Tuesday, 17 January 2012

वर्ल्ड वाईड वेब

(WWW) ला वेब असेही म्हणतात. सन १९९० मध्ये टीम बर्नर्स ली यांनी (www) वेब तयार केले. सन १९९० मध्ये टीम बर्नर्स ली आणि रॉबर्ट कॅलो यांनी (CERN) येथे वेब ही संकल्पना विकसित केली. इंटरनेट म्हणजे केबल किंवा केबलरहित जोडणीने तयार झालेले. संगणकाचे जाळे होय. तर या जोडणीच्या मदतीने वर्ल्ड वाईड वेब ही सेवा पुरविली जाते. वेब मुळेच इंटरनेट हे प्रसिध्दीस आले.
इंटरनेटवरील माहिती ही वापरकर्त्यांना योग्य पध्दतीने उपलब्ध व्हावी आणि हाताळता यावी यासाठी HTML या संगणकीय भाषेचा उपयोग करण्यात आला. HTML या संगणकीय भाषेमुळे वेब पेजेस तयार करुन त्यामध्ये कमीत कमी आकाराच्या फाईल्सच्या माध्यमातुन अधिकाधिक मजकुर, आकृत्या, चलतचित्रे वापरकर्त्यांना देता येऊ लागले. किंवा उपलब्ध करुन देता आले. त्याचप्रमाणे एका वेब पेजवरील माहिती हे दुसर्या वेवपेजवरील माहितीशी जोडली जाते त्यालाचा हायपरलिंक असे म्हणतात.
१) वेब पेज- www साठी तयार केलेली डॉक्युमेंट्स म्हणजेच वेबपेजेस होय. वेबपेजेसमध्ये मजकुर, प्रतिमा, ध्वनी, चलतचित्रे समाविष्ट असतात.
२) डोमेन नेम-
आज बेबसाईटच्या क्षेत्राप्रमाणे पूढीलप्रमाणे डोमेन नेम वापरले जातात. (त्यात संस्थेवर आधारित)
१) .com- Commercial - व्यापारी संघटना
२) .net- Network - नेटवर्क संघटना
३) .gov- Government - सरकारी संघटना
४) .edu- Education - शैक्षणिक संघटना
५) .mil- Military - सैनिक संघटना
६) .org- Organization - सेवाभावी संघटना
७) .int- International - आंतरराष्ट्रीय संघटना
भौगोलिक स्थान किंवा राज्य यावर आधारित
.in- India
.au- Australia
.us- United States
.uk- United Kingdom
.cn- China
.jp- Japan
.ca- Canada
.np- Nepal
हे डोमेन नेम वेबसाईटच्या मालकाला विकत घ्यावे लागतात. त्यानुसार इंटरनेटवर नाव रजिस्टर केले जाते. डोमेन नेम हे सर्वसाधारण १ ते १० वर्षाच्या कालावधी पर्यंत विकत घेता येऊ शकतात.
३) प्रोटोकॉल- प्रोटोकॉल हे इंटरनेटवरील माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी असलेल्या नियमांचा संच आहे. जेव्हा नेटवर्कमधील दोन किंवा अधिक संगणक माहितीची देवाण-घेवाण करतात. तेव्हा त्या संगणकाच्या जोडणीसंबधी माहितीचे संप्रेषण घडवुन आणण्यासाठी जो नियमांचा संच असतो त्यालाच प्रोटोकॉल म्हणतात. आज TCP/IP हे दोन उच्च प्रोटोकॉल वापरले जातात.
४) URL- URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर्स. इंटरनेटवर अनेक विषयाच्या माहितीची असंख्य वेबपेजेस साठवलेली असतात त्या प्रत्येक वेबपेजला एकमेव (युनिक) पत्ता असतो त्यालाच URL म्हणतात. थोडक्यात URL हा वेबसाईटचा इंटरनेटवरील पत्ता (अँड्रेस) होय. यासाठी आपण पूढील उदाहरण पाहु.

