धुळे- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळ, मुंबई यांच्याकडून आतापर्यंत एकूण 18 विश्वकोशांची निर्मिती करण्यात आली असून, सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत विश्वकोशाचा 19वा खंड ‘सृष्टी आणि मानव’ या विषयावर येणार आहे. तसेच संगणकाचे महत्त्व लक्षात घेऊन संगणकीय बालकोश व बालकथा, जातककथा, पंचतंत्र, पुराण कथा, इसापनीती हे सर्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे या दृष्टिकोनातून मंडळाकडून लवकरच कथाकोशची निर्मिती होणार आहे, अशी माहिती डॉ.विजया वाड यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
त्या म्हणाल्या की, लहान मुलांना संगणकाबाबत येणार्या अडचणी, नवीन तांत्रिक गोष्टी, इंटरनेट सर्चिंग व अन्य अथपासून इतिपर्यंतच्या गोष्टी समजाव्यात यासाठी मराठीत संगणकीय बालकोश येणार असून, त्यात ही सर्व माहिती दिली जाणार आहे. याशिवाय नव्या पिढीला इसापनीती, पंचतंत्र, विज्ञानकथांसह मराठी कथांचा ठेवा मिळावा यासाठी कथाकोशाचीही निर्मिती केली जाणार आहे. या कथाकोशात लहान मुलांना प्रेरणा देणार्या देशातील 11 महान व्यक्तींच्या कथांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यात रवींद्रनाथ टागोर, भा.रा.भागवत, साने गुरुजी आदींचा समावेश आहे. लवकरच हे कोश बच्चे कंपनीच्या भेटीस येतील. यापूर्वीही राज्य विश्वकोश मंडळाने विश्वकोशाचे 9 खंड युनिकोडच्या माध्यमातून जगासमोर आणले आहेत. त्यासाठी पुण्यातील सी-डॅकचे महेश कुलकर्णी व संगणकतज्ज्ञ माधव शिरवळकर यांचे बहुमोल सहकार्य मिळाले आहे.
सीडीज्चे वजन केवळ 450 ग्रॅम
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळाकडून युनिकोडचा वापर करून ऑनलाइन विश्वकोश तयार होत आहेत. तसेच सर्व खंडांचे रूपांतर सीडीमध्ये होत आहे. आतापर्यंत आलेल्या सर्व विश्वकोश खंडाच्या सीडीज बाजारात उपलब्ध असून, त्यांची किंमत केवळ 750 रुपये इतकी आहे. तसेच वजन केवळ 450 ग्रॅम आहे. हा सीडीरूपी ज्ञानाचा खजिना लहानशा बॅगेत घेऊन फिरता येते. सर्वांसाठी उपयुक्त असा हा खजिना आहे.
पोर्टल 22 देशांत प्रसिद्ध
विश्वकोश मंडळाच्या वेब पोर्टलला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 22 देशांतून 2 लाख 80 हजार हिट्स या वेबसाइटला मिळालेल्या आहेत. भविष्यात संपूर्ण 19 खंड व इतर कोश युनिकोडच्या माध्यमातून जगासमोर आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मंडळाकडून विश्वकोश मंडळाच्या प्रचार-प्रसारासाठी सर्वंकष प्रय} सुरू असून, विविध प्रकारच्या स्पर्धा, सीडीज्मध्ये विश्वकोश इ.ला प्रोत्साहन देण्याचे काम होत आहे. बाहेरदेशांत एनसायक्लोपीडिया-ब्रिटानिका या विश्वकोशांना खूप महत्त्व आहे; परंतु मराठी विश्वकोश त्या प्रमाणात अभ्यासले जात नाहीत. त्यामुळे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रपातळीवर विश्वकोशनिर्मितीसाठी प्रय} केले जाणार आहेत.
Thursday, 13 September 2012
लहानग्यांसाठी येतोय संगणक बालकोश!
डायबेटीसची माहिती देणाऱ्या दोन उत्तम लिंक्स
निळं वर्तुळः मधुमेहाचं आंतरराष्ट्रीय प्रतीक |
आपली अशी कल्पना असते की आपल्याला डायबेटीस म्हणजे काय हे नीट माहित आहे. स्वादुपिंड, इन्शुलिन, शुगर लेव्हल्स, शुगर हाय होणं म्हणजे काय, डायबेटीसने जखम लवकर बरी होत नाही वगैरे ज्ञान वाचून, ऐकून किंवा टीव्हीवर पाहून आपल्याकडे जमा झालेलं असतं. पण ह्या बाबतीत धोक्याची सुचना ही की हे जमा झालेलं ज्ञान अपुरं, अर्धवट किंवा क्वचित गैरसमजावर आधारलेलंही असू शकतं.
डायबेटीस संबंधी, ज्या माहितीवर विसंबून राहता येईल, अशा दोन साईटस (खरं तर पेजलिंक्स) मी नेहमीच संदर्भासाठी वापरत असतो. त्यातली पहिली लिंक म्हणजे - How Diabetis works. ह्या पहिल्या लिंकमध्ये डायबेटीस म्हणजे नेमकं काय हे सांगितलेलं आहे. 300 पानी पुस्तक वाचून जे ज्ञान तुम्हाला मिळेल ते ह्या पाच पानी लेखात सामावलेले आहे. तुम्हा आम्हा सामान्यांना तेवढं ज्ञान पुरेसं असतं.
दुसरी लिंक आहे - How Diabetic Diets Work. ह्यात डायबेटीस संबंधी आहार आणि विहाराची चांगली माहिती आहे. हा लेख छोटा आहे. तो अमेरिकन लेखकाने लिहीलेला असल्याने त्यात आपले आयुर्वेदिक उपचार तसेच योगोपचाराची माहिती त्यात नाही. मात्र, त्यातील मुलभूत माहिती सर्वांनाच खूप उपयुक्त वाटेल.
ह्या दोन लिंक्स आपण जरूर वाचा. डायबेटीस संबंधी एखादा गैरसमज तुमच्या मनात वर्षोनुवर्षे रूजलेला असेल तर तो नक्कीच दूर होईल.
Subscribe to:
Posts (Atom)