Thursday, 3 May 2012

सोशल नेटवर्किंग म्हणजे काय?


आपण फेसबुक, ऑर्कुट आणि ट्विटर ही नावे ऐकली असतील आणि त्याच सोबत या सोशल नेटवर्किंग वेबसाइट आहेत हे देखिल आपण ऐकले असेलच.
या वेबसाइट मोफत सेवा देणार्‍या वेबसाइट आहेत. प्रत्येकाला आपापले मत मांडण्याचा आणि प्रत्येकाला इंटरनेटवर आपली स्वतंत्र ओळख करुन देणार्‍या या वेबसाइट आहेत. या वेबसाइटवर आपण आपले मोफत खाते उघडू शकतो. महत्त्वाचे म्हणजे हे खाते उघडण्यासाठी आपल्याला ठराविक एखाद्या म्हणजे जी-मेल अथवा याहूचाच ई-मेल असणे आवश्यक नाही. आपण आपल्या कोणत्याही ई-मेलच्या सहय्याने या वेबसाईटवर आपले खाते उघडू शकता.
जुने मित्र-मैत्रिणी शोधणे, तसेच नविन ओळखी वाढविणे, व्यक्तीनुसार त्यांचा समुह ( communities ) तयार करणे, ग्रिटींग पाठविणे, वाढदिवस लक्षात ठेवणे, आवडीनुसार त्यांना बातम्या/माहिती देणे, नविन असलेल्या गोष्टींची मोबाईलवर माहिती सांगणे, नोकरी शोधण्यासाठी मदत करणे इ.इ. सेवा या वेबसाइट पुरवितात.

सोशल नेटवर्किंग म्हणजे अशा वेबसाइट ज्यांचा मुख्य उद्देश आपले नाव प्रसिद्ध करण्याचा नसून आपल्या सभासदांना त्यांना हवे ते करण्याची मुभा देणे हा असतो.

सध्याच्या युगामध्ये आपल्या प्रत्येक ओळखीच्या माणसाबरोबर संपर्कात राहणे शक्य नाही अशा परीस्थितीत या जगातून कुठूनही सर्वांशी संपर्कात राहून सर्व गोष्टी लक्षात ठेवून चालू घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी सोशल नेटवर्किंग वेबसाइट फार उपयोगी आहेत. कारण इथे प्रत्येकाला भरपुर वेळ न देता फक्त ' कसे आहात ? ' हा प्रश्न देखिल पुरेसा असतो. जेणेकरुन आम्हाला तुम्ही लक्षात आहात हे दुसर्‍याला सांगता येते. तसेच वेळ असेल तेव्हा ऑनलाईन असलेल्या व्यक्तीशी थेट चॅटींगची देखिल सोय या सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर असल्याने कुणाची आठवण आल्यास अथवा कुणाला काहिही सांगायचे असल्यास तो जरी ऑनलाईन नसला तरी त्याच्यासाठी निरोप ठेवण्याची सोय इथे असते, मग जेव्हा ती व्यक्ती आपले खाते उघडून पाहिले तेव्हा तीला आपला निरोप न चुकता मिळतोच. त्याचसोबत महत्वाच्या घटना लक्षात ठेवणे. जसे एखाद्याचा वाढदिवस, एखादा कार्यक्रम इ. या गोष्टी देखिल वेळोवेळी आठवण करुन दिल्या जातात. जेणे करुन काहिही विसरण्याचा प्रश्नच येत नाही.

काही सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर आपल्या मित्रांसोबत ऑनलाईन गेम्स खेळण्याची देखिल सोय असते. या व अशा कितीतरी गोष्टी सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर उपलब्ध असल्याने सोशल नेटवर्किंगच्या मोहातून बाहेर पडणे कठीण होते.

मोबाईलसाठी मोफत रिंगटोन्स, थिम्स आणि गेम्स कुठे मिळतील?


मोबाईलसाठी मोफत रिंगटोन्स, थिम्स आणि गेम्स डाऊनलोड करण्यासाठी सध्या इंटरनेटवर बरीच संकेतस्थळे उपलब्ध आहेत. अशाच काही मोजक्या संकेतस्थळांची यादी इथे दिली आहे.

