Thursday, 22 September 2011

लाईफ़ इन आय.टी..

कि-बोर्ड च्या बटनांच्या आवाजाने संपुर्ण आसमंत भरुन गेलेला आहे. वातावरणात एक प्रकारचा तणाव, कायमचाच भरलेला असतो.sad

बाहेरच्या ऍटेंन्डन्स बोर्डला गळ्यातल्या कार्डने नोंद करुन काचेचे दार उघडुन आत आले की हा लगेच तणाव जाणवतो.
भयाणं.. अंगावर दडपण आणणारा.. cry cry

आपल्या मागे काचेचे दार बंद होते आणि आपला आणि जगाचा जणु भौतीक संपर्कच तुटतो. काळ्या काचेच्या खिडकीतुन बाहेरील वेळ कळणे केवळ अशक्यच असते. बाहेर उन आहे का पाऊस आहे, वादळ आले का जगबुडी झाली, जोपर्यंत ती बातमी इंटरनेट वर येणार नाही तोपर्यंत आतील लोकांनी त्याबद्दल काही कळण्याचा काही मार्गच नसतो.no

शनिवार-रविवारची जोडुन आलेली सुट्टी सुध्दा चेहऱ्यावर प्रसन्नता आणु शकत नाही.worried

इन-बॉक्स मध्ये ऑर्कुट, फेसबुक वर आलेल्या मित्रांच्या नोंदीची मेल्स असतात. पण वाचत बसणे जवळ जवळ अशक्यच होऊन गेलेले असते. कारण साता-समुद्रापार बसलेल्या क्लायंटच्या विकेंड्ची सुरुवात अनेक कामं ऑफ्लोड करुन झालेली असते.
वेलकम टु द वर्ल्ड ऑफ आय.टी. कामाच्या दडपणाचे भुत क्षणाचाही विलंब न करता मानगुटीवर चढुन बसते.devil devil

बोटं कि-बोर्ड वर सराईतपणे फिरु लागतात. प्रोजेक्ट मॅनेजरची लाल-उद्गारवाचक चिन्ह असलेली महत्वाची मेल प्रोजेक्ट ‘येल्लो फ्लॅग’ मधुन ‘रेड फ्लॅग’ मध्ये गेल्याची बातमी देत असते.down

भितीची एक लाट अंगावरुन धावत जाते. कुणाला घाम फुटलेला असतो तर कुणी भितीने आधीच गारठलेले असते. थिजलेल्या शरीराव ए/सी चा थंडगार वारा काटे आणत असतो.

‘कॉफी?’ संगणकाच्या पडद्यावर बाजुच्याच क्युब मध्ये बसलेल्या मित्राचा मेसेज फडफडतो. शरीरावर चढत असलेले दडपण दुर करण्यासाठी तुम्ही उठण्याचा विचार करता, पण समोर साठलेला कामाचा ढीग पाहुन,

‘नो यार, बिट बिझी! लॅटर’
‘ऑल राईट, सी या’

तुम्ही मान उंचावुन त्याच्याकडे बघता, त्याच्या चेहऱ्यावरचे बदलेले भाव बघुन तुम्हाला हासु येते.. क्षणीक.. आणि परत कामात मग्न होता.
दरवेळी मदतीला हमखास धावणारे गुगल नेमके आजच बावचळल्यासारखे करत असते. मिळणारे अनेक पर्यायांपैकी एकही तुम्हाला उपयोगी पडत नसतो. तासभर प्रयत्न केल्यावर तुमची चाळवा-चाळव सुरु होते. तुम्ही पुन्हा एकदा मान उंचावुन बघता.cat

दुसऱ्या क्युबीक मधील एका कन्येशी तुमची नजरानजर होते. ती दोन्ही डोळे मिचकावुन एक हास्य फेकते. तुम्ही हास्य देऊन परत इतरत्र पाहता. मानेवरुन फिरणारे हात, नखांचे कुरतडणे, बोटांची टेबलावर लयबध्द टिक-टिक. प्रत्येकाचंच घोडं कुठेना कुठे अडलेले असते.
संगणकाच्या पटलावर पुन्हा एकदा मेसेज फडफडतो.. ‘कॅन यु कॉल मी नाऊ’ क्लायंट उगवलेला असतो. तुम्ही चरफडता. ‘रात्री झोपत नाहीत का? यांना ना नवरे ना बायका, मोकाट सोडलेल्या वळु सारखे फिरत असतात.’

