Wednesday, 22 February 2012

Open Source Software हे आहे तरी काय?

Open source ( खुली साधने)  म्हणजे उत्पादन व विकासातील अशी प्रक्रिया ज्याने आपण पुर्ण झालेल्या उत्पादनातील घटकांना मिळवू शकतो . 

म्हणजे ?
आपण जे काही तयार वा लिहिले आहे ,ते कोणीलाही मुक्तपणे वापरता येणे. open source हे फ़ार लोकप्रिय साधन आहे.त्याला जगात वेगवेगळे लोक वेगवेगळे नाव वापरतात. Open source ची सुरुवात कुठे व कशी झाली हे सांगणे कठिणच आहे.परंतु चारचाकी च्या अधिकारांवरुन भांडणे झाली व मुक्त साधने याचा प्रचार झाला. Open source हे फ़ार मोठ्या क्षेत्रात पसरलं आहे. ते तंत्रज्ञान ,शेती ,समाज , राजकारण ,अर्थाशास्त्र ,शिक्षण इंथपासुन ते कला ,नवसंशोधन , ओषधी क्षेत्र इ. पर्यान्त पसरले आहे.

या सर्वावर लिहणे शक्य नाही. तो या लेखाचा उद्देशही नाही. आपण यातील फ़क्त Open Source Software याचा विचार करु.
Open source software (OSS) म्हणजे असे software ज्याचा आपण फ़क्त उपयोगच नाही तर, त्यात बदल घडवणे , बदविलेले software चा प्रचार करणे इ. येत. OSS  ला Free software moment या सामाजिक चळवळीमुळे चालना मिळाली. Free software चळवळ १९८३ मधे Richard Stallman यांच्या पुढाकाराने सुरु झाली. या चळवळतूनच “open source”,”software libre”  या शब्दाचा उगम झाला.
Richard Stallman
Richard Stallman यांनी आताची लोकप्रीय GNU Project  ची स्थापना केली. GNU Project  प्रोजेक्ट मधुनच  GNU operationg system ची सुरुवात झाली.यातूनच GNU OS जन्माला आली. FOSS ( Free and Open source Software ) हा शब्द आता internet  वर वांरवार वापरला जातो.याचा अर्थ जे software आहे ते मुक्त व खुले दोन्ही आहे.
फ़रक -
Free software व Open Software हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. काही  FreeSoftware च्या अटी   OpenSoftware मान्य करत नाही तर OpenSoftware काही च्या अटी FreeSoftware  मान्य करत नाही.
” जवळजवळ सर्व OpenSoftware हे मुक्त आहे व सर्व FreeSoftware हे खुले आहेत.”
-Free Software Foundation
(माहिती पाहण्यासाठी  icon  वर  click  करा.)
गरज-
सुरवातीला software हे मुक्त होते. लोक तस्याप्रकारे काम करत. पण, IBM, Microsoft इ. कंपन्यामुळे जे मुक्त software होते ते विकले जावू लागले. प्रत्येकाला तेच software तेवढ्याच किंमतीला घ्यावे लागत. त्यातूनच ही चळवळ उभी राहिली. ती आता भारतात ही पोचली आहे. महाराष्ट्र शासनाने Microsoft सोबत केलेल्या कराराविरोधात free software foundation of india लढा लढत आहे.
काही लोकप्रिय Open Source –
काही उपयुक्त Softwares -
१. इंटरनेट पाहण्यासाठी सुरक्षित Browser .
Mozilla FireFox -
हे Browser मराठीतही उपलब्ध आहे. येथे जा. 
http://www.mozilla.com/en-US/firefox/all.html
२. व्हिडियो बघण्यासाठी फ़ार उत्तम आहेत. .
VLC Player
Media Player Classic
३. open-source office याचा उपयोग आपण रिपोर्ट word processing, spreadsheets, presentations, graphics, databases  इं साठी करु शकता.
४. Operating system download.
५.ग्राफ़िक्स/फ़ोटो संपादनासाठी -
अ.  Photos.                                                                                                                           
ब. Graphics.
६. E-mail
७.3D Graphics and Modeling
आपल्याला हा लेख कसा वाटला हे जरुर कळवा. सुचना असतील त्या बिनधास्त लिहा.

