तुम्ही अजूनही पेंटिअम सिरिजचे कॉम्प्युटर वापरता का ? तर तुम्ही अजुनही मागच्या जगात वावरता आहात.. कारण पेंटिअम सिरिजनंतर आलेले ‘ कोअर टू ड्युओ ‘ देखिल आता जुना झाला… त्यांच्या जागी इंटेलने आपला सर्वात फास्ट असा ‘ कोअर आय सेव्हन ‘ हा नवा प्रोसेसर लॉंच केला. हा जगातील सर्वात फास्ट प्रोसेसर असल्याचा इंटेलचा दावा आहे.
आज देशात वापरल्या जाणा-या बहुतांशी कॉम्प्युटरमध्ये इंटेल प्रोसेसर वापरले जातात. तसेच कॉम्प्युटरचा वापरही आता प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे इंटरनेट सर्फिंग, विडिओ एडिटिंग, गेमिंग आणि रेग्युलर कॉम्पयुझिंगसाठी ‘ हाय स्पीड ‘ ही गरज बनली आहे. त्यासाठीच इंटेलने ‘ कोअर आय सेव्हन ‘ हा नवा प्रोसेसर बाजारात आणालाय, असे इंटेलचे मार्केटिंग डायरेक्टर प्रकाश बगरी यांनी सांगितले.
कॉम्पयुझरच्या नव्या गरजा लक्षात घेऊन ‘ नेहलम प्रोसेसर ‘ या नव्या मालिकेअंतर्गत इंटेलने आणलेला ‘ कोअर आय सेव्हन ‘ हा पहिलाच प्रोसेसर आहे. ९६५, ९४० आणि ९२० या तीन सिरीजमध्ये आणलेले हे प्रोसेसर जे अनुक्रमे ३.२० गिगाहर्टझ, २.९३ गिगाहर्टझ आणि २.६६ गिगाहर्टझ या क्लॉकस्पीडमध्ये बाजारात उपलब्ध असतील. हे प्रोसेसर डीडीआर३-१०६६ मेमरीला सपोर्ट करतील. त्यामुळे हे प्रोसेसर भन्नाट स्पीडचा अनुभव देतील, असे इंटेलचे म्हणणे आहे.
‘ कोअर टू ड्युओ ‘ मध्ये नसलेले सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे टर्बो बुस्ट टेक्नोलॉजी. या तंत्रामुळे गेमिंग, सर्फिंग सारख्या हायस्पीड गरजा पूर्ण करणे सोपे होईल. तसेच या तंत्रामुळे वीजेचा अतिरिक्त वापर टळून कॉम्प्युटर चांगला वेग देऊ शकतो. तसेच सर्व्हर टेक्नॉलॉजीसाठी हे तंत्रज्ञान फायद्याचे ठरेल, असा इंटेलने स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment