Thursday, 15 December 2011

आपली मुले संगणकाचा गैरवापर तर करीत नाही ना ?" यावर पाळत ठेवा.



नेटभेटचे नियमीत वाचक असलेल्या एका सदगृहस्थांनी मला एक प्रश्न विचारला होता. तो असा -
- मला एक जाणून घ्यायचे आहे की, आपली मुले, भाऊ, बहिणी त्यांच्या लॅपटॉप किंवा
डेस्क्टॉप वर काय काय करत असतात, कुणाशी बोलत असतात, काय बोलत असतात इंटरनेट वर योग्य तेच करतात का हे त्यांना न कळता कसे जाणून घ्यायचे?
जर याबद्दल काही उपाय असेल तर क्रुपया मला त्याबद्दल माहिती द्याल का?
खरे तर कोणाची अशी छुपी माहिती जमा करणे (मग ती स्वतःच्या मुलांची असली तरीही) मला उचित वाटत नाही. मात्र अशाच आशयाच्या आणखी काही ईमेल्स मला आल्या ज्यामध्ये हाच प्रश्न वेगळ्या प्रकारे मांडला होता.
- माझ्या ऑफीसमधील संगणकावर माझ्याव्यतीरीक्त इतरही लोक काम करतात. आणि माझ्या अनुपस्थीतीत माझ्या संगणकावर काही प्रतिबंधीत वेबसाईट्स पाहतात मात्र त्यातून येणार्‍या व्हायरस मुळे माझा संगणक नेहमी बिघडतो. आपोआप इंस्टॉल होणार्‍या काही अश्लिल वॉलपेपर्समुळे माझी बदनामी देखिल होते. तेव्हा माझ्या संगणकाचा गैरवापर नक्की कोण आणि केव्हा करते हे मला शोधता येईल का?
- मी एक उद्योजक असून कामानिमित्त नेहमी फिरतीवर असतो. मात्र मी ऑफिसमध्ये नसताना माझ्या ऑफिसमधील माणसे नीट काम करत आहेत ना, काही टाळाटाळ किंवा पर्सनल कामे करतात का तसेच संगणकाचा आणि इंटरनेटचा गैरवापर तर करीत नाहीत ना ? हे मला कसे शोधता येईल?
वरील प्रश्न पाहिल्यावर मात्र अशा प्रकारे माहिती मिळविण्यामुळे जर कोणाचे नुकसान टाळता येत असेल तर आपण या प्रश्नास उत्तर द्यावे असा विचार करुन मी हे उत्तर शोधले आणि सर्वांच्या माहितीकरता येथे देत आहे. (असे करणे उचित आहे की नाही हे सुजाण वाचकांनी आपले आपणच ठरवावे.)
संगणकाचा वापर कसा केला जातोय हे पाहण्याचा सोपा उपाय म्हणजे इंटरनेट हिस्ट्री Internet History किंवा Start > My Recent documents तपासणे हा होय. मात्र हे दोनही प्रकार बर्‍याच लोकांना माहित असल्याने हिस्ट्री डीलीट करुन किंवा My Recent documents मधील फाईल्स डिलीट करुन लपवता येतात. आपण जो उपाय पाहणार आहोत तो थोडा वेगळा आहे.
या सॉफ्टवेअरची माहिती घेण्याआधी आपण ते कसे काम करते हे पाहुया. एकदा का संगणकावर हे सॉफ्टवेअर इंस्टॉल केले की ते आपोआप स्क्रीनशॉट्स Screenshots घेणे चालू करते. स्क्रीनशॉट म्हणजे संगणकाच्या स्क्रीनचा फोटो. हे स्क्रीनशॉट आपण ठरवून दिलेल्या फोल्डरमध्ये चित्ररुपात (Image format) साठविले जातात. अर्थात असे स्क्रीनशॉट्स घेतले जात आहेत हे वापरकर्त्यांला कळतही नाही.
असे आपोआप स्क्रीनशॉट्स घेणारे अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. आपण त्यापैकीच एका भरवशाच्या सॉफ्टवेअरची माहिती घेऊयात. या सॉफ्टवेअरचे नाव आहे Automatically take screenshot software. freesoft80.com या साईटवर येथे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
सॉफ्टवेअर डाउनलोड व ईंस्टॉल करण्याची पद्धती -
१. येथे क्लिक करुन Automatically take screenshot software डाउनलोड करुन घ्या.
२. Automatically take screenshot software डाउनलोड करण्याआधी संगणकामध्ये मायक्रोसॉफ्ट डॉट नेट फ्रेमवर्क ३.५ (Microsoft .net framework 3.5 ) असणे आवश्यक आहे. हे सॉफ्टवेअर तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या साईटवर येथे जाऊन डाउनलोड करु शकता. (इन्स्टॉलर 2MB चा असला तरी मुख्य सॉफ्टवेअर ५७ MB चे आहे !)