गुगलचं महाजाल

माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटचा ’जीनी’ म्हणजेच गुगल, इंटरनेट म्हणजे गुगल आणि गुगल म्हणजेच इंटरनेट अशी अनेक आभुषणं गुगलला दिली जातात कारण "गुगल हे जगातील सर्वात मोठा महासंगणक चालवते" असं त्याचे चाहते म्हणतात कारण जगातल्या कुठल्याही कानाकोपर्यालतुन आपण गुगलला माहिती विचारली तर तो एका सेकंदाच्या आत तुम्हाला हवी ती माहिती हव्या त्या भाषेत पुरवते आणि तेही अगदी मोफ़त. अशी ही जगातील सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे जणु एक आठवं आश्चर्य म्हणावं लागेल. 

       गुगल ही जगातली सर्वात जास्त भेट दिली गेलेले संकेतस्थळ आहे आणि तेही अगदी दररोज. गुगलची एक नव्हे तर जवळजवळ १०० वेगवेगळ्या सेवा पुरवते. आणि प्रत्येक सेवेत काही तरी नविन देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि तो नेहमीच यशस्वी होतो. मग त्यात जी मेल, यु ट्युब, आर्कृट, गुगल अर्थ, ब्लॉगर, गुगल क्रोम, स्केच अप, पिकासा किंवा इतर कुठलीही सेवा असो. माहितीचा शोध (बातम्या, पुस्तकं, छायाचित्रं, महिती, हवामान, फ़िल्म शो, चलचित्र, विमानसेवा, व्यक्तीबद्द्ल, डिक्शनरी, ब्लॉग, प्रवास, ठिकाण इ.), सॉफ़्टवेअर (गुगल क्रोम, Android, गुगल डेस्कटॉप, टुलबार, स्केच अप, गुगल अर्थ, पिकासा, ट्रान्स्लेट इ.) व ब्लॉग व गुगल साईट्स ह्या त्यांच्या काही सेवा. गुगल सर्च ही सेवा सर्वप्रथम १९९६ मधे लॅरी पेज व सर्जे्य ब्रिन ह्या दोन Stanford University मधे Ph. D. करणार्याग विद्यार्थ्यांनी तयार केली होती. अगदी एका छोट्याश्या कोपर्याटत एक छोटासा सर्वर तयार करुन त्यावर चालु केलेले हे ’सर्च इंजीन’ आज जगाच्या कानाकोपर्यारत पसरलेले आहे. Google ह्या शब्द मुळ Googol ह्या शब्दापासुन तयार झाला आहे. त्यानंतर Google हा शब्द ऑक्सफ़र्ड डिक्शनरी मधे तयार करण्यात आला आणि त्याचा अर्थ ’गुगल सर्च इंजीन वापरुन इंटरनेट वर माहिती शोधने’ असा घेतला. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला हवी ती माहिती मोफ़त पुरवणे हा एकच उद्देश घेऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात. आजवर जे तंत्रज्ञान संगणक व इंटरनेट क्षेत्रात विकसीत झाले त्यातील सिंहाचा वाटा गुगल उचलत असते. मग त्यात Mobile Computing मधील Android OS असो किंवा Open Source मधील Google Crome OS असो किंवा Augumented Reality, Software as a Service, Cloud Computing सारख्या नव्या Technology असो प्रत्येक वेळेस गुगल जगाच्या एक पाऊल पुढे टाकुन चालते. 
       गुगलचं थोडक्यात वर्णन करणं अवघडच !!!!! त्याबद्दल आणखी जाणुन घेण्याकरीता विकीपेडिया वरील हा लेख वाचा. गुगलने आजवर अनेक सेवा बाजारात आणल्या आणि दर महिण्याला काही तरी नविन घेऊन येतात.माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटचा ’जीनी’ म्हणजेच गुगल, इंटरनेट म्हणजे गुगल आणि गुगल म्हणजेच इंटरनेट अशी अनेक आभुषणं गुगलला दिली जातात कारण "गुगल हे जगातील सर्वात मोठा महासंगणक चालवते" असं त्याचे चाहते म्हणतात कारण जगातल्या कुठल्याही कानाकोपर्यालतुन आपण गुगलला माहिती विचारली तर तो एका सेकंदाच्या आत तुम्हाला हवी ती माहिती हव्या त्या भाषेत पुरवते आणि तेही अगदी मोफ़त. अशी ही जगातील सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे जणु एक आठवं आश्चर्य म्हणावं लागेल. 
माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटचा ’जीनी’ म्हणजेच गुगल, इंटरनेट म्हणजे गुगल आणि गुगल म्हणजेच इंटरनेट अशी अनेक आभुषणं गुगलला दिली जातात कारण "गुगल हे जगातील सर्वात मोठा महासंगणक चालवते" असं त्याचे चाहते म्हणतात कारण जगातल्या कुठल्याही कानाकोपर्यालतुन आपण गुगलला माहिती विचारली तर तो एका सेकंदाच्या आत तुम्हाला हवी ती माहिती हव्या त्या भाषेत पुरवते आणि तेही अगदी मोफ़त. अशी ही जगातील सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे जणु एक आठवं आश्चर्य म्हणावं लागेल. 

