Monday, 10 October 2011

असेम्बल्ड आणि ब्रॅण्डेड PC

असेम्बल्ड कम्प्युटर आणि ब्रॅण्डेड कम्प्युटरमध्ये काय फरक आहे

असेम्बल्ड कम्प्युटरलाही गॅरेंटी मिळते

मग ब्रॅण्डेड कम्प्युटर घेऊन आम्ही उगाजच पैसे का वाया घालयवायचे

या मुद्यावरून दोन मत प्रवाह आहेत आणि ते दोन्हीही तितकेच प्रभावी आहेत. असेम्बल्ड कम्प्युटरमध्ये तुमचे पैसे वाचतात हा मुद्दा खरा आहे. मात्र, अनेकदा असे होते की, आपले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर्स जुळत नाही अथवा एक हार्डवेअर, दुसऱ्या हार्डवेअरशी मॅच होत नाही. यामुळे कदाचित आपला कम्प्युटर काही दिवसांनी काम करणं बंद होतो अथवा त्याच्या कामाची क्षमता कमी होते. अर्थात, असेम्बल्ड करणारे कम्प्युटर इंजिनिअर या सर्व गोष्टींची काळजी घेतात. मात्र, याची गॅरेंटी आपण देऊ शकत नाही.


याउलट ब्रॅण्डेड कम्प्युटरर्सचे असतं. यातील हार्डवेअर एकमेकास पूरक असून त्यामध्ये सहजा सहजी प्रॉब्लेम्स येत नाहीत. तसंच, दोन्ही कम्प्युटरपैकी ब्रॅण्डेड कम्प्युटरचं लाइफ जास्त असतं. तसंच, याला मिळणारी आफ्टर सेल्स सव्हिर्स चांगली मिळू शकते. असेम्बल्डमध्ये तुम्हाला देण्यात येणारी हार्डवेअर्स ही ब्रॅण्डेडच असतात. यामुळे तुम्ही केवळ काही पैसे वाचवून भविष्यातील सुविधांना मुकाल. आता तुम्ही काही डेल, कॉम्पॅक यासारख्या कंपन्यांच्या साइटवर तुम्ही तुमचे कॉन्फिग्रेशन टाकून तुम्हाला पाहिजे तसा ब्रॅण्डेड असेम्बल्ड कम्प्युटर बनवून घेऊ शकता. यामुळे प्रायोरिटी ही ब्रॅण्डेडला असली तरी असेम्बल्ड घेऊच नये अशातला भाग नाही.

मला नवीन कम्प्युटर घ्यायचा आहे. माझे बजेट २० ते २५ हजार रूपये असून मला ५०० जीबी हार्ड डिस्क, चार जीबी रॅम, २.९ गीगीहार्ट्सचा स्पीड, इंटेल कोर ३ किंवा ७ आणि १ जीबी ग्राफीक कार्ड हवं आहे. -

नवा ब्रॅण्डेड कम्प्युटर घ्यायचा असेल तर तुम्हाला या कॉन्फिग्रेशनसाठी किमान २५ हजारावर पैसे मोजावे लागतील. तुम्ही थोडं बजेट वाढवलं तर तुम्हाला कॉम्पॅक किंवा झेनिथचा चांगला पीसी घेता येईल. डेलच्या इन्सिपिरॉन सिरीजमधील डेस्कटॉप तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करू शकतात. यामध्ये कोर आय ३-२१०० प्रोसेसर असून एचडी ग्राफीककार्ड आहे. याशिवाय ८ इन वन कार्ड रीडर आदी सुविधा आहेत. डेलच्या इतर सिरिजमध्ये विंडोज ७ प्रोफेशनल आहे. याचबरोबर यात आणखी एक विशेष सोय आहे ती म्हणजे डेलच्या साइटवर जाऊन तुम्ही तुमचे आवडीचे कॉन्फिग्रेशन टाकले की, तसा कम्प्युटर मिळू शकतो. इतर कंपन्यांचे पाहायचे असतील तर, झेनिथ, अॅसर या दोन कंपन्यांचा विचार करू शकता. झेनिथमध्ये स्मार्ट स्टाइल पीसी आहे जो तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. मात्र, तुम्ही असेम्बल्ड करून घेतला तर, तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये पूर्ण कम्प्युटर मिळू शकेल. असे असले तरी तुम्ही ब्रॅण्डेडचा पर्याय स्वीकारणं योग्य आहे. यात आणखी एक बाब म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल आणि खरोखरच उपयोग असेल तर लॅपटॉपच घ्यावा. जेणेकरून भविष्यात त्याचा तुम्हाला वापर करता येईल. तसेच तुम्ही लहान मुलांसाठी जर घेत असाल तर डेस्कटॉप घेणेच योग्य ठरेल.