इंटरनेट रचना

१) ISP- इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स हे ISP चे विस्तारित स्वरुप आहे. इंटरनेटच्या वापरासाठी इंटरनेट सेवेची आवश्यकता असते. आज इंटरनेट सेवा पुरविण्यार्या अनेक संस्था आहेत. त्यांनाच इंटरनेट सर्विस प्रोव्हायड म्हणतात. भारतात विदेश संचार निगम लिमिटेड (VSNL) ही कंपनी इंटरनेट सेवा देऊ लागली. यासाठी मोडेम, टेलिफोन सेवा यांची आवश्यकता असते. त्यानंतर कोऑक्सियल फायबर ऑप्टीक केबल च्या वापरातुन इंटरनेट सेवा अधिक वेगवान होऊ लागली. आणि त्या सेवेलाच ब्रॉडबँड सेवा म्हणतात.
सध्या WiFi ही प्रचलित इंटरनेट सेवा अस्तित्वात आली आहे. जी केबलशिवाय सेवा पुरविते. वायफाय च्या माध्यमातुन इंटरनेट सेवा ज्या ठिकाणी मिळते त्याठिकाणाला हॉटस्पॉट म्हणतात. या पध्दतीने गाव, शहरे इंटरनेटने जोडली जातात.
२) सर्व्हर- इंटरनेटशी जोडल्या जाणार्या संगणकांना सर्व्हर म्हणतात. हे सर्व्हर अत्यंत वेगवान असल्याने माहितीचे स्थलांतर वेगात होते. आणि त्यांची जोडणी केबल्स द्वारे केलेली असते. आणि या संगणकांना टेलिफोन लाईन्सच्या मदतीने हजारो व्यक्तीगत संगणक (Personal Computer) इंटरनेटशी जोडले जातात.
सर्व्हर्स संगणकाचे वेगवान गतीने माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रचंड मोठया केबल्स जोडल्या जातात. या केबलचे जाळे व संगणक यांना इंटरनेटचा कणा म्हणजेच बॅकबोन म्हणतात. सर्व देशांतील नेटवर्क्स सर्व्हर्सच्या सहाय्याने बॅकबोनला जोडलेले असतात.
३) क्लाइंट- सर्व्हर संगणकांना टेलिफोन लाईनच्या सहाय्याने हजारो संगणक इंटरनेटशी जोडले जातात त्यांना क्लाइंट म्हणजे प्रत्येक व्यक्तीगत संगणक जो इंटरनेट सर्व्हिस साठी एखाद्या मुख्य सर्व्हर शी जोडला जातो. त्यांना क्लाइंट म्हणतात.
४) मोडेम- इंटरनेट नेटवर्कच्या जोडणीमध्ये मोडेमची आवश्यकता असते. मोडेम हा शब्द Modulation व Demodulation या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातुन तयार झालेला आहे. ते म्हणजे Mod+dem= Modem नेटवर्कमधील संगणक हे एकमेकांना टेलिफोन्स च्या तारांनी जोडले जाते. या टेलिफोनच्या तारांमधुन नेहमी डिजीटल सिग्नल (० व १) मध्ये संकेत संगणकाकडे पाठविले जाते. यामध्ये डिजीटल सिग्नलचे अँनॉलॉग सिग्नलमध्ये तर अँनॉलॉग सिग्नलचे डिजीटल सिग्नल रुपांतर होवुन वहन होत असते. यावरुन डिजीटल सिग्नलचे अँनॉलॉग सिग्नलमध्ये रुपांतर होणार्या क्रियेला मॉड्युलेशन म्हणतात. तर मोडेम हे अँनॉलॉग सिग्नलचे रुपांतर डिजीटल सिग्नलमध्ये करुन संगणकामध्ये संकेत पाठवितो त्यास डिमॉड्युलेशन म्हणतात.
५) टेलिफोन कनेक्शन - इंटरनेट नेटवर्क हे सिग्नल द्वारे माहितीचे वहन करतात.त्यामुळे नेटवर्कमधील संगणक हे इंटरनेटशी टेलिफोन तारांनी जोडले जाते. हे टेलिफोन कनेक्शन संगणकांना मोडेमच्या माध्यमातुन माहिती पुरविते. टेलिफोन तारांमधुन येणारे सिग्नल मोडेम मधुन संगणकाकडे जातात. आणि संगणकाकडुन पाठविलेले संकेत मोडेम मधुन पुन्हा टेलिफोन तारांकडे पाठवले जातात.
थोडक्यात इंटरनेट व संगणक यांच्यामधील माहितीची देवाण-घेवाण ही टेलिफोन तारांच्या माध्यमातुन केली जाते. त्यामुळे टेलिफोन कनेक्शन हे इंटरनेट नेटवर्कसाठी आवश्यक उपकरण आहे.
६) ब्राउजर- इंटरनेट नेटवर्कमधील व्यक्तीगत संगणकावर इंटरनेटवरील मजकुर, चित्रे, ध्वनी अशी वेगवेगळ्या स्वरुपातील माहिती बघण्यासाठी ज्या विशेष सॉफ्टवेअर प्रोग्रामची गरज असते त्यालाच ब्राउजर असे म्हणतात. या ब्राउजर्स प्रोग्रामच्या मदतीने इंटरनेट वापरकर्त्यांना इंटरनेटवरील माहिती हाताळण्यासाठी प्रवेश दिला जातो.थोडक्यात या ब्राउजर प्रोग्रामच्या मदतीने वापरकर्ता इंटरनेटवरील पेजेस हाताळु शकतो.
सध्या बाजारामध्ये अनेक ब्राउजिंग प्रोग्राम्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला फायरफॉक्स नेटस्केप निव्हिगेटर हे ब्राउजर अतिशय प्रचलित आहेत.