       गुगल ही जगातली सर्वात जास्त भेट दिली गेलेले संकेतस्थळ आहे आणि तेही अगदी दररोज. गुगलची एक नव्हे तर जवळजवळ १०० वेगवेगळ्या सेवा पुरवते. आणि प्रत्येक सेवेत काही तरी नविन देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि तो नेहमीच यशस्वी होतो. मग त्यात जी मेल, यु ट्युब, आर्कृट, गुगल अर्थ, ब्लॉगर, गुगल क्रोम, स्केच अप, पिकासा किंवा इतर कुठलीही सेवा असो. माहितीचा शोध (बातम्या, पुस्तकं, छायाचित्रं, महिती, हवामान, फ़िल्म शो, चलचित्र, विमानसेवा, व्यक्तीबद्द्ल, डिक्शनरी, ब्लॉग, प्रवास, ठिकाण इ.), सॉफ़्टवेअर (गुगल क्रोम, Android, गुगल डेस्कटॉप, टुलबार, स्केच अप, गुगल अर्थ, पिकासा, ट्रान्स्लेट इ.) व ब्लॉग व गुगल साईट्स ह्या त्यांच्या काही सेवा. गुगल सर्च ही सेवा सर्वप्रथम १९९६ मधे लॅरी पेज व सर्जे्य ब्रिन ह्या दोन Stanford University मधे Ph. D. करणार्याग विद्यार्थ्यांनी तयार केली होती. अगदी एका छोट्याश्या कोपर्याटत एक छोटासा सर्वर तयार करुन त्यावर चालु केलेले हे ’सर्च इंजीन’ आज जगाच्या कानाकोपर्यारत पसरलेले आहे. Google ह्या शब्द मुळ Googol ह्या शब्दापासुन तयार झाला आहे. त्यानंतर Google हा शब्द ऑक्सफ़र्ड डिक्शनरी मधे तयार करण्यात आला आणि त्याचा अर्थ ’गुगल सर्च इंजीन वापरुन इंटरनेट वर माहिती शोधने’ असा घेतला. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला हवी ती माहिती मोफ़त पुरवणे हा एकच उद्देश घेऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात. आजवर जे तंत्रज्ञान संगणक व इंटरनेट क्षेत्रात विकसीत झाले त्यातील सिंहाचा वाटा गुगल उचलत असते. मग त्यात Mobile Computing मधील Android OS असो किंवा Open Source मधील Google Crome OS असो किंवा Augumented Reality, Software as a Service, Cloud Computing सारख्या नव्या Technology असो प्रत्येक वेळेस गुगल जगाच्या एक पाऊल पुढे टाकुन चालते. 
       गुगलचं थोडक्यात वर्णन करणं अवघडच !!!!! त्याबद्दल आणखी जाणुन घेण्याकरीता विकीपेडिया वरील हा लेख वाचा. गुगलने आजवर अनेक सेवा बाजारात आणल्या आणि दर महिण्याला काही तरी नविन घेऊन येतात. 

