संपूर्ण जगातील कोणत्याही   भूभागाचा, शहराचा, शहरातील रस्त्यांचा, तिथल्या महत्त्वाच्या स्थळांचा,   दुकानांचा, नावासहित समावेश असलेला नकाशा जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर   अतीशय उत्तमरीत्या पाहता आला तर!? असं झालं तर जगाच्या पाठीवर तुम्ही कधीही   हरवणार नाही. आणि वाटेतील अनोळखी रस्त्यांची तुम्हाला कधी भिती वाटणार   नाही.
  (सूचना - खाली रिकामी जागा दिसत आहे!? त्या तिथे एक व्हिडिओ आहे. तो दिसत नसेल तर, पाहण्यासाठी हा लेख संपूर्ण स्वरुपात उघडावा.)
  
पुन्हा   एकदा गुगलने यासाठी एक दर्जेदार सॉफ्टवेअर उपलब्ध करुन दिले आहे. हे   सॉफ्टवेअर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच वापरायचं आहे. याचं नाव आहे ‘गुगल   मॅप्स’.
  
   १. ‘गुगल मॅप्स’ वापरण्याकरता तुमच्या मोबाईलवरुन m.google.co.in/maps या पत्त्यावर जा.
१. ‘गुगल मॅप्स’ वापरण्याकरता तुमच्या मोबाईलवरुन m.google.co.in/maps या पत्त्यावर जा. 
  २. ‘गुगल मॅप्स’ आपल्या मोबाईलवर डाऊनलोड आणि इंस्टॉल करुन घा.
  ३. ‘गुगल मॅप्स’ ओपन केल्यानंतर मोबाईलवरील बटणांच्या सहाय्याने वापरावयाचे   हे शॉर्टकट्स लक्षात ठेवा. ‘२’ या बटणाने ‘मॅप व्हू’ आणि ‘सॅटेलाईट व्हू’   यांदरम्यान स्विच होईल. ‘झुम इन’ साठी ३ नंबरचे बटण आणि ‘झुम आऊट’ साठी १   नंबर बटण वापरावे लागेल. ट्रॅफिक पाहण्यासाठी ७ नंबरचे बटण आणि एखादे   लोकेशन फेव्हरेट म्हणून सेव्ह करण्यासाठी * बटणाचा वापर करता येईल. ‘गुगल   मॅप्स’वर ‘डायरेक्शन’ पाहण्याची सोयही उपलब्ध आहे.
  
   असंच   शहरात फिरता फिरता एकदा रस्ता भटकल्यावर मी माझ्या मित्राला ‘गुगल मॅप्स’   बद्दल सांगितलं. आणि त्याला त्याच्या मोबाईलवर ‘गुगल मॅप्स’ इंस्टॉल करुन   दिलं, तेंव्हा ते पाहून त्याला फारच आश्चर्य वाटलं आणि आनंद झाला. आम्ही   दोघांनी मिळून लगेच आम्हाला जायचं होतं ते ठिकाण शोधून काढलं. शेवटी   अंधळ्याला काठीचा आधार आणि बुडत्याला काडीचा आधार (हे या इथे जुळलं तर   जुळवून घ्या नाहीतर सोडून द्या :-) अशाप्रकारे कधी बाहेर गावी, दुस-या   राज्यात फिरायला गेल्यावर, जर तुम्ही रस्ता भटकलात, तर त्यावेळी आपल्या   मोबाईलवर ‘गुगल मॅप्स’ ओपन करायला विसरु नका.

No comments:
Post a Comment