कॉल सुरु होतो.. तो बोलत असतो, तुम्ही ऐकत असता. कॉल संपतो. तुम्ही चरफडत बाहेर येता. प्रोजेक्ट मध्ये थोडा बदल असतो ज्यामुळे तुम्ही केलेले खुप सारे काम स्क्रॅप झालेले असते. पुन्हा नविन सुरुवात, पुन्हा नविन उमेद.

आठवड्याचे चार दिवस सतत १२-१६ तास काम करुन तुमचा कलीग थकलेला असतो. शुक्रवारी तरी घरी वेळेवर जाऊ या विचारात असतानाच एक ‘एस्कलेशन’ येते. तो जाम वैतागलेला असतो. क्लायंटला कळकळीच्या स्वरात विचारतो, ‘आठवडाभर १६ तास काम केले आहे, एक्सलेशन p2 च आहे, सोमवारी बघीतले तर चालेल का?’

थोड्यावेळाने तुमच्या बॉसला क्लायंटचा फोन येतो, ‘आमचे कॉन्ट्राक्ट तुमच्या कंपनीशी आहे, तुमच्या एखाद्या इंजीनीयरशी नाही. तो १२ तास काम करतो का १६ तास त्याच्याशी आम्हाला काही देणे-घेणे नाही, तुम्ही मागता तेवढे पैसे आम्ही देतो, आम्हाला आमचे काम वेळेवर करुन हवे.’
शुक्रवारची संध्याकाळ सोडाच, आता शनिवार-रविवार सुध्दा त्याचा राहीलेला नसतो.

‘बाबा मला सायकल शिकवा ना..’ पोराची आर्त विनंती या आठवड्यात सुध्दा अर्धवटच रहाणार या विचाराने त्याच्या डोळ्यात पाणी तरळते.
दुपारची जेवणाची वेळ झालेली असते. बायकोने डब्यात प्रेमाने दिलेले अन्न ए/सी मुळे गारठलेले असते. एव्हाना तुमची खाण्यातुन वासना गेलेली असते. डबा परत कसा न्हायचा म्हणुन तुम्ही कसंबसं पोटात ढकलता.

क्षणभर विरंगुळा म्हणुन आलेल्या स्क्रॅप्स, ट्विट्स, मेसेजेसला तुम्ही पटापट उत्तर देऊन टाकता. बॅकेच्या स्टेटमेट्स वर एक नजर जाते. काहीच उरलेले नसते. गलेलठ्ठ दिसणारा पगार इनकम-टॅक्स नामक अक्राळ-विक्राळ भस्मासुराने आधीच गटकलेला असतो. उरलेला पैसा इ.एम.आय ने महीन्याच्या पहिल्या आठवड्यातच उचललेला असतो.

कुणाच्या घरात बारसं, कुणाचे पहिले वाढदिवस, कुणाच्या ऍनीव्हर्सरी, तर कुणाच्या पालकांची साठीचे कार्यक्रम ठरत असतात. तुमच्या दृष्टीने पंचांगाची किंमत शुन्य असते. महत्वाचे असते ते प्रोजेक्ट डेडलाईन्सचे कॅलेंडर.

तुमच्यापैकीच कोणी परदेशात स्थाईक झालेले असता. आपला आनंद, आपले सुख तुम्ही निसर्ग-रम्य स्थळांभोवती, बर्फामध्ये फोटो काढुन, हॅलोविनचे भोपळे हातात घेऊन काढलेले फोटो सोशल-नेटवर्कींग वर शेअर करुन मित्र-मंडळींना जळवु पहाता. तुमच्याकडे बोलण्यासारखे सांगण्यासारखे खुप काही असते. परंतु दिवाळी-दसरा, रक्षाबंधन, श्रावण-सणाला तुमच्याकडचे शब्दच थिजुन जातात. शेअर करण्यासारखे काहीच रहात नाही.
कुठुन आय.टी. मध्ये आलो.. पश्चातापाचा एक विचार पुन्हा एकदा डोक्यात तरळुन जातो. मित्राने एकदा सांगीतलेले असते, ‘अरे तुला माहीत आहे, तो शंकर महादेवन आहे ना, तो संगणक तज्ञ होता आधी!, ओरॅकल मध्ये कामाला होता. पण तो वेळीच बाहेर पडला. आता बघ तो कुठे पोहोचला!.’

तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या आठवतात. ‘लकी गाय’, त्याला शक्य झाले, आपणं कधी बाहेर पडु शकतो या जंजाळातुन?
मौत का कुवा! डोक्यात जुन्या आठवणी जाग्या होतात. तो मोटारसायकल वाला त्या विहीरीत गोल गोल फेऱया मारत असतो. प्रचंड वेगाने, तेच तेच, त्याच त्याच गोष्टी, परंतु प्रचंड एकाग्रता. एक छोटीशी चुक, एक क्षण विश्रांती आणि होत्याचे नव्हते होऊन जाऊ शकते.
थांबला तो संपला….worried

समोरच्या भितीवर लावलेल्या अनेक देशांमधील वेळ दाखवणाऱ्या घड्याळांचे काटे फिरत असतात.. न थांबता.
कंटाळवाण्या मिटींग्ज्स, ट्रेनींग सेशन्स, निरर्थक बडबड डोक्यावर आदळत असतात. तुमचा मौल्यवान वेळ वाया चाललेला असतो.
तुमच्याच ग्रुप मध्ये एक नविन ‘बकरा’ रुजु झालेला असतो. आज पहिलाच दिवस असतो. घड्याळात ७ वाजलेले बघुन तो आवरा-आवर करुन बाहेर पडत असतो. तेवढ्यात मॅनेजर त्याला गाठतो..
‘जा रहे हो?’
‘हा सर!’
वेळ माहीत असुनही घड्याळात एक कटाक्ष..
‘अच्छा ठिके.. जाओ.. वैसेभी तुम्हारा आज पहेला दिन है.. आदरवाईज, धिस इज जस्ट अ हाल्फ डे, इजंट इट?’
त्याची ती थंडगार स्माईल पुन्हा एकदा सर्वांगावर काटा आणते..
वेलकम टु द वर्ल्ड ऑफ आय.टी….happy worried no

संगणकीय भाषा शिकण्याचे १० मुक्त संकेतस्थळे.

नमस्कार मंडळी,

आजच्या जगात संगणक जणू आपला ४ था महत्वपुर्ण घटक होउन बसला आहे. म्हणजे पहिले फ़क्त अन्न, वस्त्र ,निवारा असं होत, पण आता अन्न, वस्त्र ,निवारा आणि संगणक असं झालयं.त्यातही तुम्ही जर अभियंते असाल तर मग काय विचारता. त्यातही IT क्षेत्रात काम करायचं असेल तर मग एक तरी संगणकिय भाषा शिकावीच लागते व त्यावर प्रभुत्व मिळ्वावे लागते. मग त्यासाठी class लावाला लागतो. ते करणे जमले नाही तर….तर काही बिघडत नाही. कारण बर्याच संकेतस्थळावर असे online class भरलेले असतात, तेही विनामुल्य. त्याचा फ़ायदा का न घ्यावा.
चला तर मग बघुया असे १० संकेतस्थळॆ.
१. हे संकेतस्थळ फ़ारच लोकप्रिय आहे.येथे तुम्ही Java फ़ारच छान शिकू शकता. Program run करायसाठी आपल्याला काहिच install कराव लगत नाही. तरिहि तुम्ही program run करुन पाहु शकता.

येथे आपण c,c++ फ़ारच सोप्या पद्धतीने शिकू शकता.
२.

३.

४. http://visualcplus.blogspot.com/
५.ही Java ची official site आहे.

६.तेथुन आपण java script चे नमुने काढुन घेउ शकतो.