३. एकदा मायक्रोसॉफ्ट डॉट नेट फ्रेमवर्क ३.५ इंस्टॉल झाले की आपण Automatically take screenshot software इंस्टॉल करु शकतो.





४. सॉफ्टवेअर इंस्टॉल झाल्यानंतर खाली दाखविल्याप्रमाणे स्क्रीन दिसेल.
यामध्ये A, B व C चा अर्थ अनुक्रमे असा आहे -
A - आपोआप घेतले जाणारे स्क्रीनशॉट्स ज्या फोल्डरमध्ये save करावयाचे आहेत ती जागा. उदाहरणार्थ मी येथे Auto screenshots हा फोल्डर बनविला आहे.
B - किती अंतराने स्क्रीनशॉट्स घ्यायचे आहेत ती वेळ. उदाहरणार्थ मी येथे ३ मिनीटे १० सेकंद अशी वेळ ठरवलेली आहे.
C - या अतिशय महत्त्वाच्या सेटींग्ज आहेत. चित्रात दाखविल्याप्रमाणे Load this software on windows startup आणि Start as hidden application हे दोनही पर्यात निवडा (सिलेक्ट करा). या दोन सेटींग्जचा अर्थ असा आहे की संगणक सुरु करताच हे सॉफ्टवेअर आपोआप चालू होईल आणि लपून राहील त्यामुळे स्क्रीनशॉट्स घेतले जात आहेत हे वापरकर्त्यांना कळणार नाही.
बस. आता संगणकामध्ये घडणार्‍या प्रत्येक घडामोडीचा ठरवलेल्या वेळेनुसार फोटो काढण्यात येईल. हे स्क्रीनशॉट्स पाहून संगणकाचा वापर कसा केला जातोय याकडे बारकाईने लक्ष ठेवता येईल.
Note - सतत स्क्रीनशॉट्स save झाल्यामुळे संगणकाची बरीचशी मेमरी स्पेस वापरली जाईल. तेव्हा ठराविक अंतराने हे स्क्रीनशॉट्स डीलीट करायला विसरु नका.
हा लेख आणि हे सॉफ्टवेअर कसे वाटले ते आम्हाला जरुर लिहून कळवा. आणि कृपया याचा गैरवापर करु नका. प्रत्येकाला असलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करा.

जगातून कुठूनही चालवा आपला कम्प्युटर!

1) सध्या आपला कम्प्युटर आपली अतिमहत्त्वाची वस्तू बनलेली आहे. जणू काही आपला जिवलग मित्रच. तर कधीकधी आपले त्याहूनही अगदी जवळचं नातं तयार झालेलं असतं. बऱ्याच वेळा असं होतं, की आपली सर्व महत्त्वाची कामं ऑॅफिसच्या कम्प्युटरवर करत असतो. घरी आल्यावर किंवा एखाद्या वेळी बाहेरगावी गेल्यावर ऑॅफिसमधल्या कम्प्युटरवरची महत्त्वाची फाइल हवी असते मग ती फाइल कशी मिळवायची, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. 

2) या समस्येवर एक चांगला आणि सोपा पर्याय आहे तो म्हणजे 'रिमोट कम्प्युटर ऍक्सेस'. सध्या आपण कुठूनही आपला कम्प्युटर चालवणं अगदी सहज शक्य आहे. 'रिमोट कम्प्युटर अॅक्सेस'द्वारे आपण इण्टरनेटच्या माध्यमातून कोणत्याही कंपनीला आणि काहीही पैसे न देता आपण कधीही आणि कितीही वेळा आपला कम्प्युटर हाताळू शकता. 

