पासवर्डसमुळे आपल्या व्यक्तिगत माहिती1चे ऑनलाईन रक्षण होते. मजबूत पासवर्ड म्हणजे असा पासवर्ड की जो दुसर्या व्यक्तीला समजण्यास कठीण असेल पण आपल्याला आठवेल
मजबूत पासवर्ड कसा तयार करावा याची माहिती:
• कॅपिटल (अप्पर केस) व लोअर केसमधील अक्षरे, चिन्हे व अंक यांचा एकत्रित वापर करा. बहुतांश पासवर्डस केस-सेन्सिटिव्ह2 असले पाहिजेत, म्हणजेच आपण आपला पासवर्ड टाईप करीत असताना अप्पर केस आणि लोअर केसमधील अक्षरांना महत्व असते.
• आपले पासवर्डस किमान आठ वर्णांचे असल्याची खात्री करा. ते जितके मोठे असतील, तितका त्यांचा अंदाज करणे कठीण असते.
• एक पूर्ण शब्द निवडण्याऐवजी अंक आणि अक्षरांचा एक संच निवडण्याची खात्री करा. मात्र तो आपल्याला आठवू शकेल याचीही खात्री करा.
आपला पासवर्ड सेट केल्यानंतर तो सुरक्षित राहील याची खात्री करा:
हे करा:
• आपले पासवर्डस वारंवार बदला. दर महिन्यातून एकदा बदलण्याची सवय चांगली.
• वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगवेगळे पासवर्डस वापरा
हे करु नका:
• तो विशिष्ट संगणक फक्त आपणच वापरत असलात तरच, आपल्याला आपला पासवर्ड संगणकावर जतन करायचा आहे का, असे विचारल्यावर “होय” म्हणा.
• आपले पासवर्डस डेस्कटॉपवर ठेवू नका.
• आपले पासवर्डस आपल्या संगणकावर लिहून ठेवू नका किंवा आपल्या संगणकावर चिकटवून ठेवू नका.
• आपला पासवर्ड इतर कोणालाही देऊ नका.