Tuesday, 16 October 2012

क्रोम - ऑपरेटिंग सिस्टिम


गुगलच्या 'क्रोम' ही ऑपरेटिंग सिस्टिम असलेले डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाइल, नोटबुक्स अर्थात 'क्रोमबुक' लवकरच बाजारात येणार आहेत. इंटरनेट जगतातील जाएंट गुगलने स्पधेर्ला तोंड देण्यासाठी आपल्या कक्षा रूंदावण्यास सुरूवात केली आहे. अगदी गृहपयोगी उपकरणांपासून ते आता नोटबुकपर्यंतचे माकेर्ट कॅप्चर करण्यासाठी गुगल सज्ज झाले आहे. 

लॅपटॉप बनविणाऱ्या कंपन्या वेगळ्या आणि त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टिम आणि सॉफ्टवेअर पुरविणाऱ्या कंपन्या वेगळ्या यामुळे अनेकदा या कंपन्यांना एकमेकांना पैसे देऊन तर काही वेळेस विविध करार करून एकत्रितपणे काम करण्याची गरज भासते. परंतु, आता प्रत्यक कंपनी स्वतंत्र होऊ लागली आहे. आजपर्यंत इंटरनेट जगतात अडचण होती ती, ऑपरेटिंग सिस्टिमची. ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वर्षानुवषेर् स्वत:ची मक्तेदारी सिद्ध करणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या विंडोजला आता अनेक पर्याय उभे ठाकले आहेत. यामध्ये युजर फ्रेण्डली ठरलेल्या गुगल 'क्रोम'ची सध्या माकेर्टमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे. अर्थात गुगलने आता स्मार्टफोनच्या माकेर्टमध्ये आपले स्थान टिकविण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. त्यातच आणखी आक्रमक भूमिका घेत गुगलने आता 'क्रोम' ऑपरेटिंग सिस्टिम असलेले डेस्कटॉप, लॅपटॉप, नोटबुक अर्थात क्रोमबुक विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्यांचे हे प्रोडक्ट बाजारात येणार असून यासाठी त्यांनी अॅसर आणि सॅमसंगशीही टायअप केले आहे. क्रोम ऑपरेटिंग सिस्टिम असेलेले विविध प्रोडक्ट अमेरिकेत १५ जून पासून ऑनलादन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या नव्या क्रोम कम्प्युटर्समधून आपल्याला विविध प्रकारचे अॅप्लिकेशन्स वापरता येणार आहेत. यामध्ये आपण आपल्या गुगल अकाऊंटची सेटिंग करून ठेऊ शकतो. तर काही लिंक्स, फोन नंबरर्स, युट्युब वरचे काही व्हीडिओज आपल्या मोबाइलवर मॅपिंग करून ठेऊ शकतो. तुमच्या मोबाइलला प्रिंटींग केबल अटॅच केल्यानंतर त्यामधील मजकूराचा प्रिंट आऊटही तुम्ही घेऊ शकतात. तुमचे अनेक डिटेल्स तुम्ही तुमच्या क्रोम या ऑपरेटिंग सिस्टिमध्ये असेलेल्या ऑप्शन्समध्ये सेव्ह करून ठेऊ शकतात. ते सर्व डिटेल्स तुम्ही तुमच्या मोबाइलवरही पाहू शकता, अर्थात यासाठी तुमच्या कम्प्युटर आणि मोबाइलमध्ये 'क्राम' असणे गरजेचे आहे. वेबसाइटवरील तुम्हाला आवडलेले कोणतेही संदर्भ तुम्ही स्टोअर करून ठेऊ शकता व ते तुम्ही फावल्या वेळात वाचू शकता. मोबाइलप्रमाणेच तुमच्या कम्प्युटरवरही तुम्हाला मेसेजेस टाइप करता येतील, तसेच आलेले मेसेजेस वाचताही येतील. परंतु, हे सर्व एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला 'क्राम'मय व्हावे लागणार आहे, म्हणजे तुमच्याकडे कम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि मोबाइल या दोन्ही गोष्टींमध्ये 'क्रोम' ही ऑपरेटिंग सिस्टिम असणे गरजेचे आहे.

Saturday, 29 September 2012

युएसबी संगणक खिशात घालून खुशाल फिरा!