संगणकात सीडी टाकली की ती स्वत:हून सुरू होते.

स्वत:हून सीडी सुरू होण्याच्या सुविधेला ऑटो रन म्हणतात. ही सुविधा काढण्याचे दोन मार्ग आहेत. एक तात्पुरता मार्ग ज्यात सीडी ड्राइव्हमध्ये टाकल्यावर ताबडतोबशिफ्ट हे बटन दाबून ठेवा. सीडी ड्राहवचा दिवा बंद होइ पर्यंत (संगणकाचे सीडी ड्राइवमधील सीडी वाचून होईपर्यंत ... अगदी काही सेकंद लागतील) दाबून ठेवा. पण हा उपाय फक्त त्या वेळेसाठी असेल पुढच्या वेळी परत सीडी टाकल्यावर ती स्व:तहून सुरू होईल.
 
जर आपलाला कायमची ही सुविधा काढायची असेल तर दुसरा उपाय म्हणजे स्टार्ट -सेटिंग - कन्ट्रोल पॅनल - सिस्टम - डिवाइस मॅनेजर निवडा. यात आपला सीडी रॉम डिवाइस निवडा आणि त्याच्या प्रॉपटीर्ज् वर क्लिक करा. या नंतर 'सेटिंग या टॅबवर क्लिक करा आणि ऑटो इन्सर्ट नोटिफिकेशन या ऑप्शन जवळ असलेले बरोबर चिन्ह क्लिक करून काढा. 

टोरंट - डाऊनलोड म्हणजे काय ?

