Thursday, 19 April 2012

काही निराळ्या तर काही उपयोगी वेबसाइट



१. www.statusdetect.com  -  या वेबसाइटवर आपण याहू मॅसेंजरवरील आपल्या 'इनव्हिजिबल' म्हणजेच 'अदृश्य'  असलेल्या मित्रमैत्रीणींना पकडू शकता.

२. www.yahoo.com  -  या याहूच्या वेबसाइटवर गेल्यावर याहूचे जे मुख्य पान उघडते त्यातील याहू या नावापूढे असलेल्या ' ! ' वर क्लिक केल्यास 'याहूहूहूहूहूहू.....' असा आवाज ऐकू येईल. लक्षात असू द्य की बर्‍याच वेळेस याहूची ही वेबसाइट सुरु केल्यास याहू इंडीया ही वेबसाइट उघडते, ज्यावर  yahoo.com  अशी लिंक दिलेली असते ज्यावर क्लिक करुन ती वरील वेबसाइट सुरु करा.

. www.easycalculation.com  -  या वेबसाइटवर आपण वयाचे गणित पाहू शकता.

४. www.transferbigfiles.com  -  या वेबसाइटद्वारे आपण इतरांना मोठ्या साईझच्या फाईल्स पाठवू शकता.

५. www.downforeveryoneorjustme.com  - या वेबसाइटवर आपण एखादी वेबसाइट चालू आहे का नाही ते पाहू शकता.

६. www.dontclick.it  -  इटलीच्या या वेबसाइटवर कुठेही क्लिक करायची गरज पडत नाही. म्हणजेच 'न' क्लिक करता ही वेबसाइट पाहाता येईल अशीच ती बनविली आहे.

७. www.pimpmysearch.com  -  या वेबसाइटवर आपण आपले नाव दिल्यास गुगल पुढील वेळेस इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केल्यास गुगल सदृश वेबसाइट सुरु होईल पण त्यावर गुगल एवजी आपले नाव असेल

८. www.cooltoad.com  -  जवळजवळ सर्व भाषांतील गाणी डाऊनलोड करण्यासाठी हि एक चांगली वेबसाईट आहे. मुळात हि एक अशी वेबसाईट आहे जेथे कुणीही त्याला हवी असलेली गाण्याची फाईल [ mp3 ] इतकेच नव्हे तर कोणतीही आवाजाची फाईल ह्या वेबसाईटवर टाकू शकतो.

९. www.meebo.com  -  याहू, हॉटमेल, जीमेल इ. मॅसेंजरद्वारे चॅटिंग करण्यासाठी ते सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटर टाकणे (इंस्टॉल करणे)आवश्यक असते. याला पर्याय म्हणून www.meebo.com या वेबसाईटवर या सर्व प्रकारातील चॅटिंग कोणतेही सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये न टाकता करता येते.

१०. www.howstuffworks.com  -  सर्व प्रकारच्या गोष्टी कशा काम करतात म्हणजेच त्यामागचे शास्त्रिय कारण व ते मानवाने त्यात वापरलेले कौशल्य याद्वारे ती वस्तु कशी बनली व ती कशी काम करते ही सर्व माहिती या वेबसाईट दिली आहे.

११.  www.ehow.com  -  एखादी गोष्ट कशी हाताळायची अथवा कशी करायची अशा अनेक प्रनेक प्रश्नांची उत्तरे या वेबसाईट दिली आहे.

१२.  www.bugmenot.com  -  बर्‍याच वेळेस एखाद्या वेबसाइटवर गेल्यावर आपणास ती वेबसाइट पाहण्यासाठी त्या वेबसाइटचे मोफत सभासद व्हावे लागते आणि त्यानंतरच त्या वेबसाइट वरील आपल्या मोफत लॉगीन आयडी आणि पासवर्डने लॉगीन करता येते. हा सभासद होण्याचा वेळ वाचविण्यासाठी ही वेबसाइट उपयोगी पडते.

१३. www.computerpranks.com -  कॉम्प्युटरवर खोड्या करुन इतरांना फसविण्याचा आणि नंतर हसविण्याचा विचार करीत असाल तर या वेबसाईटवर तुम्हाला बरेच प्रोग्रॅम्स मिळतील, पण लक्षात असूद्या कुठलाही प्रोग्रॅम वापरण्याआधी त्याची संपूर्ण माहिती वाचा आणि मगच वापरा.

सीडी राईट कशी करावी?


सीडी राईट कशी करावी, म्हणजेच आपल्या कॉम्पुटरमधिल माहिती सीडीवर कशी साठवावी.
तुमच्या कॉम्पुटरवर तुम्ही सीडीवरील गाणी, पिक्चर पाहू शकता याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या कॉम्पुटरमध्ये सीडी राईट देखिल करु शकता, सीडी राईट करण्यासाठी सीडी ड्राईव्हर हा सीडी राईटर असायला हवा. शक्ततो त्या सीडी ड्राईव्हरवर 'Recorder/Re-Writable/Writer' असे लिहिलेल असल्यास तुम्ही त्यावर सीडी राईट करु शकता.

विंडोज मध्ये सीडी राईट करण्यासाठी स्वतःचा सीडी राईटींचा प्रोग्राम आहे, परंतू त्यामध्ये काही आवश्यक गोष्टी नसल्यामूळे सीडी राईट करण्यासाठी 'Nero' हा स्वतंत्र प्रोग्राम जास्त प्रसिद्ध झाला. जास्तीत जास्त ठिकाणी 'Nero' हाच प्रोग्राम सीडी राईट करण्यासाठी वापरला जात असल्याने आपणदेखिल तोच प्रोग्राम कसा वापरायचा ते पहाणार आहोत.

