Friday, 13 April 2012

फेसबुक वर त्रास देणार्‍या व्यक्तीचा पत्ता(फेक प्रोफाईलवाले) कसा शोधाल?


मंडळी सोशल नेटवर्किंग म्हटले की खोटी प्रोफाईल बनवणारे पण त्या अनुषंगाने आलेच आणि तुम्ही जर मुलगी असाल तर तो त्रास कोणत्या टोकाला जावू शकतो याची तुम्ही कल्पना करू शकता अथवा काहीना असे अनुभव आले असतीलच...बर्‍याच फेक प्रोफाईल वाल्यांचा अथवा उलटी कामे करणा‍र्‍यांचा असा समज असतो की त्यांना शोधणे कठिण आहे..त्यांना कोणी पकडू शकत नाही...पण या जगात कठिण काहीच नाही आहे.

मंडळी सुरुवातीचा काही काळ फेसबुक कडून तुम्हाला येणा‍या नोटिफिकेशन मेल मध्ये त्या व्यक्तीचा आयपी ऍडरेस कोडिंगच्या स्वरुपात लपवलेला असायचा,त्यामुळे कोणता युजर कोणत्या ठिकाणा वरून असे प्रकार करतो ते शोधणे संगणकाची मध्यम स्वरुपाची माहिती असलेल्या कोणालाही शक्य होते,पण त्यामुळे युजरची खाजगी माहिती उघड होते असे मानून फेसबुकने तो बग मानून दुरुस्त केला आणि अश्या  फेक प्रोफाईलवाल्या लोकाना शोधणे कठिण झाले..पण अशक्य नाही.

आज आपण अश्या त्रासदायक व्यक्तींचे ठिकाण कसे शोधायचे याची माहिती करून घेणार आहोत..हे करण्यासाठी तुम्हाला संगणकाची माहिती असणे गरजचे आहे नसेल तर माहिती असलेल्या व्यक्तींची मदत तुम्ही घेवू शकता.

सोप्पी पद्धत:
१) या पद्धतीचा वापर करण्यासाठी,जी अनोळखी व्यक्ती तुम्हाला त्रास देते आहे उदा. आपण त्याला फेसबुक आजोबा,फेसबुक राजा, असे काहीही समजु या. :-D
अश्या फेक प्रोफाईल वाल्या अनोळखी मवाल्याच्या वॉलवर एक 
लिंक पाठवायची आहे..आणि ती त्याला उघडायला भाग पाडायची आहे.

२)यासाठी आधी खाली दिलेल्या दुव्यावर जा.
how-about-you

३)जे पान उघडेल त्यावर तुम्हाला खाली चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे पर्यांय दिसतील.


Link for person:
पर्यांया समोर असलेली संपुर्ण लिंक तुम्हाला कॉपी करून या फेक प्रोफाईल वाल्याच्या वॉल वर पोस्ट करायची आहे अथवा मॅसेज मधून पाठवायची आहे.(जर तुम्हाला इतकी मोठी लिंक पाठवायची नसेल तर खाली चित्रामध्ये दाकविल्याप्रमाणे Click here to create tinyurl link पर्यांयाचा वापर करून जी लिंक मिळेल ती कॉपी करून त्या मवाल्याला पाठवा.)


४)Redirect URL: http:// समोर www.facebook.com   टाईप करा.असे केलेत तर तुम्ही त्या व्यक्तींला पाठवलेल्या दुव्यावर त्याने टिचकी दिली की  आपोआप www.facebook.com उघडले जाईल.

५)Link for you: समोर जी लिंक आहे ती तुम्ही तुमच्या कडे ठेवायची सेव्ह करून ठेवायची आहे आणि वेळोवेळी ब्राउजर मध्ये उघडून त्यात त्या मवाल्याचा आयपी ऍडरेस आला आहे का ते पाहायचे आहे.

