Friday, 23 September 2011

आपला मेल हॅक होवू शकतो.

कॉम्प्युकॉम्प्युटर स्लो झाल्यास रिस्टार्ट करायचे टाळाटर स्लो झाल्यास रिस्टार्ट करायचे टाळा

कॉम्प्युटर व्हायरस

कॉम्प्युटर हाताळताना अचानक व्हायरस येण्याची नेहमी शक्यता असते. हा व्हायरस कॉम्प्यूटरमध्ये सुरक्षित केलेल्या फाइल्स करप्ट करतो. त्यामुळे आपल्या कॉम्प्युटरला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
एखादा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी कॉम्प्युटरवर प्रोग्राम बनविलेला असतो. यामध्ये जावा, सी लँग्वेज, एक्सेल, डॉट नेट इत्यादी प्रोग्राम्स असतात. या प्रोग्राममध्ये सूचनांचा संच असतो. ( उदाहरणार्थ दुकानदाराचे बिल बुक छापणे, ग्रीटींग कार्ड इत्यादी.) अशा प्रकारच्या प्रोग्राममध्ये काही जण व्हायरस सोडतात.
व्हायरस सोडणार्‍या लोकांना कॉम्प्युटरची सखोल माहिती असते. त्यामुळे आपल्याला कोणत्या प्रोग्रामवर हल्ला करायचा हे लोकांना निश्चित करता येते. व्हायरसमुळे तयार असलेल्या फाइल्स एकापाठोपाठ नष्ट होऊ लागतात.
व्हायरसचे प्रकारव्हायरसचा पहिला प्रकार म्हणजे 'कम्पॅनियन व्हायरस'. हा व्हायरस चांगल्या प्रोग्रामला खराब करत नाही. त्यामुळे प्रोग्राम सुरक्षित राहतो. परंतु, दुसरा व्हायरस एखाद्या चांगल्या प्रोग्राममध्ये बिघाड करतो. उदा. आपण 'विंडोज' मध्ये एखाद्या प्रोग्रॅमच्या नावावर किंवा आयकॉनवर डबल क्लिक केलं तर आपल्याला हवा असणारा मूळ प्रोग्रॅम सुरू होण्याऐवजी हा व्हायरसचा प्रोग्रॅमच नकळत सुरू होतो आणि त्याचा कार्यभाग उरकून मूळ प्रोग्रॅमकडे पुन्हा सूत्र देऊन टाकतो.
व्हायरसचा दुसरा प्रकार म्हणजे 'एक्झिक्युटेबल प्रोग्रॅम व्हायरस'. हा व्हायरस प्रोग्रामला सर्वात जास्त धोकादायक असतो. तो आपल्या कॉम्प्युटरच्या डिस्कवरील सर्व 'डिरेक्टरीज' सलग वाचत राहतो. प्रत्येक डिरेक्टरीत त्याला जी एक्झिक्युटेबल (म्हणजे आपण तिच्या नावावर डबल क्लिक केलं की तिचं काम सुरू होतं अशी ) फाइल दिसेल अशा प्रत्येक फाइलमध्ये प्रवेश करण्याचं तो मुख्य काम करतो. हा व्हायरस मूळ एक्झिक्युटेबल फाइल पूर्णपणे नष्ट करून टकातो.
तिसर्‍या प्रकारचा व्हायरस म्हणजे 'मेमरी रेसिडेंट व्हायरस'. या व्हायरसने एकदा आपल्या कॉम्प्यूटरमध्ये प्रवेश केल्यास तो नेहमी जागृतावस्थेत असतो म्हणून त्याला 'मेमरी रेसिडेंट' व्हायरस असे म्हणतात. पहिल्या दोन प्रकारातील व्हायरस डिस्कवरच्या फाइल्स आणि प्रोग्रॅम्सवर हल्ला करत असतो. जेव्हा आपण त्या फाइल्स उघडायला जाऊ तेव्हा तो व्हायरस जागृत होऊन आपलं काम साधतो.
पण 'मेमरी रेसिडंट व्हायरस' मात्र सदैव आपल्या कृतींचा कानोसा घेऊन त्यांच्यापैकी काहींचा स्वत: कडे ताबा घेतो. उदा. आपल्या की बोर्डवरची कळ दाबली की अक्षर पडद्यावर उमटायला पाहिजे पण की कीबोर्डशी संबंधित 'मेमरी रेसिडेंट व्हायरस' आपल्या कॉम्प्युटरमध्ये घुसला तर तो कीबोर्डचं नियंत्रण स्वत: कडे घेतो आणि ते अक्षर पडद्यावर उमटण्याऐवजी दुसरचं काहीतरी करेल.


......


