Thursday, 15 December 2011

जगातून कुठूनही चालवा आपला कम्प्युटर!

1) सध्या आपला कम्प्युटर आपली अतिमहत्त्वाची वस्तू बनलेली आहे. जणू काही आपला जिवलग मित्रच. तर कधीकधी आपले त्याहूनही अगदी जवळचं नातं तयार झालेलं असतं. बऱ्याच वेळा असं होतं, की आपली सर्व महत्त्वाची कामं ऑॅफिसच्या कम्प्युटरवर करत असतो. घरी आल्यावर किंवा एखाद्या वेळी बाहेरगावी गेल्यावर ऑॅफिसमधल्या कम्प्युटरवरची महत्त्वाची फाइल हवी असते मग ती फाइल कशी मिळवायची, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. 

2) या समस्येवर एक चांगला आणि सोपा पर्याय आहे तो म्हणजे 'रिमोट कम्प्युटर ऍक्सेस'. सध्या आपण कुठूनही आपला कम्प्युटर चालवणं अगदी सहज शक्य आहे. 'रिमोट कम्प्युटर अॅक्सेस'द्वारे आपण इण्टरनेटच्या माध्यमातून कोणत्याही कंपनीला आणि काहीही पैसे न देता आपण कधीही आणि कितीही वेळा आपला कम्प्युटर हाताळू शकता. 

)सध्या काही मोजक्याच कंपन्यांच्या प्रोग्रॅमद्वारे ही सिस्टम वापरता येते.यामधे काही कंपन्यांचा प्रोग्रॅम काही हजार रुपयांना विकत घ्यावा लागतो. तर काही अगदी मोजक्या कंपन्या त्याचा रिमोट कम्प्युटर अॅक्सेस प्रोग्रॅम अगदी मोफत देतात. ही सेवा मोफत देणाऱ्या कंपन्यांमधे 'लॉगमीइन' ही कंपनी फार प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या www.logmein.com वेबसाइटद्वारे आपण ही सेवा वापरू शकता. 

3)या वेबसाइटवरून एक छोटासा प्रोग्रॅम आपल्या कम्प्युटरमधे लोड करावा लागेल. त्यानंतर आपण तो कम्प्युटर कुठूनही अॅक्सेस करू शकता. फक्त अशा वेळी दोन्ही कम्प्युटर चालू असणं आवश्यक आहे. तसंच दोन्ही कम्प्युटरवर इण्टरनेट सुरू असणं आवश्यक आहे. 

4)नवीन खातं उघडण्यासाठी या वेबसाइटवर नवं मेल सुरू करण्याची जी प्रक्रिया असते तशाच प्रकारचा फॉर्म भरवा लागतो. आता जेव्हा आपल्याला एखादा कम्प्युटर दुसरीकडून अॅक्सेस करायचा असेल तर आपल्या खात्यामधे जमा केलेले कम्प्युटर हाताळू शकता फक्त ते सुरू असणं आणि त्यावर इण्टरनेट सुरू असणं आवश्यक आहे. आता जर आपल्याला आपल्या खात्यामधे जमा केलेला एखादा कम्प्युटर चालवायचा असेल, तेव्हा परत www.logmein.com ही वेबसाइट सुरू करा. आता आपण या वेबसाइटचे मोफत सभासद असल्याने आपल्या खात्याच्या ई-मेल आयडी आणि पासवर्डने लॉगइन करा. आता आपल्यासमोर My Computers चं पान उघडेल त्यातील जे जे कम्प्युटर्स चालू असतील त्यांची नावं ठळक दिसतील, तर बंद असलेल्या कम्प्युटर्सच्या पुढे Offline असं दिलं असेल. आता जोकम्प्युटर आपल्याला उघडायचा असेल त्याच्या नावावर क्लिक करा. आता लगेचच त्या कम्प्युटरचा Access Code म्हणजेच त्याला दिलेला पासवर्ड विचारेल तो देऊन लॉगइन या बटणावर क्लिक करताच आपल्यासमोर तो कम्प्युटर हाताळण्याचं पान उघडेल त्यातील Remote Control या बटणावर क्लिक करा. आता तो दुसरीकडील कम्प्युटर जसाच्या तसा आपल्यासमोर छोट्या स्क्रीनमधे उघडेल इथे फुल स्क्रीनच्या ऑॅप्शनवर क्लिक करून तो कम्प्युटर उघडू शकता काम पूर्ण होईल तेव्हा Disconnect या बटणावर क्लिक करा. आपण ज्या कम्प्युटरला हाताळत असाल, त्यावर जणू काही जादू झाल्याप्रमाणे सर्व गोष्टी आपोआप होता