इंटरनेट म्ह्णजे काय

जगभरातले सर्वात मोठे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय. जगभरातील संगणक जेव्हा सॅटेलाईट आणि फायबर ऑप्टीक केबलद्वारे जोडले जाते तेव्हा नेटवर्कचे जाळे तयार होते. इंटरनेट ही जगप्रसिध्द संपर्क सेवा मानली जाते. सध्या इंटरनेट हे लोकप्रिय नेटवर्क बनले आहे. ज्याद्वारे एका देशातीलच नव्हे तर संपुर्ण जगाभरातील लोक जवळ आले आहे. इंटरनेरटमुळे असंख्य संगणक एकमेकांशी जोडले गेले आहे.
थोडक्यात सांगायचे झाले तर जगभरातल्या छोट्या छोट्या नेटवर्कला जोडणारे मोठे नेटवर्कचे जाळे म्हणजेच इंटरनेट होय. यामुळे छोट्या गावापसुन ते मोठ्यातल्या मोठ्या देशातील लोकांशी आपण जोडले जाऊन अतिशय कमीवेळेत संवाद साधाता येतो. आज इंटरनेट हे संवाद साधण्याचेच नव्हे तर ज्ञान मिळविण्यासाठीचे प्रभावी व उत्तम माध्यम बनले आहे. हे नेटवर्क कुठल्याही खाजगी संस्थेच्या मालकीचे नसुन समाजसेवेच्या माध्यमातुन बनवले गेले आहे. म्हणजेच इंटरनेट हे लोकांनी लोकांसाठी उपलब्ध करुन दिलेले माहितीचे जाळे आहे.
इंटरनेटविषयी अधिक माहिती घेण्याआधी आपण नेटवर्क म्हणजे काय? व नेटवर्कचे प्रकार अभ्यासु.
नेटवर्क- ज्या संपर्क यंत्रणेमुळे दोन किंवा अधिक संगणक एकमेकांना वैशिट्य पुर्ण पध्दतीने जोडले जातात ज्यामुळे माहितीची देवाण-घेवाण होते त्यालाच नेटवर्क असे म्हणतात. नेटवर्कींग मध्ये अनेक संगणक हे माहिती संदेश वहन करण्याच्या उद्देशातुन जोडले जातात.
संगणकाची जोडणी करण्याच्या पध्दतीत व विस्तार क्षेत्राप्रमाणे तीन प्रकार पडतात. त्यांना टोपोलॉजी असे म्हणतात. टोपोलॉजी म्हणजे नेटवर्कींग मध्ये संगणकाची केलेली जोडणी किंवा व्यवस्थापन होय.
१) लॅन- लॅन टोपोलॉजी म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. लॅन मध्ये स्थानिक पातळीवर संगणकाची जोडणी केलेली असते. ज्यामध्ये एकाच परिसरातील कार्यालय, दवाखाने, इमारती मधील संगणक हे ऑप्टीकल फायबर केबल च्या सहाय्याने जोडलेली असतात. लॅनच्या जोडणीसंदर्भात भौगोलि़क मर्यादा असतात.
वरील प्रमाणे माहिती संदेशवहनासाठी विशिष्ट प्रकारे जोडणी करण्याच्या पध्दतीलाच टोपोलॉजी असे म्हणतात. यामध्ये संगणकाचे स्थान व जोडणी हे घटक लक्षात घेता लॅनचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले जाते.
लॅनचे वर्गीकरण

