संगणक सुरक्षेच्या पहिल्या अंकात आपले स्वागत आहे. जगभरात संगणक क्षेत्रात घडण्याऱ्या घटनांचा आढावा व तुमच्या संगणकाशी संबंधित बातम्यांचे विश्लेषण व तसेच आपल्या प्रश्नांची उत्तरे , असे याचे स्वरूप असेल. आम्हाला आपले प्रश्न जरूर लिहून कळवा.
आज मी आपल्या बरोबर इंटरनेट वर संगणकाचा वापर करताना घेतल्या जाणाऱ्या सुरक्षे संबंधी चर्चा करणार आहे. अर्थात या बाबी सार्वभौम आहेत. कुठल्याही देशात आणि कुठल्याही भाषेत संगणकाचा वापर करताना याच बाबींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम आपण ब्रावूजर चा विचार करू. आपला सर्वांचा आवडता ब्रावूजर म्हणजे इंटरनेट एक्सप्लोरर. हा जसा सर्वांच्या माहितीतला व जगात सर्वाधिक वापरला जाणारा ब्रावूजर आहे तसाच सर्वाधिक संगणकांना व्हायरस पोहोचवणारा ब्रावूजर म्हणून हि याची कुख्याती आहे. याला कारण म्हणजे इंटरनेट वापरताना आपल्याकडून होणारा निष्काळजीपणा. आपण यावर सविस्तर विचार करू.
आपण कोणतीही माहिती शोधताना सर्वप्रथम त्याचा गूगल वर शोध घेत असतो, आणि गूगल वर सापडलेल्या साईट मधून एखाद्या साईट वर आपण क्लिक करतो. संगणकावर व्हायरस ला आमंत्रण देण्याची ही पहिली पायरी आहे. कारण बहुतांशी साईट हे व्हायरस ने दूषित झालेले किंवा जाणून बुजून खोटी माहिती पुरवण्या साठी बनवलेले असतात. ही माहिती प्रथम ऐकताना आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला असेल. कारण गूगल वर एखाद्या साईट वर क्लिक करण्याचा आणि संगणकावर व्हायरस ओढवून घेण्याचा काही संबंध असेल हे कदाचित आपण यापूर्वी ऐकले नसेल, किंवा ऐकले असले तरी त्याची गंभीरता आपल्याला कधी जाणवली नसेल, किंवा हे सर्व माहित असून देखील याला रोकण्यासाठी काय करावे लागते याची आपल्याला कल्पना नसेल.

अशा घातक वेब साईट पासून तुमच्या कॉम्प्युटर ला वाचवण्याचा उपाय म्हणजे वेब साईट वर्गीकरण करणारी सेवा. याला इंग्रजीत साईट एडव्हायजरी टूल असे म्हणतात. या कंपन्या इंटरनेट वरील साईट चे परीक्षण करून त्यांना सुरक्षित , शंकास्पद व असुरक्षित असे वर्गीकरण करतात. या कंपन्या या वर्गीकरणाचा उपयोग करण्यासाठी ब्रावूजर प्लग इन बनवतात. इंटरनेट एक्सप्लोरर व फायरफौक्स ब्राऊजर साठी हे प्लग इन उपलब्ध असतात. या मध्ये WOT (web of trust), Mcafee साईट एडवायजर, ThreatExpert browser defender, Haute Secure वगैरे अनेक कंपन्या कार्यरत आहेत. तुम्ही यापैकी कोठलीही सेवा निवडू शकता. या मध्ये वेब ऑफ ट्रस्ट ही कंपनी, जनते कडून वेब साईट चे वर्गीकरण करण्या वर आधारलेली आहे, त्यामुळे WOT ही सर्वाधिक लोकप्रिय सेवा बनली आहे. तुम्ही (wot.com) या वेब साईट वरून तुमच्या ब्रावूजर साठी त्यांचे प्लग इन विनामूल्य डावून्लोड करू शकता.
एकदा हा प्लग इन इंस्टाल झाल्यानंतर तुम्हाला नवीन दृष्टी मिळाल्याचा अनुभव येयील. जेव्हा तुम्ही गूगल मध्ये एखादी गोष्ट शोधता तेव्हा , सर्च रिझल्ट मध्ये तुम्हाला प्रत्येक लिंक समोर लाल , पिवळे किंवा हिरवे वर्तूळ दिसून येयील. हे WOT चे वर्गीकरण आहे. लाल वर्तुळा ने चिन्हित केलेल्या लिंक पासून दूर राहा. पिवळे वर्तूळ असलेल्या लिंक बद्दल साशंकता असते, आणि हिरवे वर्तूळ असलेल्या वेब साईट ला सुरक्षीत मानले जाते. आणि जर तुम्ही चुकून एखाद्या असुरक्षित वेब साईट ला उघडण्याचा प्रयत्न केला तर ती वेब साईट उघडण्या पूर्वी तुम्हाला त्या वेब साईट बद्दल पूर्वसूचना दिली जाते. आणि हे वर्गीकरण, तुमच्या ईमेल मध्ये असलेल्या लिंक चे ही केले जाते. अर्थात जेव्हापर्यंत तुमचे कॉम्प्युटर इंटरनेट शी जोडलेले आहे तेव्हा पर्यंत WOT प्लग इन लिंक चे वर्गीकरण करीत राहते. या प्लग इन मध्ये आणखी ही काही सुविधा आहेत,