Thursday, 26 July 2012

दोन अथवा अनेक कॉम्प्युटर्सना एकमेकांना कसे जोडाल?


दोन किंवा जास्त कॉम्प्युटर्सना एकमेकांना जोडून त्यांचामध्ये  Networking  केले जाते. एकेकाळी अनेक कॉम्प्युटर्समध्ये Networking  करणे फार कठीण काम होते. परंतू सध्या वापरल्या जाणार्‍या विंडोज  XP  आणि VISTA  मध्ये कितीही कॉम्प्युटर्सना Networking  द्वारे एकत्रित जोडणे अगदी सोपे बनले आहे. या कामाला जास्तीत जास्त ५ मिनिटे लागतात आणि यासाठी कॉम्प्युटर हार्डवेअरच्या क्षेत्रातील इतर कुठल्याही अतिरिक्त माहितीची गरज नाही.


नेटवर्किंगचे फायदे खाली दिले आहेत.
१. नेटवर्किंगमधिल कॉम्प्युटर्समध्ये फाईलींची देवाणघेवाण सोपे होते. उदा. सीडी, पेन ड्राईव्ह अथवा फ्लॉपीची गरज नाही.
२. नेटवर्किंगद्वारे जोडलेल्या सर्व कॉम्प्युटर्सवर इंटरनेट वापरता येते.
३. नेटवर्किंगमधिल कुठल्याही कॉम्प्युटरवरुन कुठल्याही कॉम्प्युटरला जोडलेल्या प्रिंटरद्वारे प्रिंट काढता येते.
४. वेळ वाचतो.



दोन किंवा जास्त कॉम्प्युटर्समध्ये नेटवर्किंग कसे करावे.
अनेक कॉम्प्युटर्समध्ये नेटवर्किंग करण्यासाठी म्हणजेच त्यांना जोडण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. १) नेटवर्किंग स्विच, २) ईथरनेट (नेटवर्किंग) केबल.
नेटवर्किंग स्विच कॉम्प्युटर हार्डवेअरच्या दुकानामध्ये रु ५००/-  ते पूढे त्याच्या दर्जा आणि प्रकारानुसार मिळते. तर ईथरनेट (नेटवर्किंग) केबल रु १००/-  च्या पूढे तीच्या लांबीनुसार मिळते.
नेटवर्किंग स्विच त्याला असलेल्या पोर्टद्वारे (Port) ओळखले जाते. जसे ४ पोर्ट, १२ पोर्ट, २४ पोर्ट. हे पोर्ट म्हणजेच त्याला कॉम्प्युटर्स जोडण्याची व्यवस्था. जेवढे पोर्ट जास्त तेवढी त्याची किंमत जास्त. नेटवर्किंग स्विचला असलेल्या पोर्टला नेटवर्किंग केबलद्वारे कॉम्प्युटरला जोडता येते. ईथरनेट केबल आकाराने थोडीशी जाड व थोडीफार टेलिफोनच्या केबल प्रमाणे दिसते. या केबलला नेटवर्किंग स्विचला जोडण्यासाठी थोडा मोठा प्लग असतो तर तसाच प्लग आपल्या कॉम्प्युटरला अथवा लॅपटॉपला असतो. शक्यतो नविन कॉम्प्युटरला नेटवर्किंग करण्यासाठी प्लग असतो.
खालिल चित्रामध्ये नेटवर्किंग स्विच आणि कॉम्प्युटरला ईथरनेट केबलद्वारे जोडलेले दाखविले आहे. आपणास फक्त ईथरनेट केबलचे एक टोक स्विचमध्ये तर दुसरे टोक कॉम्प्युटरला जोडायचे आहे.


टीप :  या ठिकाणी कॉम्प्युटरला Restart  म्हणजेच कॉम्प्युटर बंद करुन पून्हा सुरु करावा लागेल.
१. आता ज्या कॉम्प्युटरला ती ईथरनेट केबल जोडली असेल तो कॉम्प्युटर सुरु करा. आता डेस्कटॉपवरील 'My Computer'  वर माऊसने राईटक्लिक करुन येणार्‍या छोट्या चौकोनातील 'Properties'  वर क्लिक करा.

