Monday, 30 April 2012

ओळख काही संकेतस्थळांची व सुविधांची


१. http://www.jacksonpollock.org/

रंगाशी खेळणे आवडते तुम्हाला ? तर वरील संकेतस्थळावर जा... माऊस फिरवा... बघा काय होतं ते ... थोड्या वेळाने तुम्ही स्वतःला नक्कीच एक उच्च कोटीचा मॉडर्न आर्टवाला पेंटर समजु लागला.... हा हा हा :)


२. http://www.greeniq.com/ 

आपली धरती / पृथ्वी हिरवीगार असावी असे वाटतं तुम्हाला... तर हे योग्य संकेतस्थळ आहे तुमच्यासाठी... ग्लोबल वॉर्मिंग पासून धरतीचे कसे रक्षण करावे ह्याची संपुर्ण माहीती व संबधीत बातम्या.. संघटना ह्यांचे दुवे !

३. http://www.5min.com/ 
ट्रीक्स !!! एकापेक्षा एक जबरदस्त ट्रीक्स आहेत ह्या संकेतस्थळावर.. बुध्दीबळ, सुन्न्कर, बिल्यर्ड... पियानो, गिटार.. ड्रमसेट... कसे वाजवावे कसे हताळावे ह्यांची दृष्य माहीती येथे उपलब्घ आहे.. तसेच शेयर मार्केट... कोचींग... सेल्समॅन कसे बनावे ह्याची प्रचंड माहीती ह्या संकेतस्थळावर व्हीडीओ माध्यमातून आहे... बेस्ट वेबसाईट !

४. http://www.slacker.com/ 
इंन्टर्नॅशनल गाण्यांसाठी एक जबरदस्त / कमी महाजाल वेगामध्ये देखील व्यव्स्थीत काम करणारे रेडिओ स्टेशन !

५. http://onelook.com/ 
शब्द संग्रह !!! पण असा तसा नाही... एक शब्दाच्या अर्थाबरोबर.. त्याची पुर्ण माहीती देखील ! वापरुन पहा !

६. http://www.bestechvideos.com/
तुम्हाला फोटोशॉप शिकायचे आहे ? तुम्हाला सी++ शिकायचे आहे ? काही ही शिका येथे ऑनलाईन व्हीडीओ द्वारा ! संकलन आहे वेगवेगळ्या विषयातील माहीतीचे एका जागी !
- राजे
http://www।lokayat।com/

Recycle Bin मधून फाईल्स डिलीट झाल्या तर











Recycle Bin मधून फाईल्स डिलीट झाल्या तर त्या परत मिळवता येत नाहीत अशी बर्‍याच जणांची समजूत असते. Recycle Bin ही Windows ची एक डिरेक्टरी आहे. डिलीट केलेल्या फाईल्स इथे आणल्या जातात. 


जेव्हा आपण Recycle Bin मोकळी म्हणजे Empty करतो तेव्हा त्या Windows मधून काढून टाकल्या जातात. मात्र त्यांची मुळे संगणकावर अस्तित्वात असतात. ज्यावेळी ह्या मुळांवर दुसर्‍या फाईल्स चढतात तेव्हा ती मुळे नाहीशी होतात. त्यानंतर मात्र फाईल्स परत मिळू शकणं जवळजवळ अशक्य असतं

Recycle Bin मधूनही गेलेल्या तुमच्या फाईल्स परत मिळविण्यासाठी Undelete Plus नावाचा मोफत उपलब्ध असणारा प्रोग्राम तुम्ही वापरायला हवा. www.undelete-plus.com ह्या साईटवरून तुम्ही तो डिलीट करू शकता.

लॅपटॉप घेताय?



लॅपटॉप घेण्याचा विचार करताय? मग जरा थांबा... उगीच घाई करू नका. लॅपटॉप घेताना फक्त किंमत कमी आहे या निष्कर्षावर खरेदी केली जाते. त्यामुळे नंतर पस्तावण्याखेरीज काहीच उरत नाही. तशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी ही चेकलिस्ट...