विंडो एक्सपी मध्ये सिस्टीम रीस्टोर चा वापर कसा करावा

1)  एखादा वायरस काढून टाकण्यासाठी सिस्टीम रीस्टोर चा वापर करणे हा सगळ्यात सोपा आणि बरोबर लागू होणारा इलाज आहे. यासाठी तुम्हाला    सिस्टीम रीस्टोर उघडावे लागेल. विंडो एक्सपी मध्ये 

 2) Start > All Programs > Accessories > System Tools > System Restore 
असे निवडावे.


 3)  त्यानंतर "रीस्टोर माय कॉम्प्युटर" असे निवडावे. आणि समोरच्या स्क्रीन वर एखादी तारीख निवडावी. गडद निळ्या रंगाच्या तारखा या रीस्टोर पोइंट असतात. तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर वर वायरस आढळून येण्या पूर्वीची तारीख अंदाजे निवडावी लागेल. जर तुम्ही ही तारीख बरोबर निवडली तर तुमचा कॉम्प्युटर  त्या तारखेला जसा होता तसा पूर्व स्थितीत जाईल. आणि वायरस च्या फाईली कॉम्प्युटर  वरून दिसेनाश्या होतील. यानंतर नेक्स्ट बटन दाबून सिस्टीम रीस्टोर ची प्रक्रिया पूर्ण करावी

Monday, 5 December 2011

कॉम्प्युटर हँग ….?


काल वर्गात कॉम्प्युटरवर प्रॅक्टिस करत असताना एक विद्यार्थी वैतागून म्हणाला , `सर हा पी.सी. खूप slow चालतोय. मी format करू कां ?’ मी म्हंटलो , `format कां करायचा बरं ? तू troubleshooting कर नां. विचार कर की काय problem असेल ? पी.सी. कां slow झाला आहे? virus आहे कां? garbage data आहे कां ? temperory files आहेत कां? एखादा program जास्त memory वापरतोय कां? स्कॅन करून बघ…..काय problem आहे ते शोधून काढ मग solution सापडेल .’ तो म्हणाला ,`ओ सर, खूप वेळ लागेल…. परत problem नाही सापडला तर शेवटी format करावाच लागेल … त्यापेक्षा आत्ताच format करतो.’ ‘अरे, format करणं हे solution नाही. ती पळवाट झाली . परत problem आला तर परत format करणार कां ?’ नाखुशीनेच त्याने troubleshooting करून पाहिले. असे लक्षात आले की एक प्रोसेस , कॉम्प्युटरची मेमरी फ्री करत नव्हती, त्यामुळे कॉम्प्युटरवर बाकीचे प्रोग्राम लोड व्हायला उशीर लागत होता व तो slow झाला होता. problem लक्षात आल्यावर solution सापडले…. आपल्या रोजच्या जीवनात पण असे होत असते . खूप अडचणी, संकटे येत असतात. आपण तिथेच अडून राहून चालत नाही. त्यावर उपाय असतो तो फक्त शोधावा लागतो. आपण बऱ्याचदा पेपरमध्ये ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबद्दल’ वाचतो… प्रत्येक वेळी माझ्या मनात हाच विचार येतो … अडचणी, संकटे येतच असतात. पण त्यावर आत्महत्या हा उपाय नाही. ती पळवाट झाली . शांत डोक्याने विचार केला तर लक्षात येईल की जी काही अडचण आहे त्यावर मात करता येते. फक्त वेळ लागतो , निरनिराळे मार्ग अभ्यासावे लागतात . संयम ठेवणे खूप महत्वाचे आहे. कधी कधी असं वाटतं की ‘संयम ठेवणे’ ही tendency कमी होत चाललीय . त्याला कारणीभूत आजची परिस्थिती आहे. जर प्रत्येक गोष्ट, एका क्लिक वर, एका sms वर , हाकेच्या अंतरावर मिळत असेल तर वाट पाहणं, संयम ठेवणं हे वेळ वाया घालवण्यासारखं वाटतं. साधं उदाहरण घेऊ. पूर्वी घरी इडली करून खायची असेल तर किमान १ दिवस वाट पहावी लागायची. (डाळ,तांदूळ भिजवा, वाटा, ८-९ तास रुबवत ठेवा, मग इडली तयार करा. या process साठी १ दिवस लागायचाच.) आता ‍कोपर्‍यावरच्या वाण्याकडे इडलीचे तयार पीठ कधीही मिळते , जास्तीत जास्त अर्ध्या तासात घरी इडली तयार होते. असंच प्रत्येक गोष्टीत होते… त्यामुळे वाट पाहाणे हे मागासलेपणाचे वाटते. कमी मार्क मिळाले , हव्या त्या शाखेला अॅडमिशन नाही मिळाली, मुलीनं प्रेम करायला नकार दिला… (ही लिस्ट बरीच वाढेल) थोडक्यात हवे ते नाही मिळाले की कर आत्महत्या, संपवा आयुष्य!!! (पी.सी. हँग झाला , slow झाला , कर format ) हे इतकं सोपं असतं कां? आयुष्य इतकं स्वस्त आहे कां?
-- फुलपाखरु फक्त १४ दिवस जगतं, परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगुन कित्येक हदय जिकंत....... आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हदय जिकंत रहा ......!!!!!! 9890888388