कम्प्युटर व्हायरसचं काम चालतं कसं?

व्हायरस लिहिणा - या लोकांना कम्प्युटर कसा चालतो याची बरीच सखोल माहिती असावी लागते . कारण त्यातूनच कम्प्युटरमधल्या कुठल्या बाबींवर हल्ला करता येईल , हे ठरवता येतं . व्हायरसचं मुख्य उद्दिष्ट हे दुस - या , आधी व्यवस्थित चालणा - या ' निष्पाप ' प्रोग्रॅमला बिघडवून त्याच्याकडून चित्रविचित्र प्रकार घडवून घेणं हे असतं
कम्प्युटरकडून अनेक प्रकारची कामं करून घेण्यासाठी प्रोग्रॅमर मंडळी जावा , सीशार्प , वगैरे भाषांमध्ये ' प्रोग्रॅम्स ' लिहीत असतात . एखादा प्रोग्रॅम म्हणजे सूचनांचा संच . सर्वसामान्यत : असे प्रोग्रॅम्स लिहिण्यामागचा मंडळींचा हेतू विधायक असतो . ( उदाहरणार्थ पगारपत्रिका तयार करणं , बिलं छापणं वगैरे .) पण तंत्रज्ञानाचा वापर विध्वंसक वृत्तीनं करणारी काही मंडळी सर्वत्र असतातच . अशी प्रोग्रॅमर मंडळी व्हायरसेसचे प्रोग्रॅम्स लिहितात .
व्हायरस लिहिणा - या लोकांना कम्प्युटर कसा चालतो याची बरीच सखोल माहिती असावी लागते . कारण त्यातूनच कम्प्युटरमधल्या कुठल्या बाबींवर हल्ला करता येईल , हे ठरवता येतं . व्हायरसचं मुख्य उद्दिष्ट हे दुस - या , आधी व्यवस्थित चालणा - या ' निष्पाप ' प्रोग्रॅमला बिघडवून त्याच्याकडून चित्रविचित्र प्रकार घडवून घेणं हे असतं . म्हणजे व्यवस्थितपणे पगारपत्रिका तयार करणारा एखादा प्रोग्रॅम अचानकपणे व्हायरसच्या हल्ल्यानंतर फाइल्स डिलिट करू लागतो , वगैरे . तर हल्लेखोर त्यासाठी आधी आपल्या कम्प्युटरवरच्या एखाद्या व्यवस्थित चालणा - या प्रोग्रॅममध्ये व्हायरसचा प्रोग्रॅम घुसवून टाकतो . हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ .
समजा आपल्या पगारपत्रिका तयार करण्याच्या प्रोग्रॅममधल्या पहिल्या तीन सूचना अशा आहेत :
पगाराविषयीची माहिती साठवलेली फाइल उघड .
प्रत्येक कर्मचा - याचं रेकॉर्ड वाच .
त्या कर्मचा - याचा एकूण पगार खालील गणितांनी ठरव , वगैरे .
यानंतर प्रत्यक्ष आकडेमोडी , पगारपत्रिका छापणं , इत्यादिसाठीच्या सूचना या प्रोग्रॅममध्ये असतील . आता समजा हल्लेखोरानं या प्रोग्रॅमचं काम बिघडवायचं ठरवलं , तर काय होईल ? तो कदाचित आपल्या मुळच्या प्रोग्रॅमच्या दुस - या सूचनेत बदल करून तिला प्रत्येक कर्मचा - याचं रेकॉर्ड वाचण्याऐवजी व्हायरस ( प्रोग्रॅम ) मधल्या सूचना आधी अंमलात आणायला सांगेल . त्या व्हायरसमधल्या लिहिलेल्या गोष्टी मग घडू लागतील . उदाहरणार्थ , डिस्कवरच्या फाइल्स उडवणं किंवा किंवा कम्प्युटरच्या पडद्यावर चित्रविचित्र आकृत्या नाचवणं वगैरे . मग हा धुडगूस घालून झाला की व्हायरस पुन्हा आपल्या मुळच्या प्रोग्रॅममधल्या मुळच्या सूचनेकडे नियंत्रण देऊन टाकेल . आणि कदाचित पगारपत्रिका व्यवस्थित छापल्या जातीलही !
आता एखादा चांगला प्रोग्रॅम व्हायरसनं बिघडवून टाकला की तो प्रोग्रॅम ई - मेलनं दुस - या अनेक कम्प्युटर्सवर पोहोचतो . कधी तो हल्लेखोरानं जाणूनबुजून फॉरवर्ड केलेला असतो . तर कधी व्हायरसच ई - मेल्सच्या माध्यमातून स्वत : ला पसरवू शकतो .
व्हायरसेसचे अनेक प्रकार असतात . त्यांच्यामधला पहिला म्हणजे ' कम्पॅनियन व्हायरस '. हा खरं म्हणजे चांगल्या प्रोग्रॅम्सना हात लावत नाही . त्यामुळे चांगल्या प्रोग्रॅम्समध्ये बिघाड होणं वगैरे प्रकार इथं घडत नाहीत . पण त्याऐवजी हा व्हायरस दुस - या एखाद्या चांगल्या प्रोग्रॅम्सच्या ठिकाणी स्वत : च आपलं घोडं दामटतो . ते कसं ? तर जेव्हा आपण ' विंडोज ' मध्ये एखाद्या प्रोग्रॅमच्या नावावर किंवा आयकॉनवर डबलक्लिक केलं तर आपल्याला हवा असणारा मूळ प्रोग्रॅम सुरू होण्याऐवजी हा व्हायरसचा प्रोग्रॅमच आपल्या नकळत सुरू होतो आणि त्याचा कार्यभाग उरकून मूळ प्रोग्रॅमकडे पुन्हा सूत्र देऊन टाकतो .
