Monday, 26 December 2011

इंटेलचा नवा ' कोअर आय सेव्हन ' प्रोसेसर बाजारात




इंटेलचा नवा ' कोअर आय सेव्हन ' प्रोसेसर बाजारात दाखल
आता तुमचा संगणक होणार सुपरफास्ट..
जर तुम्ही अजुनही पेन्टियम ४ या सिरिजचे संगणक वापरत असाल तर तुम्ही खुप मागे आहातकारण इंटेल कोअर टु ड्यु प्रोसेसर पण आता जुना झालाय इंटेलने बाजारात आता नविन आणी सुपरफास्ट कोअर आय सेव्हन ' हा नवा प्रोसेसर लॉंच केला. हा जगातील सर्वात फास्ट प्रोसेसर असल्याचा इंटेलचा दावा आहे कोम्प यूजरच्या नव्या गरजा लक्षात घेऊन ' नेहलम प्रोसेसर ' या नव्या मालिकेअंतर्गत इंटेलने आणलेला ' कोअर आय सेव्हन ' हा पहिलाच प्रोसेसर आहे. ९६५, ९४० आणि ९२० या तीन सिरीजमध्ये आणलेले हे प्रोसेसर जे अनुक्रमे ३.२० गिगाहर्टझ, २.९३ गिगाहर्टझ आणि २.६६ गिगाहर्टझ या क्लॉकस्पीडमध्ये बाजारात उपलब्ध असतील. हे प्रोसेसर डीडीआर३-१०६६ मेमरीला सपोर्ट करतील. त्यामुळे हे प्रोसेसर भन्नाट स्पीडचा अनुभव देतील, असे इंटेलचे म्हणणे आहे.


Wednesday, 21 December 2011

संगणक सुरक्षा

संगणक सुरक्षेच्या पहिल्या अंकात आपले स्वागत आहे.  जगभरात संगणक क्षेत्रात घडण्याऱ्या घटनांचा आढावा व तुमच्या संगणकाशी संबंधित बातम्यांचे विश्लेषण व तसेच आपल्या प्रश्नांची उत्तरे , असे याचे स्वरूप असेल.  आम्हाला आपले प्रश्न जरूर लिहून कळवा.

आज मी आपल्या बरोबर इंटरनेट वर संगणकाचा वापर करताना घेतल्या जाणाऱ्या सुरक्षे संबंधी चर्चा करणार आहे. अर्थात या बाबी सार्वभौम आहेत. कुठल्याही देशात आणि कुठल्याही भाषेत संगणकाचा वापर करताना याच बाबींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम आपण ब्रावूजर चा विचार करू. आपला सर्वांचा आवडता ब्रावूजर म्हणजे इंटरनेट एक्सप्लोरर. हा जसा सर्वांच्या माहितीतला व जगात सर्वाधिक वापरला जाणारा ब्रावूजर आहे तसाच सर्वाधिक संगणकांना व्हायरस पोहोचवणारा ब्रावूजर म्हणून हि याची कुख्याती आहे.  याला कारण म्हणजे इंटरनेट वापरताना आपल्याकडून होणारा निष्काळजीपणा.  आपण यावर सविस्तर विचार करू.