मला लॅपटॉप घ्यायचा आहे, यामध्ये मला मुख्यत्वे करून गेम्स आणि विविध सॉफ्टवेअर्स वापरता आले पाहिजे. त्याचबरोबर इंटरनेटचा स्पीड जास्त असावा आणि इतर सर्व चांगले फिचर्स असावे. तसंच, वायरलेस इंटरनेटसाठी कोणता ऑप्शन निवडू हेही सजेस्ट करा. - विनायक अमीन

तुम्हाला गेम्स खेळण्यासाठी लॅपटॉप घ्यायचा असेल तर माझा सल्ला असा राहिल की, तुम्ही लॅपटॉपऐवजी डेस्कटॉप घ्यावा. कारण लॅपटॉपपेक्षा डेस्कटॉपवर गेम्स खेळण्याचा चांगला आनंद लुटू शकता. आता लॅपटॉप घ्यायचा असेल तर सध्या तुम्हाला डेलची इन्स्पिरॉन, एचपीचे प्रोबुक आणि सोनीची वायोच्या नव्या सिरिजचा विचार करता येईल. लॅपटॉप घेताला कोर आय ३ किंवा आय ५ आहे का हे तपासा, तुमचा रॅम किमान १ जीबी असावा तसेच गेम्ससाठी चांगले ग्राफीक कार्डही तपासून घ्या. आता तुमचा दुसरा प्रश्न तो म्हणजे वायरलेस इंटरनेट साठी टाटा फुटॉन किंवा दुसरे कोणते युएसबी वापरू. तर यात मी तुम्हाला असा सल्ला देऊ इच्छितो की, तुम्ही कोणत्याही कंपनीचा यूएसबी घेऊन वायरलेस इंटरनेट घ्या. मात्र ते घेण्यापूवीर् ते तुमच्या घरी अथवा ज्या महत्त्वाच्या ठिकाणी तुम्हाला वापरायचे आहे त्या ठिकाणी काही वेळ ट्रायलसाठी आणून तपासा आणि मगच कोणते घ्यायचे याचा निर्णय घ्या. सध्या यात टाटा, रिलायन्सबरोबरच काही नवे ब्रॅण्डही आले आहेत.

मी आय ३ आणि कोर टू ड्युओ या प्रोसेसरमध्ये कन्फुज्ड झालो आहे. तर, कोणता प्रोसेसर घ्यावा हे सुचवा. तसेच रॅमही कोणती घेऊ हे सांगा. मला एईडी मॉनिटरही घ्यायचा आहे माझे बजेट सहा ते आठ हजार इतके आहे. - Nishikant Manugade

कोर टू ड्युओ हे केव्हाही चांगले असेल.

आय ३ हे टेक्निकली चांगले आणि सपोर्टिव्ह असले तरी, यामध्ये आपल्याला एकच प्रोसेसिंग थ्रड मिळते. यामुळे आपल्या कम्प्युटरच्या स्पीडमध्ये फरक पडू शकतो. कोर टू ड्युओमध्ये आपल्याला दोन प्रोससिंग थ्रेड्स असल्यामुळे आपल्याला चांगला परफॉर्मन्स मिळू शकतो. यात आणखी एक सल्ला देतो तो म्हणजे तुम्ही कोर टू आयथ्री प्रोसेसरही घेऊ शकता. आता दुसरा प्रश्न म्हणजे एलईडी मॉनिटरचा. सध्या बाजारात बहुतांश कंपन्यांचे एलईडी मॉनिटर उपलब्ध आहेत. यमाध्ये एलजी, डेल यासारख्या कंपन्यांचे १५ ते २० इंचांपर्यतचे मॉडेल्स तुमच्या बजेटमध्ये येऊ शकतात.