Saturday, 7 January 2012

गूगलतर्फे क्रोम ऑपरेटिंग सिस्टिम (OS) चा आरंभ


1)  गूगल ने आपल्या गूगल क्रोम ह्या नवीन ऑपरेटिंग सिस्टिमची चाचणी आवृत्ती वापरात आणली आहे. ही इंटरनेटवर आधारित OS असल्याने भारतात संगणकाच्या किंमती 25% ने कमी होऊ शकतील. क्रोम OS हे फुकट मिळणारे सॉफ्टवेअर आहे असे गूगलमधील उत्पादन-व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष श्री. सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले. संगणकाच्या एकूण किंमतीपैकी सुमारे चौथा किंवा पाचवा हिस्सा OS चा असतो. गूगलची ही OS मुळातच फुकट असल्याने 2011 सालात संगणकांच्या किंमती त्या प्रमाणात घसरतील असे दिसते. उदाहरणार्थ 22,000 रु. किंमतीच्या संगणकातील OS ची किंमत सुमारे 4,000 रु. असते. त्याचप्रमाणे ग्राहकास Microsoft Windows 7 Home Basic version ची किंमत सुमारे 5,690 रू. तर Windows 7 Ultimate ची किंमत सुमारे 11,190 रु. पडते.


2) गूगल क्रोम मुळे संगणकांच्या किंमती खूपच कमी होतील – अर्थात त्यासाठी ही OS ओपन सोर्स उर्फ मुक्तस्रोत प्रकारची असली पाहिजे म्हणजे तिच्यावर कोणत्याही परवाना शुल्काचा बोजा असून उपयोगी नाही असे प्रोटिव्हिटी कौन्सेलिंगचे श्री. पंकज अरोरा म्हणाले.
किंमतींचा मुद्दा सोडला तरी गूगल क्रोम OS वापरणार्यांरना इतरही काही फायदे मिळू शकतात – उदा. हे सॉफ्टवेअर स्थापित (इंस्टॉल) करण्याची गरज नाही. त्याऐवजी संगणकाद्वारे इंटरनेटवरून मिळणार्याे ऍप्लिकेशन्सचा वापर केला जातो व ह्यामुळे वापरकर्त्याला कोणत्याही संगणकावरून आपल्या फाइल्स व ऍप्लिकेशन्सपर्यंत पोहोचता येते. क्रोम असलेले संगणक कमी वेळात सुरू होऊन वापरकर्त्याला 10 सेकंदांत एखाद्या इंटरनेट ब्राउझरपर्यंत पोहोचवतात. ज्या वापरकर्त्यांना माहिती सतत नोंदावी किंवा वापरावी लागते परंतु त्यांना एका जागी बसणे शक्य नसते अशांसाठी क्रोम आदर्श आहे असे तांत्रिक सल्लासेवा देणार्याए ओव्हम ह्या कंपनीचे म्हणणे आहे. मूलतः क्रोम नोटबुक प्रकारच्या संगणकांसाठी बनवलेले असले तरी डेस्कटॉप व लॅपटॉपनाही ते उपयोगी आहे कारण ते X86 (Intel Pentium, Atom समूह) आणि ARM चिप अशा दोन्ही प्रकारच्या सिस्टिम्सवर चालते. ह्याखेरीज गूगलने आणखीही काही बाबी ह्यात देऊ केल्या आहेत - स्प्रेडशीट्ससाठी Docs तर वर्ड प्रोसेसर आणि PDF साठी रीडर. ब्राउझरच्या साहाय्याने वापरकर्ते इतर सामाईक सुविधांचा उपयोग करू शकतील – उदा. कॅलक्युलेटर, Face book व YouTube साठीचे टॅब्ज, सुरक्षा-प्रणाली इ

No comments:

Post a Comment