व्हायरसेसचा दुसरा प्रकार म्हणजे ' एक्झिक्युटेबल प्रोग्रॅम व्हायरस '. या प्रकारातला प्रोग्रॅम जास्त घातक असतो . तो आपल्या कम्प्युटरच्या डिस्कवरच्या सगळ्या ' डिरेक्टरीज ' एकापाठोपाठ एक वाचत सुटतो . प्रत्येक डिरेक्टरीत त्याला जी जी एक्झिक्युटेबल ( म्हणजे आपण तिच्या नावावर डबलक्लिक केलं की तिचं काम सुरू होतं अशी ) फाइल दिसेल अशा प्रत्येक फाइलमध्ये घुसणं हे त्याचं मुख्य काम असतं . हा व्हायरस चक्क मूळ एक्झिक्युटेबल फाइल पूर्णपणे पुसून त्याठिकाणी आपला प्रोग्रॅम लिहिण्यापासून तसं न करता त्याच्यामध्ये कुठूनतरी आपल्याकडे नियंत्रण मिळवणं आणि नंतर परत मूळ प्रोग्रॅमकडे सूत्र देणं असे अनेक प्रकार करू शकतो .
तिस - या प्रकारचा व्हायरस म्हणजे ' मेमरी रेसिडेंट व्हायरस '. या प्रकारचा व्हायरस हा एकदा का आपल्या कम्प्युटरमध्ये घुसला की सदैव जागृतावस्थेतच असतो म्हणून त्याला ' मेमरी रेसिडेंट ' किंवा कम्प्युटरच्या मेमरीत राहणारा व्हायरस असे म्हणतात . आधीच्या दोन प्रकारांमधले व्हायरस डिस्कवरच्या फाइल्स आणि प्रोग्रॅम्सवर हल्ला चढवत असल्यानं जेव्हा आपण त्या फाइल्स उघडायला जाऊ तेव्हा तो व्हायरस जागृत होऊन आपलं काम साधतो . पण ' मेमरी रेसिडंट व्हायरस ' मात्र सदैव आपल्या कृतींचा कानोसा घेऊन त्यांच्यापैकी काहींचा स्वत : कडेच ताबा घेतो . उदाहरणार्थ आपल्या कीबोर्डवरची की दाबली की खरं म्हणजे ते अक्षर पडद्यावर उमटलं पाहिजे . पण जर कीबोर्डशी संबंधित ' मेमरी रेसिडेंट व्हायरस ' आपल्या कम्प्युटरमध्ये घुसला तर तो कीबोर्डचं नियंत्रण स्वत : कडे घेईल आणि ते अक्षर पडद्यावर उमटण्याऐवजी भलतंच काहीतरी करेल . उदाहरणार्थ ते अक्षर पडद्यावरून खाली पडल्यासारखं घरंगळवणं वगैरे !
चौथा प्रकार म्हणजे ' बूट सेक्टर व्हायरस '. आपण जेव्हा आपला कम्प्युटर सुरू करतो तेव्हा बायॉस नावाची यंत्रणा पहिल्यांदा जागी होते . ही यंत्रणा डिस्कवरून कम्प्युटरच चालू केल्यावर ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत ( उदाहरणार्थ कीबोर्ड - माऊस जोडले आहेत की नाहीत , मेमरी ठीकठाक आहे की नाही ) त्या तपासून डिस्कवरून आपल्या कम्प्युटरची विंडोज , लिनक्स वगैरे ' ऑपरेटिंग सिस्टिम ' मेमरीत आणते . मग आपली ऑपरेटिंग सिस्टिम आपल्या कम्प्युटरचा ताबा घेऊन त्याचं काम चालवते . जेव्हा ' बूट सेक्टर ' व्हायरस आपल्या कम्प्युटरवर हल्ला करतो तेव्हा ' बायॉस ' नं ऑपरेटिंग सिस्टिमकडे नियंत्रण सोपवण्यापूर्वीच हा व्हायरस आपल्या कम्प्युटरवर कब्जा घेऊन टाकतो . मग तिथून पुढे काय करायचं हे तो व्हायरस ठरवतो !
' मॅक्रो व्हायरस ' हा मायक्रोसॉफ्ट वर्ड , एक्सेल इत्यादि प्रकारच्या फाइल्समधून पसरतो .
जी मंडळी ' अॅण्टिव्हायरस ' लिहितात त्यांचं काम डॉक्टर्ससारखं चालतं . डॉक्टर्स कसे आपल्याला होणा - या त्रासाविषयी अनेक प्रश्न विचारतात , चाचण्या करून रक्त वगैरे तपासतात . आणि या सा - यातून आपल्या शरीरात झालेल्या बिघाडामागे कोणता ठराविक ' पॅटर्न ' आहे का ते शोधतात ! तसंच प्रत्येक व्हायरसचा ' पॅटर्न ' ( त्याला त्याची ' सिग्नेचर ' म्हणतात ) असतो . ही ' सिग्नेचर ' म्हणजे चक्क ० - १ च्या भाषेतल्या व्हायरसच्या सूचना . अशा लाखो सिग्नेचर्स ओळखून त्या व्हायरसेसना दूर ठेवणं , सा - या प्रोग्रॅम्सवर बारीक लक्ष ठेवून कुठल्या प्रोग्रॅमचं काम व्हायरससारखं तर नाहीये ना हे सतत करत राहणं , ही ' अॅण्टिव्हायरस ' सॉफ्टवेअरची जबाबदारी