लंडन - यूएसबी स्टीकमध्ये तुमचा वैयक्तिक संगणक खुशाल खिशात घेऊन जा, गरज पडली की अन्य कोणत्याही संगणकावर त्याचा वापर करा. तुम्ही खिशात आणलेला संगणक वापरत आहात याचा थांगपत्ता कुणालाही लागणार नाही, असे जेम्स बॉँडलाही भूरळ घालणारे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

एका साध्या यूएसबी मेमरी स्टीकमध्ये विंडोजसारखी पूर्ण ऑपरेटिंग सिस्टिम आहे. गरज पडली की ही यूएसबी स्टीक कोणत्याही संगणकाला प्लग करायची. तो संगणक लगेच तुमच्या वैयक्तिक सेटअपमध्ये रिस्टार्ट होईल आणि तुम्हाला तुमचा वैयक्तिक संगणक पूर्ण क्षमतेने वापरता येईल.

या तंत्रज्ञानाला ‘टेल’ असे संबोधण्यात आले आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे ज्या पीसीवर तुम्ही तुमचा संगणक ऑपरेट केला, त्या पीसीवर तुमची ब्राऊसिंग हिस्ट्री किंवा अन्य कोणत्याही बाबीच्या किंचितही पाऊलखुणा मागे राहाणार नाहीत. तुमचे काम संपले की तो संगणक शट डाऊन करा. यूएसबी स्टीक तुमच्या खिशात घाला. तुम्ही तुमचा पीसी तेथे ऑपरेट केला हे त्या संगणकाला अजिबात ट्रेस करता येणार नाही.



तंत्रज्ञान चांगले पण - ही यूएसबी स्टीक संगणकाला जोडल्यानंतर तुम्ही जे काही करता ते सगळे काही टेलमध्येच होते. म्हणजे तुम्ही ब्राऊज केलेल्या वेबसाइटच्या कुकीज किंवा रिसायकल बिनमध्ये तुमचा एखादा डॉक्यूमेंट शिल्लक राहाण्याची सुतरामही शक्यता नाही. हे नवे तंत्रज्ञान चांगले असले तरी यूएसबी स्टीकद्वारे अत्यंत गुप्तपणे काम करता येणार असल्याने लोकांना बेकायदेशीर कारवाया करणे सुलभ होणार असल्याची टीका संगणक सुरक्षातज्ज्ञ करू लागले आहेत.

सुरक्षेची हमी पण हरवण्याची भीती - टेलमुळे तुमचे डॉक्यूमेंट कोणालाही चेक करता येणार नाही. तुमचा पीसी सुरू असला किंवा तुमच्या खिशात ठेवलेला असला तरी त्याच्या हालचालींवर कोणालाही पाळत ठेवता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला सुरक्षेची हमी मिळते. असे असले तरी ही यूएसबी मेमरी स्टीक हरवणार नाही, एवढीच दक्षता तुम्हाला घ्यावी लागणार आहे.

Thursday, 13 September 2012

लहानग्यांसाठी येतोय संगणक बालकोश!


 

धुळे- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळ, मुंबई यांच्याकडून आतापर्यंत एकूण 18 विश्वकोशांची निर्मिती करण्यात आली असून, सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत विश्वकोशाचा 19वा खंड ‘सृष्टी आणि मानव’ या विषयावर येणार आहे. तसेच संगणकाचे महत्त्व लक्षात घेऊन संगणकीय बालकोश व बालकथा, जातककथा, पंचतंत्र, पुराण कथा, इसापनीती हे सर्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे या दृष्टिकोनातून मंडळाकडून लवकरच कथाकोशची निर्मिती होणार आहे, अशी माहिती डॉ.विजया वाड यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

त्या म्हणाल्या की, लहान मुलांना संगणकाबाबत येणार्‍या अडचणी, नवीन तांत्रिक गोष्टी, इंटरनेट सर्चिंग व अन्य अथपासून इतिपर्यंतच्या गोष्टी समजाव्यात यासाठी मराठीत संगणकीय बालकोश येणार असून, त्यात ही सर्व माहिती दिली जाणार आहे. याशिवाय नव्या पिढीला इसापनीती, पंचतंत्र, विज्ञानकथांसह मराठी कथांचा ठेवा मिळावा यासाठी कथाकोशाचीही निर्मिती केली जाणार आहे. या कथाकोशात लहान मुलांना प्रेरणा देणार्‍या देशातील 11 महान व्यक्तींच्या कथांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यात रवींद्रनाथ टागोर, भा.रा.भागवत, साने गुरुजी आदींचा समावेश आहे. लवकरच हे कोश बच्चे कंपनीच्या भेटीस येतील. यापूर्वीही राज्य विश्वकोश मंडळाने विश्वकोशाचे 9 खंड युनिकोडच्या माध्यमातून जगासमोर आणले आहेत. त्यासाठी पुण्यातील सी-डॅकचे महेश कुलकर्णी व संगणकतज्ज्ञ माधव शिरवळकर यांचे बहुमोल सहकार्य मिळाले आहे.

सीडीज्चे वजन केवळ 450 ग्रॅम

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळाकडून युनिकोडचा वापर करून ऑनलाइन विश्वकोश तयार होत आहेत. तसेच सर्व खंडांचे रूपांतर सीडीमध्ये होत आहे. आतापर्यंत आलेल्या सर्व विश्वकोश खंडाच्या सीडीज बाजारात उपलब्ध असून, त्यांची किंमत केवळ 750 रुपये इतकी आहे. तसेच वजन केवळ 450 ग्रॅम आहे. हा सीडीरूपी ज्ञानाचा खजिना लहानशा बॅगेत घेऊन फिरता येते. सर्वांसाठी उपयुक्त असा हा खजिना आहे.

पोर्टल 22 देशांत प्रसिद्ध

विश्वकोश मंडळाच्या वेब पोर्टलला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 22 देशांतून 2 लाख 80 हजार हिट्स या वेबसाइटला मिळालेल्या आहेत. भविष्यात संपूर्ण 19 खंड व इतर कोश युनिकोडच्या माध्यमातून जगासमोर आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मंडळाकडून विश्वकोश मंडळाच्या प्रचार-प्रसारासाठी सर्वंकष प्रय} सुरू असून, विविध प्रकारच्या स्पर्धा, सीडीज्मध्ये विश्वकोश इ.ला प्रोत्साहन देण्याचे काम होत आहे. बाहेरदेशांत एनसायक्लोपीडिया-ब्रिटानिका या विश्वकोशांना खूप महत्त्व आहे; परंतु मराठी विश्वकोश त्या प्रमाणात अभ्यासले जात नाहीत. त्यामुळे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रपातळीवर विश्वकोशनिर्मितीसाठी प्रय} केले जाणार आहेत.

 

डायबेटीसची माहिती देणाऱ्या दोन उत्तम लिंक्स

 निळं वर्तुळः मधुमेहाचं आंतरराष्ट्रीय प्रतीक
डायबेटीस किंवा मधुमेह हा आपल्या आजुबाजूला नेहमीच वावरत असतो. कधी कधी तर तो आपल्याच शरीरात असतो, किंवा आपले प्रियजन त्याच्याशी झगडत असलेले आपण पहात असतो.
आपली अशी कल्पना असते की आपल्याला डायबेटीस म्हणजे काय हे नीट माहित आहे. स्वादुपिंड, इन्शुलिन, शुगर लेव्हल्स, शुगर हाय होणं म्हणजे काय, डायबेटीसने जखम लवकर बरी होत नाही वगैरे ज्ञान वाचून, ऐकून किंवा टीव्हीवर पाहून आपल्याकडे जमा झालेलं असतं. पण ह्या बाबतीत धोक्याची सुचना ही की हे जमा झालेलं ज्ञान अपुरं, अर्धवट किंवा क्वचित गैरसमजावर आधारलेलंही असू शकतं.

डायबेटीस संबंधी, ज्या माहितीवर विसंबून राहता येईल, अशा दोन साईटस (खरं तर पेजलिंक्स) मी नेहमीच संदर्भासाठी वापरत असतो. त्यातली पहिली लिंक म्हणजे - How Diabetis works. ह्या पहिल्या लिंकमध्ये डायबेटीस म्हणजे नेमकं काय हे सांगितलेलं आहे. 300 पानी पुस्तक वाचून जे ज्ञान तुम्हाला मिळेल ते ह्या पाच पानी लेखात सामावलेले आहे. तुम्हा आम्हा सामान्यांना तेवढं ज्ञान पुरेसं असतं.

