Monday, 16 July 2012

गेटपिनकोड.कॉम - पिनकोड मिळवा सहज..


 आजकाल पत्र लिहिली जात नसल्याने आपल्या पोस्टाच्या पत्यामधला पिन कोड काय आहे हे बहुदा अनेक लोकांना माहित नसतं, पोस्ट्ल पत्ता हा जवळ्पास कालबाह्यच झाला आहे. कार्यालयीन लेखी व्यवहारच फक्त होत असतात. आपल्याला साधारणत:  स्वत:च्या कार्यालयाच्या जागेचा, किंवा घराच्या पत्याचाच केवळ लक्षात राहतो.
कधी कधी नवीन ठिकाणी पत्र पाठवायचे असते आणि पत्राचा पत्ता माहित असतो .. पण पिन कोड नक्की माहित नसतो . अशावेळेस या सेवेचा तुम्हाला वापर करता येईल..


http://www.getpincode.info
 तुम्हाला हव्या असलेल्या भागाचा पत्ता इथे टाइप करा आणि  पिनकोड मिळवा. ही सेवा फक्त इंग्रजी शब्दानीच शोध घेते. तसेच आजुबाजूची ठिकाणे ही सुचविते.

मला खात्री आहे तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होइल !

गूगल office !

सकाळची नऊ साडेनऊची वेळ, एका मैत्रिणीचा फोन आला.. 
" हाय, अरे तू परवा कॉम्प फॉरमॅट करून गेलास पण ऑफीस टाकलंच नाहीस "
" हो ... गडबडीत विसरलोच ! "
" आता मला साडे दहा पर्यंत एक प्रेसेंटेशन करून द्यायचय .. काही ही कर आणि मला ते इन्स्टॉल करून दे.. "
" ते शक्यच नाहीय .. कारण् मी पुण्यात नाहीये ! "
" ..  "
" पण तुझ घरचं नेट चालू आहे ना ? "
"हो"
" मग चिंता मिटली .."

" .. "
" गूगल डॉक कधी वापरलं आहेस का ? "

.... त्यानंतर तिच काम सहज झालं आणि मी ही सुटलो ! ..

गूगल डॉक्युमेट्स हे अत्यंत उपयोगी आणि सर्वात महत्वाचे "फुकट" असे साधन आहे. पूर्वी उमेदवारी करणारे तरूण आपापला resume स्वत:लाच इमेल करून ठेवायचे . काही जण आताही करतात .. किंवा काही महत्वाचे डॉक्यूमेंट्स प्रेझेंटेशन्स .. किंवा हिशेबाची स्प्रेड्शीट्स ही त्यांचा पाठसाठा [backup] म्हणून करून ठेवायची .. तर ते दिवस आता गेलेले आहेत. तुम्ही गूगल्च्या साहाय्याने ऑनलाईन सर्व महत्वाच्या फाईल्स - कागद्पत्रे सुरक्षित ठेवू शकता आणि नवीन तयार ही करू शकता ! 


अधिक माहिती. : 
Document - वही - हा प्रकार लेखन आणि गद्य पद्य लिखाण, साहीत्य अशा प्रकाराशी निगडीत आहे. यात टंकलेखन [typing] हा महत्वाचा भाग असतो. लेखक, शास्त्रज्ञ, कवी, माहीतीगोळा करणारे या प्रकाराचा जास्त वापर करतात. या वहीला अनंत पाने असतात आणि खाडाखोड होतच नाही .. कागद वाचतो तो वेगळाच असे याचे अनेक फायदे आहेत.


Spreadsheet - हिशेबवही, खतावणी. - मुख्यत: हा प्रकार सारण्या [Tables] शी संबंधीत असल्यामुळे या प्रकाराचा वापर हिशोब, नोद्ण्या, किंवा गणिती वापरासाठी होतो. या प्रकाराचा वापर ही भरपूर प्रमाणात होतो. यात काही सूत्रे योग्य जागे बसवली की बाकीची गणिते आपोआप केली जाऊ शकतात. तसेच काम ही भराभर होते.. काहीजण याल excel sheet असेही म्हणतात.


