आपण जेव्हा कॉम्प्युटर बंद करण्यासाठी 'Turn Off Computer' ची सुचना देतो तेव्हा प्रत्यक्ष्यात कॉम्प्युटरमध्ये 'कॉम्प्युटर बंद होण्याचा प्रोग्राम' सुरु होतो. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण विंडोजमध्ये निरनिराळे प्रोग्राम/सॉफ्टवेअर सुरु करतो त्याचप्रमाणे कॉम्प्युटर बंद करताना देखिल त्याचप्रमाणे बंद होण्याचा प्रोग्राम सुरु होतो. काम करण्याच्या पद्धतीजरी सर्वांच्या निरनिराळ्या असल्यातरी कॉम्प्युटर बंद करताना सर्वजण एकाच पद्धतीने Start बटणावरील 'Turn Off Computer' या विभागाद्वारे कॉम्प्युटर बंद करतात. २. आता आपल्यासमोर Create Shortcut चा चौकोन सुरु होईल त्यातील खालील चित्रामध्ये दाखविलेल्या जागेत Shutdown -s -t 03 -c "Bye Bye !" हे टाईप करा आणि खालील Next > या बटणावर क्लिक करा. ३. आता आपल्यासमोर येणार्या चौकोनात खालील चित्रामध्ये दाखविलेल्या जागेत 'Shut Down' असे टाईप करा व खालील 'Finish' बटणावर क्लिक करा. ४. आता डेस्कटॉपवर 'Shut Down' नावाचा आयकॉन तयार होईल. त्याला माऊसने दाबून ( Draging ) विंडोजवरील Task Bar मधिल ' Quick Launch ' या विभागामध्ये नेवून सोडा. असे केल्याने त्याजागेमध्ये कॉम्प्युटर बंद करण्यासाठी एक शॉर्टकट आयकॉन तयार होईल. ५. बस्स. इतकेच करायचे आहे. आता यापूढे जेव्हा आपणास कॉम्प्युटर बंद करायचा असेल तेव्हा फक्त या छोट्या आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे कॉम्प्युटर बंद होईल. टीप : याच प्रमाणे कॉम्प्युटर बंद करुन सुरु (Restart) करण्यासाठी Shutdown -t असे देवून आपण नविन शॉर्टकट आयकॉन बनवू शकता. | |
---|---|
Wednesday, 23 November 2011
एका क्लिकने कॉम्प्युटर बंद करा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment