Wednesday, 23 November 2011

भारतात तयार झालेला जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट कॉम्प्युटर!


sakshat
PR

‘साक्षात’ हे भारतात डिझाइन केले गेलेले ऍण्ड्रॉइड प्लेटफॉर्मवर आधारित टॅबलेट कॉम्प्युटर आहे ज्याची किंमत फक्त 1500 रुपये ($ 5 अमेरिकी डॉलर) घोषित करण्यात आली आहे. तसं तर याचे रिटेल किंमत थोडी जास्त असू शकतं. 

हे उपकरण सूचना व संचार तंत्रविज्ञान द्वारे शिक्षेचे राष्ट्रीय मिशनच्या अंतर्गत विकसित करण्यात आले आहे, ज्याचे उद्देश्य भारताच्या किमान 25000 कॉलेज व 400 महाविद्यालयांना ‘साक्षात’ इंटरनेट पोर्टल द्वारे ई-लर्निंग प्रोग्रॅमने जोडणे आहे. तसं तर जगातील अंतापर्यंतचा सर्वात स्वस्त टॅबलेट कॉम्प्युटर 'एचपी'चा टचपॅड (99 डॉलर) व अमेझॉनच किंडल फायर (199 डॉलर)आहे. 

भारतात 1500 रुपयात तयार झालेला हा टॅबलेट गूगलच्या ऍण्ड्रॉइडवर चालणार आहे, यात एक वर्चुअल कीबोर्ड, कॅमेरा, फुल व्हिडिओ कॅपेबिलिटी, वाय-फाय, कार्ड रीडर आरी 2 जीबीचे इंटर्नल मेमरी असणार आहे. या टॅबलेटचा आविष्कार भारतीय विज्ञान संस्थान आणि भारतीय तंत्रविज्ञान संस्थान आहे व निर्माता एचसीएल इंफोसिस्टम्स हे आहे.
हे सुध्दा शोधा: मराठीत कपिल सिब्बल, साक्षात, ऍण्ड्रॉइड, टॅबलेट कॉम्प्युटर, , इंटरनेट पोर्टल, विज्ञान संस्थान

(recuva) नावाचे हे सॉफ्टवेअर

आपण एखादी फाइल रिसायकल बिनमधूनही डिलीट करतो. पण क्षणार्धातच आपल्या लक्षात येते की आपण ही फाईल चुकून काढून टाकली. अशा डिलीटेड फाइल्स कम्प्युटरमध्येच असतात. पण त्या अदृष्य स्वरूपात. त्या कशा रिकव्हर कराल? साधे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा. रेकुव्हा (recuva) नावाचे हे सॉफ्टवेअर चकटफु आहे आणि त्याचा साइझ आहे फक्त २.२ एमबी. तो डाऊनलोड झाला की त्यावर डबलक्लिक करा व फाइल रन करा. हार्ड डिस्क आणि मेमरी कार्डमधील सर्व फाइल्स स्कॅन होतील आणि सर्व डिलिटेड फाइल्स तुमच्या समोर येतील. त्यातली हवी ती फाइल तुम्ही 'रिस्टोअर' करू शकता. 

इंटरनेटवर फाईल पाठवायची आहे


एक गोष्ट मला खुप दिवसापासुन सतावत होती. ती म्हणजे इंटरनेटवर एखादी फाईल पाठवण्याची. अगदी साधी वर्ड फाईल असुदे किंवा फोटो काही पाठवायचे झाले की माझ्या कपाळावर आठया आल्याच म्हणुन समजा.
पण शेवटी माझा हा प्रश्न सोडवणारा एक उपाय मला सापडलाच ! त्याचे नाव आहे "जेटबाईट्स" (Jetbytes.com)
 जेव्हा पण आपल्याला एखादी फाईल इंटरनेटवर कोठे पाठवायची असते तेव्हा पहीला उपाय आठवतो ते इ-मेलचा. पण ई-मेल वर अटॅचमेंट पाठवायची म्हणजे काही सोपे काम नाही. पहील्यांदा फाईल अपलोड करा, मग ती स्कॅन होईपर्यंत वाट पहा आणि मग पाठवा. आणि फाईलचा आकार आणि त्यामुळे ई-मेल पोचावयास लागणारा वेळ हे नेहमीचे प्रॉब्लेम्स तर असतातच.
दुसरा मार्ग म्हणजे, विविध फाईल शेअरींग साईट्स वर आधी फाईल अपलोड करा. आणि मग त्यांनी दीलेली लिंक पाठवा. फाईलच्या आकारामुळे येणारे प्रॉब्लेम जरी सुटले असले तरी या प्रकाराचे काही तोटे आहेतच. एकतर अशा साईट्सवर रजीस्ट्रेशन करावे लागते आणि फाइल अपलोड होण्यासाठी प्रचंड वेळ लागतो.
पण मित्रहो, जेटबाईट्सने हे सर्व प्रॉब्लेम्स मुळापासुन नष्ट केले आहेत.
        जेटबाईट्स कसे काम करते?
1. http://www.jetbytes.com/ या साईटवर जा.
2. मग तेथुन जी फाईल पाठवायची आहे तिथे जा
. (Browse to the location of file in your computer)
3. Jetbytes लगेचच एक वेबलिंक बनवेल. (फक्त 1-2 सेकंदातच !)

