Wednesday, 21 March 2012

विंडोज ८ :मायक्रोसॉफ्टने घोषित केली आहे विंडोजची सर्वात अद्यावत ऑपरेटिंग सिस्टिम.


विंडोज एक्स.पी. व्हिस्ता,विंडोज ७ च्या अभूतपूर्व यशानंतर मायक्रोसॉफ्टने सध्या तैवानमध्ये होत असलेल्याकॉम्प्युटेकस्ट २०११ या शोमध्ये आपली नवीनतम अशी विंडोज ८ प्रदर्शित केली.
हि ऑपरेटिंग सिस्टिम प्रामुख्याने मोबाईल व टेबलेट पीसीसाठी नव्यातून बनवली असून ती सध्या चालणाऱ्या संगणकामध्ये व लँपटँाप मध्ये सुद्धा वापरण्यात येणार आहे.
या ऑपरेटिंग सिस्टिम साठी मायक्रोसॉफ्टला टचस्क्रीन व टेबलेट पीसीसाठी लागणारे नवीन बदल करावे लागले आहे.
विंडोज चा हा नवा अविष्कार अँपलची I-OS व गुगलची Android ऑपरेटिंग सिस्टिम यांना चांगलीच टक्कर देईल असे तज्ञांचे मत आहे.
या ऑपरेटिंग सिस्टिममुळे मायक्रोसॉफ्ट पुन्हा मोबाईल व टेबलेट ऑपरेटिंग सिस्टिमच्या शर्यतीत आली आहे.

कशी आहे हि  ऑपरेटिंग सिस्टिम:

खास मेट्रो यु.आय :
प्रथमतः व टेबलेट पीसी अनलॉक करण्यासाठी विंडो स्क्रेन वरच्या बाजूस सरकवावी तेन्ह्वा आपणास होम स्क्रीन दिसेल.
या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये सुरवातीला या ओ.एस.( ऑपरेटिंग सिस्टिम) साठी बनवलेला खास मेट्रो यु.आय.दिसेल.
यामध्ये वातावरणाची माहिती देणारे अप्लीकेशन ट्वीटर,इन्वेस्टमेंट ,व्हिडिओ,गाणी व इतर भरपूर अप्लीकेशन एकाच स्क्रीनवर विशिष्टपूर्णपणे मांडली गेली आहेत.
आपण टचस्क्रीन वर स्क्रोल करून पूर्ण मांडणी पाहून अप्लीकेशन निवडू शकतो.
तसेच आपण कीबोर्ड जोडला असेल तेंव्हा पेज अप आणि पेज डाऊन बटन वापरून आपण संपूर्ण स्क्रीनभर कंट्रोल करू शकतो.
सुरवातीच्या स्क्रीन वर आपण सर्वात जास्त वापरलेली अप्लीकेशन दिसतील आपण स्वतः सुद्धा आपल्याआवडीनुसार ग्रुप सेट करून आनंद घेता येतो.
आपण या अप्लीकेशनला टच करून डायरेक्ट ते अप्लीकेशन उघडू शकतो.
अप्लीकेशन उघडल्यानंतर पुन्हा होम स्क्रीन वर येण्यासाठी स्क्रीन च्या उजव्या बाजूस विंडोजचा लोगो ला टच केल्यावर आपण पूर्वीच्या होम स्क्रीनवर येतो.

ठळक बाबी:

  • विंडोमध्ये अप्लीकेशन डेवलपमेंटसाठी मायक्रोसॉफ्टने विशेष प्लेटफॉर्म केला आहे ज्याचे नाव आहे टेलेरद्र अप्लीकेशन प्लेटफॉर्म.
  • यामध्ये आपण HTML 5,जावा ,CSS यासारख्या सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रामींग लँग्वेजेस वर आधारित अप्लीकेशन डेवलपमेंट करू शकतो.
  • यामधील सर्व अप्लीकेशन जलद गतीने चालतात.तसेच एका अप्लीकेशनमधून दुसरया अप्लीकेशनमध्ये क्षणात जाता येते.
  • तसेच सर्व अलर्ट मेसेज देण्यासठी स्क्रीनवर नोटीसची सुविधा पण दिली आहे.
  • उजव्या बाजूची स्क्रीन टच करून आतील बाजूस ढकलली असता विंडोजचा कंट्रोल बार ओपन होतो.
  • कंट्रोल बार वर आपण सेटिंग करू शकतो तसेच विंडोज च्या आयकॉन वर टच केले असता आपण होम विन्डोवर पोहचतो.
  • डाव्या बाजूची स्क्रीन टच करून आतील बाजूस ढकलली असता आपण अगोदर उघडलेली अप्लीकेशन आपण परत उघडू शकतो.
  • जेंव्हा आपण अगोदर उघडलेले अप्लीकेशन परत उघडत असू तेंव्हा ते लहान विंडो मधून परत फुल्ल स्क्रीन होईल.
  • याचा खास फायदा म्हनजे आपण आपल्या दोन्ही अंगठ्याच्या मदतीने आपणास टेबलेटवर अगदी सुरळीतपणे काम करता येते.
  • आपण खालील बाजूस वर ओढल्यास चालू अप्लीकेशन ची सेटिंग सेट करू शकतो.
  • यावर अति उच्य दर्जाचे व्हिडिओ न थाबता चालतात.
  • तसेच एकाच वेळी अनेक अप्लीकेशन चालू असतात व कोणतेही अप्लीकेशन चालू स्थितीत परत उघडू शकतो.एकदम मल्टीटास्किंगचा अनुभव..