अ) बस टोपोलॉजी- बस टोपोलॉजी मधील संगणक हे केबलच्या सहाय्याने एका सरळ रेषेत जोडलेले असतात. या जोडणीसाठी साधी केबल वापरली जाते. त्याचप्रमाणे संगणकाची संख्या देखील मर्यादित असल्याने माहितीची देवाण-घेवाण अधिक गतीने होते.
ब) रिंग टोपोलॉजी- रिंग टोपोलॉजी मध्ये संगणकाची जोडणी ही एखाद्या रिंगप्रमाणे वर्तुळाकार पध्दतीमध्ये केलेली असते. त्यामुळे माहितीची देवाण-घेवाण ही वर्तुळाकार दिशेने म्हणजेच एका संगणकाकडुन दुसर्या संगणकामध्ये पाठविली जाते. यामध्ये प्रत्येक संगणकामधील माहितीचा अँड्रेस वाचला जातो. या टोपोलॉजीमध्ये मध्यभागी संगणकाची गरज नसते. त्यामुळे केंद्रस्थानी नियंत्रण नसल्याने त्यामध्ये बिघाड झाल्यास तो शोधणे अवघड जाते.
क) स्टार टोपोलॉजी- स्टार टोपोलॉजी ही बर्याचदा एक किंवा अधिक लहान संगणक वापरुन एका मोठ्या संगणकाच्या जोडणीसाठी वापरले जातात. अनेक ठिकाणच्या लॅनमध्ये स्टार टोपोलॉजी वापरली जाते. ज्यामध्ये केंद्रस्थानी असलेल्या संगणकामधील माहिती इतर संगणकांमध्ये शेअर केली जाते. या टोपोलॉजीमध्ये केंद्रस्थानी एक संगणक असुन इतर संगणक हे स्टारच्या आकारात जोडलेले असतात. त्यालाच हब असेही म्हणातात. यामधील संगणक हे सर्व्हरशी स्वतंत्रपणे माहितीची देवाण-घेवाण करु शकतात.
या टोपोलॉजीमध्ये हब म्हणजेच्व्ह मध्यवर्ती विद्युत साधनांमुळे संपुर्ण यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. त्याचप्रमाणे एखाद्या संगणकात बिघाड झाला तरी इतर यंत्रणा चालु असते. परंतु मध्यवर्ती उपकरणामध्ये बिघाड झाल्यास संपुर्ण यंत्रणा बंद पडते. याबरोबरच संगणकाच्या संख्येमध्ये वाढ झाल्यास कामाची गती कमी होत जाते. अधा प्रकारे लॅनच्या वेगवेगळया जोडणीमुळे माहितीची देवाण-घेवाण, यंत्रणेची समान विभागणी, कामाची गती व कर्यक्षमता यासाठी उपयोग होतो.
२) मॅन- मॅनचे विस्तारित स्वरुप म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क होय. मेट्रोपॉलिटन एरिया हा एक संपुर्ण शहरी विभागासाठी असुन यामध्येही क्षेत्र मर्यादा असते. मॅन हे लॅन प्रमाणेच जोडलेले असते. परंतु माहितीचे संप्रेषण अधिक गतीशील असते. मॅन हे अनेक लॅनचे एकत्रीकरण आहे. एका शहरामधील विविध एरियामध्ये असलेले छोटे छोटे लॅन टोपोलॉजीचे विस्तारित स्वरुप म्हणजेच मॅन होय.
३) वॅन-वॅनला वाईड एरिया नेटवर्क असे म्हटले जाते. हजारो लॅन, मॅन यांच्या एकत्रीकरणातुन विस्तारित स्वरुपाचे नेटवर्क म्हणजेच नेटवर्क होय. वॅनच्या जोडणीलाच इंटरनेट असे म्हटले जाते. फक्त एका देशातील राज्य, शहरे नव्हे तर संपुर्ण देशभरातील संगणक हे नेटवर्कमध्ये जोडले जातात. वॅनमध्ये भौगोलिक मर्यादा नसते. ही सर्व संगणकाची जोडणी उपग्रहाद्वारे संदेशवहन होते. वॅनच्या जोडणीसाठी विशिष्ट साधने आवश्यक असतात. त्यामध्ये मॉडेम, इंटरनेट सर्व्हिस सेवा, ब्राऊझर, टेलिफोन माध्यम इ.