२. आता आपल्यासमोर  'System Properties'  चा चौकोन सुरु होईल. त्यातील वरील बटणामधिल 'Computer Name'  वर क्लिक करा.

३. आता आपल्यासमोर त्याच चौकोनात 'Computer Name'  विभाग सुरु होईल. त्यातील ह्या बटणावर क्लिक करा.
४. आता आपल्यासमोर 'Computer Name Changes'  हा एक नविन छोटा चौकोन सुरु होईल. त्यामध्ये वरील जागेत Computer name:  या जागेत आपल्याला त्या कॉम्प्युटरला जे नाव द्यायचे असेल ते द्या. तर खालिल जागेमध्ये Workgroup: या जागेत  GROUP  हे टाईप करा.

५. आता आपल्यासमोर त्या कॉम्प्युटरच्या नविन Workgroup मध्ये आपले स्वागत आहे असा मॅसेज येईल. त्यातील ' OK '  वर क्लिक करा.

६. आता लगेचच आपल्यासमोर ' Restart this computer '  म्हणजेच कॉम्प्युटर बंद करुन पून्हा सुरु करण्यासाचा मॅसेज येईल. त्यातील ' OK '  वर क्लिक करा.

७. बस्स. इतकेच आपणास करायचे आहे. आता हिच क्रिया नेटवर्किंग मध्ये जोडलेल्या इतर कॉम्प्युटरवर करा.
टीप :  या ठिकाणी कॉम्प्युटरला Restart  म्हणजेच कॉम्प्युटर बंद करुन पून्हा सुरु करावा लागेल.
८. अशा प्रकारे सर्व कॉम्प्युटर्स जरी एकमेकांना जोडले गेले असले तरी आपल्या कॉम्प्युटरमधिल डेस्कटॉपवरील  द्वारे पाहिल्यास आपणास इतर कॉम्प्युटर दिसणार नाहित.
' My Network Places ' म्हणजेच नेटवर्किंगमध्ये कॉम्प्युटर आणण्यासाठी त्याला शेअर (Sharing) करणे आवश्यक आहे.

९. कॉम्प्युटर शेअर (Sharing)  करण्यासाठी डेस्कटॉपवरील   सुरु करा. आता आपल्यासमोर कॉम्प्युटरमधिल [ Local Disk (C:) ], [CD-RW Drive (D:) ] दिसतील त्यावर माऊसने राईट क्लिक करा आणि त्यातील  Sharing and Security...  वर क्लिक करा.

१०. आता आपल्यासमोर ' Local Disk (C:) Properties '  चा चौकोन सुरु होईल. त्यातील खालिल चित्रामध्ये दाखविलेल्या ' .... click here  ' जागी क्लिक करा.

११. आता आपल्यासमोर ' Sharing ' चा विभाग सुरु होईल, त्यातील खालिल चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे 'Share this folder on network'  समोरील आणि खालिल  वर क्लिक करुन त्याला सुरु करा.
१२. आता हिच क्रिया नेटवर्किंग मध्ये जोडलेल्या इतर कॉम्प्युटरवर करा आणि ते सर्व कॉम्प्युटर्स एकदा बंद करुन सुरु करा ते सर्व नेटवर्किंगमध्ये जोडले जातील.

टीप :
१. नेटवर्किंगमध्ये जोडलेल्या सर्व कॉम्प्युटर्सना इंटरनेट द्यायचे असल्यास ब्रॉडबँड इंटरनेटच्या आपल्याकडे आलेल्या ईथरनेट केबलला नेटवर्किंग स्विच मध्ये घातल्यास इंटरनेट आपोआप त्या सर्व कॉम्प्युटर्सवर सुरु होते.
२. नेटवर्किंगमध्ये जोडलेल्या ज्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला असेल त्या प्रिंटरला जर नेटवर्कमध्ये आणायचे असल्यास. विंडोज Start  बटणामधिल  Settings  मधिल Printers and Faxes  बटणावर क्लिक करा. त्यातील आपणास ज्या प्रिंटरला शेअर (Sharing)  करायचे असेल त्याला वरील १०,११ क्रमांकामध्ये सांगितल्याप्रमाणे करुन नेटवर्कमध्ये जोडा.