कॉम्प्युटर नेटवर्क….ओळख आणि माहिती

आपल्या रोजच्या जीवनात आपण ‘नेटवर्क’ हा शब्द बर्‍याचदा ऎकतो. कळत न कळत आपण कुठल्या ना कुठल्या नेटवर्क सेवेचा लाभ घेत असतो. उदा. केबल टीव्ही, बँकांचे जाळे इ. माहितीच्या नेटवर्कच्या आधारे काही नेटवर्क्‍स विकसित झाली आहेत. त्याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात माहिती मिळविण्यासाठी करतो. ज्यामध्ये इंटरनेट, रेल्वे आरक्षण, ग्रंथालय नेटवर्क व माहितीचे नेटवर्क या दळणवळणातील प्रगत तंत्रज्ञानावर आधारित सेवांचा समावेश होतो. इंटरनेट म्हणजे माहितीचे प्रचंड मोठे जाळे , बर्‍याच सारे नेटवर्क येथे एकत्रित केले असतात. पण हे नेटवर्क काय आहे ? याची सुरवात कधी , कुठे , कशी झाली ? कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय? नेटवर्कचे फायदे-तोटे काय आहेत? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नेटवर्किंगमध्ये नवीन तंत्रज्ञान कोणते आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून मिळवणार आहोत.

१९७०च्या दशकात पी.सी अर्थात पर्सनल कॉम्प्युटर अर्थात खाजगी उपयोगासाठीचा संगणक वापरायला सुरवात झाली. स्वत:च्या संगणकावर महत्वाची माहिती साठवली जाऊ लागली. एक्सेल शीटवर बिलींग करणे , शाळा अथवा कॉलेजचे निकालपत्र तयार करणे इ. कामे केली जाऊ लागली. यातूनच ही सर्व माहिती शेअर करण्याची गरज निर्माण झाली. आणि जन्म झाला ‘नेटवर्क’ या तंत्रज्ञानाचा!!! नेटवर्क म्हणजे एकाच प्रकारे काम करणारे, एकत्रित प्रणाली व पद्धतीमध्ये भाग घेणारे दोन घटक दळणवळण माध्यमाने जोडणे होय. नेटवर्कचा मुख्य उद्देश हा आहे की एका प्रकारचे काम हे नेटवर्क घटकांच्या मदतीने द्विगुणित करणे.

यू.एस. डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सने (DoD) १९६० साली स्थापन केलेले कॉम्प्युटर नेटवर्क हे पहिले नेटवर्क होय. त्यास ‘अर्‌पानेट’ म्हटले गेले. या नेटवर्कमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या संगणकांमध्ये संवाद होऊ शकतो हे सिद्ध झाले. अर्‌पानेटचे रूपांतर आज जगप्रसिद्ध इंटरनेट या महाकाय नेटवर्कच्या जाळ्यात रूपांतरित झाले आहे.