आपण कोणतीही माहिती शोधताना सर्वप्रथम त्याचा गूगल वर शोध घेत असतो, आणि गूगल वर सापडलेल्या साईट मधून एखाद्या साईट वर आपण क्लिक करतो.  संगणकावर व्हायरस ला आमंत्रण देण्याची ही पहिली पायरी आहे. कारण बहुतांशी साईट हे व्हायरस ने दूषित झालेले किंवा जाणून बुजून खोटी माहिती पुरवण्या साठी बनवलेले असतात. ही माहिती प्रथम ऐकताना आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला असेल. कारण गूगल वर एखाद्या साईट वर क्लिक करण्याचा आणि संगणकावर व्हायरस ओढवून घेण्याचा काही संबंध असेल हे कदाचित आपण यापूर्वी ऐकले नसेल, किंवा ऐकले असले तरी त्याची गंभीरता आपल्याला कधी जाणवली नसेल, किंवा हे सर्व माहित असून देखील याला रोकण्यासाठी काय करावे लागते याची आपल्याला कल्पना नसेल. 
अशा घातक वेब साईट पासून तुमच्या कॉम्प्युटर ला  वाचवण्याचा उपाय म्हणजे वेब साईट वर्गीकरण करणारी सेवा. याला इंग्रजीत साईट एडव्हायजरी  टूल असे म्हणतात. या कंपन्या इंटरनेट वरील साईट चे परीक्षण करून त्यांना सुरक्षित , शंकास्पद व असुरक्षित असे वर्गीकरण करतात.  या कंपन्या या वर्गीकरणाचा उपयोग करण्यासाठी ब्रावूजर प्लग इन बनवतात. इंटरनेट एक्सप्लोरर व फायरफौक्स   ब्राऊजर साठी हे प्लग इन उपलब्ध असतात. या  मध्ये WOT (web of trust), Mcafee  साईट एडवायजर, ThreatExpert browser defender, Haute Secure वगैरे अनेक कंपन्या कार्यरत आहेत.  तुम्ही यापैकी कोठलीही सेवा निवडू शकता.  या मध्ये वेब ऑफ ट्रस्ट ही कंपनी, जनते कडून वेब साईट चे वर्गीकरण करण्या वर आधारलेली आहे, त्यामुळे WOT ही सर्वाधिक लोकप्रिय सेवा बनली आहे.  तुम्ही (wot.com) या वेब साईट वरून तुमच्या ब्रावूजर साठी त्यांचे प्लग इन विनामूल्य डावून्लोड करू शकता. wot plugin
एकदा हा प्लग इन इंस्टाल झाल्यानंतर तुम्हाला नवीन दृष्टी मिळाल्याचा अनुभव येयील.  जेव्हा तुम्ही गूगल मध्ये एखादी गोष्ट शोधता तेव्हा , सर्च रिझल्ट मध्ये तुम्हाला प्रत्येक लिंक समोर लाल , पिवळे किंवा हिरवे वर्तूळ दिसून येयील. हे WOT चे वर्गीकरण आहे.  लाल वर्तुळा ने चिन्हित केलेल्या लिंक पासून दूर राहा. पिवळे वर्तूळ असलेल्या लिंक बद्दल साशंकता असते, आणि हिरवे वर्तूळ असलेल्या वेब साईट ला सुरक्षीत मानले जाते.  आणि जर तुम्ही चुकून एखाद्या असुरक्षित वेब साईट ला उघडण्याचा प्रयत्न केला तर ती वेब साईट उघडण्या पूर्वी तुम्हाला त्या वेब साईट बद्दल पूर्वसूचना दिली जाते. आणि हे वर्गीकरण, तुमच्या ईमेल मध्ये असलेल्या लिंक चे ही केले जाते. अर्थात जेव्हापर्यंत तुमचे कॉम्प्युटर इंटरनेट शी जोडलेले आहे तेव्हा पर्यंत WOT प्लग इन लिंक चे वर्गीकरण करीत राहते.  या प्लग इन मध्ये आणखी ही काही सुविधा आहेत,

Thursday, 15 December 2011

आपली मुले संगणकाचा गैरवापर तर करीत नाही ना ?" यावर पाळत ठेवा.