१.झेडएज.कॉम:www.zedge.net
२.फ्रिहिंदीटोन्स.कॉम:www.freehinditones.com
३.धिंगाणा.कॉम:www.dhingana.com/music/marathi-songs-movie-videos
४.रेडिफ.कॉम:in.rediff.com/mobile
५.मोबाईल९.कॉम:www.mobile9.com
६.मोबाईल२४.कॉम:www.mobiles24.com

मराठी अथवा हिंदी गाणी कुठे मिळातील?


मराठी आणि हिंदी गाणी डाऊनलोड करण्यासाठी सध्या इंटरनेटवर बरीच संकेतस्थळे उपलब्ध आहेत. अशाच काही मोजक्या संकेतस्थळांची यादी इथे दिली आहे. आपण जर गूगल.कॉमवर ' Free Latest Hindi Marathi Songs ' असे शोधल्यास आपणास बरीच संकेतस्थळे सापडतील.

१.स्किलसाँग.कॉम:www.skillsongs.com
२.म्युझिकदुनिया.कॉम:www.musicduniya.com
३.एम्पीथ्रीहंगामा.कॉम:www.mp3hungama.com
४.म्युझिकमाझा.कॉम:www.musicmaza.com
५.डाऊनलोडहिंदीसाँग्सफ्री.कॉम:www.downloadhindisongsfree.com
६.मस्तीफॉरइंडिया.कॉम:www.masti4india.com
७.डाऊनलोडमिंग.कॉम:www.downloadming.com
८.हंगामा.कॉम:www.hungama.com
९.साँग्समस्ती.कॉम:www.songsmastee.com
१०.बॉलीकिंग्स.कॉम:www.bollykings.com

चांगले सॉफ्टवेअर कुठे सापडतील?

प्रत्येक सॉफ्टवेअर बनविणारी कंपनी आपल्या सॉफ्टवेअरची जाहिरात त्यांच्या संकेतस्थळावर करीत असतात. त्याच सोबत इंटरनेटवर इतर काही संकेतस्थळावर आपल्या सॉफ्टवेअरची माहिती देवून आपल्या सॉफ्टवेअरची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो

.
इंटरनेटवर अशीच काही संकेतस्थळे आहेत ज्यावर नवनविन निर्माण होणार्‍या सॉफ्टवेअरची माहिती दिली जाते. अशा संकेतस्थळांची यादी खाली दिली आहे
.

१.डाऊनलोड.कॉम:www.download.com
२.फाईलहिप्पो.कॉम:www.filehippo.com
३.ब्रदरसॉफ्ट.कॉम:www.brothersoft.com
४.सॉफ्टअहेड.कॉम:www.softahead.com
५.सॉफ्टपेडिया.कॉम:www.softpedia.com


वरील संकेतस्थळे चांगल्या दर्जाची असून दररोज या संकेतस्थळांवरुन लाखोंच्या प्रमाणात निरनिराळ्या सॉफ्टवेअर्सना डाऊनलोड केले जाते.


एखादे सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना त्या सॉफ्टवेअरबद्दलच्या खाली दिलेल्या गोष्टी निट तपासून पहाव्यात.
१.सॉफ्टवेअर मोफत (Free) आहे का? काही काळासाठी (Trial Version) आहे का? विकत (Paid) आहे का?  त्यातील फक्त काही मर्यादीत (Shareware) गोष्टी चालतात का?


.सॉफ्टवेअर कधी बनविलेले आहे. कारण नजिकच्या काळामध्ये बनविलेले सॉफ्टवेअर नक्किच चांगले, सर्व ऑपरेटींग सिस्टमला सहाय्य करणारे आणि विविध चांगल्या गोष्टी समाविष्ट असलेले असते.

.सॉफ्टवेअर विंडोजच्या सर्व व्हर्जनवर चालणारे आहे का? म्हणजेच Windows XP, Vista, 7  वर चालेल का?  कारण एखाद्या वेळेस आपण तेच सॉफ्टवेअर निराळ्या ऑपरेटींग सिस्टमवर टाकल्यास तेथे ते चांगल्याप्रकारे चालावे.


.सॉफ्टवेअर बद्दलच्या इतरांच्या प्रतिक्रिया वाचाव्यात. जेणेकरुन ते सॉफ्टवेअर वापरल्यानंतर आपणास कोणत्याही प्रकारची अडचण होवू नये. इतरांच्या प्रतिक्रिया बर्‍याच वेळेस आपल्या उपयोगाच्या असू शकतात.

टीप :  कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यापूर्वी ते सॉफ्टवेअरची संपूर्ण माहिती वाचून घ्यावी.