Saturday, 19 November 2011

आपला मेल हॅक होवू शकतो.

आपला मेल हॅक होवू शकतो. आपला मेल हॅक होत असल्यास ते ओळखण्याच्या काही टिप्स आहेत. 
1.सर्वात प्रथम आपण आपल्या लॉग-इन विषयीची माहिती लक्षात ठेवावी. आपण मेल कधी उघडला होता. त्यावर काय काय केले होते, हे लक्षात ठेवावे.

2. आपण आपला मेल उघडल्यानंतर त्यावर सर्वात शेवटची तारीख पाहू शकता. यावर आपण यापूर्वी कदी आला होतात, याची नोंद असते.

3. ज्या पीसीवरुन मेल एक्टिव्हेट करण्यात आला त्याचा आयपीही यावर दिसतो.

4. मेल पाहिल्यानंतर आपण त्याची एक्सेस तारीख व लॉग-इन-टाइम लक्षात ठेवावा

.
5. दर महिन्याला आपला मेल पासवर्ड आपण बदलावा.


6. मेल पासवर्डमध्ये काही कॅप्स (कॅपिटल)  शब्द तसेच काही आकडेही असावेत.


वरील काही टिप्स आपल्याला मेल एक्सेस करताना उपयोगी पडू शकतात.


मध्ये माझ्या एका मित्राचे ‘गुगल अकाऊंट’ हॅक झाले होते. म्हणजे हॅकर्सनी अगदी हुबेहुब ऑर्कुट सारखं पेज तयार केलं होतं आणि तिथे जर तुम्ही लॉग-इन झालात की, संपलंच मग सगळं! पण यावेळीही गुगलच्या सोयीसुविधा त्याच्यासाठी धावून आल्या. म्हणजे त्याचं अकाऊंट हॅक जरुर झालं! पण त्याचं त्याला ते परतही मिळालं! कसं काय!? त्याने गुगल अकाऊंट्सला आपला मोबाईल नंबरही दिला होता. त्याने मोबाईलच्या सहाय्याने आपला पासवर्ड रिसेट करुन आपलं अकाऊंट परत मिळवलं. ऑनलाईन अकाऊंट आणि आपला मोबाईल नंबर हे दोन्ही एकाच वेळी चोरीला तर जाऊ शकत नाहीत ना! आणि म्हणूनच मला वाटतं, सावधानतेचा उपाय म्हणून प्रत्येकाने आपला मोबाईल नंबर गुगलला देऊन ठेवावा. 

काही चांगल्या websites all computer user

 websites 


To download free soft wares the site is

Free software downloads and software reviews – CNET Download.com

http://www.softpedia.com/

http://www.brothersoft.com/

mobile साठी java applications download करण्यासाठी हि site best आहे माझ्या मते.
http://www.getjar.com/
यातली oxford dictionary खूप छान आहे.

media converter मी नेहमी वापरते. videos mp3 मध्ये convert करण्यासाठी.

काही वेळेला you tube आणि त्यासारख्या काही websites मधील videos ची गाणी छान असतात. नुसती गाणी हवी असतील तर हे convertor छान आहे आणि फ्री आहे. 5 downloads per day . शिवाय यात इतरही बरेच options आहेत.
http://www.mediaconverter.org/
जर तुम्हाला एक pet हवा असेल तर अजिबात त्रास न देणारा pet येथे सापडेल.
http://dlc.thinkdesktop.com/dl/?FI=1307

कॉम्प्युटर स्लो झाल्यास रिस्टार्ट करायचे टाळा.

बर्‍याच वेळेस कॉम्प्युटरवर भरपूर काम केल्याने अथवा भरपूर निरनिराळे सॉफ्टवेअर्स उघडून काम केल्याने कॉम्प्युटर त्या वेळेस थोडासा स्लो होतो म्हणजेच थोडासा हळू चालू लागतो. त्याची झालेली संथ गती आपल्या लक्षात आल्यानंतर आपण कॉम्प्युटर रिस्टार्ट करतो म्हणजेच बंद करुन पून्हा सुरु करतो. जेणे करुन त्याच्या मेमरी मध्ये निर्माण झालेला गुंता सुटून तो पुन्हा व्यवस्थित चालू लागतो.  या परीस्थितीवर चांगला पर्याय म्हणून आपण नेहमी तो कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु करतो, म्हणजेच 'रीस्टार्ट'करतो. मग या कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु करण्याच्या वेळेमध्ये आपली २-३ मिनिटे वाया जातात.