७. dot.net साठि उपयुक्त जागा.

८. VB.NET शिकण्यासाठी छान जागा.

खालील संकेतस्थळांवर आपल्याला बर्याच प्रकारच्या भाषा शिकू शकता.
९.

१०.

NTLDR is Missing असा मॅसेज देउन संगणक बंद झाल्यास काय करावे ?

Posted by Nishikant Manugade

जेव्हा कधी आपण आपला संगणक सुरु करतो आपणास
NTLDR is Missing
Press any key to restart

Boot: Couldn't find NTLDR
Please insert another disk

NTLDR is missing
Press Ctrl Alt Del to Restart

असा सन्देश विंडोज कडुन दाखवला जातो तेव्हा आपली NTLDR file परत विंडोज मधे रिस्टोर करवी लागते ती कशी करावी या बदद्ल थोडिशी ही माहीती...

जेव्हा कधी आपण आपला संगणक सुरु करतो आपणास

NTLDR is Missing
Press any key to restart

Boot: Couldn't find NTLDR
Please insert another disk

NTLDR is missing
Press Ctrl Alt Del to Restart

असा सन्देश विंडोज कडुन दाखवला जातो तेव्हा आपली NTLDR file परत विंडोज मधे रिस्टोर करवी लागते ती कशी करावी या बदद्ल थोडिशी ही माहीती...

प्रथम आपण विंडोज एक्स्पी किवा जी कोणती ऑपरेटींग सिस्टीम जी तुमच्या संगणकात ईस्टॉल केली असेल त्याची cd cd drive मधे insert करावी संगणक cd drive ने बुट करावा आनी ऑपरेटींग सिस्टीमच्या सेटअप फाईल कॉपी होउन द्याव्यात आनी जेव्हा तुम्हाला विंडोज कडुन i agree prss F8 असा संदेश दाखविला जाईल त्यानंतर तुम्हाला तो रीपेअर विंडोज साठी विचारणा करेल तेव्हा रीपेअर ऑप्शन सिलेक्ट करुन नंतर cd मधुन NTLDR NTDETECT.COM या फाईल विंडोजच्या root directory मधे पेस्ट करव्यात त्यासाठी पुढील command वापरावेत

copy e:\i386\ntldr c:\

copy e:\i386\ntdetect.com c:\

त्यानतंर तुमचा विंडोज पुनः सुरु करावा
तुमची ऑपरेटींग सिस्टीम व्यवस्त्तीत चालु होईल.