Saturday, 3 December 2011

14 मार्चला इंटरनेट एक्स्प्लोअरर 9 येतोय..



पण थांबा, तुमच्या संगणकावर WINDOWS XP असेल तर तुम्हाला नवा कोरा इंटरनेट एक्स्प्लोअरर 9 लावता येणार नाही. कारण तो WINDOWS XP सपोर्ट करीत नाही.
तुम्हाला त्यासाठी WINDOWS VISTA अथवा WINDOWS 7 तुमच्या संगणकावर लावावं लागेल.
नवे IE9 हे  HTML 5 ने युक्त आहे. शिवाय नवे जावास्क्रीप्ट इंजिन (JSCRIPT) ची साथ त्याला असणार आहे. ह्या इंजिनचे नाव आहे CHAKRA.
गेल्या महिन्यात 10 फेब्रुवारी रोजी मायक्रोसॉफ्टने IE9 चा रिलीज कँडिडेट इंटरनेटवर सादर केला होता. आता 15 मार्चला येतेय ती अंतिम आवृत्ती, तुमच्या आमच्या सर्वांसाठी.
पण, आता विंडोज 7 कडे गेल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण IE9 आणि HTML5 चा लाभ घ्यायचा असेल तर दुसरा मार्ग नाही. FACEBOOK, TWITTER वापरत असाल, YOU TUBE चे फॅन असाल तरी तुम्हाला लवकरच WINDOWS 7 चा आधार घ्यावा लागणार आहे.

ब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सविस्तर माहिती कुठे मिळेल

Blu (Blue नव्हे) Ray Disk ह्या DVD च्या पुढलं पाऊल म्हणून ओळखल्या जातात. दोघांचा वापर, आकार आणि दिसणं सारख्याच पद्धतीचं असल तरी क्षमता आणि इतर काही मुद्दे यात खूप फरक आहे. आजच्या Singe sided DVD वर ४.७ जी.बी. चा डेटा राहू शकतो, किंवा साधारणतः दोन तासाचा चित्रपट त्यात मावू शकतो. Single sided Blu Ray Disk त्या तुलनेत एखाद्याडायनॉसोरससारखी आहे. त्यावर २७ जी.बी.चा डेटा किंवा तेरा तासांचा व्हिडीओ त्यात मावू शकतो.

डीव्हीडी १९९७ साली, तर ब्लू रे डिस्क २००६ साली बाजारात आली.
डीव्हीडी मध्ये लाल (Red) रंगाचे लेसर किरण डिस्क वाचण्यासाठी वापरले जातात. ब्लू रे डिस्कमध्ये मात्र निळ्या रंगाचे लेसर किरण वापरले जातात. त्यावरूनचत्याला Blu हे नाव मिळाले. वस्तुतः Blue Ray चे ट्रेड मार्क म्हणून रजिस्ट्रेशन करावयाचे होते. पण नियमाप्रमाणे शब्दकोशातील शब्दाचे ट्रेड मार्क म्हणून रजिस्ट्रेशन होऊ शकत नसल्याने Blue मधील e काढून टाकण्यात आला. Blu ह्या स्पेलींगमागील गोम ही अशी आहे.

अधिक माहिती http://www.blu-ray.com/ ह्या साईटवर उपलब्ध आहे.

पीडीएफ एडिट करायचीय? ही घ्या वेब ट्रीक.

परिस्थिती आणि पीडीएफ सांगून येत नाहीत म्हणतात. होतं असं की कुणीतरी पीडीएफ पाठवतं. आपल्याला ती वाचायची असते. वाचता वाचता त्यात दिसतात स्पेलींगच्या घोडचुका. आपल्याला मोह होतो. त्या तिथल्या तिथे सुधारण्याचा. पण पीडीएफ फाईल ती. एडिट करायची कशी? त्याला पीडीएफ एडिटर हवा. अक्रोबॅट हवा. आपल्याकडे पीडीएफ एडिटर नसेल किंवा काही कारणाने तो चालत नसेल तर?. करायचं काय? अशा परिस्थितीता उपयोगी पडणारी एक वेब साईट आहे. तिचं नाव आहे -


तिथे जाऊन आपली पीडीएफ फाईल अपलोड करायची. आपला ईमेल पत्ता द्यायचा. .doc मध्ये किंवा rtf मध्ये रूपांतरीत झालेली आपली पीडीएफ फाईल आपल्याला ईमेलने पाठविली जाते. मग रूपांतरीत झालेल्या त्या doc/rtf फाईलला आपल्या वर्डमध्ये किंवा ओपन ऑफिस मध्ये किंवा कोणत्याही वर्ड प्रोसेसरमध्ये उघडायचं आणि ती एडिट करायची. खटकलेली स्पेलींग्ज वगैरे सुधारायची आणि पुन्हा त्या वर्डची पीडीएफ करून घ्यायची.

सुप्रसिद्ध NITRO PDF ची ही सेवा आहे. पीडीएफ चं doc किंवा rtf रूपांतर अतिशय तंतोतंत होतं असा त्यांचा दावा आहे. आपल्याला अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही. कारण ही सेवा मोफत आहे.

Parental software - एक कौटुंबिक गरज

Parental Filter ह्या नावाचं मोफत आणि माझ्या मते उत्तम असं सॉफ्टवेअर तुमच्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध आहे.http://www.ecommsec.com/pf/PfSetup30.exeह्या लिंकवर क्लीक केलत की Parental Filter चा डाऊनलोड सुरू होईल. केवळ २.१ एम.बी. आकाराचं हे डाऊनलोड आहे. त्यामुळे ते पटकन डाऊनलोड होतं. डाऊनलोड पूर्ण झाल्यानंतर इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशन नंतर तुमच्या पुढे खालील स्क्रीन येईल.


त्यातील वरच्या बाजूस असलेल्या उजवीकडील लाल आयतावर (Banlist Off) वर क्लीक करा. म्हणजे तो चौकोन हिरवा होईल आणि Banlist On होईल. याचा अर्थ तुमचं Parental Filter चालू झालं. Pornography किंवा अश्लील प्रकारच्या वेबसाईटस उघडायचा प्रयत्न झाल्यास त्या उघडणार नाहीत. Page can not be displayedअसा संदेश मिळेल.
Parental Filter ने हजारो पोर्न व तत्सम साईटसची यादी केली आहे, आणि त्यांचा समावेश Banlist मध्ये केला आहे. दरमहा त्यात नवनव्या साईटसची भर पडत असते. त्यामुळे तुम्ही Banlist महिन्यातून एकदा जरूर अपडेट करा.
आता, शेवटची पण सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे पासवर्डची. तुम्ही लावलेलं Parental Filter कुणीही काढू नये यासाठी पासवर्डची व्यवस्था आहे. पासवर्ड लावण्यासाठी खाली दाखवलेल्या खुणेवर क्लीक करा.

आता समोर आलेल्या खालील विंडोमध्ये तुमचा पासवर्ड द्या.

हा प्रोग्राम बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. पण तो फार मोठ्या प्रमाणावर साईटस बॅन करतो अशी टीका काही जण करतात. ज्या अर्थी तो लोकप्रिय आहे, त्याअर्थी आपण टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे हेच बरे.