प्रोसेसर विषयक:

या ऑपरेटिंग सिस्टिमचे आणखी एक उल्लेखनीय गोष्ट हि आहे कि पहिल्यांदाच मायक्रोसॉफ्टने आर्म प्रोसेसर्स साठी विंडोज चा सपोर्ट दिला आहे.
विंडोज ८ हो अशी ऑपरेटिंग सिस्टिम आहे कि जी इंटेलच्या X८६ प्रोसेसर्स व आर्म कंट्रोलर प्रोसेसेस या दोघांनाही सपोर्ट करते.
AMD,Intel हे विंडोज चे पहिले पार्टनर आहेतच तसेच या  ऑपरेटिंग सिस्टिम साठी आर्म प्रोसेसेस असणारे नवे पार्टनर सुद्धा मायक्रोसोफ्टला मिळाले आहेत.
जसे कि एनव्हीडीया कंपनीचा Kal-Ei ,QualComm चा Snapdragon,Texas Instrumentचा omap4 प्रोसेसर असे आर्म बेस असणारे नवे प्रोसेसर आहेत.
जे भविष्यात येणारया स्मार्ट फोन व टेबलेट पी सी मध्ये वापरले जातील.   
आपण जेंव्हा USB पेन drive जोडला असता सिस्टिम आपोआप कोणते अप्लिकेशन आहे ते ओळखून ते चालूकरते.
तसेच या ओ.एस द्वारा ७२० पी व्हिडिओ घेवू शकतो.
अशा प्रोसेसरशी संलग्न अनेक सुविधा या नव्या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आहेत.

कोणत्या विशेष सुविधा आहेत ?

विंडोज स्न्याप सुविधा:
  • एक अप्लिकेशन फुल्ल स्क्रीन वर चालू असताना आपण दुसरे अप्लिकेशन चालू अप्लिकेशन जवळ सोडून एकच वेळी दोन स्क्रीन पाहण्याचा आनंद घेवू शकतो.
  • यावेळी दोन्ही अप्लिकेशन सुरळीत पाने चालू सतत व आपण कोणत्याची अप्लिकेशन वर काम करू शकतो.तसेच अप्लिकेशन ची साईझ बदलू शकतो.  
नवा इंटरनेट ब्राऊजर :
  • या ऑपरेटिंग सिस्टिम साठी इंटरनेट एक्सप्रोरर १० हि नवीन इंटरनेट ब्राऊजर सोफ्टवेअर देण्यात आले आहे.
  • यात टच स्क्रीन साठी विशेष बदल केले आहेत.आपण इंटरनेट ब्राऊजर चालू असताना वरील बाजूस खाली ओढल्यास आपण उघडलेल्या विन्डो टेब दिसतील त्यावर टच करून आपण ती विंडो उघडू शकतो.
  • तसेच खालील बाजूस URL वर टच केले असता कीबोर्ड आपोआप उघडला जाईल.
  • यामध्ये टेबलेट धारकांसाठी कीबोर्ड चा नवा प्रकार आणला आहे.
  • एक बटन दाबून आपण कीबोर्ड दोन भागात विभागूनतो दोन्ही अंगठ्याने कीबोर्ड अगदी सहज वापरू शकतो.
  • यामध्ये GPUचा वापर करून इंटरनेट ब्राऊजर चालवण्यासाठी हार्डवेअर अय्सिस् ची सोय आहे.
  • तसेच आय्डोबी फ्लाशसाठी सुद्धा हि सोय आहे.त्यामुळे फ्लाश व ब्राऊजर उच्च दर्जाचे कन्टेन्ट चालवण्यास पात्र ठरतात.  
संगणकासारखा वापर:
  • हि जरी टेबलेटसाठी बनवली गेली असली तरी याचा वापर नेहमीचा संगणकासारखा करत येतो.
  • याच्या होम स्क्रीन वर एका बटणावर टच केल्यावर आपण आपल्या नव्या ऑपरेटिंग सिस्टिम  चे रुपांतर सध्या वापरात असणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये करू शकतो.
  • व परत पुन्हा नव्या  ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये परत हि येवू शकतो.
  • तसेच संपूर्ण स्क्रीनला टच चा सपोर्ट दिला आहे.
  • या मोड मध्ये आपण विंडोज च्या इतर ऑपरेटिंग सिस्टिम सारखे फाईल्स व फोल्डर विंडो वर पाहू व वापरू शकतो.
  • तसेच डेस्कटॉपवर चालणारे सर्व अप्लिकेशन आपल्या पद्धतीने चालवता येतात आणि पी सी मोड ते टेबलेट मोड हे क्षणात जाता येते.
  • यासाठी आपला डिस्प्ले १६:९ रुपांतरीत हवा. यात आपणास आपली स्क्रीनला १०२४ X ७६८ इतके रेझोल्यूशन मिळते.
नवीन फाईल सिस्टम -प्रोटोगोंन:
  • विंडोज ८ मध्ये जुन्या NTFS  फाईल सिस्टम ला बदलून नव्या अशा प्रोटोगोंन फाईल सिस्टमचा वापर करण्यात आला आहे.
  • जी डिस्क मँनेजमेंट सुरळीतपणे करेल.यात डिस्कचे खराब भाग आपोआप शोधून ते दुरुस्तकरण्याची सोय आहे.
  • तसेच नवीन इंस्टॉलरमधेच डिस्क क्लीन करण्याची सोय आहे.
प्लिकेशन ते अप्लिकेशन शेअरिंग:
  • आपण एका अप्लिकेशन मधून माहिती दुसऱ्या अप्लिकेशन मध्ये पाठवू शकतो. हि मस्त सोय आहे.
  • उदा:फोटो फिडर या अप्लिकेशन मुले आपण आपले फोटो डायरेक्ट ट्वीटर वर अपलोड करू शकतो.
  • यासाठी आपणस कॉपी , पेस्ट, सेव्ह वापरण्याची काही गरज भासणार नाही.

No comments:

Post a Comment