नेटभेटचे नियमीत वाचक असलेल्या एका सदगृहस्थांनी मला एक प्रश्न विचारला होता. तो असा -
- मला एक जाणून घ्यायचे आहे की, आपली मुले, भाऊ, बहिणी त्यांच्या लॅपटॉप किंवा
डेस्क्टॉप वर काय काय करत असतात, कुणाशी बोलत असतात, काय बोलत असतात इंटरनेट वर योग्य तेच करतात का हे त्यांना न कळता कसे जाणून घ्यायचे?
जर याबद्दल काही उपाय असेल तर क्रुपया मला त्याबद्दल माहिती द्याल का?
खरे तर कोणाची अशी छुपी माहिती जमा करणे (मग ती स्वतःच्या मुलांची असली तरीही) मला उचित वाटत नाही. मात्र अशाच आशयाच्या आणखी काही ईमेल्स मला आल्या ज्यामध्ये हाच प्रश्न वेगळ्या प्रकारे मांडला होता.
- माझ्या ऑफीसमधील संगणकावर माझ्याव्यतीरीक्त इतरही लोक काम करतात. आणि माझ्या अनुपस्थीतीत माझ्या संगणकावर काही प्रतिबंधीत वेबसाईट्स पाहतात मात्र त्यातून येणार्‍या व्हायरस मुळे माझा संगणक नेहमी बिघडतो. आपोआप इंस्टॉल होणार्‍या काही अश्लिल वॉलपेपर्समुळे माझी बदनामी देखिल होते. तेव्हा माझ्या संगणकाचा गैरवापर नक्की कोण आणि केव्हा करते हे मला शोधता येईल का?
- मी एक उद्योजक असून कामानिमित्त नेहमी फिरतीवर असतो. मात्र मी ऑफिसमध्ये नसताना माझ्या ऑफिसमधील माणसे नीट काम करत आहेत ना, काही टाळाटाळ किंवा पर्सनल कामे करतात का तसेच संगणकाचा आणि इंटरनेटचा गैरवापर तर करीत नाहीत ना ? हे मला कसे शोधता येईल?
वरील प्रश्न पाहिल्यावर मात्र अशा प्रकारे माहिती मिळविण्यामुळे जर कोणाचे नुकसान टाळता येत असेल तर आपण या प्रश्नास उत्तर द्यावे असा विचार करुन मी हे उत्तर शोधले आणि सर्वांच्या माहितीकरता येथे देत आहे. (असे करणे उचित आहे की नाही हे सुजाण वाचकांनी आपले आपणच ठरवावे.)
संगणकाचा वापर कसा केला जातोय हे पाहण्याचा सोपा उपाय म्हणजे इंटरनेट हिस्ट्री Internet History किंवा Start > My Recent documents तपासणे हा होय. मात्र हे दोनही प्रकार बर्‍याच लोकांना माहित असल्याने हिस्ट्री डीलीट करुन किंवा My Recent documents मधील फाईल्स डिलीट करुन लपवता येतात. आपण जो उपाय पाहणार आहोत तो थोडा वेगळा आहे.
या सॉफ्टवेअरची माहिती घेण्याआधी आपण ते कसे काम करते हे पाहुया. एकदा का संगणकावर हे सॉफ्टवेअर इंस्टॉल केले की ते आपोआप स्क्रीनशॉट्स Screenshots घेणे चालू करते. स्क्रीनशॉट म्हणजे संगणकाच्या स्क्रीनचा फोटो. हे स्क्रीनशॉट आपण ठरवून दिलेल्या फोल्डरमध्ये चित्ररुपात (Image format) साठविले जातात. अर्थात असे स्क्रीनशॉट्स घेतले जात आहेत हे वापरकर्त्यांला कळतही नाही.
असे आपोआप स्क्रीनशॉट्स घेणारे अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. आपण त्यापैकीच एका भरवशाच्या सॉफ्टवेअरची माहिती घेऊयात. या सॉफ्टवेअरचे नाव आहे Automatically take screenshot software. freesoft80.com या साईटवर येथे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
सॉफ्टवेअर डाउनलोड व ईंस्टॉल करण्याची पद्धती -
१. येथे क्लिक करुन Automatically take screenshot software डाउनलोड करुन घ्या.
२. Automatically take screenshot software डाउनलोड करण्याआधी संगणकामध्ये मायक्रोसॉफ्ट डॉट नेट फ्रेमवर्क ३.५ (Microsoft .net framework 3.5 ) असणे आवश्यक आहे. हे सॉफ्टवेअर तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या साईटवर येथे जाऊन डाउनलोड करु शकता. (इन्स्टॉलर 2MB चा असला तरी मुख्य सॉफ्टवेअर ५७ MB चे आहे !)

३. एकदा मायक्रोसॉफ्ट डॉट नेट फ्रेमवर्क ३.५ इंस्टॉल झाले की आपण Automatically take screenshot software इंस्टॉल करु शकतो.





४. सॉफ्टवेअर इंस्टॉल झाल्यानंतर खाली दाखविल्याप्रमाणे स्क्रीन दिसेल.
यामध्ये A, B व C चा अर्थ अनुक्रमे असा आहे -
A - आपोआप घेतले जाणारे स्क्रीनशॉट्स ज्या फोल्डरमध्ये save करावयाचे आहेत ती जागा. उदाहरणार्थ मी येथे Auto screenshots हा फोल्डर बनविला आहे.
B - किती अंतराने स्क्रीनशॉट्स घ्यायचे आहेत ती वेळ. उदाहरणार्थ मी येथे ३ मिनीटे १० सेकंद अशी वेळ ठरवलेली आहे.
C - या अतिशय महत्त्वाच्या सेटींग्ज आहेत. चित्रात दाखविल्याप्रमाणे Load this software on windows startup आणि Start as hidden application हे दोनही पर्यात निवडा (सिलेक्ट करा). या दोन सेटींग्जचा अर्थ असा आहे की संगणक सुरु करताच हे सॉफ्टवेअर आपोआप चालू होईल आणि लपून राहील त्यामुळे स्क्रीनशॉट्स घेतले जात आहेत हे वापरकर्त्यांना कळणार नाही.
बस. आता संगणकामध्ये घडणार्‍या प्रत्येक घडामोडीचा ठरवलेल्या वेळेनुसार फोटो काढण्यात येईल. हे स्क्रीनशॉट्स पाहून संगणकाचा वापर कसा केला जातोय याकडे बारकाईने लक्ष ठेवता येईल.
Note - सतत स्क्रीनशॉट्स save झाल्यामुळे संगणकाची बरीचशी मेमरी स्पेस वापरली जाईल. तेव्हा ठराविक अंतराने हे स्क्रीनशॉट्स डीलीट करायला विसरु नका.
हा लेख आणि हे सॉफ्टवेअर कसे वाटले ते आम्हाला जरुर लिहून कळवा. आणि कृपया याचा गैरवापर करु नका. प्रत्येकाला असलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करा.

जगातून कुठूनही चालवा आपला कम्प्युटर!

1) सध्या आपला कम्प्युटर आपली अतिमहत्त्वाची वस्तू बनलेली आहे. जणू काही आपला जिवलग मित्रच. तर कधीकधी आपले त्याहूनही अगदी जवळचं नातं तयार झालेलं असतं. बऱ्याच वेळा असं होतं, की आपली सर्व महत्त्वाची कामं ऑॅफिसच्या कम्प्युटरवर करत असतो. घरी आल्यावर किंवा एखाद्या वेळी बाहेरगावी गेल्यावर ऑॅफिसमधल्या कम्प्युटरवरची महत्त्वाची फाइल हवी असते मग ती फाइल कशी मिळवायची, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. 

2) या समस्येवर एक चांगला आणि सोपा पर्याय आहे तो म्हणजे 'रिमोट कम्प्युटर ऍक्सेस'. सध्या आपण कुठूनही आपला कम्प्युटर चालवणं अगदी सहज शक्य आहे. 'रिमोट कम्प्युटर अॅक्सेस'द्वारे आपण इण्टरनेटच्या माध्यमातून कोणत्याही कंपनीला आणि काहीही पैसे न देता आपण कधीही आणि कितीही वेळा आपला कम्प्युटर हाताळू शकता. 