उदा.
फेसबुक राजा तुम्हाला काहीतरी अश्लील टिप्पणी करतो..आणि तुमच्या कडे तुमचा फोटो नंबर मागतो.
मग तुम्ही वर दिलेल्या साईट वर जाता सर्व पायर्‍या नीट वापरून tinyurl link  बनवता आणि त्याला सांगता की मी तुला माझा फोटो या दुव्यावर पाठवला आहे तो बघ :
मग हा फेसबुकचा राजा लाडात त्या लिंकवर टिचकी देतो आणि त्याचा आयपी ऍडरेस आपोआप नोंदवला जातो.

आता तुम्ही Link for you: पर्यांया समोरील जी लिंक तुम्हाला शोध घेता यावा यासाठी सेव्ह करून ठेवली आहे ती वेब ब्राउजर मध्ये उघडता. आणि मग त्या व्यक्तीचा आयपी ऍडरेस तुम्हाला उघडलेल्या पानावर चित्रा मध्ये दाखवलेल्या टेबला मध्ये IP या पर्यांया खाली मिळतो.


६)आता तुम्ही तो आयपी नंबर घेता आणि खाली दिलेल्या दुव्यावर जाता.

ip-tracer
तिथे चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे रिकाम्या जागेत तो नंबर टाईप करता आणि > वर टिचकी देता


आणि असे केल्याने तुम्हाला त्या व्यक्तीचा देश,ठिकाण,इंटरनेट सर्विस प्रोव्हायडरची माहिती मिळते.


७)या माहितीच्या आधारे तुम्ही अश्या फेसबुक राजाना गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यामध्ये सजा मिळवून देवू शकता.



Wednesday, 11 April 2012

टीव्हीवर संगणक


संगणकावर टीव्ही बघण्यासाठी आजकाल आपणासमोर बरेच पर्याय आहेत. संगणकावर इंटरनेटचा वापर करून आपण अनेक ऑनलाईन टीव्ही चॅनल्स बघू शकतो किंवा संगणकाचा मॉनिटर किंवा एलसीडीला बाहेरून लावण्यासाठी असणारे टीव्ही ट्यूनर कार्डचा वापर करूनदेखील आपण संगणकावर टीव्ही बघू शकतो. पण जर घरच्या टीव्हीवरच आपण जर संगणकात करू शकतो ती सर्व कामे करू शकलो तर? होय आता हे शक्य आहे. एलजी व सॅमसंगने त्यांचे नवीन ‘स्मार्ट टीव्ही’ हे क्रांतिकारी वैशिष्ट्य असणारे एलसीडी टीव्ही सादर केले आहे. ज्याचा वापर करून आपण टीव्हीवरच संगणक वापरू शकतो. ‘स्मार्ट टीव्ही’ हे भविष्यातील टीव्ही आहेत व त्यात संगणक, इंटरनेट व टीव्हीचे भन्नाट कॉम्बिनेशन आहे.
स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये


* संगणक प्रणाली :
 स्मार्ट टीव्हीमध्ये संगणकात असते तशीच संगणक प्रणाली असते व संगणकाच्या संगणक प्रणालीमध्ये असणारे जवळपास सर्व वैशिष्ट्ये ‘स्मार्ट टीव्ही’मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.




* सोशल नेटवर्किंग : ‘स्मार्ट टीव्ही’चे हे एक अनोखे वैशिष्ट्य आहे त्यात सोशल नेटवर्किंग विभागात आपण आपल्या टीव्हीवर कुठलाही कार्यक्रम बघता बघताच आपल्या सोशल नेटवर्किंग संकेत स्थळावरील मित्रमंडळींच्या थेट संपर्कात राहू शकतो. सोशल नेटवर्किंगवर आपण ‘लाईव्ह’ असल्यामुळे आपण एखादा आवडीचा कार्यक्रम आपल्या मित्रांना थेट शेयर करू शकतो किंवा एखादा व्हिडीओ किंवा फोटोजदेखील शेयर करू शकतो.




