एक गोष्ट मला खुप दिवसापासुन सतावत होती. ती म्हणजे इंटरनेटवर एखादी फाईल पाठवण्याची. अगदी साधी वर्ड फाईल असुदे किंवा फोटो काही पाठवायचे झाले की माझ्या कपाळावर आठया आल्याच म्हणुन समजा.
पण शेवटी माझा हा प्रश्न सोडवणारा एक उपाय मला सापडलाच ! त्याचे नाव आहे "जेटबाईट्स" (Jetbytes.com)

दुसरा मार्ग म्हणजे, विविध फाईल शेअरींग साईट्स वर आधी फाईल अपलोड करा. आणि मग त्यांनी दीलेली लिंक पाठवा. फाईलच्या आकारामुळे येणारे प्रॉब्लेम जरी सुटले असले तरी या प्रकाराचे काही तोटे आहेतच. एकतर अशा साईट्सवर रजीस्ट्रेशन करावे लागते आणि फाइल अपलोड होण्यासाठी प्रचंड वेळ लागतो.
पण मित्रहो, जेटबाईट्सने हे सर्व प्रॉब्लेम्स मुळापासुन नष्ट केले आहेत.
जेटबाईट्स कसे काम करते?
2. मग तेथुन जी फाईल पाठवायची आहे तिथे जा
. (Browse to the location of file in your computer)
3. Jetbytes लगेचच एक वेबलिंक बनवेल. (फक्त 1-2 सेकंदातच !)
4. ही वेबलिंक कॉपी करा आणि तुम्हाला जिथे पाठवायची असेल तेथे ई-मेल्ल करा
.
5. ई-मेल मिळाल्यानंतर या लिंकवर क्लिक केल्यास त्या फाईलचे आपोआप डाउनलोड सुरु होइल.
1. जेटबाईट्स पुर्णपणे मोफत आहे.
2. अधीक जलद आहे.
3. कोणत्याही रजीस्ट्रेशनची गरज नाही
4. वापरावयास खुप सोपे आहे. मोफत वस्तुंकडुन यापेक्षा अधीक काय पाहीजे
No comments:
Post a Comment