दुसरी लिंक आहे - How Diabetic Diets Work. ह्यात डायबेटीस संबंधी आहार आणि विहाराची चांगली माहिती आहे. हा लेख छोटा आहे. तो अमेरिकन लेखकाने लिहीलेला असल्याने त्यात आपले आयुर्वेदिक उपचार तसेच योगोपचाराची माहिती त्यात नाही. मात्र, त्यातील मुलभूत माहिती सर्वांनाच खूप उपयुक्त वाटेल.


ह्या दोन लिंक्स आपण जरूर वाचा. डायबेटीस संबंधी एखादा गैरसमज तुमच्या मनात वर्षोनुवर्षे रूजलेला असेल तर तो नक्कीच दूर होईल.

Saturday, 1 September 2012

टि.व्ही. वरील कार्यक्रम आता युट्यूबवर

जागतिक क्रमवारीत युट्यूबचा तिसरा क्रमांक लागतो. इंटरनेटवर ऑनलाईन व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब ही सर्वांत लोकप्रिय साईट आहे. युट्यूब वेबसाईट ही गूगलच्या इंटरनेट साम्राज्याचा भाग आहे. त्यामुळे गूगलकडे साधेपणातून वेगळेपण जपण्याची जी कला आहे, तीच कला आपण युट्यूब या साईटमध्ये देखील पाहू शकतो. दोन वर्षांपूर्वी “युट्यूबवर ऑनलाईन चित्रपट” आणि “युट्यूबवर लाईव्ह आय.पी.एल. सामने”, असे दोन लेख आपण पाहिले होते. युट्यूबने आता टि.व्ही. वरील कार्यक्रमांसाठी खास विभाग सुरु करुन पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करुन दाखवलं आहे.

जुन्या काळात टि.व्ही. वरील एखादा कार्यक्रम चुकला की तो पुन्हा नंतर पाहता येत नसे. त्यानंतर टि.व्ही. वर एकच कार्यक्रम दिवसातून ३ वेळा (कधीकधी काही कार्यक्रम याहूनही अधिक वेळा) दाखावले जाऊ लागले, तेंव्हा ठराविक वेळी टि.व्ही. समोर हजर राहण्याचं बंधन उरलं नाही. संगणकावर टि.व्ही. ट्यूनर कार्ड वापरुन टि.व्ही पाहता येऊ लागला आणि त्यावरील कार्यक्रम साठवून ठेवता येऊ लागले, पण त्याचा लाभही सर्वसामान्यांपर्यंत काही पोहचला नव्हता. अलिकडे काही डिश टि.व्ही. सेवा पुरवणारे टि.व्ही वरील कार्यक्रम साठवून ठेवण्याची सोयही पुरवतात. पण ही सुविधा देखील अजून सर्वांपर्यंत पोहचलेली नाही. यातच युट्यूबने हवं तेंव्हा टि.व्ही. वरील कार्यक्रम पाहण्याचा आणखी एक पर्याय आपल्या समोर आणला आहे.
 
