Tuesday, 19 June 2012

‘पेपाल’चे खाते कसे काढायचे?


मागे साधारण दोन वर्षांपूर्वी मी पेपालचे खाते काढायचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी मला ते एक अतिशय अवघड काम वाटलेलं. माझ्याजवळ ‘क्रेडिट कार्ड’ नसल्यामुळे सर्वकाही जरा जास्तच अवघड होऊन बसलेलं. त्यावेळी कदाचीत पेपालची भारतीय आवृत्ती नुकतीच विकसत होऊ लागलेली. कारण त्यांनी मला मागाहून पॅन कार्ड नंबर देखिल मागितलेला. मी माझा पॅन कार्ड नंबर दिला, पण त्यावेळी माझे बँक खाते मी पेपालशी जोडू शकलो नाही.  तसं ते व्हेरिफाय करणं मलाच कळाले नाही की, पेपालच्या वेबसाईट इंटरफेसची ती चुक होती, मला माहित नाही. पण खूप प्रयत्न करुनही जमले नाही म्हटल्यावर, शेवटी सर्व नवीन असल्याने काहीही धोका पत्कारायला नको म्हणून मी माझे पेपाल खातेच पुरते डिलिट करुन टाकले. त्यानंतर दोन वर्ष मी काही पेपालच्या नादी लागलो नाही. पण सध्या मी एका साईटवर लिहित आहे, आणि त्याचा मोबदला म्हणून मला जे पैसे मिळणार आहेत, त्यासाठी पेपाल हा एकच मार्ग त्यांनी दिलेला. चेकचा पर्याय त्या तिथे उपलब्ध नव्हता. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा पेपालसाठी एक प्रयत्न करायचं ठरवलं आणि यावेळी मी यशस्वी झालो! पेपालचं ‘व्हेरिफाईड’ खातं काढायचं आहे? ते कसं काढता येईल, ते मी खाली सांगत आहे.

पेपाल चा उपयोग काय?


पेपाल
इंटरनेटच्या माध्यमातून सुरक्षितरीत्या पैशांची देवाण घेवाण करण्याच्या कामात पेपालचा उपयोग होतो. आपण जर पेपालच्या माध्यमातून इंटरनेटवर खरेदी करत असाल, तर अशावेळी आपला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड नंबर पेपाल जवळ सुरक्षीत राहतो. विक्रेता आणि खरेदी करणारा या दोघांचे खाते क्रमांक, कार्ड नंबर इ. ची गोपणीय माहिती पेपाल आपल्याजवळ सुरक्षीत ठेवतो. त्यामुळे इंटरनेटवर कोणताही धोका न पत्करता आपल्याला पैशांचे व्यवहार करता येतात. अर्थात प्रत्येक व्यवहारासाठी पेपाल काही नाममात्र दर आकारतो. सुरक्षेततेची हमी दिल्याचा हा मोबदला असतो.

पेपालचे खाते कसे काढता येईल?

त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पेपाल वर जावं लागेल. Sign Up वर क्लिक करा. इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी अथवा पैशे पाठवण्यासाठी आपण पेपालचे Personal Account काढणार आहोत. Personal च्या खाली Get Started वर क्लिक करा. आता एक फॉर्म आपल्या समोर असेल, तो आपल्याला भरायचा आहे. पेपालला आपली माहिती पुरवत असताना ती अचूक असेल याची काळजी घ्या. आपला ईमेल पत्ता द्या. हा नंतर आपल्या पेपाल अकाऊंट नंबर सारखा वापरला जाईल. त्यामुळे वापरात असलेला ईमेल पत्ता द्या. त्यानंतर पेपाल खात्यामध्ये शिरण्यासाठी वापरण्यात येईल, असा पासवर्ड द्या. आपले नाव, आपल्या वडिलांचे नाव, आडनाव, हे न चुकता काळजीपूर्वक भरा. आपली अधिकृत जन्मतारीख द्या. Nationality India  निवडा. आपला योग्य पॅन कार्ड क्रमांक काळजीपूर्वक लिहा. आपण आत्ता रहात असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता काळजीपूर्वक नमूद करा. आणि आपण सध्या वापरत असलेला फोन नंबर लिहा.

पेपाल मार्फत पैसे पाठवण्यासाठी काय लागते? 

आपण आपला फोन नंबर लिहिलेला आहे. आता पेपाल मार्फत आपल्याला पैसे पाठवायचे असतील, तर त्यासाठी आपण पेपालला आपल्या क्रेडिट अथवा डेबिड कार्ड विषयी माहिती पुरवणं आवश्यक आहे. यासाठी आपल्याकडे Visa, MasterCard, Discover, AMEX (American Express) या चार पैकी एक कार्ड असणं आवश्यक आहे. आपल्याकडे क्रेडिट कार्ड असेल, तर काहीच समस्या नाही. पण मला वाटतं डेबिट कार्डची सुविधा भारतातील लोकांसाठी नाही. आपल्याकडे वर नमूद केलेल्यापैकी जर एखादे कार्ड असेल, तर त्या कार्डचा क्रमांक द्या, त्या कार्डची Expiry Date नमूद करा, CW क्रमांक सांगा. हा CW क्रमांक कसा पहायचा हे त्या तिथे Whats this? मध्ये सांगितलेले आहे.