कॉम्प्युटर नेटवर्क हे किती जागेमध्ये , कसे तयार केले आहे यावरून त्याचे ३ प्रकार पडतात.

१. लोकल एरिया नेटवर्क (LAN) – हे एका छोट्या कंपनीत , शाळा / कॉलेजमध्ये किंवा घरगुती उपयोगासाठी केले जाते. यामध्ये कमीत कमी २ ते जास्तीत जास्त १०० कॉम्प्युटर जोडलेले असतात. एका मर्यादित उद्देशासाठी या प्रकारचे नेटवर्क हे अत्यंत उपयुक्त आहे. पण यामध्ये जर जागेची व्याप्त्ती किंवा जोडलेल्या कॉम्प्युटर संख्या वाढली तर नेटवर्कचा स्पीड कमी होतो. अर्थात नेटवर्कचा स्पीड हा इतरही बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असतो.

२. मेट्रोपोलिटॅन एरिया नेटवर्क (MAN) – याप्रकारचे नेटवर्क हे एखाद्या शहरापुरते , राज्यापुरते मर्यादित असते. उदा. केबल नेटवर्क

३. वाईड एरिया नेटवर्क (WAN) – हे सर्वात मोठे नेटवर्क, जे शहर, राज्य , देश यांच्या हद्दी ओलांडून जाते. यामध्ये बरेच LAN अथवा MAN एकत्र जोडलेले असतात. याचे सर्वात महत्वाचे , मोठे उदाहरण म्हणजे ‘इंटरनेट’.

नेटवर्कमध्ये communication साठी कोणते माध्यम वापरले आहे त्यावरून नेटवर्कचे वर्गीकरण केले जाते.

१. इथरनेट नेटवर्क – यामध्ये कॉपर केबल वापरून नेटवर्क केले जाते. यात इलेक्ट्रीसिटी सिग्नलच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.

२. वायरलेस नेटवर्क – यामध्ये रेडिओतरंगाच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.

३. फायबर ऑप्टिक नेटवर्क – यामध्ये फायबर ऑप्टिक केबल वापरून नेटवर्क केले जाते . यामध्ये प्रकाशलहरींच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते. या प्रकारचे माध्यम वापरून आपण सर्वात जास्त सुरक्षित , वेगवान आणि जास्तीत जास्त अंतरापर्यंत संदेशवहन करू शकतो.

नेटवर्कमध्ये communication चा वेग हा किलोबाईटस्‌ पर सेकंद (KBPS) , मेगाबाईटस्‌ (MBPS) किंवा गिगाबाईटस्‌ (GBPS) असा मोजला जातो. १००० बाईटस्‌ म्हणजे १ किलोबाईट आणि १००० किलोबाईट म्हणजे १ मेगाबाईट आणि १००० मेगाबाईट म्हणजे १ गिगाबाईट असे हे परिमाण आहे. वेगवेगळ्या प्रकारची नेटवर्क तयार करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे म्हणजे नेटवर्क डिव्हायसेस लागतात. जसे की इथरनेट केबल , नेटवर्क कार्ड , हब , स्वीच , राऊटर , गेटवेज्‌ इत्यादी. नेटवर्कचा मूळ उद्देश आहे – कम्युनिकेशन ! अर्थात दोन अथवा जास्त संगणकांमधला संवाद. हा संवाद करण्यासाठी एका विशिष्ठ प्रणालीची गरज असते. यामध्ये संवादासाठीच्या नियमांचा (प्रोटोकॉल्सचा) समावेश होतो. TCP/IP , Novell Netware , Appletalk असे बरेच प्रोटोकॉल्स वापरून दोन अथवा जास्त संगणकांमध्ये माहितीचे वहन केले जाते.

कॉम्प्युटर नेटवर्क हे कामाचा ताण विभागण्यासाठीसुध्दा उपयुक्त आहे. यामध्ये ‘क्लायंट-सर्व्हर’ हे तंत्रज्ञान वापरले जाते. या तंत्रज्ञानात सर्व माहिती (database) हा सर्व्हरवर साठवलेला असतो. क्लायंट त्याच्या गरजेनुसार हा माहितीचा साठा वापरू शकतो. तसेच सर्व्हरला प्रिंटर जोडलेला असेल तर क्लायंट त्या प्रिंटरवरून प्रिंटस्‌ काढू शकतो. यासाठी ‘क्लायंट-सर्व्हर’ तंत्रज्ञानात बरीच सेटींग्ज करावी लागतात. कोणाही अनाहूत कॉम्प्युटरद्वारे सर्व्हरला कनेक्ट करून त्यावरील माहितीचा दुरूपयोग करू नये म्हणून त्याला वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा (security) द्यावी लागते.

