Tuesday, 17 January 2012

इंटरनेट म्ह्णजे काय

जगभरातले सर्वात मोठे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय. जगभरातील संगणक जेव्हा सॅटेलाईट आणि फायबर ऑप्टीक केबलद्वारे जोडले जाते तेव्हा नेटवर्कचे जाळे तयार होते. इंटरनेट ही जगप्रसिध्द संपर्क सेवा मानली जाते. सध्या इंटरनेट हे लोकप्रिय नेटवर्क बनले आहे. ज्याद्वारे एका देशातीलच नव्हे तर संपुर्ण जगाभरातील लोक जवळ आले आहे. इंटरनेरटमुळे असंख्य संगणक एकमेकांशी जोडले गेले आहे.
थोडक्यात सांगायचे झाले तर जगभरातल्या छोट्या छोट्या नेटवर्कला जोडणारे मोठे नेटवर्कचे जाळे म्हणजेच इंटरनेट होय. यामुळे छोट्या गावापसुन ते मोठ्यातल्या मोठ्या देशातील लोकांशी आपण जोडले जाऊन अतिशय कमीवेळेत संवाद साधाता येतो. आज इंटरनेट हे संवाद साधण्याचेच नव्हे तर ज्ञान मिळविण्यासाठीचे प्रभावी व उत्तम माध्यम बनले आहे. हे नेटवर्क कुठल्याही खाजगी संस्थेच्या मालकीचे नसुन समाजसेवेच्या माध्यमातुन बनवले गेले आहे. म्हणजेच इंटरनेट हे लोकांनी लोकांसाठी उपलब्ध करुन दिलेले माहितीचे जाळे आहे.
इंटरनेटविषयी अधिक माहिती घेण्याआधी आपण नेटवर्क म्हणजे काय? व नेटवर्कचे प्रकार अभ्यासु.
नेटवर्क- ज्या संपर्क यंत्रणेमुळे दोन किंवा अधिक संगणक एकमेकांना वैशिट्य पुर्ण पध्दतीने जोडले जातात ज्यामुळे माहितीची देवाण-घेवाण होते त्यालाच नेटवर्क असे म्हणतात. नेटवर्कींग मध्ये अनेक संगणक हे माहिती संदेश वहन करण्याच्या उद्देशातुन जोडले जातात.
संगणकाची जोडणी करण्याच्या पध्दतीत व विस्तार क्षेत्राप्रमाणे तीन प्रकार पडतात. त्यांना टोपोलॉजी असे म्हणतात. टोपोलॉजी म्हणजे नेटवर्कींग मध्ये संगणकाची केलेली जोडणी किंवा व्यवस्थापन होय.
१) लॅन- लॅन टोपोलॉजी म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. लॅन मध्ये स्थानिक पातळीवर संगणकाची जोडणी केलेली असते. ज्यामध्ये एकाच परिसरातील कार्यालय, दवाखाने, इमारती मधील संगणक हे ऑप्टीकल फायबर केबल च्या सहाय्याने जोडलेली असतात. लॅनच्या जोडणीसंदर्भात भौगोलि़क मर्यादा असतात.
वरील प्रमाणे माहिती संदेशवहनासाठी विशिष्ट प्रकारे जोडणी करण्याच्या पध्दतीलाच टोपोलॉजी असे म्हणतात. यामध्ये संगणकाचे स्थान व जोडणी हे घटक लक्षात घेता लॅनचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले जाते.
लॅनचे वर्गीकरण