Presentation- slide show - तक्ते, हा प्रकार मुख्यत्वे करून जिथे कमी शब्दात, आकर्षकपद्धतीने माहीती द्यायची गरज असते त्याठिकाणी वापरला जातो. उदा. कॉन्फरेंस मधे, किंवा जाहिरातीसाठी, संदेश देण्यासाठी, लहान मुलांना समजवण्यासाठी ही ह्या प्रकाराचा वापर केला जातो. पूर्वी ज्या प्रकारे एक एक फोटो, चित्र दाखवून एखादी गोष्ट सांगितली जात असे त्याचेच हे आधुनिक स्वरूप आहे.


या करता तुम्हाला फक्त एक gmail चे खाते काढावे लागते. बाकी काही ही लागत नाही. जर तुम्ही आधीच gmail वापरकर्ते असाल तर फक्त खालील दुव्यावर टिचकी मारा आणि तुमचा नाव व परवलीचा शब्द [ username & password ] टाका आणि तुमच्या समोर गूगलच्या या सेवेच मुख्यपान उघडेल ज्यात तुम्ही लिहीलेल्या, नवीन तयार केलेल्या सर्व वह्या, तक्ते, हिशेबसारण्या[Documents, Presentations, Spreadsheets] कालानुक्रमे दिसतील. जशा खालील चित्रात दिसत आहेत. यात new वर गेलात की तुम्हाला नवीन काय काय बनवता येते ते कळेल .. आपण उद्याला एखादी वही [Document] बनवू या .. तो पर्यंत

धीर धरी .. धीर धरी .. !

consumermate.com तुमच्या पसंतीचा मोबाइल निवडा सहज !





आज दोघातिघा मित्रांनी फेसबुक वर विचारलं होतं की मोबाइल घ्यायचा आहे. कोणतं मॊडेल सुचवशील ?
..
काल माझ्या मामेभावाचा दुकानातून फोन...
अरे कोणता कॅमेरा तु सजेस्ट केला होतास मागे ..
आता इथे तर इतकी  मॉडेल्स आहेत कोणता घ्यावा ते कळत नाहीय...

यासगळ्याना मी एक वेबसाईट सांगितली तीच इथे पण सांगत आहे ..

http://www.consumermate.com/

इथे तुम्ही तुमच्या बजेट नुसार आधि कोणत्याही वस्तूची वर्गवारी करू शकता व नंतर त्याची गुणवैशिष्ट्य पडताळून योग्य तो निर्णय घेऊ शकता. फक्त मोबाईलच नव्हे तर लॅपटॉप, कॅमेरे, प्लाज्मा टीव्ही, एम्पी३ प्लेअर सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता.. 
ह्या सारख्या अनेक वेबसाईट्स आहेत त्यांचाही वापर करून तुम्ही अचूक हवी ती वस्तू विकत घेण्याचा निर्णय घेऊ शकता. 

  1. http://www.flipkart.com
  2. http://www.naaptol.com
  3. फक्त मोबाइल साठी
     http://mobileinindia.in/
  4. http://www.gsmarena.com/
  5. फक्त कॅमेराज साठी
    http://www.dpreview.com/products/compare/cameras

google - take out



सध्या गूगल ने इतक्या नवनवीन सोयी आणल्या आहेत की त्याशिवाय इतर लिहिणंच चूक ठरणार आहे. गूगल टेक आऊट ही एक अशी सुविधा आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची पूर्वीचा गूगलच्या सर्व्हरवर साठवलेली छायाचित्रे, संपर्क, बझ् पोस्ट्स, गूगल प्रोफाइलवरील सर्व माहिती तुमच्या संगणकावर बॅकअप म्हणून उतरवून घेऊ शकता. हे करण्यासाठी कसलेही मूल्य आकारण्यात येत नाही.
पुढील काही कृतींमधून तुम्ही हे सहज साध्य करू शकाल.




https://www.google.com/takeout/
इथे जा.  नेहमीच्या गूगल खात्याच्या नाव व पासवर्ड्ने लॉग इन करा. 