* स्मार्ट ऍप्लिकेशन : स्मार्ट टीव्हीवर संगणक किंवा मोबाईलप्रमाणेच आपणास विविध ऍप्लिकेशन देण्यात आलेले आहेत. या ऍप्लिकेशनचा वापर करून आपण वेगवेगळ्या गोष्टींचा टीव्हीवर वापर करू शकतो.




* वेब ब्राऊजर : संगणकाप्रमाणेच स्मार्ट टीव्हीवर आपण वेब ब्राऊजरचा वापर करून इंटरनेटचा वापर करू शकतो. आपण आपल्या टीव्हीवर इंटरनेटवरील विविध संकेतस्थळे वापरू शकतो किंवा आपला ई-मेल पाहू शकतो अगदी इंटरनेटवरून कोणतीही फाईलदेखील डाऊनलोड करू शकतो.




* म्युझिक प्लेयर : स्मार्ट टीव्हीवर आपण इंटरनेटवरून कोणतेही गाणे डाऊनलोड करू शकतो. डाऊनलोड केलेले कोणतेही गाणे आपण स्मार्ट टीव्हीमधील म्युझिक प्लेयरचा वापर करून टीव्हीवरच ऐकू शकतो.




* विजिटस् : यू ट्यूब, पिकासा, स्कायपी, फेसबुक इ. इंटरनेटवरील लोकप्रिय सेवांचे थेट टीव्हीवरच विजिटस् देण्यात आले आहेत व त्याचा वापर करून आपण थेट या सेवा टीव्हीवरच वापरू शकतो.




* प्रोग्राम रेकॉर्डर : डीटीएच टीव्ही सेवेतले हे लोकप्रिय वैशिष्ट्य आता स्मार्ट टीव्हीवरदेखील आपणास बघावयास मिळेल. प्रोग्राम रेकॉर्डरचा वापर करून आपण टीव्हीवर सुरू असलेला कोणताही कार्यक्रम ऑनलाइन किंवा टीव्ही बंद असतानादेखील रेकॉर्ड करू शकतो. रेकॉर्ड झालेला कार्यक्रम नंतर आपण आपल्या सवडीनुसार कधीही बघू शकतो.




* ३डी/एचडी टीव्ही : स्मार्ट टीव्हीमध्ये आपणास ३डी तसेच हायडेफिनेशन असे दोन्हीही पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण आपल्या बजेटप्रमाणे कोणत्याही आवडत्या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो.




* स्मार्ट कनेक्टिव्हिटी : स्मार्ट टीव्हीमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीटीसाठी आपणास विविध पर्याय देण्यात आले आहेत. वायफाय व वायरलेस राऊटरसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या टीव्हीवर इंटरनेटची जोडणी करू शकतो. स्मार्ट कनेक्टिव्हिटीमधले सर्वात क्रांतिकारी वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा, आयपॅड, आयफोन अशी कोणतीही डीव्हाईस तुमच्या टीव्हीला कनेक्ट करू शकता व त्यातील हवी ती गोष्ट किंवा सेवा शेयर करू शकता.




* स्मार्ट टीव्हीचे पर्याय : सध्या बाजारात एलजी व सॅमसंग या दोन कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत व त्याच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्यावी. 
www.samsang.comlin/smarttv. www.LG.com.

Friday, 30 March 2012




 संगणकाचे हार्ट म्हणून ओळखले जाणारे "हार्ड डिस्क' ऐन दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात शॉर्टेज झाले. यामुळे ऍसेंबल्ड संगणक विक्री करणाऱ्यांना हंगामातच झळ पोचली. ब्रॅण्डेड संगणकाला मागणी वाढावी यासाठी ही पॉलिसी असल्याचे बोलले जात असले, तरीही प्रत्यक्षात थायलंडमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीचा परिणाम असल्याचे जाणकार सांगतात.