)सध्या काही मोजक्याच कंपन्यांच्या प्रोग्रॅमद्वारे ही सिस्टम वापरता येते.यामधे काही कंपन्यांचा प्रोग्रॅम काही हजार रुपयांना विकत घ्यावा लागतो. तर काही अगदी मोजक्या कंपन्या त्याचा रिमोट कम्प्युटर अॅक्सेस प्रोग्रॅम अगदी मोफत देतात. ही सेवा मोफत देणाऱ्या कंपन्यांमधे 'लॉगमीइन' ही कंपनी फार प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या www.logmein.com वेबसाइटद्वारे आपण ही सेवा वापरू शकता. 

3)या वेबसाइटवरून एक छोटासा प्रोग्रॅम आपल्या कम्प्युटरमधे लोड करावा लागेल. त्यानंतर आपण तो कम्प्युटर कुठूनही अॅक्सेस करू शकता. फक्त अशा वेळी दोन्ही कम्प्युटर चालू असणं आवश्यक आहे. तसंच दोन्ही कम्प्युटरवर इण्टरनेट सुरू असणं आवश्यक आहे. 

4)नवीन खातं उघडण्यासाठी या वेबसाइटवर नवं मेल सुरू करण्याची जी प्रक्रिया असते तशाच प्रकारचा फॉर्म भरवा लागतो. आता जेव्हा आपल्याला एखादा कम्प्युटर दुसरीकडून अॅक्सेस करायचा असेल तर आपल्या खात्यामधे जमा केलेले कम्प्युटर हाताळू शकता फक्त ते सुरू असणं आणि त्यावर इण्टरनेट सुरू असणं आवश्यक आहे. आता जर आपल्याला आपल्या खात्यामधे जमा केलेला एखादा कम्प्युटर चालवायचा असेल, तेव्हा परत www.logmein.com ही वेबसाइट सुरू करा. आता आपण या वेबसाइटचे मोफत सभासद असल्याने आपल्या खात्याच्या ई-मेल आयडी आणि पासवर्डने लॉगइन करा. आता आपल्यासमोर My Computers चं पान उघडेल त्यातील जे जे कम्प्युटर्स चालू असतील त्यांची नावं ठळक दिसतील, तर बंद असलेल्या कम्प्युटर्सच्या पुढे Offline असं दिलं असेल. आता जोकम्प्युटर आपल्याला उघडायचा असेल त्याच्या नावावर क्लिक करा. आता लगेचच त्या कम्प्युटरचा Access Code म्हणजेच त्याला दिलेला पासवर्ड विचारेल तो देऊन लॉगइन या बटणावर क्लिक करताच आपल्यासमोर तो कम्प्युटर हाताळण्याचं पान उघडेल त्यातील Remote Control या बटणावर क्लिक करा. आता तो दुसरीकडील कम्प्युटर जसाच्या तसा आपल्यासमोर छोट्या स्क्रीनमधे उघडेल इथे फुल स्क्रीनच्या ऑॅप्शनवर क्लिक करून तो कम्प्युटर उघडू शकता काम पूर्ण होईल तेव्हा Disconnect या बटणावर क्लिक करा. आपण ज्या कम्प्युटरला हाताळत असाल, त्यावर जणू काही जादू झाल्याप्रमाणे सर्व गोष्टी आपोआप होता

विंडो एक्सपी मध्ये सिस्टीम रीस्टोर चा वापर कसा करावा

1)  एखादा वायरस काढून टाकण्यासाठी सिस्टीम रीस्टोर चा वापर करणे हा सगळ्यात सोपा आणि बरोबर लागू होणारा इलाज आहे. यासाठी तुम्हाला    सिस्टीम रीस्टोर उघडावे लागेल. विंडो एक्सपी मध्ये 

 2) Start > All Programs > Accessories > System Tools > System Restore 
असे निवडावे.