4. ही वेबलिंक कॉपी करा आणि तुम्हाला जिथे पाठवायची असेल तेथे ई-मेल्ल करा
.
5. ई-मेल मिळाल्यानंतर या लिंकवर क्लिक केल्यास त्या फाईलचे आपोआप डाउनलोड सुरु होइल.


1. जेटबाईट्स पुर्णपणे मोफत आहे.

2. अधीक जलद आहे.

3. कोणत्याही रजीस्ट्रेशनची गरज नाही 

4. वापरावयास खुप सोपे आहे. मोफत वस्तुंकडुन यापेक्षा अधीक काय पाहीजे






एका क्लिकने कॉम्प्युटर बंद करा.


आपण जेव्हा कॉम्प्युटर बंद करण्यासाठी 'Turn Off Computer' ची सुचना देतो तेव्हा प्रत्यक्ष्यात कॉम्प्युटरमध्ये 'कॉम्प्युटर बंद होण्याचा प्रोग्राम' सुरु होतो. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण विंडोजमध्ये निरनिराळे प्रोग्राम/सॉफ्टवेअर सुरु करतो त्याचप्रमाणे कॉम्प्युटर बंद करताना देखिल त्याचप्रमाणे बंद होण्याचा प्रोग्राम सुरु होतो.
काम करण्याच्या पद्धतीजरी सर्वांच्या निरनिराळ्या असल्यातरी कॉम्प्युटर बंद करताना सर्वजण एकाच पद्धतीने Start  बटणावरील 'Turn Off Computer' या विभागाद्वारे कॉम्प्युटर बंद करतात
.

१ कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर माऊसने राईटक्लिक करुन येणार्‍या छोट्या चौकोनातील 'New'  या विभागातील 'Shortcut'  या बटणावर क्लिक करा.

२. आता आपल्यासमोर Create Shortcut  चा चौकोन सुरु होईल त्यातील खालील चित्रामध्ये दाखविलेल्या जागेत  Shutdown -s -t 03 -c "Bye Bye !"   हे टाईप करा आणि खालील  Next >  या बटणावर क्लिक करा.

३. आता आपल्यासमोर येणार्‍या चौकोनात खालील चित्रामध्ये दाखविलेल्या जागेत  'Shut Down'  असे टाईप करा व खालील 'Finish'  बटणावर क्लिक करा.

४. आता डेस्कटॉपवर 'Shut Down'  नावाचा आयकॉन तयार होईल. त्याला माऊसने दाबून ( Draging ) विंडोजवरील Task Bar  मधिल ' Quick Launch '  या विभागामध्ये नेवून सोडा. असे केल्याने त्याजागेमध्ये कॉम्प्युटर बंद करण्यासाठी एक शॉर्टकट आयकॉन तयार होईल.

५. बस्स. इतकेच करायचे आहे. आता यापूढे जेव्हा आपणास कॉम्प्युटर बंद करायचा असेल तेव्हा फक्त या छोट्या आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे कॉम्प्युटर बंद होईल.

टीप : याच प्रमाणे कॉम्प्युटर बंद करुन सुरु (Restart) करण्यासाठी Shutdown -t  असे देवून आपण नविन शॉर्टकट आयकॉन बनवू शकता.