Saturday, 19 November 2011

डाऊनलोड मॅनेजर

टरनेटवर 'डाऊनलोड मॅनेजर' असा सर्च दिलात की असंख्य मॅनेजर्स मिळतील. त्यातील काही चांगल्या मॅनेजर्सची ही तोंडओळख. आपल्या सर्वांच्याच उपयोगी पडणारी...

.
1)    आपल्याला एखादी फाइल डाऊनलोड करायची असते पण ती डाऊनलोड व्हायला इतका वेळ लागतो की वैताग येतो. प्रत्येकाकडे      ब्रॉडबँड असेलच असे नाही, त्यामुळे जे काही इंटरनेट कनेक्शन असेल त्याच्याशी झटापट करावी लागते. हे डाऊनलोडिंग चालू असताना दुसरे काही काम करता येत नाही. मध्येच वीज गेली वा कम्प्युटर हँग झाला तर पुन्हा सारे डाऊनलोडिंग पहिल्यापासून करावे लागते. अशा वेळेस आपल्या मदतीला येतात वेगळ्या प्रकारचे मॅनेजर्स. त्यांना डाऊनलोड मॅनेजर म्हणतात. फार हौस असेल तर असे 'डाऊनलोड मॅनेजर्स' तुम्ही विकतही घेऊ शकता. पण फुकटातले मॅनेजर्स असतील आणि तेच काम अधिक कार्यक्षमतेने करत असतील तर? विकत घेतलेल्या मॅनेजरमध्ये थोड्या अधिक सुविधा असतात हे खरे, पण फुकट्यांत पुरेशा सोयी असतात हेही खरे.


2)    इंटरनेटवर 'डाऊनलोड मॅनेजर' असा सर्च दिलात की असंख्य मॅनेजर्स मिळतील. त्यातील काही चांगल्या मॅनेजर्सची ही तोंडओळख. 'डाऊनलोड अॅक्सलरेटर प्लस'ची ८.६ क्रमांकाची व्हर्जन सध्या उपलब्ध आहे. कोणतेही डाऊनलोड अत्यंत वेगाने करणारा मॅनेजर म्हणून त्याला ओळखले जाते. कोणत्याही कारणाने डाऊनलोडिंग खंडित झाले तर पुन्हा आपोआप सुरू करण्याची क्षमता यात आहे. म्हणजे आधी एखाद्या फाइलचा जेवढा भाग डाऊनलोड झाला असेल त्याच्यापुढचा भाग डाऊनलोड होत राहातो. हा मॅनेजर वेगवान असला तरी अन्य साइटवर जाऊन त्याहीपेक्षा अधिक वेगाने डाऊनलोड करायचे असेल तर पर्यायी साइट सुचविण्याचेही काम केले जाते. हा फुकटात मिळत असला तरी तो अपग्रेड करण्यासाठी पैसे मोजावे लागतात. ते मोजायचे नसतील तर 'डाऊनलोड अॅक्सलरेटर मॅनेजर ३.२' डाऊनलोड करा. त्यातही 'प्लस'ची बरीच वैशिष्ट्ये आहेत.


'3)    फ्लॅशगेट' या डाऊनलोड मॅनेजरची लोकप्रियता या अॅक्सलरेटरएवढीच आहे. त्याची व्हर्जन १.९.६ सध्या चालू आहे. तेथे वेगाने फाइल डाऊनलोड होतेच, पण डाऊनलोड झालेल्या फाइलमध्ये व्हायरस नाही ना हे पाहण्याचे काम हा मॅनेजर लगेचच करतो. म्हणजे व्हायरसयुक्त फाइल मशीनमध्ये जाऊच शकत नाही. 'फ्लॅशगेट' डाऊनलोड केल्यावर डेस्कटॉपवर उजव्या बाजूला त्याचा एक आयकॉन येतो. 'ऑबिर्ट डाऊनलोडर' हाही एक अत्यंत उपयुक्त मॅनेजर आहे. म्युझिक, व्हीडिओ, मीडिया फाइल्स वेगाने डाऊनलोड करण्याचे काम तो करतो. शिवाय इंटरनेट एक्सप्लोअरर, फायरफॉक्स, मॅक्सथॉन, ऑपेरा या सर्व ब्राऊझरमध्ये तो चांगल्या पद्धतीने काम करतो. कोणत्याही कारणाने खंडित झालेले डाऊनलोडिंग पुन्हा पुढे सुरू करण्यात त्याचा हातखंडा आहे.