ता.क- माझा हा लेख ’डेटाकॉम’ या कॉम्प्युटर आणि तंत्रज्ञान विषयक मॅगझिनमध्ये प्रकाशित झाला आहे.

नेटवर्किंग डिव्हायसेस

नेटवर्कचे प्रकार कोणते ते आपण मागच्या लेखात पाहिले.

LAN , MAN , WAN हे प्रकार नेटवर्क किती जागेमध्ये तयार केले आहे त्यावरून आले आहेत. नेटवर्कमध्ये संदेशवहनासाठी कोणते माध्यम वापरले आहे त्यावरून नेटवर्कचे वर्गीकरण केले जाते.

१. इथरनेट नेटवर्क - यामध्ये कॉपर केबल वापरून नेटवर्क केले जाते. यात इलेक्ट्रीसिटी सिग्नलच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.

२. वायरलेस नेटवर्क - यामध्ये रेडिओतरंगाच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.

३. फायबर ऑप्टिक नेटवर्क - यामध्ये फायबर ऑप्टिक केबल वापरून नेटवर्क केले जाते . यामध्ये प्रकाशलहरींच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.

कोणत्याही ठिकाणी नेटवर्क तयार करण्यासाठी गरज असते ती वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांची ज्याला नेटवर्किंग डिव्हायसेस असे म्हंटले जाते. नेटवर्किंग डिव्हायसेस कोणती , त्यांचे प्रकार , उपयोग यांची माहिती या लेखातून आपण घेणार आहोत.

१. नेटवर्क कार्ड - आपला संगणक नेटवर्कला जोडण्यासाठी याचा उपयोग होतो. यालाच LAN card , LAN adapter अशी वेगवेगळी नावे आहेत . नेटवर्क कार्ड वेगवेगळ्या प्रकारची असतात जसे की ‘इथरनेट’ LAN कार्ड , वायरलेस LAN कार्ड , फायबर ऑप्टिक कार्ड इ.आपण कोणत्या प्रकारचे माध्यम वापरणार आहोत त्यावर कोणते कार्ड वापरायचे हे अवलंबून आहे.

२. नेटवर्क केबल - कॉपर केबल आणि फायबर ऑप्टिक केबल हे यात मुख्य प्रकार असून कॉपर केबलच्या जाडीवरून UTP , STP, co-axial असे वेगवेगळे उपप्रकार आहेत. यापैकी UTP या प्रकारची cat 5 किंवा cat 6 ही केबल इथरनेट LAN मध्ये वापरली जाते.

३. रीपीटर - कॉपर केबल वापरून जेव्हा संदेशवहन केले जाते तेव्हा त्यामध्ये असणार्‍या resistance मुळे हा संदेश विशिष्ट अंतर पार करून गेल्यावर कमजोर होतो व त्यामुळे destination ला संदेश योग्य रितीने मिळत नाही. त्यासाठी रीपीटर हे उपकरण सिग्नलची stength वाढवायला मदत करते.

४. हब ,ब्रिज - दोनपेक्षा जास्त संगणक जोडण्यासाठी पूर्वी हे उपकरण वापरले जायचे. पण यामार्फत होणार्‍या संदेशवहनाचा वेग खूपच कमी म्हणजे ४ ते १६ Mbps इतका असतो.

५. स्वीच -दोनपेक्षा जास्त संगणक जोडण्यासाठी हे उपकरण सध्या वापरतात. यामध्ये ८ पोर्ट, १६ पोर्ट , १२० पोर्ट असे बरेच प्रकार आहेत.यामुळे आपल्याला १०० ते १००० Mbps इतका वेग संदेशवनासाठी मिळू शकतो. तसेच Configurable switch वापरून आपण Virtual LAN तयार करू शकतो.

६. राऊटर - दोन किंवा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या नेटवर्कमध्ये संदेशवहन करण्यासाठी राऊटर वापरणे गरजेचे आहे. सिस्को, ज्युनिपर, सॅमसंग यासारख्या कंपन्या राऊटर तयार करतात.

७. अ‍ॅक्सेस पॉइंट - इथरनेट नेटवर्क आणि वायरलेस नेटवर्क यांना एकत्र जोडण्यासाठी हे उपकरण वापरतात.

कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची नेटवर्किंग डिव्हायसेस वापरावी लागतील हे आपण कोणत्या प्रकारचे नेटवर्क तयार करणार आहोत यावर अवलंबून आहे. उदा. जर आपल्याला ‘इथरनेट’ या प्रकारचे LAN तयार करायचे असेल तर UTP या प्रकारची केबल , ‘इथरनेट’ LAN कार्ड , स्वीच असे डिव्हायसेस वापरावे लागतात , तर ‘वायरलेस’ या प्रकारचे LAN तयार करण्यासाठी वायरलेस LAN कार्ड , अ‍ॅक्सेस पॉईंट असे डिव्हायसेस वापरावे लागतात . थोडक्यात आपल्या गरजेनुसार कोणत्या प्रकारचे LAN तयार करायचे आहे ते ठरवून प्रथम त्याचा ले-आऊट काढून घ्यावा लागतो. नंतर डिव्हायसेसच्या गरजेनुसार त्यांची जागा ठरवून घ्यावी लागते. आणि नंतर LAN चा सेटअप तयार करावा लागतो.


बिल गेटस्चे असेही रेकॉर्ड !

बोस्टन: मायक्रोसॉप्ट कंपनीचे संस्थापक बिल गेटस् यांनी अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत यादीत पुन्हा एकदा पहिले स्थान मिळविले असून त्यांनी सलग १७ वर्षे आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. गेटस यांच्याकडे ५४ बिलियन अमेरिकन डॉलरची संपत्ती आहे. फोब्र्सने नुकतीच अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत ४०० लोकांची यादी जाहीर केली. त्यानुसार गेटस् प्रथम तर उद्योगपती बर्कशायर हाथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॅरेन बॉफेट यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्यांच्याकडे ४५ बिलियन अमेरिकन डॉलरची संपत्ती आहे. तिस-या क्रमांकावर सॉप्टवेअर कंपनी ओरॅकलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी इलिसन यांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे. याशिवाय या यादीत फेसबुकचा मालक मार्क जुकेरबर्ग ३५ व्या स्थानावर आहे. त्याच्याकडे सुमारे ७ बिलियन अमेरिकन डॉलरची संपत्ती आहे. अ‍ॅपलचे मालक स्टीव जॉब्स ४२ व्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे ६.१ बिलियन डॉलरची संपत्ती आहे. मीडिया बादशाह ऑरफा विनफ्रे १३०व्या स्थानावर आहे.त्यांच्याकडे २.७ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.

आपल्या कॉम्पुटर मधील मजकूर सुरशित आहे का?

जर नाही तर हे छान से सॉफ्टवेअर आपल्या ला अतिशय उपयुक्त आहे..कारण हे "फोल्डर लॉक" सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअर च्या मदतीने आपण आपल्या कॉम्पुटर मधील फोल्डरला पासवर्ड देता येईल..आणि आपला महत्वाची माहिती सुरशित ठेऊ शकाल.हे सॉफ्टवेअर खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करून घ्या.
१) डाऊनलोड झाल्यावर त्यावर दोनदा क्लिक करा इनस्टॉलेशन चालू होईल.
२)आता तुमचा पासवर्ड सेट करा.वोके करा.
३) आता तुम्हाला जो फोल्डर पासवर्ड देऊन लॉक करायचा आहे.त्या फोल्डरवर उजवी क्किक करा त्यात तुम्हाला लॉक फोल्डर हा पर्याय दिसेल त्यावर क्किक करून आधी निवडलेला पासवर्ड टाका..आणि आपण बघाल आपला फोल्डर लॉक झाला आहे..आता कोणीही ही त्या फोल्डर ला क्लिक केले तर ते पासवर्ड मागेलआणि पासवर्ड तुम्हालाच माहित असेल.

आपल्या कॉम्पुटर मधील मजकूर सुरशित आहे का?



सिस्टम फाइल चेकर /दुरुस्ती - विंडोज विस्टा

सिस्टम फाइल चेकर ही विन्डोज़ मध्ये एक सुविधा आहे. जर काही कारणाने विन्डोज़ च्या फाईली मध्ये काही बिघाड झाला असेल तर यायोगे तुम्ही त्याला दुरुस्त करू शकता. याची आवश्यकता तुम्हाला तेव्हा पडू शकते जेव्हा एखाद्या वाइरस मुळे कॉम्पुटर चे कामकाज अनपेक्षित रित्या थांबू लागते . यासाठी खालील प्रमाणे क्लिक करा.
Start > All Programs > Accessories > Command prompt
कमांड प्रोम्पट वर राईट क्लिक करा आणि "Run as administrator" निवडा .
कमांड विंडो नावाची काळ्या रंगाची विंडो उघडेल. त्यामध्ये खालील प्रमाणे टाईप करा.
sfc /scannow
आणि एन्टर चे बटन दाबा. जर तुम्हाला विन्डोची डीवीडी मागितल्यास ती ड्राईव मध्ये टाका. आणि स्कॅन पूर्ण होई पर्यंत वाट बघा.


