Monday, 2 January 2012

आकाशचा नवा टॅब येतोय ...बाजारात....


भरपूर गाजावाजा झालेला सरकारचा ३५$ चा टॅबलेट प्रॉजेक्ट मधला आकाश टॅबलेट आता मिळणार जानेवारी २०१२ पासून.  आकाश टॅबलेट चे २ प्रारुप आहे एक सर्वसामान्य लोकसाठी ज्याची किमत असणार आहे ३००० रुपये ज्यात SIM आणि GPRS असणार आहे आणि दुसरा फक्त विद्यार्थी साठी ज्याचे किमत १५०० रुपये ज्यात  SIM आणि GPRS नसणार

सर्वसामान्य लोकसाठीचा टॅबलेट नेट वरुन ऑर्डर करू शकतो पण विद्यार्थी साठीचा टॅबलेट फक्त सरकार विद्यार्थी ला देणार(कसा ते अजुन संगीतला नाही ). बाकीचे टॅबलेट १०००० चा वरती असताना ३००० ला टॅबलेट येणार महणून याची अनेक जण वाट बघत होते. पण अनेक वेळी याचे  लॉंच पुढे धकलले होते. त्यामुळे याबाबत थोड्या शंका निर्माण झाल्या होता पण आता हा टॅबलेट खरच मिळणार आहे.
याचे विनिर्देश खालील प्रमाणे
आकार :190.5×118.5×15.7MM
वजन : 350ग्रम
प्रोसेसर : 366Mhz
RAM : 256 Mb
Memory : 2Gb flash expandable up-to 32Gb
Operating system : Android 2.2 Froyo
स्क्रीन : 7” रेज़िस्टिव टच स्क्रीन
पिक्चर रेज़ल्यूशन :800×400 पिक्सल.
USB Port : 2
Wi-Fi Enable


 आकाश टॅबलेटचं बुकिंग करण्याची संधी ज्यांनी गमावली  त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. डाटाविंड कंपनीने १५  डिसेंबरला  aakashtablet.com या संकेतस्थाळवर  आकाशसाठी ऑनलाईन बुकिंगची सूविधा उपलब्ध करुन दिली  होती. आता ज्यांना त्यावेळेस या संधीचा लाभ घेता आला  नव्हता त्यांना  NCarry.com. या संकेतस्थळावर बुकिंग करता  येणार आहे.  NCarry.com या ऑनलाईन शॉपिंग साईटने  आकाश टॅबलेटसाठी बुकिंग सुरु केलं आहे. ऑनलाईन पेमंट  करणाऱ्यांना प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याचं या  ऑनलाईन साईटने म्हटलं आहे....





|






No comments:

Post a Comment