आपल्या संगणकाची सुरक्षितता भाग

  1. फ्लॉपी डिस्क/फ्लॅश मेमरी संगणकात घालून अथवा दुसर्‍या संगणकास आपला संगणक जोडून काही संगणक-विषाणू असलेल्या फाईल्स कॉपी करणे.सर्वसाधारणपणे या कृतीने आपण फक्त विषाणूग्रस्त फाईल आपल्या संगणकावर आणतो. यापुढे यातील एखादी फाईल आपण उघडली अथवा चालू केली तरच विषाणू आपले काम चालू करतो.
    तुलना: ही गोष्ट गॅस चालू ठेवण्यासारखी आहे, भडका उडण्यासाठी फक्त एका ठिणगीची गरज असते.
    उपाय: प्रत्येक वेळी दुसरीकडून फाईल आणायच्या आधी एकदा विषाणू प्रतिबंधक प्रणालीं (अँटीव्हायरस सॉफ्टवेअर) वापरुन त्यात संगणक-विषाणू नसल्याची खात्री करणे.
  2. एखादी अशी सीडी संगणकाच्या ड्राईव्ह मध्ये घालणे की ज्यामध्ये संगणक-विषाणू असलेल्या फाइल्स आहेत.
    ज्या वेळी आपण एखादी सीडी संगणकाच्या ड्राईव्ह मध्ये घालतो, त्यावेळी आपला संगणक आपोआप त्यातील एक विशिष्ट फाईल (असल्यास) चालू करतो. (याचमुळे एखाद्या चित्रपटाची सीडी घातल्यावर आपोआप चित्रपट चालू होतो)
    जर या सीडीवर संगणक-विषाणू असेल तर अर्थातच सीडी घातल्या घातल्या तो आपले काम चालू करतो.
    तुलना: गॅस चालू ठेवणे आणि कडेला समई तेवत असणे.
    उपाय: शक्यतो अधिकृत ठिकाणाहून आणलेल्या सीडी वापरणे, तशी माहिती नसल्यास आपोआप सीडीवरील फाईल चालू करण्याची सोय बंद करणे. हे कसे करावे ते इथे बघा.
  3. इंटरनेट ला आपला संगणक जोडणे.आपल्या संगणकावर अश्या अनेक फाईल्स असतात की ज्या अधुन मधुन इंटरनेटद्वारा एखाद्या संकेतस्थळास माहिती पाठवावयाचा, घ्यावयाचा प्रयत्न करत असतात. ज्यावेळी आपण आपला संगणक इंटरनेटला जोडतो, त्यावेळी त्यांना खरोखरच तसे करता येते. तसेच बाहेर इंटरनेटवर असे अनेक प्रोग्राम्स असतात की जे इंटरनेटला जोडलेल्या संगणकावर घुसण्याचा प्रयत्न करत असतात. आपला संगणक सुरक्षित नसेल तर असे प्रोग्राम्स आपल्या संगणकावर येण्याची शक्यता वाढते.
    तुलना: घराची दारे खिडक्या उघडी टाकून आपण आतल्या एखाद्या खोलीत काम बसून राहणे.
    उपाय: आपल्या संगणकावर फायरवॉल-प्रणाली बसवून घेणे.
  4. संगणकावरील एखादा व्हायरस असलेला प्रोग्राम चालू करणे.आता याबद्दल काही अधिक सांगणे गरजेचे आहे असे मला वाटत नाही.
    तुलना: स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे.
    उपाय: आपल्या संगणकावर एखादी चांगली विषाणू प्रतिबंधक प्रणालीं चालू स्थितीत ठेवणे. अशी प्रणाली त्वरीत संगणक-विषाणू ओळखून हा प्रोग्राम चालू होऊ देत नाही तसेच हे आपल्या निदर्शनास आणते.
  5. इमेल मधुन आलेल्या विषाणू असलेल्या फाईल्स आपल्या संगणकावर उतरवून घेणे: हा प्रकार क्र.१ सारखाच आहे.
  6. आऊटलूक वगैरे प्रकारच्या इमेल-प्रणाली मधुन एखादी व्हायरस असलेली मेल बघणे:
    आऊटलूक एक्सप्रेस मधून मेल बघत असताना, त्यातील फाईल्स ह्या चालू होऊ शकतात. याचाच अर्थ त्यातील विषाणूबाधीत फाईल केवळ ती मेल बघण्यामुळे आपले काम चालू करु शकते. यामुळे केवळ आपल्याच संगणकाला धोका उत्पन्न होत नसुन, हाच विषाणू पुढे आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना पाठवला जाऊ शकतो.
    तुलना: अविश्वासू व्यक्तीकरवी आपली पत्रे पाठवण्याचे, आणण्याचे काम करुन घेणे.
    उपाय: आऊटलूक एक्सप्रेस नं वापरणे. याऐवजी भाग १ मध्ये नमुद केलेल्या प्रणाली वापरणे. अथवा आऊटलूक मध्ये कार्यान्वित होणार्‍या विषाणूंसंबंधी पुर्ण माहिती करुन घेणे. आणि योग्य ती काळजी घेणे.
  7. एखाद्या ब्राऊजर मध्ये एखादी साईट बघत असताना अचानक उपटलेल्या विंडो मध्ये हो(Yes) असे क्लिक करणे:बर्‍याचदा आपण एखादे संकेतस्थळ बघत असताना अचानक एक खिडकी (विंडो) उघडली जाते. ही बहुतेक करुन त्या पानावरील जाहिरातीने उघडलेली असते. आणि त्यात विषाणू असलेल्या फाईल्स असू शकतात. ही अचानक उघडलेली खिडकी अश्या विषाणूग्रस्त फाईलला चालू करु लागते. परंतु आपला ब्राऊजर त्यास तसे करुन देत नाही, आणि तो आपल्यास परवानगी मागतो. आपण जर नं विचार करता परवानगी दिली तर हा विषाणू आपले काम चालू करतो.
    तुलना: कुठल्याही अनोळखी माणसास घरात घेणे.
    उपाय: अशा प्रकारे आलेल्या खिडक्यांमध्ये "हो" वर टिचकी नं मारणे. या प्रकारच्या खिडक्यांना प्रतिबंध करणारी प्रणाली आपल्या संगणकावर कार्‍यान्वित ठेवणे.

sangnak शब्दकोश

प्रत्येक घरात एक स्वयंपाकघर आणि एक शब्दकोश असतो. जगात असा एकही विद्यार्थी नाही की ज्याने कधी शब्दकोश उघडला नाही. नेपोलियन म्हणत असे की माझ्या शब्दकोशात 'अशक्य' हा शब्दच नाही. नेपोलियनला हे कळले कारण त्याने शब्दकोश नक्कीच उघडून बघितला असणार. असा हा शब्दकोश. आपणा प्रत्येकासाठी ती एक गरज असते. हे पिढ्यानुपिढ्या चालत आलं आहे. शब्दकोश हे एकच पुस्तक असे आहे की जे खर्‍या अर्थाने अमर असते. कधीतरी आजोबांच्या काळापासून जपलेला शब्दकोशाचा ग्रंथ नातवालाही उपयोगी पडताना दिसतो. कारण शब्दकोशात दिलेले अर्थ कधी बदलत नाहीत. शब्दकोश फाटला म्हणून नवा आणावा लागतो. अन्यथा त्यातले शब्दार्थ तेच असतात. काही नव्या शब्दांची शब्दकोशात भर जरूर पडते. ती भर हाच काय तो बदल.

घरातला शब्दकोश हातात घेऊन पहा. बिचारा आकाराने जाडजूड असतो, पण त्यातला शब्दांचा टाईप मात्र अगदी बारीक असतो. घरातले आजोबा किंवा कुणी ज्येष्ठ नागरिक असले तर त्यांना तो टाईप वाचण्यासाठी नुसता चष्मा पुरत नाही. चष्म्याबरोबर बहिर्गोल भिंगही लागते. मोठ्या टाईपातला शब्दकोश जगात कुठेच उपलब्ध नाही. त्याचे कारण सरळ आहे, शब्दांचा टाईप मोठा केला तर शब्दकोशाची पाने वाढणार म्हणजे तो आणखी जाडजूड होणार. मग तो हाताळायचा कसा? पाने वाढल्याने त्याची किंमतही वाढणार. ती कशी परवडणार? त्यामुळे शब्दकोश म्हंटला की तो बारीक टायपातला हे ओघानंच आलं.

बारीक टाईप हा शब्दकोशाचा एक न टाळता येण्याजोगा भाग जसा आहे, तसा दुसरा भाग म्हणजे शब्दकोशाचं बाईंडिंग. जा़डजूड शब्दकोश सारखा उघड-बंद करता करता त्याचं बाईंडिंग म्हातारं होऊ लागतं आणि कोंबडीची पिसं गळू लागावी तशी शब्दकोशाची पानं गळू लागतात. ती पानं सांभाळणं म्हणजे एक मोठं दिव्य असतं. शिवाय शब्दकोशाची पानं कालांतरानं पिवळी पडू लागतात.

बारीक टाईप, सुटणारं बाईंडिंग आणि पिवळी पडणारी पानं ह्या समस्यांपासून मात्र आता आपल्याला मुक्ती मिळाली आहे. ही मुक्ती आपल्या संगणकाने म्हणजे काँप्युटरने दिली आहे. संगणकावरच्या शब्दकोशातील टाईप आपल्याला मोठा करून पाहण्याची सोय असते. त्याला बाईंडिंग नसल्याने त्याची पाने सुटत नाहीत, किंवा कालांतराने ती पिवळीही पडत नाहीत. अशी ऑक्सफर्ड किंवा वेबस्टर डिक्शनरी आता सीडीवर उपलब्ध आहे. त्यात आपल्याला गुगलच्या पद्धतीने शब्द शोधता येतात. अशी डिक्शनरी सीडीवर उपलब्ध असल्याने ती कुठेही नेता येते. पटकन लॅपटॉपमध्ये घातली की कुठेही ती उघडता येते. संगणकाने हा जो सीडीवरचा शब्दकोश दिला आहे ते खरंच आपणा सर्वांसाठी एक मोठं वरदान आहे.

