Tuesday, 17 January 2012

इंटरनेट रचना

१) ISP- इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स हे ISP चे विस्तारित स्वरुप आहे. इंटरनेटच्या वापरासाठी इंटरनेट सेवेची आवश्यकता असते. आज इंटरनेट सेवा पुरविण्यार्या अनेक संस्था आहेत. त्यांनाच इंटरनेट सर्विस प्रोव्हायड म्हणतात. भारतात विदेश संचार निगम लिमिटेड (VSNL) ही कंपनी इंटरनेट सेवा देऊ लागली. यासाठी मोडेम, टेलिफोन सेवा यांची आवश्यकता असते. त्यानंतर कोऑक्सियल फायबर ऑप्टीक केबल च्या वापरातुन इंटरनेट सेवा अधिक वेगवान होऊ लागली. आणि त्या सेवेलाच ब्रॉडबँड सेवा म्हणतात.
सध्या WiFi ही प्रचलित इंटरनेट सेवा अस्तित्वात आली आहे. जी केबलशिवाय सेवा पुरविते. वायफाय च्या माध्यमातुन इंटरनेट सेवा ज्या ठिकाणी मिळते त्याठिकाणाला हॉटस्पॉट म्हणतात. या पध्दतीने गाव, शहरे इंटरनेटने जोडली जातात.
२) सर्व्हर- इंटरनेटशी जोडल्या जाणार्या संगणकांना सर्व्हर म्हणतात. हे सर्व्हर अत्यंत वेगवान असल्याने माहितीचे स्थलांतर वेगात होते. आणि त्यांची जोडणी केबल्स द्वारे केलेली असते. आणि या संगणकांना टेलिफोन लाईन्सच्या मदतीने हजारो व्यक्तीगत संगणक (Personal Computer) इंटरनेटशी जोडले जातात.
सर्व्हर्स संगणकाचे वेगवान गतीने माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रचंड मोठया केबल्स जोडल्या जातात. या केबलचे जाळे व संगणक यांना इंटरनेटचा कणा म्हणजेच बॅकबोन म्हणतात. सर्व देशांतील नेटवर्क्स सर्व्हर्सच्या सहाय्याने बॅकबोनला जोडलेले असतात.
३) क्लाइंट- सर्व्हर संगणकांना टेलिफोन लाईनच्या सहाय्याने हजारो संगणक इंटरनेटशी जोडले जातात त्यांना क्लाइंट म्हणजे प्रत्येक व्यक्तीगत संगणक जो इंटरनेट सर्व्हिस साठी एखाद्या मुख्य सर्व्हर शी जोडला जातो. त्यांना क्लाइंट म्हणतात.
४) मोडेम- इंटरनेट नेटवर्कच्या जोडणीमध्ये मोडेमची आवश्यकता असते. मोडेम हा शब्द Modulation व Demodulation या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातुन तयार झालेला आहे. ते म्हणजे Mod+dem= Modem नेटवर्कमधील संगणक हे एकमेकांना टेलिफोन्स च्या तारांनी जोडले जाते. या टेलिफोनच्या तारांमधुन नेहमी डिजीटल सिग्नल (० व १) मध्ये संकेत संगणकाकडे पाठविले जाते. यामध्ये डिजीटल सिग्नलचे अँनॉलॉग सिग्नलमध्ये तर अँनॉलॉग सिग्नलचे डिजीटल सिग्नल रुपांतर होवुन वहन होत असते. यावरुन डिजीटल सिग्नलचे अँनॉलॉग सिग्नलमध्ये रुपांतर होणार्या क्रियेला मॉड्युलेशन म्हणतात. तर मोडेम हे अँनॉलॉग सिग्नलचे रुपांतर डिजीटल सिग्नलमध्ये करुन संगणकामध्ये संकेत पाठवितो त्यास डिमॉड्युलेशन म्हणतात.
५) टेलिफोन कनेक्शन - इंटरनेट नेटवर्क हे सिग्नल द्वारे माहितीचे वहन करतात.त्यामुळे नेटवर्कमधील संगणक हे इंटरनेटशी टेलिफोन तारांनी जोडले जाते. हे टेलिफोन कनेक्शन संगणकांना मोडेमच्या माध्यमातुन माहिती पुरविते. टेलिफोन तारांमधुन येणारे सिग्नल मोडेम मधुन संगणकाकडे जातात. आणि संगणकाकडुन पाठविलेले संकेत मोडेम मधुन पुन्हा टेलिफोन तारांकडे पाठवले जातात.
थोडक्यात इंटरनेट व संगणक यांच्यामधील माहितीची देवाण-घेवाण ही टेलिफोन तारांच्या माध्यमातुन केली जाते. त्यामुळे टेलिफोन कनेक्शन हे इंटरनेट नेटवर्कसाठी आवश्यक उपकरण आहे.
६) ब्राउजर- इंटरनेट नेटवर्कमधील व्यक्तीगत संगणकावर इंटरनेटवरील मजकुर, चित्रे, ध्वनी अशी वेगवेगळ्या स्वरुपातील माहिती बघण्यासाठी ज्या विशेष सॉफ्टवेअर प्रोग्रामची गरज असते त्यालाच ब्राउजर असे म्हणतात. या ब्राउजर्स प्रोग्रामच्या मदतीने इंटरनेट वापरकर्त्यांना इंटरनेटवरील माहिती हाताळण्यासाठी प्रवेश दिला जातो.थोडक्यात या ब्राउजर प्रोग्रामच्या मदतीने वापरकर्ता इंटरनेटवरील पेजेस हाताळु शकतो.
सध्या बाजारामध्ये अनेक ब्राउजिंग प्रोग्राम्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला फायरफॉक्स नेटस्केप निव्हिगेटर हे ब्राउजर अतिशय प्रचलित आहेत.

No comments:

Post a Comment