 शंभर-सव्वाशे उपव्यावसायिक हार्डवेअरच्या व्यवसायात आहेत. त्यांच्याकडूनच ऍसेंबल्ड संगणक तयार होतात. सुटे भाग विक्रीसाठी साधारण जिल्हा त्यांच्यावर अवलंबून आहे. हार्डवेअरचा व्यवसाय करणारे स्वतःची गुंतवणूक न करता बुकिंगवरच हार्ड डिस्कसह इतर सुट्या भागांची मागणी करतात. त्यामुळे हार्ड डिस्क शॉर्टेज झालेल्याचा मोठा फटका त्यांना बसला आहे. बुकिंग घेतल्याने आता दरवाढीचे कारण सांगता येत नाही आणि हार्ड डिस्क जादा दराने खरेदी करणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे ग्राहक आणि त्यांच्यात वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. जे प्रमुख विक्रेते आहेत त्यांनी ग्राहकांना (मदरबोर्डसह अन्य भागांचा सेट खरेदी करणाऱ्यांना) हार्ड डिस्क दिल्या आहेत. परिणामी ऍसेंबल्ड संगणक तयार करणाऱ्यांना झळ बसली.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मार्केटमध्ये केवळ ब्रॅण्डेड संगणकच विक्री केले जावेत, यासाठी हार्ड डिस्कचे शॉर्टेज केल्याचे काहींचे म्हणणे आहे. विशेषतः हा फुगवटा दिवाळीपुरता मर्यादित असून आणखी महिन्याभरात पुन्हा हार्ड डिस्क मिळू शकतील, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे; तर थायलंड-मलेशिया या भागात हार्ड डिस्क तयार करणाऱ्या फॅक्‍टरीज आहेत. तेथे महापूर असल्यामुळे तेथील फॅक्‍टरी बंद आहेत; तसेच डॉलरचा दर वाढत असल्यामुळेही हार्ड डिस्क मार्केटमध्ये उपलब्ध होत नसल्याचेही सांगण्यात येते. कारण काहीही असो मात्र ऐन दिवाळी पाडव्याच्या सनात ऍसेंबल्ड संगणक तयार करणाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला हे नक्कीच.

 ""सध्या बाजारात हार्ड डिस्कचे दर दुपटीने वाढले आहेत. आठवड्यापूर्वी पाचशे जीबी हार्ड डिस्क दोन हजारला मिळत होती ती आता चार हजारला विकली जात आहे. दिवाळी-पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर ती शॉर्टेज झाल्यामुळे ब्रॅण्डेड कंपन्यांकडून ही बिझनेस पॉलिसी असल्याचे बोलले जात असले तरीही प्रत्यक्षात तसे काहीच नाही. थायलंड-मलेशियात महापूर आल्यामुळे आणि डॉलरच्या किमती वाढत असल्यामुळे हा परिणाम झाला आहे.

हार्ड डिस्क नसली तरी चालेल...

संगणकात हार्ड डिस्क नसली तरीही स्टोअरेज कपॅसिटी करण्यासाठी काही ठिकाणी सर्च इंजिनचा उपयोग केला जाऊ शकतो. डाटा ई-मेलवरसुद्धा
साठवून ठेवता येतो. यासाठी स्वतंत्र पासवर्ड असल्यामुळे तो इतर कोणालाही मिळणार नाही, याची खात्रीही असते. मात्र संगणकातून हार्ड डिस्क सध्या तरी कालबाह्य होणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Tuesday, 27 March 2012

"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन"

एका मोठया ब्रेकनंतर आज आपण पुन्हा गुगल अ‍ॅडसेन्सबद्दल माहिती घेणार आहोत. या लेखमालिकेत सर्वांना एकाच वेगाने जाता यावे आणि मी सांगीतलेले प्रयोग करुन पाहता यावेत यासाठी मी २ महिन्यांचा अवधी देणार होतो. प्रत्यक्षात मात्र उर्वरीत लेख लिहायला जास्तच वेळ लागला. असो, आधीच्या सहा लेखांच्या मदतीने आतापर्यंत बर्‍याच जणांनी अ‍ॅडसेन्स अकाऊंट मिळविले असेल अशी मी आशा करतो. यापुढील सर्व लेख अ‍ॅडसेन्स