टि.व्ही. वरील कार्यक्रम हवे तेंव्हा युट्यूबवर पाहणे ही काही नवीन गोष्ट नाही. माझा एखादा आवडता कार्यक्रम पाहयचा चुकला किंवा विसरला तर तो मी युट्यूबवर पाहतो. काही हौशी लोक रोज युट्यूबवर आपले आवडते कार्यक्रम अपलोड करत असतात. असं करुन त्यांना काय मिळतं माहित नाही! पण आज एखादा कार्यक्रम बुडाला, तर तो दुसर्‍या दिवशी लगेच युट्यूबवर उपलब्ध होतो. त्यासाठी आपल्याला केवळ त्या कार्यक्रमाचं नाव आणि त्या कार्यक्रमातील एखाद्या एपिसोडच्या प्रसारणाची तारीख युट्यूब मधील सर्च बॉक्समध्ये टाकावी लागते. तेंव्हा युट्यूबवर टि.व्ही. वरील एखादा कार्यक्रम पाहणे यात काही नवीन नाही.
युट्यूबवर टि.व्ही. वरील कार्यक्रम
यावेळी युट्यूबने इतकंच केलं आहे, की त्या सर्व कार्यक्रमांसाठी स्वतंत्र असा विभाग केला आहे. युट्यूब वर केवळ हौशी लोक अनधिकृतपणे कार्यक्रम अपलोड करतात असंही नाही. काही कार्यक्रम टि.व्ही. चॅनल स्वतःच्या युट्यूबवरील चॅनलच्या माध्यमातून अधिकृतपणे अपलोड करतात. तर अशा अधिकृतपणे अपलोड केलेल्या कार्यक्रमांना एकत्र घेऊन युट्यूबने टि.व्ही. वरील कार्यक्रमांसाठी एक स्वतंत्र विभाग तयार केला आहे. तो विभाग आपल्याला या इथे पाहायला मिळेल – youtube.com/shows. 
गूगलच्या एकंदरीत कार्यप्रणालीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते आपली एखादी सेवा त्या त्या देशात, प्रदेशात राहणार्‍या लोकांच्या अनुकूल बनवतात. उदाहरणार्थ, गूगलच्या सर्च इंजिनची मराठी आवृत्ती. त्याचप्रमाणे युट्यूबवर देखील भारतातीतल लोकांना नजरेसमोर ठेवून भारतीय भाषांतील कार्यक्रमांची वर्गवारी केली गेली आहे. पण यात अजूनतरी मराठीचा समावेश झालेला मला दिसला नाही. आपल्याला जर मराठी कार्यक्रम ऑनलाईन पाहायचे असतील, तर नेहमीप्रमाणे त्या कार्यक्रमांच्या नावांचा युट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये शोध घेतला, तरी ते आपल्याला सापडतील. एखादा कार्यक्रम जर आपल्याला युट्यूबवर सापडत नसेल, तर युट्यूबला देखील एक पर्याय आहे तो video.india.com चा. या इथेही आपल्याला आपले आवडते हिंदी, मराठी कार्यक्रम पाहता येतील. 
 
एकंदरीत बोलायचं झालं, तर टि.व्ही. वरील कार्यक्रम आता प्रेक्षकांसाठी मागणीनुसार (ऑन डिमांड) उपलब्ध होत आहेत. आणि ऑनलाईन कार्यक्रम पाहण्याचा आणखी एक फायदा काय? तर टि.व्ही. वरुन होतो, तसा जाहिरातींचा भडीमार आपल्यावर होत नाही व अर्ध्या तासाचा कार्यक्रम मूळात असतो त्याच वेळात, म्हणजेच २० मिनिटांत संपतो.

फेसबुक मेसेंजर

गूगल, याहू, एम.एस.एन., यांचे स्वतःचे असे मेसेंजर आहेत. पण आजची सर्वांत आघाडीची सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या ‘फेसबुक’ने मात्र आपले स्वतःचे मेसेंजर आत्तापर्यंत निर्माण केले नव्हते. खरं तर, अनेक लोक आपल्या मित्रांबरोबर चॅट करण्यासाठी फेसबुक चॅटचा वापर करतात. तेंव्हा फेसबुकने आपल्या वापरकर्त्यांसाठी खास मेसेंजर का निर्माण केला नाही? याचं मला आश्चर्व वाटत होतं. पण नुकताच फेसबुक इंडियाचा अपडेट मला वॉलवर दिसला, आणि त्यावरुन असं समजलं की, फेसबुकनेही आता आपला मेसेंजर उपलब्ध करुन दिला आहे.