4)  याशिवाय, 'फ्री डाऊनलोड मॅनेजर (व्हर्जन २.५.७५८), 'इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर' (५.१४.३), फ्रेश डाऊनलोड (८.०२) असे काही चांगले डाऊनलोड मॅनेजर आहेत. यापैकी 'इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर' हा फ्लॅश व्हीडिओ, यूट्यूबवरचे व्हीडिओ, गूगल व्हीडिओ वगैरे डाऊनलोड करायला उपयोगी पडतो. प्रत्येकाने आपापल्या मशीनच्या क्षमतेनुसार आणि इंटरनेटच्या प्रकारानुसार मॅनेजर डाऊनलोड करावा. मॅनेजर कोणताही असला तरी फाइल त्यात थेट सामावल्या जातात. त्यावर डबल क्लिक करून ती फाइल ओपन करता येते वा इएक्सइ फाइल म्हणजे एखादे अॅप्लिकेशन असले तर तो प्रोग्राम थेट डाऊनलोड होणे सुरू होते. प्रोग्राम डाऊनलोड झाल्यावरही ती अॅप्लिकेशन फाइल तेथेच राहात असल्याने पुन्हा कधी काही कारणाने तो प्रोग्राम चालवायचा झाला तर बरे पडते.

5)  मास डाऊनलोडर (व्हर्जन ३.४.७) हा उत्तम डाऊनलोडर-पैकी एक ओळखला जातो. एखादी झिप फाइल डाऊनलोड करायची असेल तर तिच्यातल्या फाइल्स पाहण्याची संधी डाऊनलोड करण्याआधी आपल्याला मिळते हे याचे वैशिष्ट्य. एका वेळेस शंभर वेगवेगळ्या फाइल्स डाऊनलोड करता येतात. म्हणून त्याला 'मास' डाऊनलोडर म्हणतात. 'गेटराइट ६.३डी' हा आणखी एक डाऊनलोडर आहे. पण तो ३० दिवस फुकटात वापरता येतो. नंतर त्याचे लायसन्स विकत घ्यावे लागते. फाइल डाऊनलोड करताना अडथळा आला अथवा इंटरनेट कनेक्शन तुटले तरी नंतर ती फाइल व्यवस्थित डाऊनलोड करता येते. हा डाऊनलोडर दिसायला साधा आहे आणि त्याची फीचर्स आपल्याला हव्या त्या पद्धतीने सेट करता येतात. तरीही केवळ ३० दिवसांसाठी तो स्वीकारावा का हा प्रश्ान् उरतोच.

आपला मेल हॅक होवू शकतो.

आपला मेल हॅक होवू शकतो. आपला मेल हॅक होत असल्यास ते ओळखण्याच्या काही टिप्स आहेत. 
1.सर्वात प्रथम आपण आपल्या लॉग-इन विषयीची माहिती लक्षात ठेवावी. आपण मेल कधी उघडला होता. त्यावर काय काय केले होते, हे लक्षात ठेवावे.

2. आपण आपला मेल उघडल्यानंतर त्यावर सर्वात शेवटची तारीख पाहू शकता. यावर आपण यापूर्वी कदी आला होतात, याची नोंद असते.

3. ज्या पीसीवरुन मेल एक्टिव्हेट करण्यात आला त्याचा आयपीही यावर दिसतो.

4. मेल पाहिल्यानंतर आपण त्याची एक्सेस तारीख व लॉग-इन-टाइम लक्षात ठेवावा

.
5. दर महिन्याला आपला मेल पासवर्ड आपण बदलावा.


6. मेल पासवर्डमध्ये काही कॅप्स (कॅपिटल)  शब्द तसेच काही आकडेही असावेत.


वरील काही टिप्स आपल्याला मेल एक्सेस करताना उपयोगी पडू शकतात.


मध्ये माझ्या एका मित्राचे ‘गुगल अकाऊंट’ हॅक झाले होते. म्हणजे हॅकर्सनी अगदी हुबेहुब ऑर्कुट सारखं पेज तयार केलं होतं आणि तिथे जर तुम्ही लॉग-इन झालात की, संपलंच मग सगळं! पण यावेळीही गुगलच्या सोयीसुविधा त्याच्यासाठी धावून आल्या. म्हणजे त्याचं अकाऊंट हॅक जरुर झालं! पण त्याचं त्याला ते परतही मिळालं! कसं काय!? त्याने गुगल अकाऊंट्सला आपला मोबाईल नंबरही दिला होता. त्याने मोबाईलच्या सहाय्याने आपला पासवर्ड रिसेट करुन आपलं अकाऊंट परत मिळवलं. ऑनलाईन अकाऊंट आणि आपला मोबाईल नंबर हे दोन्ही एकाच वेळी चोरीला तर जाऊ शकत नाहीत ना! आणि म्हणूनच मला वाटतं, सावधानतेचा उपाय म्हणून प्रत्येकाने आपला मोबाईल नंबर गुगलला देऊन ठेवावा. 