 3)  त्यानंतर "रीस्टोर माय कॉम्प्युटर" असे निवडावे. आणि समोरच्या स्क्रीन वर एखादी तारीख निवडावी. गडद निळ्या रंगाच्या तारखा या रीस्टोर पोइंट असतात. तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर वर वायरस आढळून येण्या पूर्वीची तारीख अंदाजे निवडावी लागेल. जर तुम्ही ही तारीख बरोबर निवडली तर तुमचा कॉम्प्युटर  त्या तारखेला जसा होता तसा पूर्व स्थितीत जाईल. आणि वायरस च्या फाईली कॉम्प्युटर  वरून दिसेनाश्या होतील. यानंतर नेक्स्ट बटन दाबून सिस्टीम रीस्टोर ची प्रक्रिया पूर्ण करावी

Monday, 5 December 2011

कॉम्प्युटर हँग ….?


काल वर्गात कॉम्प्युटरवर प्रॅक्टिस करत असताना एक विद्यार्थी वैतागून म्हणाला , `सर हा पी.सी. खूप slow चालतोय. मी format करू कां ?’ मी म्हंटलो , `format कां करायचा बरं ? तू troubleshooting कर नां. विचार कर की काय problem असेल ? पी.सी. कां slow झाला आहे? virus आहे कां? garbage data आहे कां ? temperory files आहेत कां? एखादा program जास्त memory वापरतोय कां? स्कॅन करून बघ…..काय problem आहे ते शोधून काढ मग solution सापडेल .’ तो म्हणाला ,`ओ सर, खूप वेळ लागेल…. परत problem नाही सापडला तर शेवटी format करावाच लागेल … त्यापेक्षा आत्ताच format करतो.’ ‘अरे, format करणं हे solution नाही. ती पळवाट झाली . परत problem आला तर परत format करणार कां ?’ नाखुशीनेच त्याने troubleshooting करून पाहिले. असे लक्षात आले की एक प्रोसेस , कॉम्प्युटरची मेमरी फ्री करत नव्हती, त्यामुळे कॉम्प्युटरवर बाकीचे प्रोग्राम लोड व्हायला उशीर लागत होता व तो slow झाला होता. problem लक्षात आल्यावर solution सापडले…. आपल्या रोजच्या जीवनात पण असे होत असते . खूप अडचणी, संकटे येत असतात. आपण तिथेच अडून राहून चालत नाही. त्यावर उपाय असतो तो फक्त शोधावा लागतो. आपण बऱ्याचदा पेपरमध्ये ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबद्दल’ वाचतो… प्रत्येक वेळी माझ्या मनात हाच विचार येतो … अडचणी, संकटे येतच असतात. पण त्यावर आत्महत्या हा उपाय नाही. ती पळवाट झाली . शांत डोक्याने विचार केला तर लक्षात येईल की जी काही अडचण आहे त्यावर मात करता येते. फक्त वेळ लागतो , निरनिराळे मार्ग अभ्यासावे लागतात . संयम ठेवणे खूप महत्वाचे आहे. कधी कधी असं वाटतं की ‘संयम ठेवणे’ ही tendency कमी होत चाललीय . त्याला कारणीभूत आजची परिस्थिती आहे. जर प्रत्येक गोष्ट, एका क्लिक वर, एका sms वर , हाकेच्या अंतरावर मिळत असेल तर वाट पाहणं, संयम ठेवणं हे वेळ वाया घालवण्यासारखं वाटतं. साधं उदाहरण घेऊ. पूर्वी घरी इडली करून खायची असेल तर किमान १ दिवस वाट पहावी लागायची. (डाळ,तांदूळ भिजवा, वाटा, ८-९ तास रुबवत ठेवा, मग इडली तयार करा. या process साठी १ दिवस लागायचाच.) आता ‍कोपर्‍यावरच्या वाण्याकडे इडलीचे तयार पीठ कधीही मिळते , जास्तीत जास्त अर्ध्या तासात घरी इडली तयार होते. असंच प्रत्येक गोष्टीत होते… त्यामुळे वाट पाहाणे हे मागासलेपणाचे वाटते. कमी मार्क मिळाले , हव्या त्या शाखेला अॅडमिशन नाही मिळाली, मुलीनं प्रेम करायला नकार दिला… (ही लिस्ट बरीच वाढेल) थोडक्यात हवे ते नाही मिळाले की कर आत्महत्या, संपवा आयुष्य!!! (पी.सी. हँग झाला , slow झाला , कर format ) हे इतकं सोपं असतं कां? आयुष्य इतकं स्वस्त आहे कां?
-- फुलपाखरु फक्त १४ दिवस जगतं, परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगुन कित्येक हदय जिकंत....... आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हदय जिकंत रहा ......!!!!!! 9890888388