इंटरनेटचा उगम...(History)

इंटरनेट ही संकल्पना आज खुप विस्तारलेली आपण पाहतो आहे. पण या कल्पवृक्षाचे बीज पेरले गेले ते सर्वप्रथम युनायटेड स्टेट्सच्या संरक्षण विभागाच्या अँडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीच्या माध्यमातुन. युनायटेड स्टेट्स मिलेट्रीने सन १९६९ या वर्षी ARPANET चा शोध लावला. त्या काळातील शीतयुध्दा दरम्यान हे संगणक संरक्षण आणि सुरक्षिततेसंबधी माहितीची देवाण-घेवाण करीत असत. ज्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेल्या संगणकामध्ये माहितीची देवाण-घेवाण करता यावी. ARPANET या संस्थेने TCP/IP हे उच्च प्रतीचे संप्रेषण नेटवर्क प्रोटोकॉल पुढे १९८२ मध्ये इंटरनेट प्रोटोकॉल सुट (TCP/IP) नेटवर्क नव्याने जगासमोर आले. त्यालाच आपण वर्ल्ड वाईड नेटवर्क म्हणजेच इंटरनेट म्हणुन ओळखतो.

1)    इंटरनेटचा जनक टीम बर्नर्स ली

टीम बर्नर्स ली हा इंटरनेटचा जनक म्हणुन ओळखला जातो. यांनी वर्ल्ड वाईड वेब ची संकल्पना अधिक प्रगत स्वरुपात पूढे आणली. त्यामध्ये त्यांनी इंटरनेटसाठी (HTML) हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज ही भाषा तयार केली. त्याचबरोबर वेब पेजेस, (HTTP) हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि (URL) युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर ची निर्मीती केली.

टीम बर्नर्स ली बरोबरच विनटोन सर्फ यांचे ही योगदान तितकेच महत्त्वाचे मानले जाते.या दोन्ही संगणक शास्त्रज्ञांनी ऑक्सफर्ड मध्ये त्यांच्या इतर सहकार्यांसमवेत सतत दहावर्ष सखोल अभ्यास व संशोधने करुन इंटरनेटसाठी प्रोटोकॉल्सची योग्य रचना व डिझाईन्स विकसित केली. आज इंटरनेट म्हणजे माहितीची देवाण-घेवाण करण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणुन ओळखले जाते.

या प्रोटोकॉल्स बरोबरच ARPANET च्या माध्यमातुन १९७२ साली पहिला ई-मेल प्रोग्राम वापरण्यात आला.
2)  इंटरनेटचा थोडक्यात आढावा..

१) १९७८ मध्ये TCP आणि IP प्रोटोकॉल वेगळे करण्यात आले.

२) १९८२ मध्ये TCP/IP प्रोटोकॉल वापरण्यात आले.

३) १९८३ मध्ये डोमेन नेम सिस्टीम (DNS) ची निर्मीती केली.

४) १९८६ मध्ये जवळजवळ ५००० संगणक इंटरनेटला जोडले गेले.

५) १९८८ मध्ये (IRC) इंटरनेट रिले चॅट ही चॅटींग सुविधा अस्तित्वात आली.

६) १९९० मध्ये टीम बर्नर्स ली यांनी वर्ल्ड वाईड वेब ही इंटरनेट सेवा तयार केली.