फेसबुक हे जगातील सर्वांत प्रसिद्ध असे सोशल नेटवर्क आहे. आज करोडो लोक आपल्या मित्रपरीवारीशी जवळीक साधण्यासाठी फेसबुकचा वापर करतात. मध्यंतरी फेसबुकने “फेसबुक फॉर एव्हरी फोन” हे अ‍ॅप्लिकेशन लॉन्च करुन लोकांच्या अधिक जवळ पोहचण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यांचा तो प्रयत्न खरोखरच चांगला होता. पण एकंदरीत अ‍ॅप्लिकेशन्सच्या बाबतीत फेसबुक म्हणावं तितकं कुशल वाटत नाही. त्यांचे अ‍ॅप्लिकेशन्स पाहून असं वाटतं की, त्यांना त्याची फारशी पर्वाच नाही. फेसबुकच्या मागे पैशांचं आणि तज्ञांचं इतकं मोठं पाठबळ असताना त्यांची त्याबाबतची अनास्था न समजन्याजोगी आहे. फेसबुकचे अन्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन जर आपण पाहिलेत, तर फेसबुक ही इतकी मोठी कंपनी आहे यावर विश्वास बसत नाही. अगदी सुमार दर्जाचे फेसबुक अ‍ॅप्लिकेशन त्यांनी अँड्रॉईड मार्केटमध्ये उपलब्ध करुन दिले आहे. त्यात विशेष असं काहीच नाही आणि ते अ‍ॅप्लिकेशन फोनची महत्त्वाची इंटरनल मेमरी देखील खूप खर्च करतं. अँड्रॉईड ब्राऊजर वापरुन फेसबुक वापरणं हे त्यांचे अ‍ॅप्लिकेशन वापरण्यापेक्षा कितीतरी अधिक सुलभ आहे. आणि त्यांच्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये मूळ मोबाईल साईटहून वेगळं आणि निराळं असं काहीच नाहीये.
फेसबुक मेसेंजर
अ‍ॅप्लिकेशन्सच्या बाबतीत आपला हाच सुमार दर्जा कायम राखत फेसबुकने आता आपले मेसेंजर संगणकासाठी उपलब्ध केले आहे. कालांतराने ते कदाचीत या मेसेंजरमध्ये सुधारणा करतीलही, पण सध्यातरी ते आपल्या संगणकावर इंन्स्टॉल करुन वापरावे असं त्यात काहीही नाही. सरळ ब्राऊजरच्या माध्यमातून फेसबुक उघडून चॅट का करु नये? या प्रश्नाचं उत्तर फेसबुक मेसेंजरचा वापर करुनही सापडत नाही. फेसबुक मेसेंजरमध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा नाही, किंवा आपण एखाद्या मित्रासाठी ऑफलाईन देखील जाऊ शकत नाही. आपल्या संगणकाच्या बॅकग्राऊंडला जर चॅट अ‍ॅप्लिकेशन सुरु ठेवण्याची आपल्याला सवय असेल, तरच आपण या फेसबुक मेसेंजरचा विचार करावा. पण आपला जर केवळ हाच हेतू असेल, तर आपल्यासाठी याहू किंवा एम.एस.एन. चे मेसेंजर्स आहेतच! या मेसेंजर्समध्ये फेसबुक चॅटची सुविधा आहे. तेंव्हा केवळ एक उत्सुकता म्हणून आपल्याला फेसबुक मेसेंजर वापरुन पहायचे असल्यास ते या इथे उपलब्ध आहे – फेसबुक मेसेंजर.

Thursday, 23 August 2012

कॉम्प्युटरचा स्पीड वाढण्यासाठी कॉम्पुटर क्लीनअप कसा करावा ?


आपला संगणक स्लो झाला कि सगळ्यांनाच डोक्याला ताप होतो.मग पर्याय एकाच असतो कि कॉम्पुटर क्लीन करणे.तशा कॉम्पुटरवर क्लीन करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत.
त्यातील काही सोप्या व खात्रीशीरपणे कॉम्पुटर क्लीन अप करणाऱ्या दोन पद्धती खाली देत आहे.या प्रोसेस केल्यावर कॉम्पुटर नक्कीच फास्टर झालेला आपल्याला जाणवेल.

१]डिस्क क्लीन अप करणे.