मला माहीत आहे की ह्या टप्प्यावर तुम्ही मला हमखास एक ठरलेला प्रश्न विचारणार आहात. इंग्रजी शब्दांचा अर्थ इंग्रजीत देणार्‍या डिक्शनरीज सीडीवर उपलब्ध आहेत. पण मराठी शब्दाचा इंग्रजीत अर्थ देणारी म्हणजे मराठी इन टू इंग्लीश डिक्शनरी सीडीवर उपलब्धच नाही. ज्यांना मराठी - इंग्रजी शब्दकोशाची सीडी हवी आहे, त्यांनी काय करायचं? तुमचा हा प्रश्न अगदी शंभर नंबरी खरा आहे. वाचकहो, आजपर्यंत मूळातच अशी मराठी - इंग्रजी शब्दकोशाची सीडी कुठे उपलब्ध नव्हतीच. पण आता युनिकोड फाँटच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते शक्य झाले आहे. नवी मुंबईतील संगणक प्रकाशन ह्या संस्थेने मोल्सवर्थकृत इंग्रजी मराठी शब्दकोश नुकताच सीडीवर आणला आहे. ह्या सीडीची संपूर्ण माहिती www.molesworth.sanganak.in ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

हा शब्दकोश अनेक दृष्टींनी उपयुक्त आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याची किंमत वाजवी म्हणजे फक्त रू.१००/- (टपाल खर्चासह) आहे. त्यात एकूण ६०,००० शब्दांचे अर्थ आहेत. युनिकोड फाँट वापरून त्यात मराठी शब्दांचा सर्च देखील उपलब्ध करण्यांत आला आहे. स्क्रीनवर वाचण्यासाठी टाईप लहान मोठा करण्याची सोय त्यात दिली आहे. मुख्य म्हणजे हा शब्दकोश मोल्सवर्थ यांचा म्हणजे जगप्रसिद्ध असा शब्दकोश आहे. मोल्सवर्थ हे एक ब्रिटीश सैन्याधिकारी. जन्माने ब्रिटीश असले तरी ते मराठी भाषेचे तज्ज्ञ होते. कित्येक वर्षे परिश्रम करून व कित्येक तज्ज्ञ व विद्वानांची मदत घेऊन त्यांनी हा शब्दकोश इंग्रजांच्या काळात तयार केला. १८५७ मध्ये त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. ती अतिशय लोकप्रियही झाली. मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ देणारे शब्दकोश हाताच्या बोटावर मोजावे एवढे कमी आहेत. जे आहेत त्यांची तुलना मोल्सवर्थ शब्दकोशाशी केली तर दिसतं की मोल्सवर्थ शब्दकोश हा मराठी - इंग्रजी शब्दकोशांचा राजा आहे. त्याला पर्याय नाही. १८५७ नंतर मोल्सवर्थ शब्दकोशाच्या आवृत्त्या पुस्तक रूपाने प्रकाशित होत राहिल्या. आज मात्र त्या आवृत्त्या दुर्मिळ झाल्या आहेत. सहजासहजी त्या उपलब्ध होत नाहीत. शेवटची आवृत्ती ग्रंथरूपात सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाली होती. मात्र त्याची किंमत रू.५५०/- असल्याने बहुधा तिचा प्रचार सर्वदूर झाला नाही.