काम करताना थोडासा स्लो झालेला कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु केल्याने कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये झालेला गुंता सुटून तो पुन्हा व्यवस्थित चालू लागतो. अशाप्रकारे कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये झालेला गुंता सोडविण्यावर कॉम्प्युटर 'रीस्टार्ट' करणे हा एकच पर्याय नाही. कॉम्प्युटर 'रीस्टार्ट'   न करता देखिल स्लो झालेला कॉम्प्युटर व्यवस्थित करता येतो. असे करताना कॉम्प्युटरमधिल मेमरीमध्ये झालेला गुंता सोडविण्याची क्रिया खाली दिली आहे.
१. कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर माऊसचे राईटक्लिक करुन येणार्‍या चौकोनातील 'New' या विभागातील  "Shortcut" या नावावर क्लिक करा.



२. आता आपल्यासमोर 'Create Shortcut'  चा चौकोन उघडेल.  त्यातील 'Type tye location of item:'  च्या खालील जागेमध्ये खाली दिलेली ठळक अक्षरातील ओळ कॉपी करुन त्याजागी पेस्ट करा व खालिल Next >  या बटणावर क्लिक करा.

%windir%\system32\ rundll32. exe advapi32.dll, ProcessIdleTasks


३. आता पुढील चौकोनामध्ये 'Type a name for this shortcut'  च्या खालिल जागेमध्ये "Clear Memory" असे टाईप करुन खालिल Finish  या बटणावर क्लिक करा.



४. असे केल्याने आता कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर  "Clear Memory" नावाची एक फाईल तयार होईल. मग जेव्हा-जेव्हा आपणास कॉम्प्युटर स्लो झालेला जाणवेल तेव्हा कॉम्प्युटर 'रीस्टार्ट'  न करता फक्त या फाईलीवर डबलक्लिक करुन पुन्हा कॉम्प्युटरचा वेग सुरळीत करा.

बनवा फेक मॅगझीन कव्हर्स


महाजालावर MagMyPic.com नावाची एक वेबसाईट आहे ज्याच्या मदतीने तुम्ही पण फेक मॅगझीनकव्हर्स बनवु शकताकव्हर वरहवा असलेला एकफोटो या साईटवर जाउन अपलोड करायचातुम्हाला हवे असलेले डिझाईन वर जाउन क्लिक करायचेआणि पिक्चरसेव्ह करायचेबस्स झाले तुमचे स्वतःचे मॅगझीन कव्हर तयार.
साधारण पणे ३० विवीध प्रकारचे कव्हर्स उपलब्ध आहेतचला तर मगबनवा स्वतःचे फेक मॅगझीन कव्हर आणि होतुमच्याकव्हर ची लिंक मला पाठवायला विसरु नका.

Tuesday, 8 November 2011

इंटरनेट एक्सप्लोरर Internet Explorer मधल्या छुप्या गॊष्टी !

 
इंटरनेट वापरण्यासाठी म्हणजेच वेबसाईट पाहण्यासाठी आपण इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करतो. अशा सॉफ्टवेअर्सना 'ब्राऊझर' [Browser] असे म्हणतात. सध्या बरेच मोफत 'ब्राऊझर' मिळतात. जसे फायरफॉक्स, ऑपेरा, नेटस्केप इ. परंतु तरीही शक्यतॊ 'इंटरनेट एक्सप्लोरर' हा ब्राऊझर वेबसाईट पाहण्यासाठी जास्त वापरला जातॊ.

'इंटरनेट एक्सप्लोरर' मध्ये काही उपयोगाच्या गॊष्टी आहेत ज्या काम करताना उपयॊगी पडू शकतात.
१. फुलस्क्रिन Full Screen - इंटरनेट एक्सप्लोररमध्ये वेबसाईट पाहताना कि-बोर्डवरील 'F11' हे बटण दाबल्यास इतर सर्व मेनूबार लपले जातात व आपण पाहत असलेली वेबसाईटच संपूर्ण स्क्रिनभर दिसते. पुन्हा पूर्ववत व्यवस्थित करण्यासाठी 'F11' दाबावे.

२. वेबसाईट पाहताना - शक्यतो सर्वच वेबसाईट शेवटी '.com' नावाच्या असतात. त्यामूळे एखादी वेबसाईट पाहताना आपण सुरुवातीला 'www' आणि शेवटी '.com' टाईप करतो. म्हणजेच www.rediff.com वेबसाईट पाहताना आपण ते नाव संपूर्ण टाईप करतो. त्याएवजी 'इंटरनेट एक्सप्लोरर' मध्ये फक्त ' rediff ' टाईप करुन कि-बोर्ड वरील कंट्रोल बटण दाबून एंटर ( Ctrl + Enter ) दाबल्यास तीथे आपोआप ' www.rediff.com ' येते.

