Thursday, 22 September 2011

प्रिंटर

मोँनिटरच्या स्क्रीन वर जी माहिती मिळते त्यास आउटपुट असे म्हणतात .हा आउटपुट संगणक बंद केला की दिसेनासा होतो . स्क्रीन वर , हार्ड डिस्क , फ्लोपी डिस्क वर मिळणाऱ्या माहिती मध्ये पाहिजे तेव्हा बदल करता येतो म्हणुन अशा माहितीला सॉफ्ट कॉपी असे म्हणतात . संगणका मधून अशी माहिती प्रिंटर या प्रदान म्हणजेच आउटपुट डिवाइस मधून कागदावर छापता येते . प्रिंटर ने छापलेली माहिती तशीच राहते म्हणुन त्या माहितीला हार्ड कॉपी असे म्हणतात. प्रिंटर हे परेलाल किवा यूएसबी केबल द्वारे CPU मध्ये मदर बोर्ड ला जोडले जाते .

प्रिंटर चे सध्या ३ भाग प्रचलित आहेत .

1) डॉट मेट्रिक्स प्रिंटर :-
ह्या प्रिंटर मधी अक्षरे अनेक टिम्बाच्या स्वरूपात छापली जातात. गोल बारीक़ पिन्सची एक किवा दोन लाइनची मालीका असते . प्रतेक पिन स्वतन्त्र पणे शाईच्या रिबिन्वर आघात करते . त्या मुळे रिबिन्वारिल शाईचा ठपका कागदावर उमटतो . संगणकाच्या संदेशा प्रमाने पिन्स रिबिन वर जलद गतीने आघात करतात त्या मुळे कागदावर टीबाच्या स्वरूपात अक्षरे उमटतात .
डॉट मेट्रिक्स प्रिंटर हे कमी खर्चाचे असतात . पण प्रिंटिंगच्या वेळी खुप मोठा आवाज करत प्रिंटिंग करतात . बँकेच्या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रिंटर वापरले जातात

२) इंक जेट प्रिंटर :-

हे प्रिंटर शाईच्या तुषार जल्द गतीने फवार्य सारखे उडतात .इंकच्या तुषार सूक्ष्म छिद्रांच्या नॉझल्सने कागदावर उडवले जातात .यात नोझल्सच्या मदतीने योग्य प्रमाणात चार प्राथमिक रंग मिसळुन रंगित प्रिंट करता येते .
३) लेझर प्रिंटर :-
हे प्रिंटर छापाईसाठी लेझर किरणांचा वापर करतात. संगणका कडून येणार्या माहिती नुसार हे लेझर किरण सतत गोल फिरणारया ड्रमवर पडली जाते . या लेझर किरण मुळे ड्रमवर स्थिर विद्युत प्रभाराचे ठिपके तयार होतात . ड्रमच्या लगत असलेली कोरडी शाईची भुकटी (टोनर) ड्रम वरील विद्युत् प्रभारित कागदावर मचकुराच्या ओळी किवा चित्राचे भाग तयार होतात .
सध्या ओल इन वन (All In One ) प्रिंटरला जास्त मागणी आहे कारण हयात सर्व प्रकारचे Function आहेत . झेरोक्स , स्कैनर , प्रिंटर , फैक्स अशा सर्व गोष्टी एकात मिळतात ह्या मुळे अशा प्रिंटरला जास्त डिमांड आहे .

No comments:

Post a Comment