मात्र आता २००९ मध्ये मोल्सवर्थ मराठी - इंग्रजी शब्दकोश सीडी रूपात प्रकाशित झाल्याने वाचक आणि विद्यार्थी दोघांनाही फार मोठा दिलासा मिळाला आहे. संगणक प्रकाशनाकडील ह्या शब्दकोश सीडींचा साठा संपण्या अगोदर आपली स्वतःची एक प्रत नोंदवायलाच हवी. ही सीडी ते पोस्टाने पाठवतात. त्याची माहिती www.molesworth.sanganak.in ह्या साईटवर उपलब्ध आहे. मराठीतला हा पहिला शब्दकोश आहे. शिवाय तो वापरायलाही सोपा आहे. कायम स्वरूपी उपयोगी पडणारा हा शब्दकोश आहे.

आता हजारपट वेगाने चालेल आपला संगणक व स्मार्टफोन


आयबीएम कंपनीने एका विशिष्ट प्रकारच्या ग्लूपासून सिलिकॉन चीपचा मोठा डोंगर उभार करण्याचा निर्णय घेतला आहे. या चीपच्या सहाय्याने संगणक आणि स्मार्टफोनचा वेग हजारपटीने वाढू शकेल.

आयबीएम कंपनीने ग्लू तयार करणार्‍या एका कंपनीसोबत हातमिळवणी करून ‘सिलिकॉन स्कायस्क्रॅपर चीप’ असणारे संगणक तयार करण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये एकावर एक सिलिकॉन चीप ठेवत डोंगर उभा करण्यात येईल. त्याच्या साहाय्याने स्मार्ट फोन आणि संगणक आजच्या तुलनेत हजारपट जास्त वेगाने काम करू शकेल.

ग्लू कंपनीचीच निवड का केली?- 3 एम नावाची कंपनी जगातील अशा थोड्याफार कंपन्यांपैकी एक आहे, जिने तयार केलेला ग्लू अधिक तापमानातही विरघळत नाही. त्यामुळेच आयबीएम कंपनीने सिलिकॉन चीपचा डोंगर उभा करण्यासाठी या कंपनीशी करार केला.

सध्याच्या तंत्रज्ञानामध्ये काय चुका आहेत ?- एकावर एक चीप ठेवून संगणकाला वेग देण्याचा प्रयत्न नुकताच करण्यात आला आहे. ‘थ्री-डी’ पॅकेजिंग नावाचे हे तंत्र ओव्हरहीटिंगने यशस्वी होऊ दिले नाही. तापमान वाढताच चीप धूर ओकू लागते, ज्यामुळे आग लागते.

ग्लूचे वैशिष्ट्य काय ?- 3 एम कंपनीने तयार केलेला ग्लू तापमानाची विभागणी समप्रमाणात करतो. अशा प्रकारे खालच्या चीपपर्यंत तो पोहोचत नाही. यामुळे सर्किट थंड राहते; परंतु त्याचा वेग हजारपटीने वाढतो.

बाजारात कधी येईल ?- 100 चीप असलेले ‘सिलिकॉन स्कायस्क्रॅपर’ 2013 मध्ये बाजारात येईल, असे आयबीएमने सांगितले.

संगणकावरून मोबाईला फुकट मेसेज पाठवा

संगणकावरून मोबाईला फुकट मेसेज पाठवा !!!

In आजची वेबसाइट, मी, मोफत, संगणक on जुलै 1, 2009 at 6:08 pm
फू एस एम एस

फू एस एम एस

संगणकावरून मोबाईला फुकट मेसेज पाठवणे शक्य आहे. फू एस एम एस नावाची वेबसाइट ही सेवा मोफत पुरवते.
यात कुठेही नाव नोंदणी, किंवा कोणत्याच प्रकारची बंधने नाहीत.




foosms-sender
‘Send to Mobile Number’ दिलेल्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी (ज्या क्रमांकाला) मेसेज पाठवायचा असेल, तो क्रमांक टाका. त्याच्या खालच्या राकण्यात ‘Your message’ आपल्याला जो मेसेज करायचा असेल तो टाकावा. यात शब्द मर्यादा 120 शब्दांची आहे. खाली दिलेल्या सेंड बटनावर क्लिक करून मेसेज सेंड करावा. मेसेज पाठवल्यावर मेसेज सेंड असा संदेश येतो. तर मग करा सुरवात..