मोफत 'एसएमएस'

 प्रथम आपल्याला आपला मोबाईल क्रमांकाद्वारे 'रजिस्टर'  व्हावे लागते. इथे सुरवातीला 'रजिस्टर'  होताना आपला चालू मोबाईल क्रमांक त्यांना सांगावा लागतो ज्यावर लगेचच त्यांचा 'पासवर्ड' येतो. ज्याद्वारे आपल्याला त्यांच्या संकेतस्थळावर लॉगिन करायचे असते.

 हा पासवर्ड आपण नंतर बदलू देखिल शकता.
आपण मोबाईल प्रमाणे यामध्ये देखिल आपल्य मित्रमैत्रींचे नाव आणि मोबाईल क्रमांक साठवू शकता. जेव्हा आपण या संकेतस्थळांवरुन एखाद्याला 'एसएमएस'  पाठविता तेव्हा त्याला आपला 'एसएमएस'  जातोच जेव्हा आपण एखाद्या पहिल्यांदा 'एसएमएस'  पाठविता तेव्हा त्याला आपल्या 'एसएमएस'  सोबत आपले नाव व त्या संकेतस्थळाचे नाव असलेला तसेच आपण त्याला आपल्या खात्यामध्ये जमा केल्याचा एक माहितीचा 'एसएमएस'  या संकेतस्थळाद्वारे पाठविला जातो.

या संकेतस्थळांचे महत्त्व म्हणजे मोबाईल प्रमाणे फक्त 'एसएमएस' पाठविणे एवढीच यांचे सेवा मर्यादित नसून आपण एकाचे वेळेस अनेकांना एकच 'एसएमएस' पाठवू शकता. ज्याला 'ग्रुप एसएमएस' असे म्हटले जाते. शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर दिनांक आणि वेळ ठरविल्यास त्याच वेळी 'एसएमएस' पाठविला जातो. तसेच आपण पाठविलेल्या सर्व जून्या 'एसएमएस'  ची नोंद देखिल इथे आपल्या खात्यामध्ये साठविली जाते.



या संकेतस्थळांवरुन 'एसएमएस' कसा पाठवायचा ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.



www.world2india.in

www.site2sms.com

www.160by2.com

www.way2sms.com 

www.mysmsworld.com  
मोफत 'एसएमएस' सेवा देणार्‍या या संकेतस्थळांना मग फायदा कसा होत असेल याचा विचार केल्यास त्याचे उत्तर आपल्याला त्यांच्या संकेतस्थळावर आपले खाते उघडून त्यात प्रवेश केल्यासरशी कळेल हे संकेतस्थळावर आपल्याला निरनिराळ्या जाहिराती पाहायला मिळतील. याच जाहिराती या संकेतस्थळांचे उत्पन्नाचे साधन आहेत. या जहिराती जर निट पाहिल्यास आपल्याला त्यातील तीन जाहिराती 'गूगलच्या' नावाने आढळतील.

'क्लाउड कंप्युटिंग

ढग किंवा क्लाउड ह्याला कवींनी, 'काळा काळा पिंजलेला कापूस' असे आपल्याला लहानपणीच समजावलेले असते. तरूणपणी दादा कोंडक्यांनी 'ढगाला कळ लागल्यावर काय होते' ते समजावून सांगितले. तर अंडरवर्ल्डवाल्यांनी गेम केल्यावर माणूस 'ढगात' जातो हे समजावून सांगितले. इतके, इतक्या जणांनी ढगाबद्दल समजावले तरीही 'क्लाउड' कंप्युटिंग ही काय भानगड आहे हा प्रश्न पडतोच.
Smile
संगणक विश्वात झालेली क्रांती ही, 'संपुर्ण जगासाठी चार संगणक खुप झाले' असे म्हणणार्‍या IBM च्या एके काळच्या सिनीयर मॅनेजमेंटच्या मतापासून सुरू होऊन आज ती 'क्लाउड कंप्युटिंग'पाशी येऊन पोहोचली आहे. सध्या सगळीकडे क्लाउड कंप्युटिंगचा नारा ऐकू येतो आहे. कंपन्यांच्या IT डिपार्टमेंट्समध्ये तो एक बझवर्ड झाला आहे. तर काय आहे हे क्लाउड कंप्युटिंग असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. चला तर मग बघुयात काय आहे हे क्लाउड कंप्युटिंग...

