल व Tablet दोन्ही साठी वापरता येते.
  8. Android 4.1 (Jelly Bean)-यात गुगल नाऊ,ऑफलाइन व्होईस टायपिंग व स्मुथ रीस्पोंससाठीच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

Androidच का?-

 

तुमचा फोन वा Tablet शक्तिशाली व भरपूर सुविधा देणारी तरीही कमीत कमी battery वापरणारी हवी आहे ना!!!