वापरण्यासंबंधी असणार आहेत म्हणजेच अ‍ॅडसेन्स अकाऊंट ज्यांनी मिळविले आहे अशा सर्वांसाठी यापुढील लेख असणार आहेत







आजच्या सातव्या लेखामध्ये आपण अ‍ॅडसेन्स मधील जाहिराती वापरण्यासंबंधीची माहिती पाहुया -
१. www.google.com/adsense किंवा www.adsense.com या लिंकवर क्लिक करुन आणि आपला गुगल ईमेल पत्ता वापरुन अ‍ॅडसेन्स मध्ये Log in करा.
२. Adsense setup वर क्लिक करा.

३. येथे अ‍ॅडसेन्स वापरण्यासाठीचे पाच पर्याय दिसतील.




यापैकी शेवटचे दोन पर्याय Adsense for doamins आणि Adsense for Mobile content  असे असतील. सध्या आपण या दोनही पर्यांयांकडे दुर्लक्ष करणार आहोत. (हे पर्याय Advance users साठी आहेत) . ब्लॉगर्ससाठी अ‍ॅडसेन्सचे मुख्य उत्पन्न हे पहिल्या तीन प्रकारांमधूनच येते. ते प्रकार पुढील प्रमाणे -


Adsense for content - अ‍ॅडसेन्स फॉर कंटेंट हा पर्याय ब्लॉगर्ससाठी सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे.
Adsense for Search - प्रत्येक साईट आणि ब्लॉगवर Search ची (Search bar) सुविधा असणे गरजेचे असते. गुगलचा सर्चबार वापरुन शोध घेतल्यावर शोध परिणामांच्या बाजूला जाहिराती दिसतात. या जाहिरातींवर वाचकांनी क्लिक केल्यास त्यापासून ब्लॉगरला पैसे मिळू शकतात. याद्वारे मिळणारे उत्पन्न तुलनेने खुप कमी असते.
Adsense for feeds -  Feedburner या सुविधेमधून लेख ईमेल द्वारे ब्लॉगच्या सभासदांपर्यंत पोहोचवता येतात. यालाच ब्लॉग फीड्स असे म्हणतात. ब्लॉग फीड्स सोबत गुगलच्या जाहिराती थेट वाचकांच्या ईमेल बॉक्समध्ये पोहोचवता येतात. दुर्दैवाने मराठी फीड्स साठी जाहिराती दिसत नाहीत. ( याचे देखिल एक "जुगाड" सोल्युशन मी शोधले आहे. मात्र या सोल्युशनचे तोटे देखिल आहेत. तेव्हा हे वापरायचे की नाहीत हे तुम्हीच ठरवा.)


Adsense for content म्हणजे काय ? -


Adsense for content  या प्रकारामध्ये ब्लॉगवरील किंवा वेबसाईटवरील मजकुराला अनुसरून तसेच वाचकाच्या भौगोलिक ठिकाणाला (Location) अनुसरुन जाहिराती दाखविल्या जातात. उदाहरणार्थ नेटभेटच्या How to calculate EMI in excel? या लेखाच्या पानावर सर्रास ICICI home loans ची जाहिरात पहायला मिळते. हाच लेख वाचणारी व्यक्ती जर भारतात असेल तर वेगळी जाहिरात आणि अमेरीकेत असेल तर वेगळी जाहिरात दिसते. कोणत्या वेळेला, कोणती जाहिरात, कोणत्या मजकुरासाठी (Keywords), कोणत्या देशातील्/भागातील वाचकांना दिसेल हे गुगलच्या एका कठीण अल्गोरीदम द्वारे ठरवले जाते.


Adsense for content कसे वापरावे ? -

( ही सर्व माहिती मी Old adsense editor नुसार देत आहे. अ‍ॅडसेन्स अकाऊंट मध्ये उजव्या बाजूला वरती जुने व नविन अ‍ॅडसेन्स सीलेक्ट करण्याची सुविधा आहे. त्यापैकी Old adsense interface हा पर्याय निवडा )
Adsense setup > Get Ads > Adsense for content येथे क्लिक करा. Adsense for content चे दोन उपप्रकार दिसतील.




