3D हे एखादे द्विमितीय चित्र त्रिमितीय रुपात दर्शवण्यासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान होय.
सध्या बाजारात 3D फोटो, 3D फिल्म्स , 3D प्रोजेक्टर, 3D कॅमेरा, 3D टीव्ही , 3D गेम्स सारखी अनेक प्रोडक्ट येत आहेत.आपल्याला प्रश्न पडलाच असेल कि हे 3D म्हणजे नक्की आहे तरी काय? आणि हे कसे काम करते? आपल्याला याचा उपयोग काय? याचे प्रकार कोणते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीचा हा प्रवास…
3D डिस्प्ले हि एखादे चित्र थ्री डायमेन्शन मध्ये दाखवण्यासाठी वापरला जातो.यामुळे 3D चित्र अधिक आकर्षित व अगदी खरे असल्याची अनुभूती देते व आपणस चित्रातील वस्तू चित्रातून बाहेर आल्यासारखी दिसते.
आपण जणू काही त्याला स्पर्श करू शकतो असा आपल्याला आभास होतो. हे तंत्रज्ञान मेडिकल,संशोधन सारख्या क्षेत्रातहि वापरतात.
मुख्यतः 3D हे सध्या तत्त्वावर चालते –दोन्ही डोळ्याला वेगवेगळे चित्र अशा रीतीने दाखवणे कि ते 3D चा आभास निर्माण करेल.यास स्टेरिओस्कोपी[stereoscopy] म्हणतात.
यात आपण आपल्या मेंदूच्या मदतीने 2D चित्राला खोलीची अनुभूती देण्यास भाग पडतो व दोन्ही डोळ्याला दिसणारे वेगवेगळे चित्र मेंदू 3D चित्रासमान मानतो.
3Dचा इतिहास :
सन १८३८ ला सर् चार्ल्स व्हीटस्टोन यांनी स्टेरिओस्कोपी तत्वावर पहिला स्टेरिओस्कोपी दर्शक बनवला.हे यंत्र चलचित्र व फोटोग्राफी दुनियेत मोठा बदल घडवून आणणारे ठरले.
या जवळपास २०० वर्षापासून अस्तित्वात असणाऱ्या 3D तंत्रज्ञानत बरेचसे बदल घडत गेले.
१८४४ नंतरच्या काळात आलेले व्हीवमास्टर हे चित्र त्रिमितीय रुपात दाखवणारे यंत्र हेच तंत्रज्ञान वापरात होते.
जवळपास १९५० ला पहिला ३ D फिल्म दोन प्रोजेक्टरचा वापर करून दाखवण्यात आला.
त्यानंतर यात झपाट्याने बदल होत गेले आणि “अवतार” हा सिनेमा हा या तंत्रज्ञानाचा आधुनिक चेहरा घेवून समोर आला व जगभरचे लक्ष पुन्हा या टेक्नॉलॉजी वर आकर्षित झाले.
नवनवीन ३ D गॉगल, प्रोजेक्टर,टीव्ही क्षेत्रात प्रचंड सुधारणा झाली.इतकेच नाही तर आता संशोधन हे गॉगलचा वापर न करता आपण स्क्रीन वर 3D पाहू शकणाऱ्या तंत्रज्ञानापर्यंत झेपावले आहे.
डोळे व मेंदू 3D सोबत कसे काम करतात?
३D कडे वळण्या आधी प्रथम आपणास आपले डोळे व मेंदू चित्र कसे पाहतात व समजावून घेतात हे समजावून घेतले पाहिजे.आपण एखादी वस्तू पाहू शकतो कारण आपले डोळे वस्तू कडून आलेले किरण घेतात आणि आपला मेंदू त्या किरणाचा वापर करून चित्र तयार करतो.
जेन्ह्वा वस्तू हि दूर अंतरावर असेल तेन्ह्वा किरण समांतर नसतात तेंव्हा डोळे यास स्वतःला अनुरूप बनवतात व चित्र एकत्रितपणे जोडून पाहता येतात.
द्विमितीय दृष्टी :
मनुष्यप्राणी आपली द्विमितीय दृष्टी वापरून खोलीचा अंदाज घेतो आणि 3D जग पाहत असतो .द्विमितीय दृष्टी हे गृहीत धरते कि आपणस दोन डोळे आहेत.
मेंदू आपल्या दोन डोळ्यांना दिसणारे चित्र एकत्रित करतो दोन डोळ्यांमधून दिसणाऱ्या चित्रामधील फरकावरून मेंदू वस्तू मधील अंतर शोधतो आणि खोली व अंतर यांचा अचूक अंदाज बांधतो.