स्टायलिश फॉंन्ट्स


http://www.dafont.com/

या साईटवरुन हजारो स्टायलीश फॉंन्ट्स मोफत डाऊनलोड करता येतात.

दाफॉंन्ट्समध्ये हजारो विविध फॉंन्ट्स निवडता येतात. मुख्य म्हणजे विविध प्रकारच्या गटांमध्ये हे फॉंन्ट्स विभागले आहेत. त्यामुळे आपल्या आवडीची फॉंन्ट स्टाईल शोधणे सोपे जाते.

वैयक्तिच तसेच व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या वापरासाठी खुले असणारे भरपुर फॉंन्ट्स येथे उपलब्ध आहेत.

फॉंन्ट्सच्या सोबत येथे अनेक प्रकारचे चित्रे मोफत डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. या चित्रांच्या सहाय्याने लोगो डिजाईन करणे अतिशय सोपे आहे.

युजर्स म्हणजे ही साईट वापरणारे तुन्ही-आम्ही देखील आपले फॉंन्ट्स येथे अपलोड करु शकतो.

आपले नाव किंवा इतर मजकूर तो दिलेल्या सर्व फॉंन्ट्समध्ये कसा दिसतो ते पाहण्याची देखील येथे सोय आहे. त्यामुळे फॉंन्ट डाऊनलोड करण्याआची कसा दिसतो ते पहता येईल.


’डिलिट न होणारा’ फोल्डर

आपण कॉम्पुटर वापरतो म्हणजे फाईल कुठे ना कुठे सेव्ह करुन ठेवतोच. मग फोल्डर तयार करणं आणि त्यात फाईल सेव्ह करणं हे आपल्याला नेहमीचं झालेलं असंत. पण कॉम्पुटर जेवढा सोपा तेवढा त्यातील धोकाही जास्त असतो. चुकून व्हायरस शिरला आणि नेमका आपल्या कामाचाच फ़ोल्डर डिलीट झाला तर मोठा पस्तावा येतो. पण आता पस्तावा करत बसायची काही गरज नाही. कारण आपण बनवू शकतो ’डिलिट न होणारा’ फोल्डर.
जर आपला कॉम्पुटर एकापेक्षा जास्त जण वापरत असतील, तर कधी कधी दुसऱ्याच्या चुकीनं किंवा नकळत आपला फोल्डर डिलीट होतो. ही नकळत झालेली चुक आपल्याला महागात पडू शकते. आपण विंडोजम्ध्ये चुकून डिलीट न होऊ शकणारे फोल्डर तयार करु शकतो. या मध्ये आपल्या मह्त्त्वाच्या फाईल ठेऊ सुरक्षित ठेऊ शकातो.


प्रोसेस:-->

* असा फोल्डर तयार करतांना तो श्क्यतो प्रोग्राम फाईल्स असलेल्या ड्राईव्हवर करावा.

* यानंतर कमांड प्रॉम्ट ओपन करावा. यासाठी ’रन’ मध्ये ’cmd’ टाईप करुन कमांड ओपन करता येतो.

* यामध्ये आता cals<folder name>e/c/d/%username% ही कमांड द्यावी. या कमांडमुळे आपण निवडलेला फोल्डर हा कुणीही डिलीट करु शकत नही.

* तसंच, आपल्या लॉग इन अकाऊंटशिवाय इतर अकाऊंटवरुन लॉग इन केलेल्यांना हा फोल्डर बघताही येणार नाही. जर हा कुणी बघायचा प्रयत्न केलाच, तर त्याला परवानगी नाकारण्याचा मेसेज दाखवला जाईल.

* आता जेव्हा आपल्यालाच हा फोल्डर पुन्हा वापरायचा झाल्यास पुन्हा मघाची कमांड टाईप कारुन त्याच्या शेवटी :f’ लवून एंटर करावं. यामुळे हा फोल्डर पुन्हा पुर्वीसारखा वापरता येऊ शकतो.

* याशिवाय, आणखी एका मार्गानेही आपण हे करु शाकतो. यासाठी मघासारखे कमांड प्रॉम्ट ओपन करायचं. त्यामध्ये आपल्याला ज्या जागेवर हा फोल्डर तयार करायचा आहे, त्याचा पाथ टाईप करायाचा.

* त्यानंतर तिथे md\Aux\ ही कमांड टाईप करायची, की झाला आपला फोल्डर तयार. हा फोल्डर डिलीट करण्यासाठी rd\Aux\ ही कमांड टाईप करायची.

एकदा करुन तर बघा!