टिप : 'Nero' या एकाच प्रोग्राममध्ये सीडी राईट केल्यास ती सीडी इतर ठिकाणी दुसर्‍या कॉम्पुटरवर देखिल 'Nero' या प्रोग्रामद्वारे पून्हा-पून्हा ती सीडी राईट करु शकता.

'Nero' प्रोग्रामद्वारे सीडी राईट केरण्याची प्रक्रिया खाली दिली आहे.
तुमच्या कॉम्पुटरमध्ये 'Nero' प्रोग्राम असल्यास रिकामी सीडी (Blank CD) कॉम्प्युटर मध्ये टाकताच एका छोट्या चौकोनात ती सीडी 'Nero' प्रोग्रामद्वारे राईट करायची आहे का? असा संदेश येईल, त्यावर क्लिक करताच 'Nero' प्रोग्राम आपोआप सुरु होईल.



१. आपणास जर कॉम्पुटरमधिल एखादी माहिती अथवा एखादी फाईल सीडीवर राईट करायची असेल तर त्या चौकोनातील वर दिलेल्या पर्यायांपैकी 'Data' या विभागावर माऊस न्या आणि त्याच विभागातील 'Make Data CD' या उपविभागावर क्लिक करा.


 
२. आता पुढील चौकोनात वर उजव्या बाजूला 'Add' असे बटण दिसेल. सीडी मध्ये ज्या फाईल्स राईट करायच्या आहेत त्या निवडण्यासाठी इथे क्लिक करा.



३. 'Add' या बटणावर क्लिक करताच 'Select Files and Folders' असा एक छोटा चौकोन समोर येईल. त्यामध्ये आपणास हव्या असलेल्या फोल्डर मधून आपणास हव्या असलेल्या फाईल्स निवडाव्या व खालिल 'Add' व नंतर 'Finished' ह्या बटणावर क्लिक करावे.



४. आता मगाचचाच चौकोन आपल्या समोर येईल ज्यामध्ये आपण निवडलेल्या फाईल्स असतील, तसेच त्या सर्व फाईल्सना एकुण किती जागा लागली आहे हे देखिल त्याच चौकोनात दिलेले असेल. आता पूढे जाण्यासाठी 'Next >' ह्या बटणावर क्लिक करा.



५. आता या पुढिल चौकोनात
* तुम्हाला त्या सीडीला काय नाव 'Disc name' द्यायचे आहे?,
* ती किती स्पिडला 'Writing Speed' राईट करायची आहे? (शक्यतो हा स्पिड '16x (2,400KB/s)' द्यावा, जेणे करुन ती सीडी सर्व कॉम्प्युटर्सवर चालेल.),
* तसेच 'Allow files to be added later (multisession disc)' म्हणजेच ती सीडी पून्हा-पून्हा राईट करुन वापरायची असल्यास त्या पुढील चौकोनावर क्लिक करावे.
या सर्व गोष्टी दिल्यानंतर खालिल ' Burn ' ह्या बटणावर क्लिक करावे.



६. आता आपल्यासमोर सीडी राईट करण्याची प्रक्रिया सुरु होईल.



७. सीडी पूर्ण राईट होताच आपल्यासमोर ' Burn process completed successfully at 16x (2,400 KB/s) ' असा संदेश येईल, तीथे ' OK ' वर क्लिक करा. बस्स असे करताच आपली सीडी राईट होवून आपोआप बाहेर येईल.

८. आता इथे पुन्हा एकदा तोच चौकोन येईल त्यावरील ' Next ' ह्या बटणावर क्लिक करा.



९. आता या शेवटच्या चौकोनामध्ये कॉम्पुटर आपणास ' Exit ' असे विचारेल त्यावर क्लिक करा आणि तो प्रोग्राम बंद करा.


कॉम्प्युटर स्क्रीनशॉट

कॉम्प्युटर वापरत असताना भरपूर उपयोगी सॉफ्टवेअर वापरून आपण आपले कम लवकर आणि सहज करू शकतो. बरयाच वेळा आपल्याला काही कामासाठी स्क्रीनशॉट घ्यावा लागतो.
अश्या वेळी आपण किबोर्ड वरील प्रिंटस्क्रीन बटन दाबतो.
पण त्याने संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट येतो.
तसेच विडियो फॉर्मेट मध्ये स्क्रीनशॉट घेता येत नाही.
यावर उपाय आहे

Jing Screenshot Plugin software.
या सॉफ्टवेअर च्या मदतीने तुम्ही हवे तसे स्क्रीनशॉट घेऊ शकता.
वेबसाईटचा  तुम्हाला जेवढा भाग shot करायचा आहे फक्त तेवढाच भागाचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.
तसेच तुम्ही विडियो स्क्रीनशॉट देखिल घेऊ शकता.
या मध्ये तुम्ही तुमच्या स्क्रीनवर ज्याकाही एक्शन कराल तेवढ्या विडियो मध्ये शूट होतील.
याचा वापर तुम्ही एखादी गोष्ट कोणाला समजवान्यसाठी देखिल करू शकता कारन विडिओ मध्ये पाहून 
कोणतीही गोष्ट लवकर समजते
तसेच इमेज स्क्रीनशॉट घेउन तुम्ही त्यावर नोंद लिहू शकता
हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
.
.
.