खुप ठिकाणी अशी सोय उपलब्ध आहे.जिथे आपण आपल्या कीबोर्डच्या सहाय्याने इंग्लिश बटण्स् दाबून मराठीतून लिहितो. आणि तो मजकूर कॉपी करुन जिथे हवा त्या ठिकाणी पेस्ट करतो. पण जिथे तो मजकूर आपण पेस्ट करतो तिथेच आपल्याला डायरेक्ट देवनागरी लिपित लिहिता आलं तरं!!! जसं मी अत्ता ह्या ब्लॉगवर मराठीतून लिहित आहे. तशी ब्लॉगरनेही मराठीतून लिहीण्याचीसोय उपलब्ध करुन दिली आहे. पण त्यापेक्षाही खुप सोप्या पध्दतीने आपण फक्त ब्लॉगवरच नाही तर इंटरनेटवर कोठेही मराठीतून लिहू शाकतो. मी ब्लॉगरने उपलब्ध करुन दिलेली सोयही वापरत नाहिये आणि या ब्लॉगवर डायरेक्ट मराठीतून लिहित आहे ते ‘लिपीकार’ या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने. माझ्यासारखंच तुम्हालाही जर इंटरनेटवर डायरेक्ट मराठीतून लिहायचं असेल, तर त्यासाठी प्रथम तुम्हाला हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करावं लागेल अणि ते कसं करायचं ते पुढीलप्रमाणे:-
Get paid to share your links!
१. लिपीकार.कॉम ह्या वेबसाईटवर जा.
२.तिथे खालिल बाजुस लिपीकारची दोन versions आहेत.
४.Lipikaar Windows Software खालिल Download Now या option वर click करा.
५.मग तुमचं नाव आणि E-mail देउन Download Lipikaar या बटणावर click करा.
६.त्यानंतर एक स्क्रिन दिसेल त्यामधिल आपली कोणती operating system असेल त्यापुढील बटणावर click करा.
७.सेव केलेली फाइल इन्स्टॉल करा.
८.इन्स्टॉल केल्यानंतर डेस्कटॉपवर ' लि ' असा एक शॉर्टकट येईल.
९.त्या शॉर्टकट वर double click करा.
११.त्या आयकॉनवर click करुन Choose Language मधुन मराठी भाषा निवडा.

१२.आता तुम्ही इंटरनेटवर मराठी लिहीण्यासाठी तयार आहात.
१३.आणि हो ! मराठी लिहीत असताना मधेच English देखिल लिहावं लागतं,त्यासाठी Ctrl + Alt + L ही short cut बटणस् दाबून भाषा बदलू शकता.
No comments:
Post a Comment