Monday, 21 November 2011

लिनक्सची विशी!

तमाम आयटी कंपन्यांचा दुवा ठरलेल्या या ऑपरेटिंग सिस्टिमचा जन्म २५ ऑगस्ट १९९१मध्ये हेसिंकी विद्यापीठात झाला. लिनस टोरवल्ड्स या विद्यार्थ्यांने मिनिक्सवर आधारित एक नवी ऑपरेटिंग सिस्टिम बनवली.

टोरवल्ड्सच्या कॉलेजमध्ये सर्वत्र मिनिक्स ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यात येत होती. यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत हे माहित करून घेण्यासाठी टोरवल्ड्सने कॉलेजच्या वेबसाइटवर एक प्रश्न टाकला. या मिळालेल्या प्रतिसादातून त्यांने मिनिक्सवर आधारित स्वत:ची एक नवी ऑपेटिंग सिस्टिम तयार केली. याला लिनक्स असे नाव देण्यात आले. ओपनसोर्स ऑपेटिंग सिस्टिममधील ही सर्वात यशस्वी ऑपरेटिंग सिस्टिम ठरली. याची सुरुवात १९७१मध्ये युनिक्सपासून झाली. युनिक्सचे रुपांतर मिनिक्समध्ये झाले. मिनिक्सचे पुढे लिनक्स झाले. 

ओपनसोर्स ऑपरेटिंग सिस्टिम ही विशेषत: कंपन्यांच्या अंतर्गत व्यवहारासाठी वापरण्यात येते. या ऑपरेटिंग सिस्टिमच्या सेटिंगमध्ये आपण आपल्या सोयीने कोणतेही बदल करू शकतो. असे बदल आपल्याला विंडोज किंवा इतर कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टिममध्ये करता येत नाहीत. यामुळे आयटी कंपन्यांचे सर्व काम लिनक्सवरच चालते. लिनक्स हे नाव अपघाताने पडले. सुरुवातीला याचे नाव 'फ्रेक्स' असे ठेवण्यात आले होते. मात्र एफटीपी र्सव्हरचे काम करणाऱ्या टोरवल्ड्सच्या मित्राने र्सव्हरवर 'लिनक्स' असे नाव अपलोड केले. यामुळे पुढे तेच नाव कायम राहिले. 

लिनक्ससाठी तयार करण्यात आलेली टूलचेन, कम्पायलर, युजर स्पेस कमांडस आणि इतर सर्व टूल्स हे जीएनयू सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार केले आहे. जीएनयू हे सॉफ्टवेअर १९८४मध्ये रिचर्ड स्टॉलमन यांनी तयार केले होते. आजमितीस लिनक्सवर करोडो कम्प्युटर तज्ज्ञ काम करत असून यामुळे जगभरात ऑपेटिंग सिस्टिमच्या कोडिंगवर संशोधन करणे शक्य झाले आहे. 

लिनक्स चे फायदे

आज आपण लिनक्स च्या वापरा संबंधी काही गोष्टींचा विचार करू.
लहान मुलांना जर आपण खेळणी आणून दिली तर ते खेळ शिकतात. शाळेमध्ये देखील मुलांना खेळणी दिली जातात. जर ही खेळणी इतकी महाग झाली कि ते विकत घेणे सामान्यांना परवडेनाशी झाली तर सामन्यांची मुले खेळापासून वंचित राहतील. अशीच काहीशी बाब विंडो आणि सोफ्टवेअर संबंधात आहे.
 ubuntu soft center
आज आपण विंडो वर जे काही सोफ्टवेअर वापरतो त्याचा व्यावसाईक उपयोग करण्यासाठी आपल्याला ते सोफ्टवेअर विकत घेणे बंधनकारक असते. त्यामुळे आपल्या सोफ्टवेअर वापरण्यावर व शिकण्यावर बंधने पडतात. या उलट लिनक्स वर जे सोफ्टवेअर आहेत ते सारे मोफत आहेत, त्यामुळे आपल्याला विनासंकोच नवनवीन सोफ्टवेअर दावून्लोड करून इंस्टाल करून वापरून पाहता येतात. यामुळे आपल्या ज्ञानात ही भर पडते व आपण आपल्याला आवडलेले सोफ्टवेअर आपल्या मित्रांना आणि संबंधिताना विनामूल्य देवू ही शकतो.
हे विंडो वरील सोफ्टवेअर सोबत करता येत नाही. कारण तुम्ही विकत घेतलेला सोफ्टवेअर तुम्हाला फक्त एकाच कॉम्युटर वर वापरता येतो. एकापेक्षा अधिक कॉम्प्युटर वर वापरण्यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजून  वेगळा लायसंस घ्यावा  लागतो. त्यामुळे मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी  त्यांना लिनक्स चा कॉम्प्युटर वापरायला देणे अधिक सयुक्तिक ठरते.    
लिनक्स वापरण्यासाठी आपल्याला आपल्या मानसिकतेत बदल करावा लागेल. कोणीतरी ठरवून दिलेला अभ्यासक्रम ट्युशन लावून पूर्ण करणे आणि कसे तरी जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करणे हे आपल्याकडील शिक्षणाचे स्वरूप आहे.

चला आपण असे समजू कि हे सर्व आवश्यक आहे. तर या सर्वाचा अंतिम परिणाम काय आहे. आतापर्यंत आपल्या शिक्षण पद्धतीने काय साधले याचा आपण विचार करू. आपल्या हे लक्षात येईल कि आपल्या समाजाच्या जीवतोड महेनतीचे फळ म्हणजे एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कामाला लागणे किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये एखाद्या कंपनीमध्ये कामाला लागणे. कदाचित आपण यामध्ये काहीतरी विसरत आहोत. समाज जेव्हा एखाद्या गोष्टीचा विकास व्हावा म्हणून प्रयत्न करतो तेव्हा त्या प्रयत्नाच्या फलस्वरूप त्या समाजाचा ही विकास व्हावा हे आपण गृहीत धरतो. पण आतापर्यंत जेवढी मुले आपल्या देशातून शिकून बाहेरच्या देशात गेली किंवा येथेच कामाला आहेत त्यांनी या देशाच्या किंवा समाजाच्या विकासामध्ये काय हातभार लावला? अगदी नगण्य.  जास्तील जास्त त्या मुलांनी आपला आणि आपल्या कुटुंबियांचा आर्थिक विकास साधला, आणि जो विकास झाला तो ते काम करीत असलेल्या कंपन्यांचा झाला.

मायक्रोसोफ्ट सारख्या कंपन्या ज्या त्यांच्या मालकांना जगातले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनवतात त्यांचा समाजाच्या विकासासाठी काय हातभार लागला? आपण मायक्रोसोफ्ट च्या सोफ्टवेअरचाच विचार करू. आज भारतात एक नवीन संगणक (सोफ्टवेअर शिवाय) विकत घेण्यासाठी जेवढे पैसे खर्च करावे लागतात त्याहूनही अधिक पैसे त्यावरील सोफ्टवेअर साठी खर्च करावे लागतात किंवा पायरेटेड सोफ्टवेअर वापरण्याची नामुष्की सहन करावी लागते.

तर हा मायक्रोसोफ्ट चा सामाजिक विकासासाठी हातभार आहे काय?

कदाचित तुम्हाला हे असे समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला मायक्रोसोफ्ट ची तुलना लिनक्स आणि ओपन सोर्स सोफ्टवेअर शी करावी लागेल. जगातल्या काही संवेदनशील प्रोग्रामर नी अनेक वर्षांच्या सेवाभावी कार्यामधून जे साधले आहे ते मायक्रोसोफ्ट ने अब्जावधी डॉलर आणि हजारो प्रोग्रामर च्या फौजेनेही साधले नाही. याला कारण काय? मायक्रोसोफ्ट ला जास्तीत जास्त पैसा कमवायचा असतो आणि लिनक्स व ओपन सोर्स हे लोकांना विनामुल्य सोफ्टवेअर उपलब्ध व्हावे या सद्हेतूने बनवलेले असतात.

जगात सर्व देशांमध्ये लिनक्स व ओपन सोर्स सोफ्टवेअर चा प्रसार ज्या वेगाने होत आहे ते पाहून आपण आश्चर्य चकित होऊ. जेव्हा मुलांच्या हातात पैशांच्या बंधनात न अडकलेले सोफ्टवेअर लागते तेव्हा त्यांच्या संगणक विषयक ज्ञानात व त्यायोगे त्यांच्या प्रतिभेच्या विकासात जी दैदिप्यमान भर पडते ती बाद अनुभवण्यासारखी आहे. 
मला लिनक्स आणि ओपन सोर्स सोफ्टवेअर ची तुलना ज्ञानेश्वरांनी मराठी मधून ज्ञानेश्वरी लिहून जे कार्य केले त्याबरोबर करावीशी वाटते. ज्याप्रमाणे संस्कृत मधून मराठी मध्ये गीतेचे भाषांतर करून मराठी भाषिकांना गीते चे ज्ञान खुले करून दिले, त्याच प्रमाणे लिनक्स आणि ओपन सोर्स सोफ्टवेअर बनवणाऱ्या ऋषी तुल्य प्रोग्रामर नी संगणकाचे ज्ञान मायक्रो सोफ्ट सारख्या कंपन्यांची मक्तेदारी मोडून सामान्य जनांसाठी कॉम्प्युटर चे सोफ्टवेअर विनामूल्य उपलब्ध करण्याचे कार्य या आधुनिक ज्ञानेश्वरांनी केलेले आहे. संगणकाचे ज्ञान आणि त्याचा उपयोग हा अर्थाधीष्ठीत कंपन्यांच्या हातात राहिल्यास समाजाची उन्नती कधीच होणार नाही. ज्ञान हे सहज आणि सर्वकाळ उपलब्ध असेल तर प्रत्येक जण त्याच आपल्या परीने आपल्या जीवनात उपयोग करून आपले जीवन आनंदमय बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. संगणकाचे ज्ञान हे सार्वत्रिक आणि विनामूल्य उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. सुदैवाने आज आपल्या समोर लिनक्स वापरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचा उपयोग सर्वांनी करून आपल्या आणि आपल्या समाजाची उन्नती साधावी हीच ईश्वरचरणी अपेक्षा.