समजा तुम्ही एक संगणक तुमच्या वैयक्तिक वापरासाठी विकत घेणार आहात. त्यासाठी तुम्ही इंटेलचे हार्डवेयर असलेला संगणक फायनल केलात. त्या हार्डवेयरच्या डिव्हाइस ड्रायव्हर्सची एक DVD तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला एक ऑपरेटिंग सिस्टीम लागेल, ती तुम्ही मायक्रोसॉफ्ट विंडोज ठरवलीत. त्यासाठीही तुम्हाला एक OS DVD मिळेल. त्या DVD साठवण्यासाठी तुम्हाला एक बॉक्स घ्यावा लागेल.

आता संगणक घेतलात तर त्यावर तुम्ही काही अ‍ॅप्लिकेशन नक्कीच चालवणार असाल (म्हणजे त्याचसाठी तुम्ही संगणक घेत आहात हे गृहीत धरले आहे Smile ) तर त्या अ‍ॅप्लिकेशन्सच्याही DVD मिळतील व त्या तुम्हाला संभाळून ठेवाव्या लागतील. त्यासाठी आधिचा DVD बॉक्स तुम्हाला लहान पडतो आहे, त्यामुळे तुम्हाला एक मोठा DVD बॉक्स घ्यावा लागेल. काही वर्षांनंतर तुमचे हार्डवेयर जुने झालेले असेल त्यातले काही भाग तुम्ही बदलायचे ठरवले. पुन्हा नविन डिव्हाइस ड्रायव्हर्सच्या DVD तुम्हाला मिळाल्या. परत DVD बॉक्स तुम्हाला लहान पडतो आहे, त्यामुळे पुन्हा नविन बॉक्स. आता तुमच्या अ‍ॅप्लिकेशनचे नवे वर्जन आले आहे आणि तुम्ही ते विकत घ्यायचे ठरवले. त्याच्या पुन्हा नव्या DVD. आता तुम्ही तुमच्या मुलाकरिता अजुन एक नविन संगणक घ्यायचे ठरवता. काही आप्लिकेशन्सची जुनी वर्जन्स तुमचा मुलगा वापरणार आहे. परत नविन बॉक्स मुलासाठी. ह्या प्रत्येक वेळी तुमच्या संगणक विक्रेत्याला मदतीसाठी बोलवावे लागणार आणि त्याला सर्विस चार्ज द्यावा लागणार. ह्यात मध्येच काही DVD ऐनवेळी खराब झाल्या तर मग तुम्हाला पुन्हा नविन DVD मिळविण्याची मारामार करावी लागणार. पुन्हा तुमच्या संगणक विक्रेत्याला मदतीसाठी बोलवावे लागणार आणि त्याला सर्विस चार्ज द्यावा लागणार.
येवढी यातायात जर एक-दोन संगणकांसाठी असेल तर शेकडो / हजारो कर्मचारी काम करत कंपन्यांचे काय होत असेल याचा विचार करा. ह्या सर्व हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर विकत घेण्याच्या आणि त्याच्या मेंटेनंन्ससाठी येणार्‍या खर्चाला 'टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप (TCO)' म्हणतात. मोठ्या मोठ्या कंपन्यांची ही कॉस्ट अतिशय प्रचंड असते, त्यासाठी जे कुशल मनुष्यबळही लागते तेही प्रचंड महाग असते.
'क्लाउड कंप्युटिंग' नेमके ह्याच समस्येवर उत्तर आहे. आजच्या युगात क्लाउड कंप्युटिंग पुढे रेटण्याचा मुख्य मार्केटिंग मंत्र म्हणजे 'टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप' पासून सुटकारा. 'तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आमचे' हे क्लाउड कंप्युटिंग सेवा पुरवठादारांचे ब्रीदवाक्य आहे. Smile
क्लाउड कंप्युटिंग म्हणजे सर्व, ऑपरेटींग सिस्टीम, अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेयर आणि डाटा (माहिती) हे एका मध्यवर्ती, प्रचंड आकाराच्या (लॉजिकली) संगणकावर ठेवायचे. त्या मध्यवर्ती संगणकाची संगणनशक्ती वापरून ती OS, अ‍ॅप्लिकेशन्स त्या संगणकावर रन करायची आणि डाटा/डॉक्युमेंट्स (माहिती) त्याच मध्यवर्ती संगणकाच्या मेमरीत साठवून ठेवायचा. ह्या मध्यवर्ती संगणकासाठी लागणार्‍या हार्डवेयरची जबाबदारी ह्या मध्यवर्ती संगणकाची सेवा पुरवठा करणार्‍याची असणार. आता नविन हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर तुम्हाला आपसुकच अपग्रेड होऊन मिळणार. थोडक्यात सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर ह्या तुम्हाला सेवा म्हणून मिळणार. तुम्ही फक्त त्या सेवा वापरण्याचा मोबदला सेवा पुरवठादाराला द्यायचा. एकढाच तुमचा खर्च. बाकीची सगळी यातायात तो सेवा पुरवठादार तुमच्यासाठी, तुमच्या वतीने करणार.