आपण प्रथम आपला एक डोळा बंद करून व नंतर दुसरा डोळा बंद करून एकच वस्तू पहिली तरी आपणास आपल्या द्विमितीय दृष्टी कशी काम करते याचा अंदाज येईल.
२ D चित्र आणि 3D चित्रामधील फरक-
ज्या चित्रास उंची जाडी व खोली असते त्या चित्रास त्रिमितीय चित्र असे म्हणतात.ज्या चित्रास खोली नसते ते चित्र द्विमितीय चित्र मानले जाते.२D हे सोपी माहिती पाठवण्यासाठी वापरतात पण अवघड व जटील माहितीसाठी 3D हे 2D पेक्षा जास्त अचूक ,स्पष्ट व लवकर माहिती देते हा या दोहोंमधील फरक .
वरील त्रिकोण हे तीन रेषा व तीन कोणापासून बनलेले आहेत इतकी माहिती त्रिकोण बद्दल सर्व सांगून जाते पण पिर्यामिड हे त्रिमितीय आहे त्यास ४ बाजू आहेत ६ कोण व ५ रेष इतकी माहिती हा पिर्यामिडची माहिती देण्यास लागते.
तात्पर्य इतकेच कि २ D चे ३ D मध्ये रुपांतर करण्यासाठी आपणास भरपूर अधिक माहिती लागते.३D मुळे चित्रातवास्तवता येऊन ती अधिक माहिती स्पष्ट करते.
3 D टेक्नोलॉजीचे प्रमुख प्रकार –
3D तंत्रज्ञान हे फार लवकर नवनवीन टप्यावर बदलत आहे ,त्यानुसार 3D पाहण्यासाठी लागणारे गॉगल , 3D प्रदर्शित करण्याच्या तंत्रात आमुलाग्र बदल होत आहेत.आपण काही 3D साठी वापरण्यात येणाऱ्या प्रमुख टेक्नोलॉजीची माहिती घेवूया.
1]अँनग्लाफ ३ D[Anaglyph 3D]
- यामध्ये नीला व लाल रंगातून बनलेले 3D चित्र निळ्या व लाल रंगाचे गॉगल्सचा मदतीने प्रत्येक डोळ्याला वेगळी वेगळी चित्रे दाखवून 3D चा आभास केला जातो.
- थोड्यावेळासाठी डोळे लाल फिल्टर्स द्वारा झाकले जातात जेणे करून चित्रातील लाल भाग पांढऱ्या रंगात व नीला भाग काळ्या रंगत दर्शवला जातो.
- नंतर डोळे निळ्या फिल्टर्स द्वारा झाकले जाऊन विरुद्ध इफेक्ट मिळतो.
- खरा पांढरा व काळा रंगापासून बनलेले चित्र मेंदू एकत्र करतो आणि दोन्ही वस्तू मधील फारकावरून अंतराचा अंदाज मिळतो.
- अशा प्रकारे आपणास स्टेरिओग्राफ चित्र डोळे बंद न करता पाहता येते.
- हि लाल निळ्या रंगाची पद्धत पुर्वीच्या काळी वापरात होते आत्ता हि पद्धत थोडी जुनी झाली आहे.
- पूर्वी हि पद्धत 3D सिनेमांसाठी वापरण्यात येत होती सध्या 3-D टीव्ही साठी हे तंत्र वापरतात.
- याचा एक प्रॉब्लेम म्हणजे आपण खऱ्याअर्थाने रंगीत चित्रपट खऱ्या रंगात पाहू शकत नाही व चित्राचा दर्जाही इतका चांगला नसतो.
- सोप्या भाषेत ३ D चित्र हे डावे व उजवे चित्र रंगाचा वापर करून वेगळे करून बनले जाते.
- चित्र हे दोन रंगाच्या पडद्यापासून बनलेले असते आणि आपण गॉगलच्या मदतीने ते पडदे वेगळे करतो.
- हे सर्वात स्वस्तात ३ D बनवण्याचे तंत्र आहे.
2]पोलराईझ्ड 3D (प्यासीव) [Polarized 3D(passive)]
- डिझ्नी वल्ड ,युनिव्हर्सल स्टुडिओ सारख्या ३ D निर्मात्यांसाठी हि पध्दत फायदेशीर मानली जाते कारण यात पोलराएझ्ड गॉगल चा वापर केल्यामुळे रंगछटा उच्च प्रत्तीत दिसतात.
- दोन प्रोजेक्ट्स तों दिशेने वेगवेगळ्या पोलराईझ्ड प्रकारात चित्रे स्क्किनवर प्रदर्शित करतात.