0
0
आजकाल महाजालावर नेहमी कानावर पडत असलेला शब्द म्हणजे टोरंट.
टोरंट म्हणजे फक्त फाईल/गाणी/चित्रपट डाऊनलोड करणे एवढंच माहिती असते, पण कसे का ? या प्रश्नांची उत्तरे नसतात.
आपण या लेखातून याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू या.
पीअर टू पीअर नेटवर्किंग म्हणजे टोरंट.
आता पीअर टू पीअर म्हणजे काय ?
टोरंटवरून तुम्ही ज्या फायली डाऊनलोड करत असता त्या कुठे सर्वरवर अथवा होस्टिंग साईटवर नसतात, त्या वापरकर्ताच्या संगणकात असतात.
म्हणजे उदा. मी एक फाईल डाऊनलोड करतो तेव्हा ती फाईल ज्या संगणकावर आहे तेथून (पीअर) मी डाऊनलोड करत असतो.
उदाहरण या चित्रामध्ये पहा.
आता, आपल्या संगणकावर असा पुर्ण प्रवेश देणे तो ही कोणाला ही, ते आपल्याला परवडणार नाही, म्हणून मध्ये एक कोणी तरी हवा हो त्यांचा प्रवेश फक्त त्या फाईलसाठी मर्यादीत करू शकेल, मग तेथे येतात मदतीला सॉफ्टवेअर.uTorrentBitTorrent सारखी प्रणाली. ही / यासारखी प्रणाली असल्या शिवाय तुम्ही टोरंट डाऊनलोड करू शकत नाही.
एक ठाराविक फोल्डर (बाय डिफॉल्ट माय डाक्युमेंट/डाऊनलोड ) त्यासाठी ही प्रणाली निश्चित करते, त्या फोल्डर मधील फाईल सोडल्यातर दुसरा पिअर तुमच्या संगणकातील इतर फाईल्स हताळू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुर्ण फाईल एकाच संगणकावरून डाऊनलोड होत नाही. त्यासाठी हे सॉफ्टवेअर त्या फाईलचे छोटे छोटे विभाग (पॅकेट्स) करते व ज्या संगणकाचा स्पिड चांगला आहे तेथून आधी ते पॅकेट्स घेत असते. असे अनेक संगणकातून पॅकेट्स घेऊन मग ती फाईल तुमच्या संगणकावर डाऊनलोड होत असते.
येथे पहा
वरच्या खिडकी मध्ये डाऊनलोड होत असलेल्या फाईली दिसत आहेत व खालच्या खिडकीमध्ये त्या फाईल मधील माहिती दिसण्याची व्यवस्था आहे.
पहिल्या खिडकी मध्ये असलेल्या गोष्टींबद्दल माहिती
१. फाईलचे नाव.
२. नंबर
३. फाईलचा आकार
४. किती % डाऊनलोड झाले.
५. सद्य स्थिती
६. सिड्स - किती संगणकावरून / पिअर कडून फाईल घेतली जात आहे.
७. पिअर्स किती संगणका / पिअर तुमच्या कडून फाईल घेत आहेत.
८. डाऊनलोड होण्याचे स्पिड
९. अपलोड होण्याचे स्पिड
१०. या स्पिडनूसार डाऊनलोड होण्यासाठी लागणारा अंदाजे वेळ.
११. एकून अपलोड झालेल्या फाईलची साईज.
दुसर्‍या खिडकी मध्ये (खालील) असलेल्या गोष्टींबद्दल माहिती
१. फाईलचा आकार व त्याचा ग्राफ
२. उपलब्धता व त्यांची माहिती
फाईल चे कुठले पॅकेट डाऊनलोड होत आहे, फाईल कुठे सुरक्षित ठेवली जात आहे, कुठून डाऊनलोड होत आहे, किती वेळ लागेल, किती डाऊनलोड झाले आहे, किती अपलोड झाले आहे यांची सर्व माहिती खालच्या खिडकीत मिळते.