३. आवडत्या वेबसाईट्सची यादी 'Favorites' - एखादी वेबसाईट चांगली वाटली तर तिचे नाव संग्रही लिहून ठेवण्यासाठी हा विभाग उपयोगी पडतॊ. आपण जी वेबसाईट पाहत असाल ती जर तुम्हाला तुमच्या आवडत्या वेबसाईट्सच्या यादीमध्ये नोंदवायची असल्यास कि-बोर्डवरील 'Ctrl + D' (कंट्रोलचे बटण दाबून 'D' हे बटण दाबावे) बटण दाबल्यास कॉम्प्युटर आपणास ती संग्रही म्हणजेच 'Favorites' मध्ये साठवायची आहे का? असे विचारतो. इथे वेबसाईट नोंदविताना ती एखादा फोल्डर बनवून त्यामध्ये देखिल साठविण्याची सोय आहे. 'New Folder' वर क्लिक केल्यास त्याला नाव देऊन 'OK' केल्यास ती वेबसाईट त्या फोल्डर मध्ये नोंदविली जाते.
अशा प्रकारे नोंदविलेली वेबसाईट पुन्हा पाहण्यासाठी ब्राऊझर मधील वरील मेनूबारमधील 'Favorites' ह्या विभागामध्ये क्लिक केल्यास आपणास याआधी नोंदविलेल्या सर्व वेबसाईट्सची यादी मिळते. त्यातील आपणास हव्या असलेल्या वेबसाईटवर क्लिक केल्यास ती वेबसाईट सुरु होईल
.
४. वेबसाईटमधिल फॉन्टचा आकार वाढविणे - काही वेबसाईट वरील फॉन्टचा आकार फारच कमी असतो. अशा वेळी त्यावरील मजकूर वाचायला त्रास होतो. अशा वेळेस कि-बोर्डवरील 'Ctrl' (कंट्रोलचे बटण) दाबून ठेवून आपल्या हातातील माऊसवरील मधले गोल 'स्क्रोल'चे बटण फिरविल्यास चालू वेबसाईटवरील मजकूराचा फॉन्ट लहान अथवा मोठा होतो. आपल्या सोयीनूसार 'स्क्रोलचे' बटण फिरवून आपणास हवी असलेली फॉन्टची साईझ ठेवावी.

५. वेगळी वेबसाईट पाहताना - एखादी वेबसाईट पाहिल्यानंतर दुसरी वेबसाईट पाहण्याकरीता आपण 'Address Bar' वर म्हणजेच जेथे आपण वेबसाईटचे नाव टाईप करतो तेथेच क्लिक करुन नवीन वेबसाईटचे नाव टाईप करतो. अशाप्रकारे 'Address Bar' वर क्लिक करण्याऎवजी कि-बोर्डवरील 'F6' अथवा 'F4' बटण दाबल्यास कर्सर लगेच 'Address Bar' वर जातो.

इंटरनेटचा वेग (Speed) वाढवा!


आपण वापरत असलेल्या इंटरनेटचा वेग (Speed)  वाढविण्यासाठी आपल्या कॉम्प्युटरमध्येच सोय केलेली असते. प्रत्यक्षात इंटरनेटचा वेग हा आहे तेवढाच असतो, पण आपल्या कॉम्प्युटरमधिल विंडोजमध्येच एका जागी तो वेग थोडासा कमी केलेला असतो. याच जागी जर आपण वेग थोडासा कमी करण्याची कमांड बदलून व्यवस्थित दिल्यास थोड्याप्रमाणामध्ये  इंटरनेटचा वेग वाढू शकतो.
खाली दिल्याप्रमाणे जर आपण बदल केल्यास आपण वापरत असलेल्या इंटरनेटचा वेग थोड्याप्रमाणामध्ये  वेग वाढू शकतो.
१) ''स्टार्ट' बटणावरील ' रन (Run...) ' या विभागावर क्लिक करा आणि त्याजागेमध्ये gpedit.msc  टाईप करुन 'OK' बटणावर क्लिक करा.

२) आता आपल्यासमोर "Group Policy"  नावाचा प्रोग्रॅम सुरु होईल.

३) या "Group Policy"  प्रोग्रॅमच्या डाव्या बाजूच्या जागेतील Local Computer Policy  मधिल Computer Configuration मधिल Administrative  Templates  मधिल Network  मधिल QoS Packet Scheduler  वर क्लिक करा.

४) आता उजव्या बाजूच्या जागेतील " limit reservable bandwidth "  वर डबल क्लिक करा.

५) आता आपल्यासमोर limit reservable bandwidth Properties  चा चौकोन उघडेल. त्यातील ' Enabled ' वर क्लिक करुन खालील जागेतील Bandwidth limit %  समोरील संख्या बदलून त्याजागी शून्य (०) ही संख्या टाईप करा आणि 'OK' बटणावर क्लिक करा.

६) आता पाहा पुढल्या वेळेसे इंटरनेट वापरताना थोडाफार फरक जाणवतो का?