- यासाठी वेगवेगळ्या पोलरायझेशन च्या काचा असलेला गॉगल वापरला जातो.
- गॉगल चा वापर करून एका डोळ्याला एकाच चित्र दिसेल असे प्रयोजन केले जाते आणि मेंदू ह्या दोन्ही चित्राना एकत्र करून ३-D रुपात करतो.
- यासाठी आपणास प्यासीव प्रकारच्या काचा वापराव्या लागतात ज्या चित्राला डाव्या व उजव्या भागात वेगळे करतात.
- हि तशी ३ D ची नवीन पद्धत आहे आपण अवतार ,टोर्न यासारख्या इंग्रजी सिनेमांसाठी हि पद्धत वापरलेली पहिले असेल.
- सध्या सिनेमागृहात हि पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
3] अक्टीव शटर 3D [Active-shutter 3D]
- नवीन आलेले ३ D टीव्ही व प्रोजेक्टर हि पद्धत वापरतात.
- यात आपण एकदा डाव्या व नंतर उजव्या डोळ्याला एक चित्र दाखवले जाते .
- यात आपण घातलेला गॉगल हा डिस्प्ले सोबत कनेक्ट राहून डोळ्यास उघडझाप करतो आणि 3D चा इफेक्ट तयार करतो.
- या पद्धतीचा प्रमुख फायदा हा कि यामध्ये चित्राचा दर्जा अति उच्च दिसतो आपण जणू काही २-D पाहत आहे इतक्या सहजपणे आपण 3D ची मजा घेऊ शकतो.
- हे 3D च्या महाग प्रकारत मोडते.यात डिस्प्ले स्क्रीन वेगाने रिफ्रेश झाली पाहिजे जवळपास ६० Hz एका डोळ्यास म्हणजे १२० HZ डिस्प्ले साठी लागते.
- याच्या गॉगल ची किमत पण जास्त असते ज्यात दोन LCD आणि बँटरी असते आणि आपणास गॉगल व डिस्प्ले इन्फ्रारेड चा वापर करून एकमेकांशी जोडून सिंकमध्ये आणावे लागतात.
- आपण 3D टीव्ही सोनी ,सँमगन,पँनोसोनिक नामांकित कंपन्याकडून खरेदी कारण तेन्हा त्यात हीच पद्धत वापरली गेलेली असते.
- एनव्हीडीआ कंपनीची 3D व्हिजन हे तंत्रज्ञान अक्टीव शुटर ग्लास हीच पद्धत वापरते.
- अशी हि दोन्ही डोळ्यास वेगळा वेगळे चित्र दाखवून व नको असलेला डाटा अडवून अक्टीव शुटर ३ D पाहण्याच्या यामहागड्या पद्धतीचा आपणस अतिशय सुंदर असा 3D पाहण्यास येत्या २-३ वर्षे वापर होईल.
4]ग्लास विरहित 3D [अँटो स्टेरिओस्कोपिक] (Auto-Stereoscopic)
- अँटो स्टेरिओस्कोपिक डिस्प्ले लेन्स चा वापर करून वेगवेगळे पिक्सेल प्रत्येक डोळ्यास दाखवतो.
- याचा मस्त फायदा म्हणजे यात आपणास गॉगल घालायची की एक जरुरी नाही. सद्यस्थितीत या तंत्रज्ञानात बऱ्याच अडथळा आहेत.
- आपण फक्त एकाच जागेवरून हे ३ D पाहू शकता.१० जागेवरून 3D पाहण्यासाठी आपणस डिस्प्ले चे २० सेट लागतील.
- आणखी एक तोटा असा कि या डिस्प्ले वर आपण फक्त 3D पाहू शकतो २D पाहता येणार नाही.
- सध्या हि अतिशय महाग अशी टेक्नॉलॉजी आहे यात सुधारणा होऊन आपणस चांगले 3D गॉगल न घालता पाहता येईल अशी आशा आहे.
5]पेरलेक्स बँरीअर [Parallax barrier]
- हि सुद्धा बिना गॉगलचे 3D पाहण्यासाठी वापरण्यात येणारी प्रसिद्ध पद्धत आहे.
- शार्प,फुजी कंपनीचे 3D टीव्ही हे तंत्रज्ञान वापरात आहेत.
- हे जवळपास पोलरायझ्ड ग्लास सारखे काम करते.
- यात गॉगल ने चित्र फिल्टर करण्या पेक्षा स्क्रीन हे काम करते.
- यात विशिष्ट प्रकार चे छिद्रातून विशिष्ट कोनातून प्रकाश किरणे डोळ्यात सोडली जातात व मेदू हि वेगवेगळी किरणे एकत्र करतो.
- यात स्क्रीन हि कायम 3D रुपात वापरली जावू शकते.
3D चा अनुभव घेण्यासाठी लागणारी साधन सामुग्री :
आपणस 3D पहायचे असेल तर आपल्याकडे खालील गोष्टी जरुरी आहेत जेणे कुण ऑं 3Dचा मुक्तपणे आनंद उपभोगु शकतो.- 3D केमेरा –जो 3D शुटिंगसाठी वापरला जातो.
- 3D प्लेअर्स-ज्याद्वारे आपण संगणकावर 3D ब्लू-रे पाहू शकतो.
- 3D टीव्ही –ज्यामुळे आपण घरात बसून 3D चा आस्वाद घेवू शकतो.
- 3D प्रोजेक्टर – डिझाईन व संशोधन कंपन्याना माहिती प्रदर्शित करण्यासाठी
- 3D गॉगल -3D पाहण्यासाठी हे सध्यातरी अनिवार्य आहे. [काही कंपनी बिना गॉगल चे 3D देण्याचा प्रयत्न करत आहेत लवकरात आपणास गॉगल शिवाय 3D पाहता येवू शकेल]
3D फिल्म्स:
जास्त बजेटच्या व अति उच्च्या तंत्रज्ञान असलेल्या 3D फिल्म्सनी सध्या बॉक्स ऑफिस वर चांगलीच धूम मचवली आहे. यात प्रामुखाने अनाग्लाफी व पोलरायझ्ड ग्लास तंत्रज्ञान वापरतात.अनाग्लाफी मध्ये लाल व निळ्या रंगाचे चित्र पडद्यावर दिसते व पोलरायझ्डमध्ये आपणस दोन चित्र पडद्यावर एकत्र झालि आहेत असा आभास होतो.
3D टीव्ही :
3D मध्ये अक्टीव व प्यासीव असे दोन प्रकार आहेत.अक्टीव प्रकारात गॉगल हे टीव्ही सोबत सिंकमध्ये राहून आपलं डोळ्याला एकाच चित्र दिसू शकेल अशी उघड झाप करतात.
आपल्या आपल्या ब्लू रे किंवा प्ले स्टेशन ला 3D मध्ये अपग्रेड करू शकतो.एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण 3D टीव्ही मध्ये २ D सिनेमे व कार्यक्रमहि पाहू शकतो.
3D कँमेरा :
आपणस 3D शुटिंग करून नंतर ते 3D टीव्हीवर पाहता येवू शकतो.जरी २ D मध्ये रेकोर्ड करून ते ३ D मध्ये रूपांतरित करण्यासाठी तंत्रज्ञान असले तरी आपण डायरेक्ट 3D रेकॉड कारणाचा आनंद 3D कँमेराच्या मदतीने घेवू शकतो.
यात आपण एकाच स्क्रीन दोन केमेरा लेन्स वापरून शुटींग करतो यात दोन्ही कँमेरे सिंकमध्ये ठेवावे लागतात तसेच दोन्ही कँमेर्यातील अंतर समान ठेवावे लागते.
अनेक कंपन्या 3D सिनेमा शुटींगसाठी दोन लेन्स एकत्र असलेला केमेरा लागतो.मग नंर सगळे एकही सोपे होते.
3D छायाचित्र घेण्यासाठी आपणास एकाच दृश्याचे दोन अगदी अचूक कोन करून वेधलेले छायाचित्र करावे लागते जणू काही आपले डोळेच ये दृश्य पाहत आहेत.
चित्रपट निर्मात्याना दोन कॅमेरा मधील अंतर असे लागते कि ते वस्तू व्यवस्थीत फोकस करता येईल.
तसेच झूम ,ट्रेक ,हालचाल सारखे इफेक्ट येण्यासाठी चित्रे सिंकमध्ये असणे जरुरी असते.यासाठी नवीन कँमेरामध्ये दोन्ही कँमेरा योग्य जागेवर फिट केलेला असतो.
अगदी जवळ चे शुटींग धेण्यासाठी मिरर रिंग चा वापर केला जातो.
यात कँमेरा मध्येएक लेन्स असते व आणि आतील छोट्या आरसे द्वारे चित्र प्रतिबिंबित करून दुसऱ्या कँमेराद्वारे रेकोर्डकेले जाते.
यात आरशाच्या काचा अतिशय स्पष्ट अशाव्या लागतात मग ३ D चा झूम इफेक्ट सुरेखरीतीने आपण अनुभवू शकतो.