हे झाले तुमच्या संगणकावर काय घडते या बद्दल.
आता तुम्हाला हवा असलेला टोरंट कसा शोधायचा ?
तर असा शोध घेण्यासाठी अनेक ट्रकर ऑनलाईन उपलब्ध आहेत. जी टोरंट प्रणाली तुम्ही वापराल त्यांचा देखील ट्रकर असतो, पण त्यापेक्षा ही चांगले व गुणवत्ता असलेली फाईल्स देणारे, फाईल व्हेरिफाय करून ती सुरक्षित आहे यांची खात्री देणारे भरपूर ट्रकर आहेत.
सुचना: हे ट्रकर मुफ्त प्रणालीवर असतात, त्यामुळे त्यावरच्या जाहिरातीचा सुकाळ असतो, आपल्या जबाबदारीवर अश्या प्रकारचे साईट उघडा, नाहीतर सुरक्षेसाठी तुमच्या टोरंट प्रणालीचेच जाहिरातमुक्त संकेयस्थळ वापरा )
http://torrentz.eu
Torrentz नावाची प्रणाली ज्यांची आहे त्यांचाच हा ट्रकर आहे, हे एक प्रकारचे सर्च इंजीन आहे. जेथे तुम्ही तुम्हाला हवी असलेली फाईल शोधू शकता व डाऊन लोड करून घेऊ शकता. - जाहिरात मुक्त
http://www.picktorrent.com
हे देखील उत्तम सर्च इंजीन आहे, टोरंटसाठी. जाहिरात मुक्त
http://extratorrent.com/
हे एक वेगवान व भरपुर सिडर्स असलेले स्थळ, पण हे स्थळ आपल्या जबाबदारीवर उघडा, पुर्ण जाहिरातीनी भरलेले व (+A) जाहिरातीचा सुकाळ असलेले संकेतस्थळ आहे. पण अनेक चित्रपटांचे टोरंट येथे व्हेरिफाय केलेले मिळतात.
असे अनेक आहेत, नियमित वापरातून तुम्हाला तुमच्या आवडीचे टोरंट सर्च इंजीन मिळून जाईल.
आता या प्रकारच्या संकेतस्थळावरून फाईल कशी डाऊनलोड करावी.
आपण उदाहरण म्हणून एक संकेतस्थळ घेऊ या "http://torrentz.eu" व मला उबंटू हवे आहे तर मी सर्च मध्ये उबंटू टाईप करुन सर्चचे परिणाम पाहतो आहे.
आता हा निकाल पहा.
काय दिसत आहे.
Sponsored Links याखालील लिंक्सवर क्लिक करू नका पैसे मागतात पुढे जाऊन Big smile
त्यानंतर,
पहिल्याच नंबरच्या फाईल नावासमोर ubuntu desktop 10 10 i386 तुम्हाला एक हिरवा टिक मार्क  दिसेल. याचा अर्थ फाईल वापरकर्तानी व्हेरिफाय केली आहे, उत्तम आहे याची नोंद केली आहे.
त्यानंतर ही फाईल या संकेतस्थळावर कधी आली यांची माहिती दिली आहे 6 months ago 
त्या नंतर फाईलचा आकार दिसत आहे.
आता सर्वात महत्त्वाचे. जे नंबर दिसत आहेत ते काय ?
पहिला हिरव्या रंगातील नंबर 3,553 म्हणजे काय हे समजून घेऊ या.
ते आहेत सिडर्स, जे ऑनलाईन आहेत, ज्यांच्या संगणकातून तुम्ही ती फाईल घेणार आहात, हे जेवढे जास्त तेवढ्या पुर्ण वेगाने फाईल डाऊनलोड होईल. हे जेवढे कमी असतील तेव्हा फाईल डाऊनलोड साठी वेळ लागेल.
आता दुसरी जी दिसत आहे ती संख्या निळ्या रंगात 137
आता हे ते नमुने आहेत, जे फाईल डाऊन झाले की लगेच आपला पेअर बंद करतील, म्हणजेच फुकटे.. आपण काही देणे नाही फक्त घेणे हे तत्व असलेले 
पण भारतात महाजालाचा खर्च व अनलिमिटेड सेवांचे दर पाहता साहजिकच आहे हास्य
आता पहिल्या लिंकवर क्लिक केल्यावर काय दिसते, ते पाहू या.
एक पुर्ण लिस्ट तुमच्या समोर येत आहे, जेथून तुम्ही फाईल डाऊनलोड करून घेऊ शकता.
खालील लिस्टमधील जे अद्यावत दिसत आहे त्याचा वापर करा म्हणजे फाईल लवकर डाऊनलोड होण्याचे चान्स वाढतील.
पुन्हा एकदा Sponsored Link कडे पाहू देखील नका wink
उदा. मी torlock.com हे वापरले.
आता मला ते वरील प्रमाणे दिसत आहे, ज्यामध्ये फाईलचे नाव, ते व्हेरिफाय आहे की नाही, 1819 seeders & 76 leechers किती आहेत. व डाऊनलोड साठी ऑप्शन.
येथे मी टोरंट डाऊनलोड निवडेन. तेथे .torrent नावाची फाईल डाऊनलोड होण्यासाठी परवानगी मागेल तेथे, डाऊनलोडची खिडकी आल्यावर त्यावर मी फाईल सेव्ह न करता ओपन असे क्लिक करेन जेणे करुन ती फाईल सरळ टोरंट प्रणाली मध्ये उघडेल व डाऊनलोड चालू होईल.