अ) बस टोपोलॉजी- बस टोपोलॉजी मधील संगणक हे केबलच्या सहाय्याने एका सरळ रेषेत जोडलेले असतात. या जोडणीसाठी साधी केबल वापरली जाते. त्याचप्रमाणे संगणकाची संख्या देखील मर्यादित असल्याने माहितीची देवाण-घेवाण अधिक गतीने होते.
ब) रिंग टोपोलॉजी- रिंग टोपोलॉजी मध्ये संगणकाची जोडणी ही एखाद्या रिंगप्रमाणे वर्तुळाकार पध्दतीमध्ये केलेली असते. त्यामुळे माहितीची देवाण-घेवाण ही वर्तुळाकार दिशेने म्हणजेच एका संगणकाकडुन दुसर्या संगणकामध्ये पाठविली जाते. यामध्ये प्रत्येक संगणकामधील माहितीचा अँड्रेस वाचला जातो. या टोपोलॉजीमध्ये मध्यभागी संगणकाची गरज नसते. त्यामुळे केंद्रस्थानी नियंत्रण नसल्याने त्यामध्ये बिघाड झाल्यास तो शोधणे अवघड जाते.
क) स्टार टोपोलॉजी- स्टार टोपोलॉजी ही बर्याचदा एक किंवा अधिक लहान संगणक वापरुन एका मोठ्या संगणकाच्या जोडणीसाठी वापरले जातात. अनेक ठिकाणच्या लॅनमध्ये स्टार टोपोलॉजी वापरली जाते. ज्यामध्ये केंद्रस्थानी असलेल्या संगणकामधील माहिती इतर संगणकांमध्ये शेअर केली जाते. या टोपोलॉजीमध्ये केंद्रस्थानी एक संगणक असुन इतर संगणक हे स्टारच्या आकारात जोडलेले असतात. त्यालाच हब असेही म्हणातात. यामधील संगणक हे सर्व्हरशी स्वतंत्रपणे माहितीची देवाण-घेवाण करु शकतात.
या टोपोलॉजीमध्ये हब म्हणजेच्व्ह मध्यवर्ती विद्युत साधनांमुळे संपुर्ण यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. त्याचप्रमाणे एखाद्या संगणकात बिघाड झाला तरी इतर यंत्रणा चालु असते. परंतु मध्यवर्ती उपकरणामध्ये बिघाड झाल्यास संपुर्ण यंत्रणा बंद पडते. याबरोबरच संगणकाच्या संख्येमध्ये वाढ झाल्यास कामाची गती कमी होत जाते. अधा प्रकारे लॅनच्या वेगवेगळया जोडणीमुळे माहितीची देवाण-घेवाण, यंत्रणेची समान विभागणी, कामाची गती व कर्यक्षमता यासाठी उपयोग होतो.
२) मॅन- मॅनचे विस्तारित स्वरुप म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क होय. मेट्रोपॉलिटन एरिया हा एक संपुर्ण शहरी विभागासाठी असुन यामध्येही क्षेत्र मर्यादा असते. मॅन हे लॅन प्रमाणेच जोडलेले असते. परंतु माहितीचे संप्रेषण अधिक गतीशील असते. मॅन हे अनेक लॅनचे एकत्रीकरण आहे. एका शहरामधील विविध एरियामध्ये असलेले छोटे छोटे लॅन टोपोलॉजीचे विस्तारित स्वरुप म्हणजेच मॅन होय.
३) वॅन-वॅनला वाईड एरिया नेटवर्क असे म्हटले जाते. हजारो लॅन, मॅन यांच्या एकत्रीकरणातुन विस्तारित स्वरुपाचे नेटवर्क म्हणजेच नेटवर्क होय. वॅनच्या जोडणीलाच इंटरनेट असे म्हटले जाते. फक्त एका देशातील राज्य, शहरे नव्हे तर संपुर्ण देशभरातील संगणक हे नेटवर्कमध्ये जोडले जातात. वॅनमध्ये भौगोलिक मर्यादा नसते. ही सर्व संगणकाची जोडणी उपग्रहाद्वारे संदेशवहन होते. वॅनच्या जोडणीसाठी विशिष्ट साधने आवश्यक असतात. त्यामध्ये मॉडेम, इंटरनेट सर्व्हिस सेवा, ब्राऊझर, टेलिफोन माध्यम इ.

No comments:

Post a Comment