आपल्याकडे जर क्रेडिट कार्ड नसेल अथवा वरीलपैकी कोणतेच कार्ड नसेल, तर त्याबाबतचे पर्याय सोडून द्या आणि Agree and Create Account वर क्लिक करा. मी माझं पेपालचं खातं आधिच काढलेलं असल्याने, आता माझ्यासमोर पुढचं पान आलेलं नाहीये. पण मला आठवतं त्याप्रमाणे ते आता क्रेडिट कार्ड क्रमांक आणि बिलिंग पत्याविषयी विचारत असतील. क्रेडिट कार्ड असलेल्यांनी बिलिंग पत्याची खात्री करावी. बाकीच्यांनी या पानाकडे दूर्लक्ष करण्यास हरकत नाही. या इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आपल्याला जर पेपाल मार्फत पैसे पाठवायचे असतील अथवा खरेदी करायची असेल, तर मात्र वरील पैकी एखादे कार्ड आपल्याजवळ असणे आवश्यक आहे, नाहीतर पैसे देण्याचे, पाठवण्याचे व्यवहार आपण करु शकणार नाही.

पेपाल मार्फत पैसे स्विकारण्यासाठी काय लागते?

आपण पेपालचं खातं तर तयार केलं आहे. पण अजून ते व्हेरिफाय व्हायचं आहे. प्रथम पेपालसाठी आपण जो ईमेल पत्ता दिला आहे, ते ईमेल खाते उघडा. तिथे पेपालचा ईमेल व्हेरिफाय करण्याबाबत मेल आला असेल. त्या मेल मधील दिलेल्या लिंकवर क्लिक करुन आपला ईमेल पत्ता पेपाल बरोबर व्हेरिफाय करुन घ्या.

पेपाल मार्फत पैशे स्विकारण्यासाठी आपल्याला आता आपले बँक खाते पेपाल सोबत व्हेरिफाय करणं आवश्यक आहे. पेपाल साईटच्या साईडबारमध्ये आपल्याला त्यासंबंधीत पर्याय दिसून येतील. आपण पेपालचे खाते काढताना जे नाव दिलं आहे, ते आपल्या बँक खात्याशी संबंधीत नावाशी जुळायला हवं. आपल्या बँक खाते क्रमांक द्या आणि त्यानंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरु होईल.

पेपाल व्हेरिफिकेशन प्रोसेस काय आहे? 

यानंतर ४ ते ५ दिवसांत पेपाल आपल्या खात्यावर १.५० रुपया, २ रुपये अशा अत्यंत छोट्या रकमेचे दोन डिपॉझिट्स पाठवेल. आपल्याला आपल्या खात्यावर पेपाल मार्फत आलेल्या या रकमा लक्षात ठेवून, पेपालच्या साईटवर दिलेल्या जागेत नमूद करायच्या आहेत. आणि मग आपली व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण होईल. आपले जर ऑनलाईन नेट बँकिंग खाते असेल, तर अतिशय उत्तम! पण जर नसेल तरी काही हरकत नाही. ऑनलाईन नेट बँकिंग खाते असल्याचा फायदा हा की, आपल्याला त्वरित डिपॉझिट रक्कम पाहता येईल. माझ्या खात्यावर पेपाल मार्फत पैशे येण्यास ३ दिवसांचा कालावधी लागला. दरम्यान मी दिलेल्या पॅनकार्ड क्रमांकाचीही त्यांनी खातरजमा करुन घेतली होती. एकदा व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपण पेपाल मार्फत पैशे स्विकारण्यास तयार आहात. आपण पेपालसाठी दिलेला ईमेल पत्ता हाच आपला पेपालचा खाते क्रमांक आहे. 

पेपालचे दर

खालिल चित्राच्या माध्यमातून आपल्याला पेपाल आकारत असलेल्या दराचा अंदाच येईल. अधिक माहितीसाठी या दुव्याचा आधार घ्यावा. पेपालचे अकाऊंट काढणं आणि पैसे पाठवणं हे मोफत असून, पैसे स्विकारण्यासाठी मात्र पेपाल काही टक्के दर आकारतो.

पेपालचे दर
तर ही पेपालशी संबंधित काही माहिती होती. आपल्याला जर काही समस्या आली, तर ती आपण खाली प्रतिक्रेयेच्या माध्यमातून मांडू शकाल. 