Ad Unit व Link Unit

Ad unit मधील जाहिरातींमध्ये चित्र आणि शब्दस्वरुपात जाहिरात केली जाते. यामध्ये जाहिरातीबद्दल अधिक माहिती असते. फक्त शाब्दिक जाहिरात (Text only) , फक्त चित्रस्वरुपातील जाहिरात (Image ads only) आणि चित्र व शाब्दिक जाहिरात (Text and image ads) या उपप्रकारांपैकी एक प्रकार निवडता येतो.
चित्ररुपातील जाहिराती आकर्षक असतात आणि त्या वाचकांचे लक्ष वेधून घेतात त्यामुळे बरेच ब्लॉगर्स हा पर्याय हमखास निवडतात. मात्र लेखातील मजकुरामध्ये बेमालुमपणे मिसळणार्‍या शब्दरुपातील जाहिराती योग्यरीत्या वापरल्या तर खुप फायद्याच्या ठरु शकतात.

Link Unit मधील जाहिराती मध्ये एक किंवा दोन शब्दांच्या जाहिराती लिंक्सच्या स्वरुपात असतात. वरकरणी अगदीच निरुपयोगी वाटल्या तरी या जाहिराती योग्यरीत्या वापरल्या तर खुप फायद्याच्या ठरु शकतात. मेनुबार किंवा साईडबार सोबत बेमालुमपणे मिसळण्यासाठी Link Unit चा वापर केला जातो.

आता आपण Ad Unit वापरण्याची पद्धती सवीस्तरपणे पाहूया . (ही पद्धती पाहिल्यानंतर Link Unit बनविणे अगदी सोपे आहे.)
१. Ad Unit हा पर्याय आणि सोबत त्याचा उपप्रकार (फक्त शाब्दिक जाहिरात (Text only) , फक्त चित्रस्वरुपातील जाहिरात (Image ads only) आणि चित्र व शाब्दिक जाहिरात (Text and image ads) ) निवडा. व Continue या बटणावर क्लिक करा.
२. येथे Format , Color, Fonts, Corner style असे चार पर्याय दिसतील.


Format मध्ये तुम्ही जाहिरातीचा आकार निवडू शकता. येथे दिलेल्या आकारांपैकी ३००*२५०, ३३६*२८०, ७२८*९० आणि १६०*६०० या आकारातील जाहिराती जास्त फायद्याच्या असतात असे खुद्द गुगलकाकांनी एका अहवालात म्हंटले होते.

Color - येथे जाहिरातींची रंगसंगती ठरवता येते. हा पर्याय फक्त शाब्दीक (Text Only) या जाहिरातींसाठीच असतो. रंगसंगती ठरवताना लक्षात ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी -
   - शक्यतो तुमच्या ब्लॉगच्या थीममधील बॅकग्राउंड कलर आणि जाहिरातीच्या बॅकग्राउंड कलर व किनारीचा रंग (Border color) एकच ठेवा. यामुळे जाहिराती आणि ब्लॉगवरील मजकूर एकमेकांत मिसळला जाईल.
   - ब्लॉगमधील लिंक्सचा रंग आणि जाहिराती मधील लिंक्सचा रंग एकच असावा. वाचकांना सर्व लिंक्स सारख्याच दिसून त्यावर अनावधानाने क्लिक्स मिळण्याची शक्यता वाढते.

Fonts - ब्लॉगमध्ये वापरलेला फाँट आणि जाहिरातीमधील फाँट शक्यतो एकच असावा.

Corner style - ब्लॉगच्या टेम्प्लेटशी सुसंगत अशी Corner style निवडावी.