आपला कॉम्प्युटर बरंच काळ वापरला तसेच नवीन नवीन अप्लिकेशन इन्स्टॉल केले व री सायकल बिन मधील डाटा व टेम्पररी फाईल्स वेळचे वेळीस डिलीट केल्या नाहीत तर संगणकात बिनकामाच्या फाईल्सची संख्या वाढून कॉम्प्युटर स्लो होऊ शकतो.
असे होऊ नये म्हणून काही प्रथोमाचार पद्धती मधील एक म्हणजे ठराविक वेळानी कॉम्प्युटर मधील सर्व ड्राइव्हचे डिस्क क्लीन अप करणे.
१]प्रथम माय कॉम्प्युटर ओपन करणे.
2]यातील एक ड्राइव्ह डिस्क क्लीनअप साठी निवडावा.
3]त्यावर राईट क्लिक करून प्रोपर्टीवर क्लिक करणे.
4]त्यानंतर ओ एस प्रोपर्टीमधील डिस्क क्लीनअप या बटणावर क्लिक करावे.
5]त्यानंतर थोडा वेळ प्रोसेसिंग चालू राहील त्याद्वारे कॉम्प्युटर मधील नको असलेल्या फाईल शोधल्या जातात.
6]अशा फाईल डिस्क क्लीनअप मध्ये दाखवल्या जातील तेथील सर्व चेक बॉक्स वर क्लिक करणे.
7]नंतर ओके या बटणावर किल्क करणे.
याद्वारे नको असलेल्या सर्व फाईल्स डिलीट केल्या जातील.तसेच री सायकल बिन मधील सुद्धा सर्व फाईल्स डिलीट केल्या जातील.
याच प्रमाणे सर्व सर्व ड्राइव्हचे डिस्क क्लीन अप करणे.यामुळे आपल्या संगणकाच्या स्पीड मध्ये थोडी तरी वाढ नक्कीच होईल.
हीच प्रोसेस ठराविक कालावधीने करणे त्यामुळे कॉम्पुटर क्लीन राहण्यास मदत होईल.

२]डिस्क डी-फ्रँगमेंट करणे:

हि सुविधा विंडोज XP,व्हिस्टा तसेच विंडोज ७साठी हि आहे.
जर आपली सिस्टीम विंडोज असेल तर जवळपास  महिन्याने आपली हार्ड डिस्क डी-फ्रँगमेंट करावी.
फ्रँगमेंट याचा अर्थ असा कि जेंव्हा आपण फाईल तयार करतो किंवा पेस्ट करतो तेंव्हा त्या फाईल या डाटा रुपाने हार्डडिस्क च्या मेमरी लोकेशन वर लोड होतात.ओळीने हा डाटा डिस्कमध्ये लोड केला जातो.
जेंव्हा आपण फाईल कट डिलीट करतो तेंव्हा हा या फाईलची जागा रिकामी तयार होते.व जर नवीन पुढची फाईल जर त्या जागेत बसत नसेल तर ती फाईल डिस्क ची पुढची जागा वापरते व अशा रीतीने डिस्क मध्ये बऱ्याच छोट्या छोट्या जागा मोकळ्या राहतात यामुळे ऑपरेटिंग सिस्टिमला हवा तो डाटा लवकर मिळत नाही तसेच डिस्क मधील हि जागा तशीच मोकळी राहते.
डी-फ्रँगमेंट प्रोसेस नंतर सर्व हार्डडिस्क मधील फाईलची परत व्यवस्थितपणे अरेंजमेंट होते व डिस्क मधील न वापरली जाणारी रिकामी जागा नाहीशी होऊन वापरता जेण्याजोगी जागा वाढते.
यासाठी पुढीलप्रमाणे प्रोसेस करावी.
1]माय कॉम्पुटर ओपन करावे.
2]डिस्क ड्राइव्हवर राईट किल्क करावे.
3]प्रोपर्टी ऑप्शन निवडावा.
4]टूल या पर्यायावर जावे.
5]डी-फ्रँगमेंट नाऊवर क्लिक करावे.
६]डिस्क डी-फ्रँगमेंट विंडो मध्ये ड्राइव्ह सिलेक्ट करा.
७]डी-फ्रँगमेंट ऑप्शन्स वर क्लिक करून डी-फ्रँगमेंट सुरु करावे.
अशा तऱ्हेने सर्व डिस्क ड्राइव्ह डी-फ्रँगमेंट करणे.
अशा सोप्या पद्धतीने आपण आपल्या कॉम्पुटरवर स्पीड वाढवण्यासाठी प्रथमोपचार नक्कीच करू शकता व याने कम्पुटरला कोणतेच नुकसान होण्याचा धोका नाही व यानंतर आपल्या संगणकाचा स्पीड नक्कीच वाढेल.
या सध्या व सोप्या पद्धतीने आपण आपला संगणक टकटकीत ठेवू शकता.मग वाट कसली बघताय सुरु करा कॉम्पुटर क्लीन अप आणि रुपांतर करा आपल्या मंद कॉम्पुटरचे  जास्त फास्ट आणि जास्त स्पेसअसणारया कॉम्पुटर मध्ये…
आपणस काही शंका किंवा प्राब्लेम आल्यास नक्की कळवा..मी आहेच मदतीला.. :)