क्लाउड कंप्युटिंग ही काही नविन टेक्नॉलॉजी नाहीयेय. ते डाटा सेंटर्सच्या रूपात होतेच. पण दिवसेंदिवस जलद होत जाणार्‍या इंटरनेच्या प्रभावी वापरामुळे त्याचे एक नविन मॉडेल बनवण्यात आले ज्याद्वारे संगणकीय रिसोर्सेस प्रचंड मोठ्या स्केल मध्ये प्रभाविपणे वापरता येणे शक्य होईल. बरं ठीक आहे, पण मग त्याला 'क्लाऊड' असे नाव का? तर जेव्हा इंटरनेट आले तेव्हा वेगवेगळया आकृत्यांमध्ये इंतरनेट दर्शवण्याची खूण होती ढग, क्लाउड.

(चित्र आंतरजालावरून साभार)
क्लाउड कंप्युटिंगचा पाया आहे इंटरनेट. त्यामुळे क्लाउड हे नाव 'रूपक' म्हणून वापरले गेले आहे, मध्यवर्ती संगणकाच्या अमूर्त रुपासाठी. तर हे असे आहे अमूर्त रुप क्लाउड कंप्युटिंगचे:

(चित्र विकिपीडीयावरून साभार)
क्लाउड कंप्युटिंग हे प्रामुख्याने ३ मुख्य प्रकारांत विभागले गेले आहे.
  • इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस (IaaS)
  • प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस (PaaS)
  • सॉफ्टवेयर अ‍ॅज अ सर्विस (SaaS)

इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस (IaaS)
इन्फ्रास्ट्रक्चर हा क्लाउड कंप्युटिंगचा पाया आहे. ह्यावरच सगळा डोलारा उभा आहे. ह्या प्रकारात सर्व प्रकारचे सर्व्हर्स, नेटवर्क डिव्हायसेस, स्टोरेज डिस्क्स तत्सम हार्डवेयरचा समावेश होतो. इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस सेवा घेतल्यावर, आपल्याला फक्त हार्डवेयर कोणते हवे ते ठरवायचे असते, बाकीच्या किचकट गोष्टी सेवा पुरवठादार आपल्या वतीने करतो. ही सेवा 'जेवढा वापर तेवढे बील' अश्या तत्वावर चालते. वापर वाढला तर बील जास्त वापर कमी झाला तर बील कमी अशी 'इलास्टिक' सेवा असते ही. त्यामुळे 'टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप' मध्ये प्रचंड बचत होते.
IBM® Cloud ह्या नावाने IBM ही इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस सेवा पुरवते.
प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस (PaaS)
उद्या जर मला एक ग्रिटींग कार्ड पाठवण्याची सर्विस देणारी वेब साईट चालू करायची असेल तर मला आधि एक डोमेन नेम विकत घ्यावे लागेल, मग सर्व्हर स्पेस विकत घ्यावी लागेल, डाटाबेस विकत घ्यावा लागेल आणि मग साईट चालू होईल. जर साईट खूप चालली आणि खुप युजर्स मिळाले तर मला जास्त सर्वर स्पेस विकत घ्यावी लागेल आणि असेच बरेच काही. हे सर्व झेंगाट मलाच बघावे लागेल. पण हे सर्व नको असेल तर मी क्लाउड वर प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस ही सेवा विकत घेऊ शकतो. ज्यामुळे माझे अ‍ॅप्लिकेशन ह्या प्लॅटफॉर्मवर होस्ट केले जाईल आणि सर्व प्रकारची अ‍ॅडमिनीस्ट्रेटीव्ह जबाबदारी सेवा पुरवठादाराची असेल. म्हणजे मी नोकरी संभाळून आता ग्रिटींग कार्ड पाठवण्याची सर्विस चालू ठेवू शकतो. Wink
अ‍ॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहु ह्या प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस सेवा पुरवणार्‍या कंपन्या आहेत.
सॉफ्टवेयर अ‍ॅज अ सर्विस (SaaS)
ह्या प्रकारात मध्यवर्ती संगणकावर सॉफ्टवेयर सेवा (अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेयर), सेवा पुरवठादार पुरवतो आणि आपण आपल्याकडचा संगणक किंवा मोबाइल वापरून ही अ‍ॅप्लिकेशन्स वापरू शकतो. गुगलच्या सर्व सेवा (डॉक्स, ड्राइव्ह, पिकासा, कॅलेंडर ई.), ई-मेल सर्विसेस, मायक्रोसॉफ्ट्ची ड्रॉपबॉक्स सेवा, ब्लॉगर.कॉम, वर्डप्रेस.कॉम ह्या सर्व सेवा सॉफ्ट्वेयर अ‍ॅज अ सर्विस ह्या प्रकारात मोडतात.
तर असे आहे हे क्लाउड कंप्युटिंग, कळले का रे भाऊ! Smile

इतिहास पहा नेट वर

जग एका क्लिक वर

इतिहास पहा नेट वर

नमस्कार बालमित्रांनो, आज आपल्या भेटी साठी येताना इंटरनेट वरील एका वेगळ्या प्रकारच्या माहीतीचा खजीना घेऊन आलो आहे.बाल मित्रांनो ऑगष्ट महीना सुरू झाला की आपल्याला आठवण होते ती आपणास स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या अनेक स्वातंत्र्य सेनानींची. मित्रांनो त्यानी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले व भारतातून इंग्रजांना हुसकावून लावले. मित्रांनो या स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक उठाव, बंड, चळवळी झाल्या व अखेर इंग्रज आपला देश सोडून १५ ऑगष्ट १९४७ रोजी गेले. त्याच प्रमाणे ८ ऑगष्ट १९४२ रोजी चलेजाव चे आंदोलन झाले. अशा दोन ऎतिहासिक घटना या महीन्यात आहेत. याचे ओचित्य साधून आज मी आपणासाठी इंटरनेट वरील माहितीच्या खजिन्यातून काही निवडक गोष्टी आपणासाठी आणल्या आहेत. त्या आपण नक्की वाचाल व त्या वेब साईट ना भेट ही द्याल याची मला खात्री आहे.
    1) जन ग मन ( राष्ट्रगीत ) : बाल मित्रांनो आपण दररोज शाळेत राष्ट्रगीत म्हणतो. पण त्या राष्ट्रगीताला पण एक इतीहास आहे. तो जर आपण जाणून घेतला तर ख-या अर्थाने देश भक्तीची पाळेमूळे खोलवर रुजतील हा इतीहास आपणास खालील बेव लिंक वर उपलब्ध आहे