)सध्या काही मोजक्याच कंपन्यांच्या प्रोग्रॅमद्वारे ही सिस्टम वापरता येते.यामधे काही कंपन्यांचा प्रोग्रॅम काही हजार रुपयांना विकत घ्यावा लागतो. तर काही अगदी मोजक्या कंपन्या त्याचा रिमोट कम्प्युटर अॅक्सेस प्रोग्रॅम अगदी मोफत देतात. ही सेवा मोफत देणाऱ्या कंपन्यांमधे 'लॉगमीइन' ही कंपनी फार प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या www.logmein.com वेबसाइटद्वारे आपण ही सेवा वापरू शकता. 

3)या वेबसाइटवरून एक छोटासा प्रोग्रॅम आपल्या कम्प्युटरमधे लोड करावा लागेल. त्यानंतर आपण तो कम्प्युटर कुठूनही अॅक्सेस करू शकता. फक्त अशा वेळी दोन्ही कम्प्युटर चालू असणं आवश्यक आहे. तसंच दोन्ही कम्प्युटरवर इण्टरनेट सुरू असणं आवश्यक आहे. 

4)नवीन खातं उघडण्यासाठी या वेबसाइटवर नवं मेल सुरू करण्याची जी प्रक्रिया असते तशाच प्रकारचा फॉर्म भरवा लागतो. आता जेव्हा आपल्याला एखादा कम्प्युटर दुसरीकडून अॅक्सेस करायचा असेल तर आपल्या खात्यामधे जमा केलेले कम्प्युटर हाताळू शकता फक्त ते सुरू असणं आणि त्यावर इण्टरनेट सुरू असणं आवश्यक आहे. आता जर आपल्याला आपल्या खात्यामधे जमा केलेला एखादा कम्प्युटर चालवायचा असेल, तेव्हा परत www.logmein.com ही वेबसाइट सुरू करा. आता आपण या वेबसाइटचे मोफत सभासद असल्याने आपल्या खात्याच्या ई-मेल आयडी आणि पासवर्डने लॉगइन करा. आता आपल्यासमोर My Computers चं पान उघडेल त्यातील जे जे कम्प्युटर्स चालू असतील त्यांची नावं ठळक दिसतील, तर बंद असलेल्या कम्प्युटर्सच्या पुढे Offline असं दिलं असेल. आता जोकम्प्युटर आपल्याला उघडायचा असेल त्याच्या नावावर क्लिक करा. आता लगेचच त्या कम्प्युटरचा Access Code म्हणजेच त्याला दिलेला पासवर्ड विचारेल तो देऊन लॉगइन या बटणावर क्लिक करताच आपल्यासमोर तो कम्प्युटर हाताळण्याचं पान उघडेल त्यातील Remote Control या बटणावर क्लिक करा. आता तो दुसरीकडील कम्प्युटर जसाच्या तसा आपल्यासमोर छोट्या स्क्रीनमधे उघडेल इथे फुल स्क्रीनच्या ऑॅप्शनवर क्लिक करून तो कम्प्युटर उघडू शकता काम पूर्ण होईल तेव्हा Disconnect या बटणावर क्लिक करा. आपण ज्या कम्प्युटरला हाताळत असाल, त्यावर जणू काही जादू झाल्याप्रमाणे सर्व गोष्टी आपोआप होता

विंडो एक्सपी मध्ये सिस्टीम रीस्टोर चा वापर कसा करावा

1)  एखादा वायरस काढून टाकण्यासाठी सिस्टीम रीस्टोर चा वापर करणे हा सगळ्यात सोपा आणि बरोबर लागू होणारा इलाज आहे. यासाठी तुम्हाला    सिस्टीम रीस्टोर उघडावे लागेल. विंडो एक्सपी मध्ये 

 2) Start > All Programs > Accessories > System Tools > System Restore 
असे निवडावे.


 3)  त्यानंतर "रीस्टोर माय कॉम्प्युटर" असे निवडावे. आणि समोरच्या स्क्रीन वर एखादी तारीख निवडावी. गडद निळ्या रंगाच्या तारखा या रीस्टोर पोइंट असतात. तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर वर वायरस आढळून येण्या पूर्वीची तारीख अंदाजे निवडावी लागेल. जर तुम्ही ही तारीख बरोबर निवडली तर तुमचा कॉम्प्युटर  त्या तारखेला जसा होता तसा पूर्व स्थितीत जाईल. आणि वायरस च्या फाईली कॉम्प्युटर  वरून दिसेनाश्या होतील. यानंतर नेक्स्ट बटन दाबून सिस्टीम रीस्टोर ची प्रक्रिया पूर्ण करावी