त्यानंतर तुम्हाला वरील स्क्रीन दिसेल,


 त्यात सर्व माहितीचा एकच आर्काइव्ह किंवा संच उतरवून घेता येतो. 



इथून तुम्हाला ठराविक सेवेची माहितच फक्त डाऊनलोड करता येइल. 


आधी सेवांवर टिचकी मारा व त्या नंतर क्रीएट आर्काइव्हवर.


त्यानंतर डाऊनलोड विझार्ड सुरु होते


  
 आधी तुमची माहिती लोड होत आहे असे दाखविले जाते. 
लोडिगचा करडा रकाना लाल झाला कि तुम्हाला परत एकदा क्रीएट आर्काइव्ह वर टिचकी मारायची आहे. 
त्यानंतर ही माहिती डाऊन लोड ला उपलब्ध होते. 
आता फक्त डाऊनलोड वर टिचकी मारा आणि तुमच्या माहितीचा एक बॅकअप


 तुमच्या संगणकावर उतरवून घ्या. 

फेसबुक - व्हिडीओ चॅट




गूगल प्लस च्या व्हिडीओ चॅटच्या येण्यानं असलेले ग्राहक टिकवता टिकवता फेसबुकच्या तोंडाला फेस येऊ शकतो हे जेव्हा फेसबुक चालकांच्या लक्षात आलं, तेव्हाच त्यांनी ही सेवा लवकरात लवकर ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्याच त्यांनी ठरवलं व तसं मार्क झुकेरबर्ग फेसबुकच्या निर्मात्याने नुकतच जाहीरही केलत्याच्या म्हणण्यानुसार या आठवड्यातच स्काईप या व्हिडीओ चॅटिंग साठी प्रसिद्ध असलेल्या सेवेला सोबत घेऊन फेसबुकने ही सेवा सुरु केलेली आहे.

फेसबुक चॅटला सुरु करण्यासाठी तुम्हाला पुढील लिंकवर जायचे आहे.
https://www.facebook.com/videocalling/
https://www.facebook.com/videocalling/
त्यातील get started वर टिचकी मारा , त्यानंतर तुम्हाला एक छोटे प्लगिन उतरवावे लागेल व ते रन करावे लागेल. जसे ते प्रक्रिया पूर्ण करेल ते तुम्हाला सांगेल कि तुम्ही व्हिडीओ कॉल साठी तयार आहात.



त्यातील get started वर टिचकी मारा , त्यानंतर तुम्हाला एक छोटे प्लगिन उतरवावे लागेल व ते रन करावे लागेल. जसे ते प्रक्रिया पूर्ण करेल ते तुम्हाला सांगेल कि तुम्ही व्हिडीओ कॉल साठी तयार आहात.



त्यानंतर नेहमीची चॅट विंडो किंवा कोणाचीही प्रोफाईल उघडा व त्यामधे तुम्हाला काही बदल दिसतील. फेसबुकने काही डिझाइन मधे ही बदल केले आहेत. पूर्वी पेक्षा खुपच स्वच्छ व मोकळं चॅट विंडो डिझाईन केले आहे.  चॅट विंडोच्या वर तुम्हाला शेजारील चित्राप्रमाणे चिन्हे दिसतील , त्यातील कॅमेर्‍याच्या चित्रावर टिचकी मारा .. त्या व्यक्ती ला कॉल जातो आणि [ तुमच्याकडे व  त्या व्यक्तीकडे जर वेबकॅम व ध्वनिवर्धक [michrophone] असेल तर ] ती तुम्हाला व तुम्ही त्याना दिसु शकता व सोबत बोलु ही शकता.. यात ग्रुप चॅटिन्ग [group chat] ची सोयही आहे...
facebook + skype window for video chat.
google + ला टक्कर म्हणून हे फेसबुकचे पहिले पाऊल आहे. अजुन ही नवीन फीचर्स येतील तेव्हा परत पाहूच