Saturday 19 November 2011

आपला मेल हॅक होवू शकतो.

आपला मेल हॅक होवू शकतो. आपला मेल हॅक होत असल्यास ते ओळखण्याच्या काही टिप्स आहेत. 
1.सर्वात प्रथम आपण आपल्या लॉग-इन विषयीची माहिती लक्षात ठेवावी. आपण मेल कधी उघडला होता. त्यावर काय काय केले होते, हे लक्षात ठेवावे.

2. आपण आपला मेल उघडल्यानंतर त्यावर सर्वात शेवटची तारीख पाहू शकता. यावर आपण यापूर्वी कदी आला होतात, याची नोंद असते.

3. ज्या पीसीवरुन मेल एक्टिव्हेट करण्यात आला त्याचा आयपीही यावर दिसतो.

4. मेल पाहिल्यानंतर आपण त्याची एक्सेस तारीख व लॉग-इन-टाइम लक्षात ठेवावा

.
5. दर महिन्याला आपला मेल पासवर्ड आपण बदलावा.


6. मेल पासवर्डमध्ये काही कॅप्स (कॅपिटल)  शब्द तसेच काही आकडेही असावेत.


वरील काही टिप्स आपल्याला मेल एक्सेस करताना उपयोगी पडू शकतात.


मध्ये माझ्या एका मित्राचे ‘गुगल अकाऊंट’ हॅक झाले होते. म्हणजे हॅकर्सनी अगदी हुबेहुब ऑर्कुट सारखं पेज तयार केलं होतं आणि तिथे जर तुम्ही लॉग-इन झालात की, संपलंच मग सगळं! पण यावेळीही गुगलच्या सोयीसुविधा त्याच्यासाठी धावून आल्या. म्हणजे त्याचं अकाऊंट हॅक जरुर झालं! पण त्याचं त्याला ते परतही मिळालं! कसं काय!? त्याने गुगल अकाऊंट्सला आपला मोबाईल नंबरही दिला होता. त्याने मोबाईलच्या सहाय्याने आपला पासवर्ड रिसेट करुन आपलं अकाऊंट परत मिळवलं. ऑनलाईन अकाऊंट आणि आपला मोबाईल नंबर हे दोन्ही एकाच वेळी चोरीला तर जाऊ शकत नाहीत ना! आणि म्हणूनच मला वाटतं, सावधानतेचा उपाय म्हणून प्रत्येकाने आपला मोबाईल नंबर गुगलला देऊन ठेवावा. 

No comments:

Post a Comment