Saturday, 3 December 2011

14 मार्चला इंटरनेट एक्स्प्लोअरर 9 येतोय..



पण थांबा, तुमच्या संगणकावर WINDOWS XP असेल तर तुम्हाला नवा कोरा इंटरनेट एक्स्प्लोअरर 9 लावता येणार नाही. कारण तो WINDOWS XP सपोर्ट करीत नाही.
तुम्हाला त्यासाठी WINDOWS VISTA अथवा WINDOWS 7 तुमच्या संगणकावर लावावं लागेल.
नवे IE9 हे  HTML 5 ने युक्त आहे. शिवाय नवे जावास्क्रीप्ट इंजिन (JSCRIPT) ची साथ त्याला असणार आहे. ह्या इंजिनचे नाव आहे CHAKRA.
गेल्या महिन्यात 10 फेब्रुवारी रोजी मायक्रोसॉफ्टने IE9 चा रिलीज कँडिडेट इंटरनेटवर सादर केला होता. आता 15 मार्चला येतेय ती अंतिम आवृत्ती, तुमच्या आमच्या सर्वांसाठी.
पण, आता विंडोज 7 कडे गेल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण IE9 आणि HTML5 चा लाभ घ्यायचा असेल तर दुसरा मार्ग नाही. FACEBOOK, TWITTER वापरत असाल, YOU TUBE चे फॅन असाल तरी तुम्हाला लवकरच WINDOWS 7 चा आधार घ्यावा लागणार आहे.

ब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सविस्तर माहिती कुठे मिळेल

Blu (Blue नव्हे) Ray Disk ह्या DVD च्या पुढलं पाऊल म्हणून ओळखल्या जातात. दोघांचा वापर, आकार आणि दिसणं सारख्याच पद्धतीचं असल तरी क्षमता आणि इतर काही मुद्दे यात खूप फरक आहे. आजच्या Singe sided DVD वर ४.७ जी.बी. चा डेटा राहू शकतो, किंवा साधारणतः दोन तासाचा चित्रपट त्यात मावू शकतो. Single sided Blu Ray Disk त्या तुलनेत एखाद्याडायनॉसोरससारखी आहे. त्यावर २७ जी.बी.चा डेटा किंवा तेरा तासांचा व्हिडीओ त्यात मावू शकतो.

डीव्हीडी १९९७ साली, तर ब्लू रे डिस्क २००६ साली बाजारात आली.
डीव्हीडी मध्ये लाल (Red) रंगाचे लेसर किरण डिस्क वाचण्यासाठी वापरले जातात. ब्लू रे डिस्कमध्ये मात्र निळ्या रंगाचे लेसर किरण वापरले जातात. त्यावरूनचत्याला Blu हे नाव मिळाले. वस्तुतः Blue Ray चे ट्रेड मार्क म्हणून रजिस्ट्रेशन करावयाचे होते. पण नियमाप्रमाणे शब्दकोशातील शब्दाचे ट्रेड मार्क म्हणून रजिस्ट्रेशन होऊ शकत नसल्याने Blue मधील e काढून टाकण्यात आला. Blu ह्या स्पेलींगमागील गोम ही अशी आहे.

अधिक माहिती http://www.blu-ray.com/ ह्या साईटवर उपलब्ध आहे.

पीडीएफ एडिट करायचीय? ही घ्या वेब ट्रीक.