मित्रांनो हे जन गण मन ब-याच गायकानी गायलेले आहे. ते आपणास ऎकण्यासाठी प्रथम आपल्या संगणकावर डाऊनलोड करणे गरजेचे आहे. स्वत: रविंद्र्नाथ टागोर तसेच लता मंगेशकर, हरीहरन, कार्तीक कुमार इत्यादीच्या आवाजातील राष्ट्रगीत या लिंक वर MP3 प्रकारात ऎकता येईल


) भारतीय स्वातंत्र्य सेनांनीची माहीती : बालमित्रांनो ज्याच्या मुळे आपणास हे स्वातंत्र्य मिळाले त्या सेनानिंची सविस्तर माहीती आपणास अभ्यासावयाची असल्यास ती इंटरनेट च्या माहीतीच्या सागरात उपलब्ध आहे. http://www.indianfreedomfighters.in/ http://www.liveindia.com/freedomfighters/ या साईट वर १०० पेक्षा जास्त सेनांनिंची माहीती उपलब्ध आहे.ती आपणास नक्की उपयुक्त ठरेल.

) जयंती व पुण्यतिथी : मित्रांनो आपल्याला थोर महात्म्यांच्या जयंती व पुण्यतीथी दिवस व त्याचे कार्य सविस्तर रूपात असल्यास याhttp://www.whereincity.com/india/great-indians/freedom-fighters/ वेब साईटवर उपलब्द आहे.



) भारत एक खोज : बालमित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके व भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यानी लिहीलेले भारत एक खोज हे पुस्तक पुर्ण भारताचा इतीहास व संस्कृती उलघडणारा आहे. मीत्रांनो तो आपणास ही वाचावा असे वाटत असेलच. तो जर आपणास हवा असल्यास http://en.wikipedia.org/wiki/The_Discovery_of_India या वेब साईट उपलब्ध आहे.याच पुस्तकावर दुरदर्शन ने ४३ भागांची मालिका प्रसारीत केली होती ती आपणास पाहण्याचे भाग्य लाभले नाही . मात्र नाराज होऊ नका आजही त्या मालिकेचे सर्व ४३ भाग http://watchbharatekkhoj.blogspot.com/ या वेबसाईट वर उपलब्ध आहे ते भाग आवर्जून पहा त्याचा आपणास इतिहास विषयाच्या अभ्यासासाठी उपयोग करता येईल

) स्वातंत्र्य सेनानींच्या चित्रफिती : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यानी ज्यानी योगदान दिले त्या सेनानीना आपण भेटू शकलो नाही. परंतू आजही आपण चित्रफितींच्या माध्यमातून त्याना पाहू शकतो, तसेच त्यांच्या कार्यांची

) सुभाष चंद्र बोस याची व्हीडीओ आपणास या youtube च्या लिंक वर पहायला मिळॆल


) महात्मा गांधी याची व्हीडीओ आपणास या youtube च्या लिंक वर पहायला मिळॆल




http://www.youtube.com/watch?v=WCvuo_NZcjo
चलेजाव चळवळ १९४२ च्या लढ्यातील महात्मा गांधींची भाषणे या वेब लिंक वर उपलब्ध आहेत.



) विर सावरकर २१ सेकंदाची एक चित्रफित या वेब लिख वर उपलब्द आहे.


अशाच प्रकारच्या अनेक स्वातंत्र्य सेनानीच्याही चित्रफीती इंटरनेट्वर शोधल्यास नक्की मिळातील. आपणाही त्या शोधण्याचा प्रयत्न करा.

बाल मित्रांनो आपला देश १५ ऑगष्ट १९४७ साली स्वातंत्र्य झाला. तो आपण मोठ्या दिमाखात साजरा करतो. मित्रांनो आजच्या या इंटरनेट च्या जमान्यात आपण आपल्या मित्रांना इ ग्रेटीग पाठऊ शकतो असेच इ ग्रेटींग उपलब्द असलेल्या वेबसाईट मी आपणास खाली देत आहे. आपण ही या वेब साईटना बेट द्या व ईंटरनेट च्या साह्याने आपल्या मित्रांना व आप्ताना शुभेच्छा पत्रे पाठवा

http://www.123greetings.com/events/indian_independence_day/