मागील ब-याच दिवसापासून इंटरनेट द्वारे गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले असून यात प्रामुख्याने अश्लील प्रोफाइल तयार करणे, क्रेडीट कार्ड चा गैर वापर करणे इत्यादी गुन्हांचा समावेश आहे.
इंटरनेट द्वारे नेमके कशाप्रकारे गुन्हे घडू शकतात व सामान्य जनतेने या संदर्भात कोणती काळजी घ्यावी
अनेक ईमेल अकाऊंट धारकांना अनोळखी व्यक्तीकडून अचानकपणे खालील प्रमाणे ईमेल (Unsolicited / Spam email) येतात
- आपणास बक्षिस लागले आहे. मोठया रक्कमेची लॉटरी लागली आहे.
- परदेशात चांगल्या नोकरीची संधी आहे
मोठ्या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळाली
- आपला नातेवाईक परदेशात आजारी आहे किंवा अडचणीत आहे किंवा अपघातात मरण पावला आहे त्याला मदत करावी
.असा इमेल आपल्या मित्राच्या नातेवाईकाचा इमेल हॅक करून येऊ शकतो.
- दलाली मध्ये मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .
- फ्रेंड्स क्लब मेंबर नावाची संस्था उघडली आहे त्यासाठी मेम्बर व्हा.
- बॅक किवा आर्थिक संस्थेचे हुबेहूब बोधचिन्ह असलेले ईमेल-मध्ये अकौंट अपडेट करणे.
- आपले बँकेचे खाते हे कमिशन घेवून पैसे पाठविण्यासाठी वापरू द्यावे.
- धर्मदाय संस्था आहे असे सांगून आपल्या खात्यावर दान करणा-या व्यक्ती पैसे जमा करतील त्यातली आपण २० % रक्कम कमिशन म्हणून ठेवून घ्यावी व इतर रक्कम दिलेल्या खात्यात जमा करावी.
- नोकरीसाठी इतरांसाठी पाठविलेल्या बायोडाटाद्वारे आपणास नोकरीचे अपॉइंन्टमेंट लेटर देऊन वेगावेगळे चार्जेस साठी रु.५०००/-, १०,०००/- रक्कमेची मागणी करतील.
- परदेशातून/बाहेर गावावरून आमचे पैसे येणार आहे आपल्या बॅकेंतील खात्याचा व ए.टी.म.कार्ड चा वापर करून द्या त्याकरिता रु.५०००/-तुम्हाला भाडे देऊ असे म्हणतील
.
- संगणक इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी विषयातील मान्यता प्राप्त संस्थेचे परीक्षाकेंद्र/प्रमानपत्र देतो असे सांगून त्याची रक्कम बॅकेंत भरण्यास सांगतील.
तसेच वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमाने विशेषता: www.orkut .com वेबसाईटवर अश्लील प्रोफाइल तयार करून बदनामी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने तरूण तरुणीच्या नावाने अशलील प्रोफाइल फोटोसह तयार करून त्यावर फोन नंबर दिले जातात
तसेच अशलील संदेश पाठविले जातात. याकरिता कोल्हापूर जिल्हा पोलिसाकडून सूचित करण्यात येते कि, इंटरनेटचा वापर करताना काळजीपूर्वक वापर करण्यात यावा शक्यतो आपले फोटो अपलोड करू नये.
इंटरनेटद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी आपण खालील प्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे.
- अनोळखी व्यक्तीकडून आलेले Unsolicited ईमेल उघडू नये. यासोबतच्या अटॅचमेंट बघू नयेत यासोबत किलॉगर या सॉफ्टवेअर द्वारे अनोळखी व्यक्ती आपला पासवर्ड, बँकेचा पिन नंबर, क्रेडीट कार्ड नंबर, सी. व्ही. नंबर माहित करून घेऊन आपल्या खात्यातून पैसे काढून घेऊ शकते.
- फोन करून विशिष्ट बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलतो असे सांगून आपली संपूर्ण गोपनीय माहिती सांगुन विश्वास संपादन करतात व क्रेडीट कार्ड नंबर, सी. व्ही. नंबर, पिन नंबर विचारून मग त्याद्वारे आर्थिक व्यवहार करतात.
- आपले बॅंक अकौंटं क्रमांक, दूरध्वनी क्र, पारपत्र क्र., पासवर्ड हे ऑन लाईन अथवा फोनद्वारे न सांगणे किवा माहिती न पाठविणे शक्यतो ऑन लाईन बँकिग चा वापर करताना घरच्या किवा खात्रीच्या संगणकाचा वापर करावा तसेच पिन नंबर, पासवर्ड, सी. व्ही. नंबरसाठी व्हरचुअल कि बोर्डचा वापर करवा.
- प्राप्त ईमेल संदेशामध्ये दिलेल्या कोणत्याही अकौंट मध्ये पैसे नभरणे.
- ज्यांनी चुकून पैसे भरले असतील त्यांनी सर्व ईमेल सांभळून ठेवावे डिलीट करू नये.
- इंग्लंडची लॉटरी लागली असल्याचे भासविले असल्यास www.gmblingcommission.gov.uk, कंपनीच्या खरे पणाबद्दल खात्री करण्यासाठी www.companieshouse.gov.uk, कंपनीचा पत्ता बघण्यासाठी www.upmysreet.com.uk या वेबसाईटला भेटी द्याव्यात.
- कोणत्याही कारणाने परकीय चलनाने पैसे न पाठवणे जर परदेशी पैसे पाठवले तर पैसे पाठविण्यावर FEMA (फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट) नुसार RBI guideline अनुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा प्रकारे परकीय चलनामध्ये रक्कम भारताबाहेर पाठवणे हे प्रतिबंधित आहे.
- कोणत्याही ईमेल मधील लिंकला क्लिक करून कोणत्याही वेबसाईटवर जाऊ नये. वेबसाईट उघडताना अॅड्रेसबार वर टाइप करूनच वेबसाईट उघडावी.
- CREDIT CARD/ATM-CUM-DEBIT CARD चा वापर विश्वासपात्र असलेल्या दुकानावरच करावा. आपल्या समोर क्रेडीट कार्ड स्वॅप करून परत घ्यावे त्यावरील नंबर कोणीही नोंदवून घेणार नाही अथवा त्याची झेरोक्स काढणार नाही याची खात्री करावी.
- ATM-CUM-DEBIT CARD वर पिन नंबर लिहू नये व्यवहार झाल्यानंतर परत कार्ड घेण्यास विसरू नये तसेच CREDIT CARD/ATM-CUM-DEBIT CARD हरवील्यानंतर त्वरित संबंधित बँकेस कळवून सदर कार्ड ब्लॉक करावे