परिस्थिती आणि पीडीएफ सांगून येत नाहीत म्हणतात. होतं असं की कुणीतरी पीडीएफ पाठवतं. आपल्याला ती वाचायची असते. वाचता वाचता त्यात दिसतात स्पेलींगच्या घोडचुका. आपल्याला मोह होतो. त्या तिथल्या तिथे सुधारण्याचा. पण पीडीएफ फाईल ती. एडिट करायची कशी? त्याला पीडीएफ एडिटर हवा. अक्रोबॅट हवा. आपल्याकडे पीडीएफ एडिटर नसेल किंवा काही कारणाने तो चालत नसेल तर?. करायचं काय? अशा परिस्थितीता उपयोगी पडणारी एक वेब साईट आहे. तिचं नाव आहे -


तिथे जाऊन आपली पीडीएफ फाईल अपलोड करायची. आपला ईमेल पत्ता द्यायचा. .doc मध्ये किंवा rtf मध्ये रूपांतरीत झालेली आपली पीडीएफ फाईल आपल्याला ईमेलने पाठविली जाते. मग रूपांतरीत झालेल्या त्या doc/rtf फाईलला आपल्या वर्डमध्ये किंवा ओपन ऑफिस मध्ये किंवा कोणत्याही वर्ड प्रोसेसरमध्ये उघडायचं आणि ती एडिट करायची. खटकलेली स्पेलींग्ज वगैरे सुधारायची आणि पुन्हा त्या वर्डची पीडीएफ करून घ्यायची.

सुप्रसिद्ध NITRO PDF ची ही सेवा आहे. पीडीएफ चं doc किंवा rtf रूपांतर अतिशय तंतोतंत होतं असा त्यांचा दावा आहे. आपल्याला अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही. कारण ही सेवा मोफत आहे.

Parental software - एक कौटुंबिक गरज

Parental Filter ह्या नावाचं मोफत आणि माझ्या मते उत्तम असं सॉफ्टवेअर तुमच्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध आहे.http://www.ecommsec.com/pf/PfSetup30.exeह्या लिंकवर क्लीक केलत की Parental Filter चा डाऊनलोड सुरू होईल. केवळ २.१ एम.बी. आकाराचं हे डाऊनलोड आहे. त्यामुळे ते पटकन डाऊनलोड होतं. डाऊनलोड पूर्ण झाल्यानंतर इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशन नंतर तुमच्या पुढे खालील स्क्रीन येईल.


त्यातील वरच्या बाजूस असलेल्या उजवीकडील लाल आयतावर (Banlist Off) वर क्लीक करा. म्हणजे तो चौकोन हिरवा होईल आणि Banlist On होईल. याचा अर्थ तुमचं Parental Filter चालू झालं. Pornography किंवा अश्लील प्रकारच्या वेबसाईटस उघडायचा प्रयत्न झाल्यास त्या उघडणार नाहीत. Page can not be displayedअसा संदेश मिळेल.
Parental Filter ने हजारो पोर्न व तत्सम साईटसची यादी केली आहे, आणि त्यांचा समावेश Banlist मध्ये केला आहे. दरमहा त्यात नवनव्या साईटसची भर पडत असते. त्यामुळे तुम्ही Banlist महिन्यातून एकदा जरूर अपडेट करा.
आता, शेवटची पण सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे पासवर्डची. तुम्ही लावलेलं Parental Filter कुणीही काढू नये यासाठी पासवर्डची व्यवस्था आहे. पासवर्ड लावण्यासाठी खाली दाखवलेल्या खुणेवर क्लीक करा.

आता समोर आलेल्या खालील विंडोमध्ये तुमचा पासवर्ड द्या.

हा प्रोग्राम बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. पण तो फार मोठ्या प्रमाणावर साईटस बॅन करतो अशी टीका काही जण करतात. ज्या अर्थी तो लोकप्रिय आहे, त्याअर्थी आपण टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे हेच बरे.