Tuesday, 12 June 2012






तुमच्या घरचे वायरलेस(Wi-Fi) नेटवर्क कसे सुरक्षित ठेवाल? भाग २






तुमच्या परिसरातील इतर संगणकाना तुमचे इंटरनेटचे कनेकशन वापरता येवू नये म्हणून तुमचे वायरलेस सिग्नल encrypt करा..सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर...दुसर्या संगणकाना कळणार नाही अश्या भाषेत बदला.
आता झाली ना पंचाईत..ते कसे करायचे बुवा???...ते अगदी सोप्पे आहे.
वायरलेस नेटवर्क मध्ये र्याच Encryption पद्धती उपलब्ध आहेत. उदा.
WEP, WPA (WPA-Personal), WPA2 (Wi-Fi Protected Access version 2).
यातील WEP पद्धत बेसिक आहे त्यामुळे सहज क्रॅक करता येण्यासारखी आहे..पण ही पद्धत सर्व जुन्या उपकरणांमध्ये वापरता येण्यासारखी आहे..
WPA2
पद्धती अधिक सुरक्षित आहे पण फक्त २००६ नंतरच्या उपकरणांमध्येच वापरता येते.
मुख्यता तुमच्या नेटवर्कचे "SSID(वायरलेस नेटवर्क नाव)" "default" म्हणजे आधी पासून दिलेले असते किंवा तुमच्या router च्या ब्रान्ड प्रमाणे दिलेले असते (उदा.linksys).तुमच्या router च्या सेटिंग पानावर basic wireless settings मध्ये जावून तुम्ही तुमच्या नेटवर्कचे SSID बदलू शकता...त्यामुळे दर वेळी नेटवर्क मध्ये कनेक्ट होताना तुम्हाला ते कोणते नेट्वर्क आहे याची माहीती मिळते.म्हणजे तुमच्या परिसरात पेक्षा जास्त वायरलेस नेटवर्क असतील तर आपण आपल्याच नेटवर्क आहोत हे त्यामुळे कळते.
कृपया तुमचे नाव,पत्ता किंवा खाजगी माहिती SSID साठी वापरू नका.
हॅकर काय करतात?
inSSIDer (Windows)
आणि Kismet (Mac, Linux) सारखी Wi-Fi स्कॅनिंग टूल्स नेट वर मिळतात ती वापरून कोणी ही एखाद्या परिसरातील उपलब्ध असलेल्या Wi-Fi नेट्वर्कची माहीती मिळवू शकते.

४)नेटवर्क
Encryption चा वापर करा:
तर इंटरनेट वरचा पब्लिक डेटाबेस वापरून router चे default यूसरनेम आणि पासवर्ड मिळवतात.
उदाहरनार्थ : Linksys चे router त्याचे default यूसरनेम आणि पासवर्ड जे admin हे आहे ते वापरून कोणीही तुमच्या router च्या सेटिंग बदलू शकते...त्यामुळेच default values बदली केल्याना तुमचा router अधिक सुरक्षित होतो.
)तुमच्या नेटवर्कचे "SSID(वायरलेस नेटवर्क नाव)" नाव बदला:
एकदा का तुम्ही router च्या सेटिंग पानावर लॉग-इन झालात की पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमच्या router चा "default password" बदली करणे...तुमच्या router च्या सेटिंग पानावरच्या Administration settings वर जावून तुम्ही तो बदलू शकता.default values य़ा शक्यतो admin / password अश्या असतात..त्या बदली केल्याने तुमचा वायरलेस router अधिक सुरक्षित होईल.
तुमचे नेटवर्क हॅक करणारे नेमके करतात काय
प्रथम तुम्ही हे जाणून घेणे गरजेचे आहे की तुमच्या वायरलेस router च्या सेटिंग कश्या बदलाव्यात...त्यासाठी तुमच्या वेब ब्राउसर मध्ये १९२.१६८.. टाईप करा..मग जे पेज ओपन होईल तिथे तुमच्या वायरलेस router चे user name आणि password टाईप करा...तुमच्या वायरलेस router च्या निर्मात्या प्रमाणे ते भिन्न भिन्न असू शकतात....त्यासाठी तुम्ही तुमच्या router चे user manual पाहू शकता.जर ते तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याचा शोध गूगल वर घेवू शकता.
काही प्रसिद्ध router brands – Linksys, Cisco, Netgear, Apple AirPort, SMC, D-Link, Buffalo, TP-LINK, 3Com, Belkin हे आहेत.
)तुमच्या router चा पासवर्ड बदला:
तुमच्या घरातील वायरलेस नेटवर्क कसे असुरक्षित असते ते आपण मागच्या भागामध्ये पाहिले आता थोडीशी काळजी घेतली तर ते कसे सुरक्षित करता येईल याची माहिती आपण या भागात करून घेवू...
खाली दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही तुमचे वायरलेस नेटवर्क सुरक्षित ठेवू शकता.
) तुमच्या router च्या सेटिंग बदला: