Tuesday, 20 March 2012

फोटो मध्ये स्टायलिश फोन्ट टाका सोप्या प्रकारे कसे ते पहा

१. http://www.tagsmaker.com/ या वेबसाईट वर जावा

२. तुम्हाला हवा असेल फोटो अपलोड करा

३. तुम्हाला हवे असलेले text टाका (जे text तुम्हाला फोटो वर हवे आहे )

४. तुम्हाला हवा असलेला फोन्ट सेलेक्त करा

५. तुम्हाला फोन्ट चा हवा असलेला colour सेलेक्त करा

६. फोन्ट ची साईज सेलेकट करा

७. तो text कुठे असावा याची position ठरवा

८. submit वर क्लिक करा .

 

इंटरनेटचा वेग (Speed) वाढवा!



आपण वापरत असलेल्या इंटरनेटचा वेग (Speed) वाढविण्यासाठी आपल्या कॉम्प्युटरमध्येच सोय केलेली असते. प्रत्यक्षात इंटरनेटचा वेग हा आहे तेवढाच असतो, पण आपल्या कॉम्प्युटरमधिल विंडोजमध्येच एका जागी तो वेग थोडासा कमी केलेला असतो. याच जागी जर आपण वेग थोडासा कमी करण्याची कमांड बदलून व्यवस्थित दिल्यास थोड्याप्रमाणामध्ये इंटरनेटचा वेग वाढू शकतो.

खाली दिल्याप्रमाणे जर आपण बदल केल्यास आपण वापरत असलेल्या इंटरनेटचा वेग थोड्याप्रमाणामध्ये वेग वाढू शकतो.


१) ''स्टार्ट' बटणावरील ' रन (Run...) ' या विभागावर क्लिक करा आणि त्याजागेमध्ये gpedit.msc टाईप करुन 'OK' बटणावर क्लिक करा.


२) आता आपल्यासमोर "Group Policy" नावाचा प्रोग्रॅम सुरु होईल.


३) या "Group Policy" प्रोग्रॅमच्या डाव्या बाजूच्या जागेतील Local Computer Policy मधिल Computer Configuration मधिल Administrative Templates मधिल Network मधिल QoS Packet Scheduler वर क्लिक करा.


४) आता उजव्या बाजूच्या जागेतील " limit reservable bandwidth " वर डबल क्लिक करा.


५) आता आपल्यासमोर limit reservable bandwidth Properties चा चौकोन उघडेल. त्यातील ' Enabled ' वर क्लिक करुन खालील जागेतील Bandwidth limit % समोरील संख्या बदलून त्याजागी शून्य (०) ही संख्या टाईप करा आणि 'OK' बटणावर क्लिक करा.

६) आता पाहा पुढल्या वेळेसे इंटरनेट वापरताना थोडाफार फरक जाणवतो का?