Saturday, 3 December 2011

14 मार्चला इंटरनेट एक्स्प्लोअरर 9 येतोय..



पण थांबा, तुमच्या संगणकावर WINDOWS XP असेल तर तुम्हाला नवा कोरा इंटरनेट एक्स्प्लोअरर 9 लावता येणार नाही. कारण तो WINDOWS XP सपोर्ट करीत नाही.
तुम्हाला त्यासाठी WINDOWS VISTA अथवा WINDOWS 7 तुमच्या संगणकावर लावावं लागेल.
नवे IE9 हे  HTML 5 ने युक्त आहे. शिवाय नवे जावास्क्रीप्ट इंजिन (JSCRIPT) ची साथ त्याला असणार आहे. ह्या इंजिनचे नाव आहे CHAKRA.
गेल्या महिन्यात 10 फेब्रुवारी रोजी मायक्रोसॉफ्टने IE9 चा रिलीज कँडिडेट इंटरनेटवर सादर केला होता. आता 15 मार्चला येतेय ती अंतिम आवृत्ती, तुमच्या आमच्या सर्वांसाठी.
पण, आता विंडोज 7 कडे गेल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण IE9 आणि HTML5 चा लाभ घ्यायचा असेल तर दुसरा मार्ग नाही. FACEBOOK, TWITTER वापरत असाल, YOU TUBE चे फॅन असाल तरी तुम्हाला लवकरच WINDOWS 7 चा आधार घ्यावा लागणार आहे.

ब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सविस्तर माहिती कुठे मिळेल

Blu (Blue नव्हे) Ray Disk ह्या DVD च्या पुढलं पाऊल म्हणून ओळखल्या जातात. दोघांचा वापर, आकार आणि दिसणं सारख्याच पद्धतीचं असल तरी क्षमता आणि इतर काही मुद्दे यात खूप फरक आहे. आजच्या Singe sided DVD वर ४.७ जी.बी. चा डेटा राहू शकतो, किंवा साधारणतः दोन तासाचा चित्रपट त्यात मावू शकतो. Single sided Blu Ray Disk त्या तुलनेत एखाद्याडायनॉसोरससारखी आहे. त्यावर २७ जी.बी.चा डेटा किंवा तेरा तासांचा व्हिडीओ त्यात मावू शकतो.

डीव्हीडी १९९७ साली, तर ब्लू रे डिस्क २००६ साली बाजारात आली.
डीव्हीडी मध्ये लाल (Red) रंगाचे लेसर किरण डिस्क वाचण्यासाठी वापरले जातात. ब्लू रे डिस्कमध्ये मात्र निळ्या रंगाचे लेसर किरण वापरले जातात. त्यावरूनचत्याला Blu हे नाव मिळाले. वस्तुतः Blue Ray चे ट्रेड मार्क म्हणून रजिस्ट्रेशन करावयाचे होते. पण नियमाप्रमाणे शब्दकोशातील शब्दाचे ट्रेड मार्क म्हणून रजिस्ट्रेशन होऊ शकत नसल्याने Blue मधील e काढून टाकण्यात आला. Blu ह्या स्पेलींगमागील गोम ही अशी आहे.

अधिक माहिती http://www.blu-ray.com/ ह्या साईटवर उपलब्ध आहे.

पीडीएफ एडिट करायचीय? ही घ्या वेब ट्रीक.

परिस्थिती आणि पीडीएफ सांगून येत नाहीत म्हणतात. होतं असं की कुणीतरी पीडीएफ पाठवतं. आपल्याला ती वाचायची असते. वाचता वाचता त्यात दिसतात स्पेलींगच्या घोडचुका. आपल्याला मोह होतो. त्या तिथल्या तिथे सुधारण्याचा. पण पीडीएफ फाईल ती. एडिट करायची कशी? त्याला पीडीएफ एडिटर हवा. अक्रोबॅट हवा. आपल्याकडे पीडीएफ एडिटर नसेल किंवा काही कारणाने तो चालत नसेल तर?. करायचं काय? अशा परिस्थितीता उपयोगी पडणारी एक वेब साईट आहे. तिचं नाव आहे -


तिथे जाऊन आपली पीडीएफ फाईल अपलोड करायची. आपला ईमेल पत्ता द्यायचा. .doc मध्ये किंवा rtf मध्ये रूपांतरीत झालेली आपली पीडीएफ फाईल आपल्याला ईमेलने पाठविली जाते. मग रूपांतरीत झालेल्या त्या doc/rtf फाईलला आपल्या वर्डमध्ये किंवा ओपन ऑफिस मध्ये किंवा कोणत्याही वर्ड प्रोसेसरमध्ये उघडायचं आणि ती एडिट करायची. खटकलेली स्पेलींग्ज वगैरे सुधारायची आणि पुन्हा त्या वर्डची पीडीएफ करून घ्यायची.

सुप्रसिद्ध NITRO PDF ची ही सेवा आहे. पीडीएफ चं doc किंवा rtf रूपांतर अतिशय तंतोतंत होतं असा त्यांचा दावा आहे. आपल्याला अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही. कारण ही सेवा मोफत आहे.

Parental software - एक कौटुंबिक गरज

Parental Filter ह्या नावाचं मोफत आणि माझ्या मते उत्तम असं सॉफ्टवेअर तुमच्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध आहे.http://www.ecommsec.com/pf/PfSetup30.exeह्या लिंकवर क्लीक केलत की Parental Filter चा डाऊनलोड सुरू होईल. केवळ २.१ एम.बी. आकाराचं हे डाऊनलोड आहे. त्यामुळे ते पटकन डाऊनलोड होतं. डाऊनलोड पूर्ण झाल्यानंतर इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशन नंतर तुमच्या पुढे खालील स्क्रीन येईल.


त्यातील वरच्या बाजूस असलेल्या उजवीकडील लाल आयतावर (Banlist Off) वर क्लीक करा. म्हणजे तो चौकोन हिरवा होईल आणि Banlist On होईल. याचा अर्थ तुमचं Parental Filter चालू झालं. Pornography किंवा अश्लील प्रकारच्या वेबसाईटस उघडायचा प्रयत्न झाल्यास त्या उघडणार नाहीत. Page can not be displayedअसा संदेश मिळेल.
Parental Filter ने हजारो पोर्न व तत्सम साईटसची यादी केली आहे, आणि त्यांचा समावेश Banlist मध्ये केला आहे. दरमहा त्यात नवनव्या साईटसची भर पडत असते. त्यामुळे तुम्ही Banlist महिन्यातून एकदा जरूर अपडेट करा.
आता, शेवटची पण सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे पासवर्डची. तुम्ही लावलेलं Parental Filter कुणीही काढू नये यासाठी पासवर्डची व्यवस्था आहे. पासवर्ड लावण्यासाठी खाली दाखवलेल्या खुणेवर क्लीक करा.

आता समोर आलेल्या खालील विंडोमध्ये तुमचा पासवर्ड द्या.

हा प्रोग्राम बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. पण तो फार मोठ्या प्रमाणावर साईटस बॅन करतो अशी टीका काही जण करतात. ज्या अर्थी तो लोकप्रिय आहे, त्याअर्थी आपण टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे हेच बरे.