Thursday, 5 January 2012

मराठी टायपिंगसाठी सर्वात सोपा पर्याय

1) मराठी टायपिंग साठी आतापर्यंत ब-याच सुविधा उपलब्ध होत्या. त्यातले वेगवेगळे 
   पर्याय मी स्वत: वापरून देखील बघितले होते. पण गुगलने उपलब्ध केलेली मराठी 
   टायपिंग साठी सुविधा सर्वात चांगला आणि सोपा पर्याय मला वाटला. खाली दिलेल्या 
   लिंकवर जाऊन आपण नॉर्मल रोमनमध्ये ज्या प्रकारे मराठी टाईप करतो त्याप्रमाणे 
   टाईप केली तरी ती युनिकोड मध्ये व्यवस्थित रुपांतरीत केली जाते. 
   उदा : 
        भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम 
        आहे. जय हिंद. 
 
2) वरील सगळी वाक्ये हि मला अशीच देवनागरीत लिहियाची झाल्यास मला फक्त खाली 
    दिलेल्या लिंकवर जाऊन असा टाईप करावं लागेल. 

    bharat majha desh ahe. sare bhartiy majhe bandhav ahet. majhya deshavar 
    majhe prem ahe. jay hind. 

3)  इतकं सरळ साधं सोपं आहे मराठी टायपिंग. 
    मला खात्री आहे गुगलच्या या सुविधेमुळे तुम्ही सर्व जण इंटरनेट वर जास्तीत 
    जास्त मराठी वापराल. 
 . 
   खाली दिलेल्या लिंकवर मराठी टायपिंग उपलब्ध आहे. 
     http://www.google.com/transliterate/indic/Marathi 

No comments:

Post a Comment