या सोप्या पर्यायांनंतर आणखीन एक पर्याय खाली दिसेल. Alternate ads or colors असे लिहिलेले दिसेल. मराठी ब्लॉग्जवर गुगलच्या जाहिराती दिसत नाहीत तेव्हा या पर्यायाचा उपयोग होतो. Ads for indians, admaya किंवा इतर पर्यायांचा वापर गुगल जाहिरातींबरोबर करण्यासाठी आपण Alternate ads वापरु शकतो. जेव्हा गुगल जाहिरात दाखविण्यास असमर्थ अस्ते तेव्हा आपोआप दुसर्‍या नेटवर्कची जाहिरात दिसु लागते.
याची पद्धती खालीलप्रमाणे -

एक Notepad फाईल उघडा.

त्यामध्ये खालील कोड लिहा -



वरील कोडमध्ये Begin of AdsforIndians AdNetwork व End of AdsforIndians AdNetwork  या ओळींच्यामध्ये तुमचा Ads for indians, admaya किंवा इतर अ‍ॅड नेटवर्कचा कोड चिकटवा. तुम्ही स्वतः बनविलेल्या जाहिरातीचा कोड देखिल येथे चिकटवू शकता. वरील कोडमध्ये table style wirdth आणि hight जाहिरातीच्या आकारानुसार बदला आणि title तुम्हाला हवे तसे बदला.

फक्त गुगल जाहिरातीचा आकार आणि इतर अ‍ॅडनेटवर्क मधील जाहिरातीचा आकार सारखाच असेल असे पहा.
आता या नोटपॅड फाईलला एक नाव द्या. आणि Save as करून फाईलचे नाव.html असे सेव्ह करा. उदाहरणार्थ altads.html

या फाईलला ईंटरनेटवर होस्ट करा. अनेक Free file hosting पुरविणार्‍या साईट्स तुम्हाला शोधता येतील. माझ्यामते 110mb.com ही एक उत्तम साईट आहे. (येथे तुम्ही मोफत वेबसाईट सुद्धा बनवु शकता. त्याबद्दल नंतर कधीतरी!)

फाईल होस्ट केल्यानंतर त्या फाईलची लिंक मिळेल. ही लिंक आपण वर पाहिलेल्या गुगल अ‍ॅडसेन्समधील पाचव्या alternate ads or colors या पर्यायात वापरणार आहोत. alternate ads or colors मधील दुसरा पर्याय Show non-Google ads from another URL निवडा आणि आपण मिळवलेली लिंक येथे चिकटवा.
आता Continue या बटणावर क्लिक करा.


आता जाहिरातींसाठी एक channel निवडा/बनवा. चॅनल्स म्हणजे नक्की काय आणि ते कसे वापरावे याबद्दल आपण पुढे सविस्तर माहिती घेणार आहोत. सध्या कोणतेही एक नाव देऊन एक चॅनेल बनवा आणि Continue या बटणावर क्लिक करा.

जाहिरात बनविण्याच्या अंतिम पायरीवर आपण पोहोचलो आहोत. येथे जाहिरातीला उचित असे नाव द्या. तुम्हाला जाहिरात नीट ओळखता यावी यासाठी हे नाव असते. वाचकांना जाहिरातीचे हे नाव दिसत नाही.
आता Submitt and get ad code या बटणावर क्लिक करा. अभिनंदन ! तुम्ही बनविलेल्या पहिल्या अ‍ॅडसेन्स जाहिरातीचा html code आता तयार झाला आहे.

ब्लॉगर मध्ये आपल्या ब्लॉगच्या साईडबार किंवा मेनुबार च्या खाली add html/javascript widget असे क्लिक करुन त्यामध्ये वरील जाहिरातीचा कोड चिकटवा आणि Save करा. जाहिरात तयार झाल्यानंतर ब्लॉगवर दिसेपर्यंत १० मिनिटाचा कालावधी लागतो. तेवढे थांबून मग page refresh करा. आता तुम्ही यशस्वीरीत्या गुगल जाहीरात आपल्या ब्लॉगवर दाखविलेली आहे.