स्क्रीन क्वॉलिटी :
लॅपटॉपची स्क्रीन ही ग्लॉसी आणि मॅट अशा दोन प्रकारात उपलब्ध असते. मॅन्युफॅक्चरर हल्ली बऱ्याचदा ग्लॉसी प्रकारचे लॅपटॉप बनवतात. हे ग्लॉसी लॅपटॉप सिनेमा बघण्यासाठी ठीक आहेत. पण, रोजचं ऑफिसवर्क करण्यासाठी हे लॅपटॉप कुचकामी ठरतात. ग्लॉसी स्क्रीनमुळे डोळ्यावर अकारण ताण पडतो. त्यामुळे तुम्ही जर सिनेमा बघण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी लॅपटॉप घेत असाल, तरच ग्लॉसी स्क्रीन घ्या.

नेटवर्क कनेक्टिविटी :
बऱ्याच लॅपटॉपमध्ये इनबिल्ट वायरलेस नेटवर्क कनेक्टिविटी असते. पण फक्त एवढ्या आश्वासानावर भुलू नका. ही कनेक्टिविटी कोणत्या प्रकारची आहे ती समजून घ्या. अनेकदा यासाठी जुन्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. त्यामुळे इण्टरनेट आणि नेटवर्क कनेक्टिविटी स्लो होते. तसंच ही वायरलेस कनेक्टिविटी नंतर बदलता येत नाही. म्हणून लॅपटॉप घेण्यापूवीर्च ती अपग्रेडेबल आहे की नाही, याची काळजी घ्या. सध्या ८०२.११ एन ही वर्जन योग्य आहे, असं म्हणता येईल.

रफ अॅण्ड टफ होगा तो बेहतर है :
सध्या लॅपटॉपचा बाजार गरम आहे. अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसोबत अनेक लोकल ब्रॅण्डही या स्पधेर्त जोमाने उतरलेत. अनेकांनी आपल्या किमती खूप खाली आणल्या आहेत. पण या उतरलेल्या किमतीत लॅपटॉप घेताना आपण कुठे क्वालिटीशी तडजोड करत नाहीत ना, याची काळजी घ्या. लॅपटॉप ही गोष्ट अशी आहे, जी घेऊन आपल्याला प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यासोबत मिळणाऱ्या अॅक्ससरीज काय आहेत त्या पाहा. आपला लॅपटॉप फार नाजूक असून चालणार नाही हे लक्षात घ्या.

डोकं तापवू नका आणि लॅपटॉपही... :
लॅपटॉप मॅन्युफॅक्चरर हे आपल्या प्रोडक्टची जाहिरात करताना पॉवरफुल प्रोसेसर, फास्ट हार्ड डिस्क, हेवी बॅटरी अशी करतात. पण या साऱ्यामुळे लॅपटॉप तापतो हे आपल्याला सांगितलं जात नाही. त्यामुळे काही तासांच्या वापरानंतर लॅपटॉप गरम होण्याची शक्यता असते. आता बाजारात चांगल्या क्वालिटीचे असे लॅपटॉप मिळतात, की ज्यात उष्णतारोधक तंत्र वापरलेलं असतं. त्यामुळे लॅपटॉप घेण्यापूवीर् फक्त डीलर काय म्हणतो ते ऐकू नका, तो वापरणाऱ्या एकाचा तरी सल्ला घ्याच.

लॅपटॉपचा आवाज बंद करा :
आपण एवढ्या दमड्या मोजून लॅपटॉप घ्यायचा आणि वर त्या लॅपटॉपचाच आवाज ऐकायचा हे कोणाला आवडेल? पण कुलिंग फॅन आणि हार्ड ड्राइव्हच्या लोच्यामुळे अनेकदा लॅपटॉप आवाज करतो. कधीकधी ही भुणभुण एवढी इरिटेटिंग ठरते की त्यातून डोकेदुखीचा त्रास उद्भवतो. म्हणूनच लॅपटॉप घेतानाच या गोष्टीची काळजी घ्या. आपल्याला लॅपटॉप घ्यायचाय डोकेदुखी नको!