काही चांगल्या websites all computer user

 websites 


To download free soft wares the site is

Free software downloads and software reviews – CNET Download.com

http://www.softpedia.com/

http://www.brothersoft.com/

mobile साठी java applications download करण्यासाठी हि site best आहे माझ्या मते.
http://www.getjar.com/
यातली oxford dictionary खूप छान आहे.

media converter मी नेहमी वापरते. videos mp3 मध्ये convert करण्यासाठी.

काही वेळेला you tube आणि त्यासारख्या काही websites मधील videos ची गाणी छान असतात. नुसती गाणी हवी असतील तर हे convertor छान आहे आणि फ्री आहे. 5 downloads per day . शिवाय यात इतरही बरेच options आहेत.
http://www.mediaconverter.org/
जर तुम्हाला एक pet हवा असेल तर अजिबात त्रास न देणारा pet येथे सापडेल.
http://dlc.thinkdesktop.com/dl/?FI=1307

कॉम्प्युटर स्लो झाल्यास रिस्टार्ट करायचे टाळा.

बर्‍याच वेळेस कॉम्प्युटरवर भरपूर काम केल्याने अथवा भरपूर निरनिराळे सॉफ्टवेअर्स उघडून काम केल्याने कॉम्प्युटर त्या वेळेस थोडासा स्लो होतो म्हणजेच थोडासा हळू चालू लागतो. त्याची झालेली संथ गती आपल्या लक्षात आल्यानंतर आपण कॉम्प्युटर रिस्टार्ट करतो म्हणजेच बंद करुन पून्हा सुरु करतो. जेणे करुन त्याच्या मेमरी मध्ये निर्माण झालेला गुंता सुटून तो पुन्हा व्यवस्थित चालू लागतो.  या परीस्थितीवर चांगला पर्याय म्हणून आपण नेहमी तो कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु करतो, म्हणजेच 'रीस्टार्ट'करतो. मग या कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु करण्याच्या वेळेमध्ये आपली २-३ मिनिटे वाया जातात.

काम करताना थोडासा स्लो झालेला कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु केल्याने कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये झालेला गुंता सुटून तो पुन्हा व्यवस्थित चालू लागतो. अशाप्रकारे कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये झालेला गुंता सोडविण्यावर कॉम्प्युटर 'रीस्टार्ट' करणे हा एकच पर्याय नाही. कॉम्प्युटर 'रीस्टार्ट'   न करता देखिल स्लो झालेला कॉम्प्युटर व्यवस्थित करता येतो. असे करताना कॉम्प्युटरमधिल मेमरीमध्ये झालेला गुंता सोडविण्याची क्रिया खाली दिली आहे.
१. कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर माऊसचे राईटक्लिक करुन येणार्‍या चौकोनातील 'New' या विभागातील  "Shortcut" या नावावर क्लिक करा.



२. आता आपल्यासमोर 'Create Shortcut'  चा चौकोन उघडेल.  त्यातील 'Type tye location of item:'  च्या खालील जागेमध्ये खाली दिलेली ठळक अक्षरातील ओळ कॉपी करुन त्याजागी पेस्ट करा व खालिल Next >  या बटणावर क्लिक करा.

%windir%\system32\ rundll32. exe advapi32.dll, ProcessIdleTasks


३. आता पुढील चौकोनामध्ये 'Type a name for this shortcut'  च्या खालिल जागेमध्ये "Clear Memory" असे टाईप करुन खालिल Finish  या बटणावर क्लिक करा.



४. असे केल्याने आता कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर  "Clear Memory" नावाची एक फाईल तयार होईल. मग जेव्हा-जेव्हा आपणास कॉम्प्युटर स्लो झालेला जाणवेल तेव्हा कॉम्प्युटर 'रीस्टार्ट'  न करता फक्त या फाईलीवर डबलक्लिक करुन पुन्हा कॉम्प्युटरचा वेग सुरळीत करा.

बनवा फेक मॅगझीन कव्हर्स


महाजालावर MagMyPic.com नावाची एक वेबसाईट आहे ज्याच्या मदतीने तुम्ही पण फेक मॅगझीनकव्हर्स बनवु शकताकव्हर वरहवा असलेला एकफोटो या साईटवर जाउन अपलोड करायचातुम्हाला हवे असलेले डिझाईन वर जाउन क्लिक करायचेआणि पिक्चरसेव्ह करायचेबस्स झाले तुमचे स्वतःचे मॅगझीन कव्हर तयार.
साधारण पणे ३० विवीध प्रकारचे कव्हर्स उपलब्ध आहेतचला तर मगबनवा स्वतःचे फेक मॅगझीन कव्हर आणि होतुमच्याकव्हर ची लिंक मला पाठवायला विसरु नका.