वयाच्या अवघ्या १९-२० व्या वषीर् सोनी आणि आयफोनसारख्या मोठमोठ्या कंपन्यांच्या नाकी नऊ आणणारा हा हॅकर आहे जॉर्ज हॉट्झ. यावषीर् ९ मेपासून फेसबुकमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कामाला आहे. एवढंच नाही, तर अगदी दोन-तीन महिन्यांपूवीर् हॅकिंगमध्ये धन्यता मानणारा जॉर्ज फेसबुकमध्ये चांगलाच रुळलाय. त्यानं नुकतंच फेसबुकवर आपलं स्टेटस टाकलं, 'काम करण्यासाठी फेसबुक ही खरंच एक उत्तम जागा आहे. आता हॅकिंगची पहिली मोहीम तरी संपली आहे.
हॉट्झने २००८ मध्ये आयफोनचं सॉफ्टवेअर हॅक करण्यात यश मिळवलं. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर आयफोन अनलॉक कसा करायचा, हे त्याने बिनदिक्कत ब्लॉगवर टाकलं. पण त्याचं या क्षेत्रातलं सगळ्यात मोठं 'यश' म्हणजे त्यानं या वर्षाच्या सुरुवातीलाच सोनीचा पीएस-३ साठीचा गुप्त 'सायनिंग इन' नंबर शोधून या बड्या कंपनीला तेवढाच मोठा धक्का दिला. हा नंबरही त्यानं सर्वांसाठी खुला केला.
अशाप्रकारे सिक्युरिटी कोड सर्वांसाठी खुला करणं हे कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन आणि कम्प्युटर फ्रॉड मानला जातो. याबाबत सोनीनं थेट कोर्टात केस दाखल केली. सोनीनं ही बाब इतक्या गंभीरपणे घेण्याला कारणही तसंच गंभीर होतं. हॉट्झने हॅक केलेल्या सिक्रेट कोड्सपैकी एक नंबर हा सगळ्या प्लेस्टेशन गेम्सचा की नंबर होता. या नंबरवरून त्या गेमची पात्रता आणि वैधता ठरते. त्यामुळे हा नंबर इतरांच्या हातात पडल्यास प्लेस्टेशनमधील गेम्सची पायरसी करणं खूपच सोप्प झालं. प्लेस्टेशन-३ गेले काही वर्षं कोणीच हॅक करू शकलं नव्हतं. पण गेल्या महिन्यात फेलओव्हरफ्लो नावाच्या एका हॅकिंग ग्रुपने, हॉट्सने लीक केलेल्या नंबरच्या आधारे प्लेस्टेशन-३ हॅक केलं. त्यांनी ही माहिती केऑस कम्युनिकेशन काँग्रेस या इंटरनॅशनल हॅकर्सच्या वाषिर्क बैठकीत बलिर्नमध्ये सादर केली. त्याचवेळी हॉट्झने यातला आपला सहभागही मान्य केला होता.
त्यानंतर मात्र सोनीने या ग्रुपमधील १०० जणांवर खटला दाखल केला. हॉट्झचाही यात समावेश होणं स्वाभाविक होतंच. त्यानंतर फेलओव्हरफ्लो ही साइट कायमची बंद झाली. पण या साइटतफेर् 'व्हिडिओगेम पायरसीला आम्ही कधीच पाठिंबा दिला नाही आणि देणारही नाही,' असं एक निवेदन सादर केलं गेलं.
आता मात्र या सगळ्या अध्यायातला मास्टरमाइंड जॉर्ज हॉट्झ हॅकिंगला तात्पुरता का होईना, अलविदा करून फेसबुकसारख्या क्रिएटिव्ह कंपनीत दाखल झाला आहे. त्यामुळे सोनी आणि आयफोनसारख्या मोठ्या कंपन्यांनी नक्कीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.
Facebook URL : http://www.facebook.com/pages/George-Hotz/21554945102